त्रिवेणी

Submitted by गणेश कुलकर्णी on 22 June, 2012 - 10:51

१)
हल्ली मला पहिल्या सारखे
कांही नवीन सुचत नाही
.
.
.
बहुधा 'तिच्यात' कांही बदल झाले नसावेत !

२)
ह्या पावसाळ्यात तसा पाऊस
जास्तीचा पडला नाही...
.
.
.
कदाचित 'ती' उन्हाळ्यात खूप रडली असावी!

*****
समीप
*****

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आशय आवडला. पण तिसरी ओळ कनेक्ट करताना बहुदा, कदाचित वै. शब्दांचा आधार घ्यावा लागू नये असे वाटते. तिसरी ओळ लिहिलीएच अशी गेली पाहिजे की पहिल्या २ ओळींमधे मांडलेल्या आशयाचा कार्यकारणभाव लक्षात आपोआपच यावा (असे मला वाटले).