गझल कार्यशाळा - निमंत्रण

Submitted by वैभव_जोशी on 13 September, 2008 - 03:11

मित्रांनो ,

मायबोली मराठी गज़ल कार्यशाळा -२, दि. १६/०९/२००८ पासून आरंभ होत आहे. ही कार्यशाळा कशी चालेल यासंदर्भात काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे

१) ह्या कार्यशाळेत मायबोलीचा कुठलाही सदस्य भाग घेऊ शकतो.
२) ह्या कार्यशाळेसाठी लिहीलेल्या गज़ल kaaryashaalaa08@maayboli.com
ह्या पत्त्यावर पाठवाव्यात .
३) ह्या गज़ल ४ गज़लकार व एक संगीतकार यांनी मिळून बनलेल्या समितीतर्फे तपासल्या जातील.
४) निर्दोष गज़ल सदस्याच्या नावाशिवाय प्रकाशित होतील.
५) प्रकाशित गज़लवर वाचकांचा कौल घेण्यात येईल.
६) वाचकांच्या मताला ५०% महत्त्व असेल व उर्वरित ५० % समितीकडे आरक्षित असतील.
७) ह्या कार्यशाळेतील काही निवडक गज़लांचा मायबोली प्रातिनिधिक गज़ल संग्रहात समावेश करण्यात येईल . हा संग्रह पीडीएफ स्वरुपात मायबोलीवर दिवाळी अंकासोबत उपलब्ध करून देण्यात येईल .
८) ह्या कार्यशाळेतील विजेता , उपविजेता व एक् उत्तेजनार्थ अशा तीन गज़लकारांना मायबोली स्मरणचिन्ह देण्यात येईल.
९) ह्या कार्यशाळेतील विजेत्याची मुलाखत मायबोलीच्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्यात येईल.
१०) ह्या कार्यशाळेसाठी नावनोंदणी वर दिलेल्या ई-पत्त्यावर दि. १८/०९/२००८ पर्यंत सुरू असेल.

मित्रांनो

पहिल्या गज़ल कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रेरित होऊन आपण हा उपक्रम हाती घेतला आहे. ही कार्यशाळा पहिल्या कार्यशाळेपेक्षा थोडीशी वेगळी व आणखीन मनोरंजक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच कार्यशाळेचा तपशील जाहीर करत आहोत. तरी सर्व सदस्यमित्रांनी लवकरात लवकर नाव नोंदविण्यास सुरुवात करावी जेणेकरून कार्यशाळेच्या रचनेला अंतिम स्वरूप देण्यास आम्हाला मदत होईल.

आपले स्नेहांकित

स्वाती आंबोळे , मिलिंद छत्रे , नचिकेत आठवले व वैभव जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) आफताब
२) मीनू
३) संघमित्रा
४) गणेश कुलकर्णी
५) श्यामली
६) देवदत्त
७) दाद
८)अभिजीत दाते
९) नंदिनी_२९११
१०)सत्यजित
११) प्रसाद मोकाशी
१२) प्रसाद शिरगांवकर
१३) सारंग
१४) झाड
१५)जयावी
१६)गिरीराज
१७)अनिलभाई
१८)संदीप चित्रे
१९) चिन्नू
२०) जेलो,
२१) आयटीगर्ल
२२) अश्विनी
२३) सुधीर जोशी
२४) सतीश देशपांडे
२५) कौतुक शिरोडकर
२६) हिमांशु
२७) पुलस्ति
२८) परागकण
२९) अविकुमार
३०) मयुरेश
३१) नलिनी
३२) पल्ली
३३) उपास
३४) अश्विनी करमरकर
३५) अज्ञात
३६) अलका
३७) गिरीश
३८) चेतना
३९) मीनाताई
४०) हेमांगी (hems)
४१) सूपरमॉम
४२) bo-vish
४३) adm
४४) पूनम छत्रे
४५) मधुरा भिडे
४६) गजानन देसाई
४७) झेलम
४८) असामी
४९) टण्या बेडेकर
५०) मनीषा साधू
५१) जागोमोहनप्यारे

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

सहभाग या स्पर्धेत मी घ्यावा कसा
सम्पलेली तारीख अन वेळही उपलब्ध नाही !!

(हुश्श !!)

जागोमोहन्प्यारे,

तुम्हाला नाव नोंदवायचं आहे का? आम्ही दारं बंद केलेली नाहीत अजून. Happy

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

सहभाग मी स्पर्धेत या घ्यावा तरी कसा
सम्पली तारीख अन वेळही उपलब्ध नाही !!

आता जास्त बरोबर वाटते..

Happy

.

जामोप्या, तुमचे नाव नोंदवून घेत आहे. Happy

तुमची गझल kaaryashaalaa08@maayboli.com या पत्त्यावर पाठवा.
काही शंका, प्रश्न, सूचना असतील तर इथे अथवा या ई-पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधा

==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

कार्यशाळेत आत्तापर्यंत सहभागी झालेल्यांची नावे :

१) आफताब
२) मीनू
३) संघमित्रा
४) गणेश कुलकर्णी
५) श्यामली
६) देवदत्त
७) दाद
८)अभिजीत दाते
९) नंदिनी_२९११
१०)सत्यजित
११) प्रसाद मोकाशी
१२) प्रसाद शिरगांवकर
१३) सारंग
१४) झाड
१५)जयावी
१६)गिरीराज
१७)अनिलभाई
१८)संदीप चित्रे
१९) चिन्नू
२०) जेलो,
२१) आयटीगर्ल
२२) अश्विनी
२३) सुधीर जोशी
२४) सतीश देशपांडे
२५) कौतुक शिरोडकर
२६) हिमांशु
२७) पुलस्ति
२८) परागकण
२९) अविकुमार
३०) मयुरेश
३१) नलिनी
३२) पल्ली
३३) उपास
३४) अश्विनी करमरकर
३५) अज्ञात
३६) अलका
३७) गिरीश
३८) चेतना
३९) मीनाताई
४०) हेमांगी (hems)
४१) सूपरमॉम
४२) bo-vish
४३) adm
४४) पूनम छत्रे
४५) मधुरा भिडे
४६) गजानन देसाई
४७) झेलम
४८) असामी
४९) टण्या बेडेकर
५०) मनीषा साधू
५१) जागोमोहनप्यारे
५२) मनु:स्विनी
५३) मेघधारा
५४) आनंदयात्री
५५) बी
५६) मृण्मयी
५७) सुमेधा
५८) कार्टा
५९) योग
६०) विशाल

==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

गझल Scan करून पाठवू शकतो का?

गणेश कुलकर्णी, तुमची गझल मिळाली आहे.

==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

साहेब गजल मिळाली का ?

मी मायबोलीकर व्हायच्या अगोदर नाव नोन्दणी प्रक्रिया पूर्ण झाली असावी अस वाट्ल तरीपण १५आँक्टोबरला स्पर्धे साठी गझल

पाठवली आहे .

मी मायबोलीकर व्हायच्या अगोदर नाव नोन्दणी प्रक्रिया पूर्ण झाली असावी अस वाट्ल तरीपण १५आँक्टोबरला स्पर्धे साठी गझल

पाठवली आहे .

मला असं वाटतयं की कोणत्या तरी बेटावर येऊन पडलोय, जिथे मी यायच्या आधी 12 वर्षे लोकं होती.
मी एकटाच हाका मारून काय पदरात पडणार आहे माहीत नाहीये.
तरी जिवाच्या आकांताने विचारावसं वाटतं
"नवीन कार्यशाळा वगैरे काही सुरू आहे का सध्या? मला भाग घ्यायचाय, अनुभव घ्यायचाय, शिकायचयं"

प्रगल्भ, सध्या मायबोलीवर तरी कार्यशाळा वगैरे नाहीत. फेसबुकवर क्लोज्ड ग्रुप्स किंवा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवर चालत असल्याचं वाचलं होतं.

पण कार्यशाळेची खरंच गरज नाही. गझल लिहायचा सराव करून इथेच प्रकाशित करा. लोक कौतुक करतील आणि चुकाही दाखवतील. इथे नेमाने ग झल लिहिणारे अनेक आहेत. त्यांच्या गझला वाचून प्रतिसादही देत रहा. ( कधी कधी दिल्याशिवाय काही मिळत नाही Wink )

तुम्ही चांगले विद्यार्थी असाल तर मायबोली ही एक उत्तम शाळा आहे.

"तुम्ही चांगले विद्यार्थी असाल तर मायबोली ही एक उत्तम शाळा आहे"---> ओय तु अहो जाहो करतोयस आता.
ठीक आहे भरत दादा. जस तु म्हणालास तसं करेन अत्ताच कागद पेन घेतो.
धन्यवाद भरत दादा Happy तु भेटलास इथे...
मला वाटलं होतं की मेसेज विरून जाईल इथल्या 2008 च्या काही अवशेषांमध्ये

@प्रगल्भ - तुम्ही प्रत्येकाला दादा-ताई दादा- ताई का म्हणता हो? एक कुतूहल म्हणून हा प्रश्न. अशी सलगी प्रत्येकाला आवडेलच असे नाही Wink सरळ इक्वल फुटींगवरती - तुम्ही म्हणा की - अनाहूत सल्ला.

मीही आधी हे सांगितलंय, दादाताईकाकामावशी असं काही नको. सदस्यनामाने संबोधन करावे. इथे वयाचा काही संबंध नाही.

सार्वजनिक जागेचे संकेत पाळायला अहोजाहोच उत्तम.

दादाताई करायचंच असेल तर इथे एक बालवाडी / शिशुवर्ग आहे. तिथे सवंगडी भेटतील.

Pages