"सत्यमेव जयते" भाग ८ (Poison On Our Plate?)

Submitted by आनंदयात्री on 24 June, 2012 - 03:35

आज, २४ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रॉफ यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. त्यांना हिरो वगैरे बनण्यात अजिबात रस नव्हता. त्यांच्या धंद्याची जी काही पॉलिसी असेल त्याला छेद जाईल असं एकही स्टेटमेंट ते करायला तयार नव्हते. हसू होणं वगैरे गोष्टींची त्यांना फिकीर नव्हती असंच दिसतंय. मध्यंतरी राहुलकुमार बजाज यांना बजाज स्कूटरबद्दल ( तेव्हाच्या) असेच तिरकस प्रश्न विचारले होते त्याचीच आठवण झाली.

किरण >>
+१
मलाही राहुल बजाजंच्या त्या भेटीची आठवण आली, हे श्रॉफ देखील एक ' खाप'च नाही का?

मंदार कात्रे यांनी शेतीबद्दल विचारलेले प्रश्न - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231... येथेही लिहीले आहेत, याला म्हणायचे ग्रेट पीपल थिंक अलाईक!!!

कालचा भाग नाही पाहिला. पण भारतासारख्या देशाला पुरेशा धान्य निर्मितीसाठी संकरीत बियाणे आणि त्याला अत्यावश्यक असणारी किटकनाशके याबाबतीत दुसरा काही पर्याय आहे का त्याबद्दल पण जाणकारांनी लिहा.

एवढ्या मोठ्या लोकसंख्येला धान्य पण जास्तच लागणार. अपुर्‍या जलसिंचन सुविधा वगैरे बाकीचे मुद्दे सोडले तरी जास्त धान्य निर्मितीसाठी संकरीत बियाणाला पर्याय नाही. आणि अशा बियाण्यापासून येणारे पीक रोगाला सहज बळी पडते म्हणून किटकनाशके आवश्यक ठरतात असा मुद्दा मांडला जातो तो कितपत खरा आहे?

मला व्यक्तीश: असे वाटते की किटकनाशके वाईट आहेतच पण त्याचबरोबर आपण ती किती प्रमाणात वापरतो हेही महत्वाचे आहे. काल एकजण सांगत होता तसे मुळ प्रमाण अमुक हेक्टरला अमुक इतके असते आणि ते कंपनी-डिलर्-शेतमालक्-मजुर इथे पोचेपर्यत अमुक इतके होते. मग मुळचे वाईट परिणामही तितक्या पटीत वाढतात.

तसे पाहता डीडीटीने अतिशय उत्तम मलेरिया डास निर्मुलन होत होते पण माणसाने डीडीटीचा इतका प्रचंड अनिर्बंध वापर केला की मातेच्या दुधातही त्याचे ट्रेसेस आढळू लागले आणि मग त्यावर बंदी आणली गेली. या बंदीमागेही दुसरी गोष्ट आहे हे वेगळेच.

नैसर्गिक शेती आणि सोबत नैसर्गिक किटकनाशके वापरणे हा उपाय उत्तम आहे पण त्यामध्ये कष्ट आहेत, ते कष्ट कोण घेणार?? किटकनाशके फवारताना कष्ट कमी कारण एकतर ती रेडीमेड मिळतात आणि अज्ञानापोटी हवी तशी फवारली जातात.

कालचा एपिसोड पाहिला.
काही मुद्दे पटले, काही पटले नाहीत.

वर साधना म्हणतात त्याप्रमाणे 'निर्धारित मर्यादेत कीटकनाशकांचा वापर' असा काही पर्यायच कालच्या कार्यक्रमात सुचवला गेला नाही. सरळ रासायनिक शेती वि. सेंद्रिय शेती असा सामना झाला. मुळात हे दोन्ही परस्परांना पर्याय नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर कालच्या भागात जे तीन शेतकरी दोन्ही प्रकारच्या शेती करत होते, त्यांनी फक्त सेंद्रिय शेतीच केली असती, नाही का?
रसायनांचे दुष्परिणाम नक्कीच आहेत, पण बरेचदा त्याला काही पर्याय नसतो, आणि सेंद्रिय शेती करणेही अगदीच सोपे नाही. हेक्टरी उत्पादन नक्कीच कमी होते. आणि चाळीस कोटीपेक्षा जास्त लोक ज्या देशात आजही एकच वेळ जेवतात, तिथे अन्नधान्याचे उत्पादन हा फार कळीचा आणि सेंसिटीव्ह मुद्दा असतो.

रसायने म्हणजे 'जहर' असे वारंवार वदवून घेणेही मनोरंजक होते. आपल्या दैनंदिन वापरातले कित्येक (किंबहुना प्रत्येक) पदार्थ या अर्थाने 'जहर' आहे. प्रत्येक औषध 'जहर' आहे. त्यामुळे हा शब्द वारंवार स्ट्रेस करणे जरासे खटकले. मला वाटते, त्या रसायनाच्या कंपनीचे मालकही हेच सांगू पाहत होते, पण त्यांचा टोन चुकीचा होता आणि 'सब झूठे है' असा स्टान्स सुरूवातीलाच घेतल्याने ते हास्यास्पद ठरले.
त्या एका पाहुण्या बाईंनी सरसकट हरितक्रांतीलाच नाकारले, तेही पटले नाही. वर भरत मयेकरांनी त्याबद्दल लिहिलेच आहे.
कीटकनाशके निर्धारित मात्रेतच वापरता यावीत, जास्त प्रमाणात फवारणी करता येणे शक्यच होऊ नये, अशी काही यंत्रणा विकसीत करता येईल का, असा प्रश्न पडला.
सिक्किम मॉडेल यशस्वी व्हावे, ही शुभेच्छा. Happy

बाकी मुद्दे पटले.

मी हा कार्यक्रम पाहिलेला नाहिये, पण
१)भारतातला कर्करोग मुख्यत्वे तंबाखुजन्य पदार्थामुळे होतो.आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे non-tobaco cancersचे प्रमाण वाढतय् पण biggest killers हे तंबाखुजन्य कर्करोगच आहेत.शेतीमालचे योगदान थोडेबहुत असेल्ही पण नक्की किती ह्याची कुठलीच आकडेवारी उप्लब्ध नाही.
२)शेतकर्‍यांकडुन येणार्‍या मालापेक्षा जास्त रसायने ही processed food मधे असतात. जसे की केचप,जॅम.त्यामुळे टाळायचेच असेल तर आधी processed food टाळा.
३) non smokers मधे पण lung cancers चे प्रमाण पण वाधतय पण त्यातही शेतीमालचा संबंध नाही. disel cars चा वाढता वापर हे कारण आहे.प्रदुषनामुळे मुंबैमधेच बालदम्याच्या केसेमधे गेल्या काही वर्षात कैकपटीने वाढ झालीये.
४)cancer patients ना सेंद्रिय भाज्या फळे दिल्यास मात्र फार चांगला परिणाम दिसुन येतो.
५)किटकनाशकांवर बंदी आणन्याबरोबरच पाण्यात उद्योगांकडुन जे heavy metals release केले जातात त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे.

शेतीमालचे योगदान थोडेबहुत असेल्ही पण नक्की किती ह्याची कुठलीच आकडेवारी उप्लब्ध नाही.

काल जे कॅन्सरग्रस्त दाखवलेले ते थेट शेतमाल खाऊन ग्रस्त झाले नव्हते तर त्यांच्या गावातल्या.आजुबाजुच्या शेतांम्ध्ये, बागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची जी फवारणी होते त्यामुळे एकुण वातावरणच प्रदुषित होऊन ते लोक रोगांना बळी पडत होते. भाज्यातुन किटकनाशके पोटात गेल्यावरही कॅन्सर व. होऊ शकतो पण त्याचे प्रमाण अगदी ट्रेन्स भरुन लोकांना हॉस्पिटलात पाठवावे इतके नसते आणि तसा थेट संबंधही जोडता येणे सोपे नाही.

http://www.maayboli.com/node/14435

http://www.maayboli.com/node/31879

मी अजुन भाग बगितला नाहीय. पण गेल्या १ वर्षात एक खुप महत्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे यावर फक्त चर्चा होतात. मागे मी कुठेतरी दुधात असलेल्या ऑक्सिटोसिन बद्दल लिहले होते. अगदी माझ्या गावात आलात तर १०० पैकी ९० गोठ्यात तुम्हाला ऑक्सिटोसिन ची बाटली आणि सिरी़ज दिसेल. शेतकरी स्वतः टोचतात. दुकानात सढळ हस्ते मिळते. आणि मला वाटते डॉ. लोक त्या ऑक्सिटोसिन बद्दल जास्त माहिती देतील.

कोबी / फ्लॉवर अक्ष्रशः किटक्नाशकात बुडवुन काढलेले असतात. ते किटकनाशक पाण्यात विरङ्हळणारे नसतात. कितीही धुतले तरी धुवुन जात नाहेत. आणि बरेच Long Molecule , हेवी मेटल्स प्रमाणे शरेरात साठत जातात, बाहेर फेकले जात नाहीत.

गुळ : चंपक ने लिहलेल्या आर्टिकल मध्ये त्याने बर्यापैकि महिती दिली आहे. ते वाचुन किती जणांनी सेद्रिय गुळ आणला / वापरला. किंवा आणलेला गुळ सेंद्रिय आहे याची खात्री करुन घेतली. चर्चा मात्र बरीच झाली.

गंम्मत म्हणजे आपण पैसे मिळवतो ते जगण्यासाठी. जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचे खाणे (अन्न). किती पर्टीक्युलर असतो आपण त्याबाबतीत. तेल असो, तुप असो, दुध असो, भाजीपाला असो, किती विचार करतो आपण. चर्चा मात्र नक्किच करतो. चालु द्यात पुढील चर्चा.

अजुन शो पाहीला नाही.
निवांत पाटिल, तुमचा मुद्दा पटतोय.
पण नक्की काय करायला हवे ते कळत नाही.
म्हणजे कोणी ऑक्सिटोसिन गायीला टोचते. पण इथे शहरात राहुन ते कसे बंद करु शकतो. किंवा शुद्ध दुध मिळण्याचा दुसरा पर्याय कुठला ते कुठे माहीतेय. विकसित देशात निदान ऑरगॅनिकच्या नावाने गोष्टी मिळतात त्या घेता येतात. इथे काय करायचे?
सेंद्रिय भाज्या किंवा धान्य कुठुन आणायची तेही कळत नाही.

रेव्यु,
हे श्रॉफ देखील एक ' खाप'च नाही का? >> हे म्हणजे कहिहि. त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला, आता तो हास्यास्पद असो अथवा काही. त्यांनी काही 'ऑर्डर' नाही केली शेतकर्‍यांना की किटकनाशक वापराच.

बाकी, श्रॉफ यांच्यापेक्षा दुसर्‍या कोणाला बोलावुन जर दुसरी बाजु सक्षमपणे मांडणारा एखादा माहितगार आमंत्रीत केला असता तर कार्यक्रम आणखी प्रभावी वाटला असता.

निवांत पाटील , aschig >> +१

आम्ही Whole Foods मिस करतो. ऑरगॅनिकची सवय लागली आहे. म्हणून मग तिकडेही शोध घेतला. पुण्यात काही दुकानात असे धान्य व फळे मिळतात. स्वास्थ्य वल्ड नावाचे एक दुकान माझ्या घराशेजारी आहे. तिथे अनेक गोष्टी मिळतात. पण दुध, भाज्या इ साठी अजूनही मारामार आहे.

तसेच http://www.24lettermantra.com/inside/storelocations.html हे बघ.

ऑरगॅनिक म्हणून तुमच्या आमच्या गळी तिप्पट किमतीत जे मारले जाते, ते खरेच तसे असते का? असल्यास कसे ठरवायचे?
फक्त किड्या मुंग्यांना कीटकनाशकांचा 'रेझिस्टन्स' येतो का हो?
तुम्हाआम्हाला नाही येत?? व्हाय नॉट?
जीन्स सग्ळ्यांना दिलेत ना सारखेच? There ALWAYS is the other side.. आपणही वेगळे आहोत. आपल्या १० पिढ्यापूर्वी अन आज, नक्कीच फरक आहे. अन आहेच.
जर तुम्हा आम्हाला औषधांचा, किड्या मुंग्यांचा, ब्याक्टेरियांचा, अन तसल्या हजार गोष्टींचा रेझिस्टन्स येत नसेल तर आपण 'सर्वायव्ल ऑफ फिटेस्ट' मधे निकम्मे ठरून या जगातून गायब होऊ हेही तितकेच नक्की!

रासायनिक खतांना, कीटकनाशकांना दिली जाणारी सबसिडी सेंद्रीय खते आणि उत्पादनांना दिली तर किंमतीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार नाही का ?

किरण, पाकिपुंगा, निवांत पा., आस्चिग
सगळ्यांशि सहमत. पुन्हा एकदा, या सत्यमेव जयते मधे, विषयाच्या मुळापर्यंत निष्पक्षपातीपणे जाणे ही इच्छा दिसतच नाही, तर, हे महोदय जसे जवळ आले अन नर्मदा आंदोलनातून पळूनही गेले, तसा उथळपणा दिसतो आहे. फक्त प्रसिद्धीचा हव्यास. मनापासून विषयाची ना जाण आहे, ना जाणून घेण्याची कळकळ. टीआर्पी हवी आहे फक्त! बास.

ऑरगॅनिक म्हणून तुमच्या आमच्या गळी तिप्पट किमतीत जे मारले जाते, ते खरेच तसे असते का? असल्यास कसे ठरवायचे? >>

मला तरी तिप्पट किंमत वगैरे अजिबात वाटली नाही. थोडे महाग असते पण ते इतकेही नाही की कोणी सहन करणार नाही. त्या बाईंनी म्हणल्यासारखे मॉल मध्ये जाऊन ५००० ची खरेदी झाली तरी काही वाटत नाही, पण ऑर्गॅनिक भाजी २० रू पाव असेल ( १० -१२ च्या ऐवजी) तर आपण नाक मुरडणार. हे बदलले तर ज्यांना ऑर्गॅनिक खायचे त्यांनी खावे. अन्यथा रुटिन मध्ये मिळणारे आहे ते खावे.

तसेच ऑर्गॅनिक म्हणून ऑर्गॅनिकच मिळते का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. भारतातील नाही सांगू शकत. पण अमेरिकेतील "ठाम"पणे सांगू शकतो. ते ऑर्गॅनिकच असते.
इथे काही निकष आहेत. उदा ऑरगॅनिक म्हणून मान्यता मिळण्यासाठी २ वर्ष त्या जागेवर / गाईवर (कारण इथे गाईचेच दुध मिळते) कुठलाही रासायनिक फवारा मारला गेला नाही पाहिजे तसेच कुठलेही इंजेक्शन त्या गाईला देता कामा नये. (दुध जास्त होण्यासाठी) . मग २ वर्षानंतर रितसर ऑर्गॅनिक म्हणून म्हणवता येते. त्यातही FDA चे नियम आहेत. ते पाळावे लागतात. अन्यथा १०००० डॉलर दंड व शिक्षा वा दोन्ही होऊ शकते. म्हणून ऑर्गॅनिक म्हणवून घेणे इथे तेवढे सोपे नाही.

ऑर्गॅनिक म्हणल्यावर "वाकडं" पाहणारे इथेही आहेतच Wink

केदारजी, मी तिकडचं नाही हो,
'इकडचं'च बोलतो आहे... इथे वाट्टेल त्याला वाट्टेल ते सर्फिटिकेट भेटून जाईल. च्यापानी किती देता? डालरात देशाल तर लै झक्कास!

संपादनः सत्यमेव जयते हा कार्यक्रम उसगांवातल्या ऑर्ग्यानिक अन्नाबद्दल नाहिये ना केदारजी? तिथे चांगले मिळत असावे. अन असेल तर उत्तमच आहे. इथे मिळाले तर कुणास नको आहे? पण यावरून पुन्हा एकदा वेगळा सूर चर्चेस लागेल. why not think about what is ideal and what india should try to achieve.. 'that' is what this programme is trying to say. even if i accept this kind of argument, i shall always say that we must consider the ground realities and then set the goals. and for setting goals, there always is the planning commission...

इब्लिसजी म्हणूनच मी अमेरिकेत हा शब्द योजला आहे. आणि तुमचे सर्टिफिकेटचे बरोबर आहे. तिकडे कश्याचेही सर्टिफिकेट मिळेल. पैसे मोजले तर अगदी पुरूष गरोदर असल्याचे पण. शंकाच नाही. Happy

उदा ह्यासाठी ही आपण (म्हणजे भारत) देश म्हणून शिकायला पाहिजे त्या देशाकडून. अन्यथा अमेरिका म्हणजे सगळे वाईटच असे म्हणायला सगळेच पेटून ऊठलेले असतातच म्हणा.

च्यापानी किती देता? डालरात देशाल तर लै झक्कास! >>> थोडसं जरा नीट बोलत जा हो. इथे चर्चा चालू आहे असे वाटले होते. दर वेळी वाकड्यात शिरायची गरज का भासते तुम्हाला?

केदारजी,
वर मी थोडं एडिटलं.
अन डॉलरात लाच मागणे हे तुम्हाला कमी लेखणे नव्हते, ते इथल्या 'परवाना'दायक सुपरव्हाय्सरांचे विडंबन होते. माफ करा, चुकीचा अर्थ आपणापर्यंत पोहोचला..

ओके. खर्‍या अर्थाबद्दल धन्यवाद.

हे तुमचे वाक्य

. and for setting goals, there always is the planning commission... >> सिरियसली?

हे कोणते प्लानिंग कमीशन आहे जे अजूनही १० कोसावर जाऊन पाणी आणायला लावते?
हे कोणते प्लानिंग कमीशन आहे जे भारतातील सर्व खेडी अजूनही रोड द्वारे जोडू शकले नाही. खेडी सोडून द्या शहर देखील व्यवस्थित जोडली नाहीत.
अजून अशी खूप उदा देता येतील.

दुर्दैवाने मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे इब्लिसजी. ह्या प्रत्येक योजना अभ्यासाला होत्या. १०० मार्कासाठी का होईना अभ्यास करावा लागला. सगळेच हास्यास्पद होते त्यात. हे फक्त कमीशन वाले मिशन आहे.

असो हा विषय हा बाफचा नाही. तुम्ही प्लानिंग कमिशन कडे जात आहात, तेवढे तुम्हाला सावध करावे वाटले.

खरेच तो विषय वेगळा आहे. प्लॅनिंग कमिशन चे रिपोर्ट नीट इंप्लिमेंट केले/होऊ दिलेत तर वेगळे काही झाले असते. पंचवार्षिक योजनांवर कुठे/कधीतरी चर्चा झालीच पाहिजे. असो.

माझ्या खुलाश्याने तुमच्या मनातिल किल्मिष दुर झाले असेल तर आनंदच आहे धन्यवाद!

देशात नैसर्गिक रित्या शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झालेले आहे. कीटकनाशकं फवारल्यानंतर त्यांचं काय होतं याचा विचार होतो का ? त्यातली काही २५ - ३० वर्षं माती आणि हवेत टिकून राहतात. काही जमिनीतून खालच्या पाण्याच्या स्त्रोतांमधे मिसळतात. त्यातून भूमिगत पाणी दूषित झाल्याने विहीरींचेही पाणी दूषित होते. केरळात झालेल्या सर्वेमधे हे समोर आलेय. मध्यप्रदेश / उत्तरप्रदेशच्या सीमावर्ती क्षेत्रातल्या एका गावामधे मध्यंतरी एका गूढ आजाराची चर्चा होती. मुलांच्या मेंदूला सूज येऊन काही दिवसांनी विकृती किंवा मृत्यू असे परिणाम व्हायचे. याचं कारण समोर आलं ते ही कीटकनाशकंच..

मात्रा काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त असेल , मात्र आज ना उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांवर त्याचा परिणाम होणारच नाही असं ठामपणे म्हणता येईल का ?

या दृष्टीने या इश्श्युवर कशी का होईना चर्चा घडवून आणली जात असेल तर मी स्वागतच करीन. आमीरला तलाशसाठी ४५ कोटी मानधन मिळाल्याची चर्चा आहे. तलाशचं शूटिंग त्याने सत्यमेव जयतेसाठी वर्षभर पुढे ढकललं होतं. तूर्तास इतकंच. पुन्हा नको ती चर्चा.

हं.
टेराटोजेनिसिटी : गहन अन गंभीर विषय.
याबाबतीत शिकायला आवडेल.
(वर्षाणुवर्षे डाक्टरकी करून, एकही इन्सेक्टिसाईड इन्ड्यूस्ड टेराटोमा प्रत्यक्ष न पाहिलेला - पडेल डाक्टर) इब्लिस...

... आप ने कुछ तस्वीरें साथ लायी है. देखना चाहेंगे हम!

डॉक्टर
माफ करा. कदाचित तुमच्या क्षेत्रामधे तुम्हाला असे रुग्ण पहायला मिळाले नसावेत. पण हल्ली अकाली केस पिकण्याचे वाढलेले प्रमाण, डोळ्यांचे विकार, कमी प्रतिकारशक्ती इ. यांची कारणे मुळापासून पाहिली जातात का ? स्लो पॉयझनिंग म्हणून नोंदवल्या गेलेल्या केसमधे त्याचं मूळ समजणे सहज शक्य आते का ? जोपर्यंत एखादा सर्व्हे होत नाही आणि अमूक एका शहरातल्या नागरिकांना अमूक एका पेस्टिसाईडनेयुक्त पानी प्यावे लागत आहे , असा अहवाल येत नाही तोपर्यंत लक्षणांनी युक्त रुग्ण आजूबाजूला असले तरीही ओळखता येणं कठीणच आहे. पेस्टिसाईडच्या जोडीला प्रदूषणाचे परिणाम हे ही याच एपिसोडमधे असते तर आपल्याला किती विषारी वातावरणात काम करावे लागते याची कल्पना आली असती. शहरातून तरी अ‍ॅक्टिव्हेटेड कार्बनयुक्त फिल्टर वापरले जातात. अमेरिकन नेव्हीच्या स्टँडर्डप्रमाणे ते बायोलॉजिकल आणि केमिकल वॉरफेअरमधे दूषित हवा गाळण्यासाठी वापरले जातात. ०.१ मायक्रॉन पर्यंतचे जिवाणू / विषाणू आणि जवळपास सगळेच घातक रासायनिक वायू यात गाळले जातात. पाणी शुद्धीकरण संयंत्रातदेखील घातक द्रव्ये टाकीच्या तळाशी राहतात. शहरात पाण्यापासून होणारे प्रदूषण अत्यल्प असते. कीटकनाशकांचा अंश भाज्या आणि शेतीजन्य पदार्थातून आपल्या शरीरात जातो. त्यातही पाण्याने धुवून घेण्याच्या सवयीने वरचा थर ब-यापैकी धुतला जातो. पण अल्प प्रमाणात राहून गेलेले कीटकनाशक रोज थोडे थोडे शरीरात गेल्याने त्याचा परिणाम होणार नाही असं कसं म्हणता येईल ? वंध्यत्वाची कारणे अनेक आहेत. पण गेल्या काही वर्षात वंध्यत्वाच्या रुग्णांमधे झालेल्या वाढीचा आढावा घेतला गेल्यास त्यात या स्लो पॉयझनिंगचा काही संबंध आहे का हे ही पहायला हवं.

जोपर्यंत परस्परसंबंध अशा प्रकारे समोर येत नाही तोपर्यंत रुग्णांच्या सवयी भाज्यांचे नमुने घेणे, तपासणी करणे इ. सर्व डॉक्टरला शक्य सहज शक्य होईल असे वाटत नाही. खरं तर असे रुग्ण जेव्हां डॉक्टरकडे येत असतील तेव्हां मूळ कारणाबद्दल त्या रुग्णाला तरी सांगायचं सुचत असेल का ?

नंतर भेटूच.. शुभरात्री !

>>>
फक्त किड्या मुंग्यांना कीटकनाशकांचा 'रेझिस्टन्स' येतो का हो?
तुम्हाआम्हाला नाही येत?? व्हाय नॉट?
>>>

कारण आपले आयुर्मान किड्यांपेक्षा फार जास्त असते. जेव्हढ्या काळात आपली एक पिढी 'पुढे' सरकते, त्यांच्या लाखो पिढ्या होऊन जातात. त्यांची पुनरुत्पादन क्षमता जास्त असते. एक डासमादी जितकी अंडी घालेल, तितकी रेझिस्टन्स वाढण्याची शक्यता जास्त. माणसाच्या "एक या दो" धोरणाने फार फायदा नाही. सिकल सेल अ‍ॅनिमियाचे उदाहरण आठवा. तिथे माणसाला रेझिस्टन्स निर्माण झाला आहे. पण किती पिढ्यांनंतर?

Pages