"सत्यमेव जयते" भाग ८ (Poison On Our Plate?)

Submitted by आनंदयात्री on 24 June, 2012 - 03:35

आज, २४ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बाळासाहेब टेकवडें यांच्याबद्दलची पोस्ट काढून टाकली आहे. गूगल सर्च दिल्यावर (मराठी आणि इंग्लीश दोन्ही ) त्यांच्याबद्दल माहिती मिळतेच. ते आणि त्यांचे बंधू यांनी सेंद्रीय शेतीबद्दल केलेले प्रयोग याबद्दल त्यांच्याशी संपर्क साधणे योग्य होईल. त्यांचे संशोधन विशेषतः रायवळ आंब्यापेक्षा मोठा केसर आंबा आणि महाराष्ट्रात केलेली चहाची शेती वाचनीय आहे. मला खरंच शेतीतलं ज्ञान नाही.. पण अशा प्रयोगांकडे पाहीलं तर शेती हा उत्पन्न देणारा उद्योग आहे हे मान्य करून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इस्त्राईलने पाण्याचं दुर्भिक्ष असतानाही कृषी अभियांत्रिकी आणि कृषी उत्पादने यांत नाव कमावले आहे. आपल्याकडे दुर्भिक्ष सर्वत्र नाही.. मात्र कृत्रिम दुर्भिक्षाकडे आपली वाटचाल चालू आहे.

पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे तीन असताना कृषीला पाणी देणे शक्य होते. मात्र धरणं तीनच राहिली आणि पुण्याची लोकसंख्या दहा लाखांवरून साठ लाखांच्या पुढे गेली आहे. लगतच्या हद्दीतही पुण्याची उपनगरे वसली आहेत. याशिवाय टेमघर धरणाचं पाणी लवासासाठी वापरलं जात आहे. वरसगाव मधूनही लवासाला पाणी जात आहे.

शेतीवर अस्मानी संकट आहे हे खरं आहे मात्र सुल्तानी संकटाचं भय मोठं आहे. असो. वेगळा विषय आहे हा...

Pages