करीना आणि विद्या यांनी अखंड शाहीद का नाकारला ?

Submitted by Kiran.. on 23 June, 2012 - 12:14

विषयाचा टीव्हीवर अनेकदा करिनावादी आणि बालनवादी आयडीनी किस काढलेला आहे.
तरी सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार व्हावा.
प्रा. फेसबुक गोरे यांनी संशोधन करून ‘करीना आणि विद्या यांनी अखंड शाहीद का नाकारला ?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे.

"एका टप्प्यानंतर ‘अखंड शाहीद’चा आग्रह धरल्यास इंडस्ट्रीतील बहुसंख्य खानांच्या हिताचे रक्षण करणे आणि एक हिरॉईन म्हणून कारिअर चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव विद्यासह करिनाला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच शाहीदची हकालपट्टी करिनाने पूर्ण विचारांती स्वीकारली."

या ग्रंथातील मते जर खरी सप्रमाण असतील तर करिना x विद्या हा वाद कायमचा मिटेल हि अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर हर महादेव, दीन दीन, वाहे गुरु कि खालसा.. वाहे गुरु कि फतेह, येळकोट येळकोट जय मल्हार अशा वातावरणात एका प्रगल्भ चर्चेची वाट पहात आहे.

आ. नम्र

किरण डोकेफोडे

विद्या बालन निदान सुंदर आणी डोके असलेली तरी आहे, करीना फार तर मादक आहे. त्यामुळेत्यात तुलना ही नको आणी अर्धा असो वा अखंड शाहीद पण नको आणी खानावळ पण नक्कोच. Rofl

ऑलिम्पिक्स
झेन
स्वयंपाकाची उपकरणे
कूटप्रश्न
नृत्य
योग
होमिओपथी
बागकाम
तत्त्वज्ञान

वरील 'कीवर्ड्स' मधे होमिओपथी असल्यामुळे णीषेढयुक्त प्रतिसाद टाईप करण्यात येत आहे.

झेन द्वारे प्राप्त झालेली मनःशांती वापरून ऑलिम्पिक जिंकण्यासाठी लागावी तितक्या एकाग्रतेने स्वयंपाकाच्या उपकरणांचा वापर करून योगा योगाने नृत्य करत शाहिदचे अखंड तुकडे करून ते होमिओपथिक साईझ इतके बारीक केले तर त्यामुळे बागकामाच्या तत्वज्ञानात काही फरक पडणारे का?

तेंव्हा जिल्बीचा निषेध!
(डायबेटिक) इब्लिस

हे संशोधन प्रा. फेसबुक यांचे नसून प्रा. डॉ. गूगल यांचे आहे. त्यांच्या प्रबंधाच्या पहिल्या एक दोन पानांतूनच ही माहिती मिळाली. पुढची पाने अजूनही कोणी वाचलेली नाहीत. माझ्या ब्लॉगवर याबद्दल विस्तृत माहिती आहे (***).

वडिलांचे नाव करमचंद असणार्‍या लोकांना मिळणारा बहुसंख्य लोकांचा पाठिंबा पाहून शाहीद ने चलाखीने आपल्या बापाला करमचंद चा रोल करण्यास सांगून त्याच नावाने तो वर्षानुवर्षे फेमस होईल असे पाहिले. त्यात स्वतः खान नसून आपल्या नावावरून लोकांचा आपण खान आहोत असा समज होईल असेही केले (उदा: शाहीद खान आफ्रिदी). आपल्यावरही शेषराव मोर्‍यांनी संशोधन करावे म्हणून तो चित्रपट कलाकारांच्या नेहमीच्या धेडगुजरी हिन्दीत ये दिल माँगे मोरे म्हंटला, तर पेप्सीने ते स्पेलिंग शब्दशः घेऊन त्याची टॅगलाईन करून शाहीदलाच आपल्या जाहिरातीत ये दिल माँगे मोअर करून वापरली.

त्यामुळे आपल्यावर प्रेम करायचे सोडून ही इतर नाटके करत बसल्याने त्या दोघींनी तो नाकारला.

*** - म्हणजे लोकांनी ती पाने का वाचलेली नाहीत याबद्दल माहिती आहे. ती पाने मी ही वाचलेली नाहीत.

छान

आजवर प्रत्येक जण मन मानेल तसा आपल्या डोक्याचा ताबा घेत आलेला आहे. खरं म्हणजे आपली डोकी बधीर झालेली आहेत. पूर्वी फिल्मफेअर पत्रात छापून येईल ते काळं अक्षर म्हणजेच खरं समजलो आणि आता अवार्ड फंक्शन्स !
आपली मतं बनवली गेलेली आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. कधी कधी आपण स्वतःच आपलं डोकं गहाण टाकतो आणि मग ते जसं नांगरतील तसं आपलं डोकं मशागतीसाठी तयार होतं.

म्हणून तरन आदर्श जेव्हा स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीचा वापर करू पाहतात तेव्हाच त्यांना दंडवत घालावासा वाटतो.

वडिलांचे नाव करमचंद असणार्‍या लोकांना मिळणारा बहुसंख्य लोकांचा पाठिंबा पाहून शाहीद ने चलाखीने आपल्या बापाला करमचंद चा रोल करण्यास सांगून त्याच नावाने तो वर्षानुवर्षे फेमस होईल असे पाहिले.
>>>> फारेण्डा... Lol

वडिलांचे नाव करमचंद असणार्‍या लोकांना मिळणारा बहुसंख्य लोकांचा पाठिंबा पाहून शाहीद ने चलाखीने आपल्या बापाला करमचंद चा रोल करण्यास सांगून त्याच नावाने तो वर्षानुवर्षे फेमस होईल असे पाहिले.

@ फारेण्डा
एका नव्या संशोधनानंतर करिना दामोदर कपूर हिचे वागणे योग्य असल्याचं म्हटलं गेलंय. दामोदरसुतांचे करमचंदपुत्रांशी आजही संबंध जुळत नाही हे सिद्धच होतंय यातून.

अरे काये हे! Rofl

आणि शब्दखुणांमधे
ऑलिम्पिक्स झेन स्वयंपाकाची उपकरणे कूटप्रश्न नृत्य योग होमिओपथी बागकाम तत्त्वज्ञान >>>> Lol

लेखाचे शीर्षक वाचूनच Rofl
फारेंडा. करमचंद मस्तच रे Rofl
दामोदरसुतांचे करमचंदपुत्रांशी आजही संबंध जुळत नाही हे सिद्धच होतंय यातून.>>> हा कळस आहे!!!!!

जगात दोनच बाप..............................एक करमचंद....दुसरा दामोदर........ Lol

हा प्रश्नही तुच दिला, उत्तरही तुच दिले
पण मला वाटते बहुतेक नट्या खानावळीत लोळतात.
हिचेही काहीचे मागुन असेच झाले असणार

Pages