मित्रांनो,
कार्यशाळेबाबतीत तुम्ही दाखवलेल्या उत्साहामुळे आम्हालाही हुरूप आला आहे. गुरुवारपर्यंत आणखी 'दर्दी' आपल्यासोबत येतीलच.
तोवर नवीन मित्रमैत्रिणींना गझलची तोंडओळख करून द्यायला सुरुवात करू या का?
त्यानिमित्ताने आपलीही उजळणी होवून जाईल.
किंवा असं करू. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करू.
काय आहे, काही गोष्टींची आपल्या मनात उगाच भीती बसलेली असते. एकतर कविता म्हणजे उत्स्फूर्त अभिव्यक्ती. तिला मात्रा / छंद / लघु / गुरू असल्या कोष्टकात कोंबून बसवायला नको वाटतं! प्रेम असेल, वंचना असेल, राग असेल, मनात आलं - म्हणून मोकळं झालं..
पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली..#
अजूनही आठवून मी मोहरून जातो.. किती किती लाघवी तुझा तो नकार होता!!#
बोलणे माझे जरा ऐकून घे तू.. मी खुळा नाही, तर्हेवाईक नाही!!#
अर्थ लागेलही पुढेमागे - चल प्रतिज्ञा तरी त्रिवार करू!*
मग आता जर मी तुम्हाला सांगितलं, की पहिली ओळ भुजंगप्रयातात आहे, दुसरी हिरण्यकेशी, तिसरी मंजुघोषा आणि चौथी स्त्रग्विणी वृत्तात आहे, तर त्यामुळे त्यांची मजा कमी होते का? उलट लयीत वाचलेल्या सुंदर सुंदर ओळी आपोआप लक्षातही राहतात ना?
सोपं असतं हो!
र्हस्व अक्षर हे लघु किंवा १ मात्रा. दीर्घ अक्षर गुरू किंवा २ मात्रा.
म्हणजे अ/इ/उ स्वर असणारी अक्षरं लघु तर आ/ई/ऊ/ए/ऐ/ओ/औ हे स्वर असणारी अक्षरं गुरू असतात.
वृत्त पाहताना लघु 'ल' असा तर गुरू 'गा' असा लिहीतात.
म्हणजे 'पहाटे' शब्दात प हा लघु आहे, तर हा आणि टे गुरू आहेत. म्हणून हा शब्द झाला 'ल गा गा'.
'बोलणे' झाला 'गा ल गा'
आता 'अर्थ' शब्द उच्चारून पहा. दोन्ही अक्षरं लघु खरी, पण उच्चार 'ल ल' च्या जवळचा आहे की 'गा ल' च्या?
नियम असं सांगतो की शब्दात लघु अक्षरानंतर जोडाक्षर आलं, तर त्या लघुचा गुरू होतो.
म्हणून 'अर्थ' हा 'गा ल' शब्द आहे.
तसंच अनुस्वार असलेलं अक्षर गुरू असतं. म्हणून वंदना हा शब्द 'गा ल गा' असा ऐकू येतो पहा.
खरं सांगू का? आपण कवी मंडळी शब्दांवर प्रेम करतोच. त्यांचा अर्थ जसा भावतो, तसाच त्यांच्या 'नादा'कडे जरा कान दिला ना, की अगदी सहज लक्षात येतं हे.
ही पायरी जितकी सोपी, तितकीच महत्त्वाची आहे. एकदा लघु गुरू समजले, म्हणजे वृत्त समजणं अगदी सोपं आहे!
पुढच्या पोस्ट मधे वृत्ताबद्दल बोलूच.
पण त्या आधी एक छोटीशी परीक्षा देऊ या?
आपलं पूर्ण नाव लिहून त्यातली लघु आणि गुरू अक्षरं ओळखायची.
कुठे अडलं तर आम्ही आहोतच मदतीला.
(टीपः
# या ओळी सुरेश भटांच्या आहेत.
* ही ओळ वैभव जोशींची आहे.)
प्रशांत
प्रशांत उपासनी
गागाल लगालगा
प्र हे दीर्घ घ्यावं की न घ्यावं, प्र हे जोडाक्षर आहे, मूळाक्षर नाही बरोबर? आणि मग प्रिया मधला प्रि हा लघु कसा घेतो आपण?
नमस्कार!
प्रशांत,
प्रशांत, वरील चर्चेत जोडाक्षराच्या नियमांबद्दल सविस्तर सांगितले आहे बघा. जोडाक्षर स्वत: बदलत नसून त्या आधीचे लघु अक्षर (जर उच्चारात आघात येत असेल तर) गुरू होते.
ओहो, आलं
ओहो, आलं लक्षात आलं.. म्हणजे..
प्रशांत उपासनी
लगाल लगालगा
बरोबर.
बरोबर.
बरोबर लगाल
बरोबर
लगालल
मी अत्तच
मी अत्तच बघितलं मला शिकायला वेळ लागेल बहुतेक..
समीर रानडे
लगाल गालगा..
जागोमोहनप
जागोमोहनप्यारे (गागागागागागा)
समीर, उत्तर बरोबर आहे. फारसा वेळ लागेल तुम्हाला असं नाही वाटत. मग गझल लिहीणार ना?
==

भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
चेतना....
चेतना.... गालगा..?
शोभा सोनार...
गागा गागाल...?
खुप अभ्यास करावा लागणार..
आणी कार्यशाळेत नाव कसे टाकायचे?
चेतना,
चेतना, जमलं की!
kaaryashaalaa08@maayboli.com या पत्त्यावर नोंदणीसाठी ईपत्र पाठवायचे आहे. आणि गझलही तिथेच पाठवायची आहे.
(तुम्ही आता नोंदणीचे ईपत्र नाही पाठवलेत तरी चालेल. तुमचे नाव नोंदवून घेत आहे.)
==

भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
बिपीन
बिपीन चौधरी
ल गा ल गा ल गा
नोंदणीसाठी mail करायचे म्हणजे exactly काय लिहायचेय त्यात ?
'मला
'मला कार्यशाळेत गझल लिहायची इच्छा आहे' असं लिहायचं.
तुमचं नाव नोंदवायचं आहे का असामी?
==

भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
पराग
पराग सहस्रबुध्दे.
लगाल लगालगागा.
सर्/मॅडम.. तपासा..
पराग, जमलं
पराग, जमलं की!
==

भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
मला पण नाव
मला पण नाव द्यायचं आहे.
पूनम छत्रे
गालल गागा
-----------------------------------------------
आली दिवाळी!
मला पण नाव
मला पण नाव द्यायचं आहे.
मधुरा भिडे.
ल गा गा गा गा
बरोबर?
******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.
पूनम,
पूनम, मधुरा,
तुमचे नाव नोंदवून घेतले आहे.
पूनम छत्रे
गालल गागा
मधुरा भिडे
ललगा लगा
==

छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
फारच बेसिक
फारच बेसिक चूक झाली

टायपो होता हं
आयोजकांचीच परीक्षा आहे ही आमच्यासारख्यांना गजल शिकवणं म्हणजे!
-----------------------------------------------
आली दिवाळी!
होय
होय नक्की...
गाल गागा
गुरुवर्य
गुरुवर्य क्रुपया माझे पण नाव नोंदवून घ्या.
नाव
नाव नोंदवल्या बद्दल धन्स...
सर्व मायबोली अगदी गजलमय झाली की...
खुपच छान माहिती मिळतेय...
असामी,
असामी, तुमचं नाव नोंदवून घेतलं आहे.
==

छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
मी
मी पहिल्यांदाच आज हा बा. फ. वाचला. मीही तुमचा गृहपाठ करत आहे. कृपया तपासून गुण द्या.
बी
- गा
यशवंत काकड
ललगाल गागाल
बरोबर आहे ना?
bee, तुमचे
bee,
तुमचे नाव नोंदवून घेत आहोत.
यशवंत काकड

ललगाल गालल
==
kaaryashaalaa08@maayboli.com
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
लिं बु टिं
लिं बु टिं बु
गा ल गा ल ?????
लि म्बू टि म्बू
गा गा गा गा ?????
...;
आपला, लिम्बुटिम्बु
बरोबर.
बरोबर.
==
kaaryashaalaa08@maayboli.com
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
मला ही नाव
मला ही नाव नोंदवायचं आहे...फार उशीर झाला का?
सुमेधा पुनकर
गा गा गा गा ल ल ल
बरोबर?
सुमेधा,
सुमेधा, तुमचं नाव नोंदवून घेत आहे.
सु मे धा पु न क र
ल गा गा ल ल ल ल
==
kaaryashaalaa08@maayboli.com
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
मराठी
मराठी व्याकरणात शाळेत असताना विविध वृत्त अभ्यासाला होती पण आता त्यातले काहीच आठवत नाही. शक्य असल्यास वृत्तांची नावे व त्यांचे नियम / बांधणी शिकवाल का? किंवा लिंक द्याल का? या कार्यशाळे साठी सगळ्यांना उपयोगी पडेल.
गझलचा विषय / मूड कुठला नसावा किंवा असावा ?
विशाल
विशाल कुलकर्णी.
ल गा ल ल ल गा गा
थोडासा उशीरच झालाय, पण मी वाट पाहीन.
मलाही नाव
मलाही नाव नोंदवायचे आहे.
लगागा गाल गा लगाल गागागा.
बरोबर ?
आपला,
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
Pages