पडे उन्हात पाऊस..

Submitted by के अंजली on 28 June, 2012 - 04:45

वेळी अवेळी मनात
असा भेटतो पाऊस
वर दाटूनी नभांत
पडे उन्हात पाऊस

वारा पिंजारतो जसा
उगा ढगांचा कापूस
वर दाटूनी नभांत
पडे उन्हात पाऊस

झाड सरीस म्हणते
थांब नको ना जाऊस
गहिवरुन केव्हांचा
पडे उन्हात पाऊस

अशी आल्हादली माती
पोटी अत्तर सुवास
वर दाटूनी ढगांत
पडे उन्हात पाऊस

गुलमोहर: 

कविता वाचून छान फ़्रेश फील आला.

उन्हात पडणार्‍या पावसाबरोबर इंद्रधनु आलं असतं
रंगत आणखी वाढली आली असती.

झाड सरीस म्हणते
थांब नको ना जाऊस
गहिवरुन केव्हांचा
पडे उन्हात पाऊस.... आफाट

वर दाटूनी नभांत... या लाईनचे रिपीटेशन असह्य होत जाते... नावडीचे पाहुणे आल्या सारखं