ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा...

Submitted by सेनापती... on 15 June, 2012 - 12:00

नमस्कार,

११ व्या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने एक अभिनव स्पर्धा आयोजित करत आहोत.

ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा:

आजकाल कोणी फारसे लिहित आणि कोणी फारसे वाचत देखील नाही अशी सरसकट चर्चा सर्वत्र आढळते. पण नव्या पिढीतील ट्रेकर्स नव्या तंत्रज्ञाच्या साथीने आपले अनुभव इंटरनेटच्या माध्यमातून ब्लॉगद्वारे लिहत आहेत. फार मोठी संख्या नसली तर ट्रेकिंगवर सुमारे ३० एक ब्लॉग तरी आज मराठीत आहेत. त्यामुळेच या नव्या युगाच्या नव्या माध्यमाला चालना द्यावी आणि एक व्यासपीठ मिळवून द्यावे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

विषय: सह्यपदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयन भ्रमंती, पर्वतारोहण

लिखाणाची भाषा: मराठी

स्पर्धेसाठी लिखाणाचा ग्राह्य कालावधी : ब्लॉग स्पर्धेची हि पहिलीच वेळ असल्यामुळे, परीक्षणाच्या तारखेपर्यंत जे काही लिखाण ब्लॉगवर असेल ते सर्व लिखाण ग्राह्य धरले जाईल.
(पुढील वर्षापासून कालावधीची मर्यादा असेल)

निकष: विषय मांडणी, भाषा, ताजेपणा, लिखाणातील तांत्रिक अचूकता, ब्लॉग मांडणी.
अंतिम दिनांक: ३० जून २०१२
संपर्क: सुहास जोशी ९८३३०६८१४०

११ वे गिरिमित्र संमेलन...

ज्यांना स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी सुहास जोशी यांना संपर्क करावा किंवा मला विपु करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users