मायबोली वर्षा विहार २०१२ नोंदणी.

Submitted by ववि_संयोजक on 24 June, 2012 - 21:57

nondani.jpgवर्षा विहार ... वर्षा विहार ... मायबोलीचा वर्षा विहार ...तोही दहावा ....

तर मंडळी, समस्त मायबोली परिवाराकरता मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१२...

एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा :डोमा:) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात. सगळे वाद, स्पर्धा बाजुला ठेवून , मतभेद बाजुला सारुन, नवीन ओळखी आणि मित्र बनवण्याचा हमखास मेळा ...

यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २२ जुलै २०१२ या दिवशी, खोपोली इथल्या यू.के.’ज्‌ रिसॉर्टच्या साथीनं. पाऊस तर दरवर्षी असतोच संगतीला.
पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.

नावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे.

१. नोंदणी करणार्‍याचे नाव
२. मायबोलीचा user id
३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक )
४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)
५. आपला नेहमी वापरात असलेला email id
६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या ,प्रौढ, स्त्री , पुरुष , त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांचे वय
७. लहान मुले ( १ ते ५ किंवा ६ ते ८ वयोगट) असल्यास त्यांचे पूर्ण नाव वय
८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
९.खालील दिलेल्या बस मार्गा पैकी बसथांबा कोणता असेल ?
१०. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनला‌ईन?

नावनोंदणीची अंतिम तारीख आहे १४ जुलै २०१२.

नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.

वर्षाविहार-२०१२ वर्गणी आहे :

मुंबईसाठी :-
प्रौढ : रु. ८०० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ५००, बस : रु. २५०, इतर खर्च : रु. ५०)

पुण्यासाठी
प्रौढ : रु. ८५० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ५००, बस : रु. ३००, इतर खर्च : रु. ५०)

५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
मुले (वय ५ ते ८ वर्षे) : रु. ३७५/- प्रत्येकी.
मुले (वय ९ ते १२ वर्षे):रु ५००/- प्रत्येकी
१३ वर्षापासून पुढे पूर्ण आकार लागेल.

रिसॉर्ट च्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता , दुपारचे जेवण , संध्याकाळी चहा बिस्किटे यांचा समावेष आहे.
वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ५० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या वाढल्यास नंतर नोंदणी करणार्‍या सभासदांना प्रवास खर्च कदाचित जास्त येउ शकतो ( तो खर्च वाढलेल्या माणसांच्या संख्येवर अवलंबून आहे.) त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा.

(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.)

पुणे आणि मुंबई इथे १५जुलै २०१२या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: १५जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००

मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १५ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००

समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

ऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कॅश डिपॉझिट करु नका.

प्रत्यक्ष पैसे भरण्याकरता १५ तारखेपर्यंत वाट पाहायची गरज नाही , खालील संयोजकांपैकी कोणालाही संपर्क करुन आधीच पैसे भरु शकता.

मुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

वर्षाविहार-२०१२ संयोजन समिती :

पुणे -

मयूरेश कंटक (मयूरेश)
मल्लीनाथ करकंटी( मल्लीनाथ के):
हिमांशु कुलकर्णी (हिमस्कूल)
सत्यजीत (आगाउ)

मुंबई -
प्रणव कवळे ( प्रणव कवळे)
निलेश वेदक (_नील_)
आनंद चव्हाण (आनंदमैत्री)
विनय भिडे (विनय भिडे)
सारिका देसाई (सामी)

http://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज्‌ रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.
आपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

वविची रुपरेषा साधारण अशी असेल......

सकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया
१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मधे धम्माल मस्ती
१२.३० ते १.०० परत चेंजिंग
१.०० ते २.०० जेवण
२.३०-४.३० मनोरंजन
५.०० वाजता चहा व बिस्किट्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.

तेव्हा, भेटू या, २०१२च्या वविला!

मुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे

१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी संपर्क साधावा)
२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am
३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am (ह्या स्टॉपकरता श्री. आनंद चव्हाण ह्यांच्याशी संपर्क साधावा)
४) ऐरोली ब्रिज ७.१० am
५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am
६) वाशी ७.३० am
७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am

मुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया श्री विनय भिडे आणि पुणे रुट साठी मयूरेश कंटक ह्यांना फोन करुन संपर्क साधावा.

पुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे

१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ - ६.१५ am (६ ते ६.१५ पर्यंत बस तिथे थांबेल)
२) डेक्कन - ६.३० am (बसस्टॉप समोर)
३) राजाराम पुल - ६.४५ am (सिंहगड रोड्-व्यंकटेस्वरा हॅचरीज)
४) कोथरुड (किमया हॉटेल) - ७.०० am

प्रत्येकाने वेळेपुर्वी तेथे उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवडहुन येणार्‍यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.

नोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे.

सुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही )

युके'स रिसॉर्ट ला पुन्हा ववि करण्याच महत्वाच कारण , बाकी सर्व रिसॉर्ट चे दर कमीत कमी ६५० /- ते ७०० /- रुपये आहेत , त्याचबरोबर युके'स मध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि दर्जा देखील उत्तम आहे. मुंबई पुणे दोन्हीकडच्यांना प्रवासही सोयीचा आहे.

तर मायबोलीकरांनो हा सोहळा चुकवु नका , मुंबई पुण्याचे मायबोलीकर एकत्र भेटण्याचे हमखास ठिकाण म्हणजेच वर्षा विहार ... Happy

Let us respect everyone ( both female and male members) who may or may not like their picture posted here or anywhere. The same rule applied to picture sent through email , as once it is sent there is no control anyway who sees it.

For those of us who do not want their picture posted, please write here your wish.

A) I do not want my pictures to be posted at all
B) I don't mind my pictures posted only after my approval. So send pictures only to me, and I will post it myself if I choose.
C) I don't mind my pictures to be posted at all,(No prior permission required) but if I don't like one, please respect my wish take it down
D) Post only the big group picture of me (with everyone)

Everyone, Please respect these wishes. And maayboli administration is committed to respect this for everyone to communicate to us.

In the Hindsight , this should have been announced before the start of VAVI, but we learned and we want to acknowledge. Better late than never. Thank you for your support.

Writing this from Organizers point of view too.

1. It is very difficult for organizers to police this. All of them are very busy organizing the event and if they keep focusing on this, the event won't happen. So it is responsibility of all people to present and respect their wish. The question everyone should ask, if this was a picture of my mother, father, brother, sister, daughter, son, wife, husband do I feel comfortable posting this.

2. Organizers can understand the objection if the picture was taken without permission of the person. But if the person has specifically posed for picture (e.g group photo) to be taken, it is difficult to understand the reason why you don't want to be in the picture now. It also applies to photos of 3-4 people specifically posing to get their picture taken. Once you are in a group picture, it is very impossible for organizers to prevent its spread. Even if it is not posted here, it still spreads (without anyone's knowledge) from people to people through emails. So preventing posting of a group picture on the public forum gives only a false sense of security.

मायबोलीकरांचे ववि फोटो प्रकाशित करण्याबाबत एक महत्वाची सूचना:-काल वविला आलेल्या सर्व मायबोलीकरांना अशी विनंती आहे की वेबमास्तरांनी फोटो प्रकाशना संदर्भात वर जे पर्याय दिले आहेत त्यातले तुम्हाला हवे असलेला पर्याय निवडुन तशी पोस्ट इथे करावी..त्यासाठी तुम्हाला ४८ तासांची मुदत (दोन दिवसांची)देण्यात येत आहे.त्यानंतरच वविचे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्यात किंवा वविला आलेल्या मायबोलीकरांना पाठविण्यात येतील. ४८ तासात जर का तुम्ही पर्याय निवडला नाहीत तर तुम्हाला तुमचे फोटो प्रकाशित करण्यास कुठलाही आक्षेप नाही असे गृहीत धरण्यात येईल.

काल ज्यांनी फोटो काढले आहेत त्यांनाही सूचना आहे की त्यांनी इथे संयोजकांची पोस्ट येईपर्यंत कुठेही कालचे वविचे फोटो प्रकाशित करू नयेत किंवा कोणालाही ते पाठवुही नयेत.

प्रांत/गाव: 

संयोजक म्हटलं के तोडपाणीकायमच करावी लागते हे कधी शिकणार मल्ल्य्... आणी त्यांनी नाही केली तर बाकीचे करतील ना त्यांची

आहाहा, फ्रेश झालो एकदम,

अरे हो त्या गिरीविहारचं आत्मचरित्र झालं का लिहुन?
नाव गेल्यावर्षीच फायनल झालं होतं ना 'माझी चु..गिरी'

"आणि आनंदसुजुंचं पालुपद "ह्या गाण्याची एक वेगळीच मजा आहे!""
निधप नीट कळले नाही 'आनंदसुजुंचं' ???
मला हे सगळे वाचताना खरच मजा वाटतेय . किती उत्साहाने सगळे लिहितायत. जे येऊ शकत नाही ते हळहळत आहेत.
ये ववी क्या चीज है जल्दीच मालूम पडेगा !!!
पुण्यातून कमी उपस्थिती आहे असे ऐकतेय. पुण्याच्या मायबोलीकरांनो जमवा हो यावर्षी पण. आम्ही नवीन ववी कर खूप उत्सुक आहोत आयडी मागचे चेहरे बघायला.

अरे हो त्या गिरीविहारचं आत्मचरित्र झालं का लिहुन?
या वर्षीच्या ववी मध्ये सुध्दा काही तरी करावं म्हणतोय तो. तेही लिहुन होईल, म्हणुन थांबला असेल.

राखी Happy
येस्स्स्स्स्स्स्स्स्स.......
सामी Happy

अरे हो त्या गिरीविहारचं आत्मचरित्र झालं का लिहुन? >> त्याच्या चारित्र्यावर टिंब टिंब उडालेले असले तरी त्याचा आत्मा साफ आहे... बुळबुळीत दगडासारखा

बामन, सामी, राखी, रिया... पैवविहाशु. Happy

सेन्या तू का अरे Sad ते?????
त्याचं काय आहे मी माबोवर कोणाला ओळखत नाही
मी मुळातच प्रचंड शांत असल्याने (सगळ्यांनी नोटच डाऊन) ओळख होईला वेळ लागतो
म्हणुन भिती वाटते इतकचं
इंद्रा धन्स रे Happy

म्हणुन भिती वाटते इतकचं >> भिण्याचे कारणच नाही.. ओळख होई पर्यंत सगळे आयडी शांतच वाटतात... आणि वविला भेटल्यावर स्वत:ची ओळख विसरून सगळ्यां सोबत कल्ला करतात.

btw मैत्री... पार्कात कार्यक्रम किती वाजे पर्यंत चालणार आहे?

या वर्षी वविच्या ठिकाणी बंधारा नसल्याने माझ येणं होईल असे वाटत नाही...असे ठिकाण निवडल्याबद्द्ल संयोजकांचा त्रिवार निषेध....:-)

अग कुणास ठाऊक का दिसत नाहीये माझं नाव? Uhoh
ओ संयोजक बघा की जरा काय झालय ते
मला री-मेल पण नाही आला Uhoh
नको येऊ का मी? भ्याआआआआआआआआआआआआआआ

इंद्रा-
शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १५ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००

आणि त्यानंतर..................................................

Pages