पाऊस

Submitted by aart on 21 June, 2012 - 13:58

सजुन आला वेशीवरती
थेंबनाचरा पाऊस..
गोजिरवाण्या गिरक्यांची
छुमछुमणारी पैंजणहौस..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वॉव.......!!!
मला आजवर सर्वाधिक आवडलेली ही चार-ओळी

अशाच अजून किमान २ तरी कराच कविता पूर्ण करायला
किंवा हिला धृपदासाराखी ठेवून दोन कडवी (जराश्या मोठ्या वृत्तात ४ते ६ मात्रा जास्त असतील अशा )
करून एक झकास गीत करा ........."पाउसगाणं !!"
मजा येईल
किती छान लिहिता तुम्ही ..............
काय अप्रतीम आहेत या ओळी ............. आहा मस्त
आता दिवसभर काही वाचायला नाही मिळाला तरी कै नै वाटणार !!

तो सजून आला वेशीवरती थेंबनाचरा पाउस्.....
गोजिरवाण्या गिरक्यांची छुम्छुमणारी पैंजणहौस्..!!॥धृ.॥