मी पाहिलेले न्यू यॉर्क शहर !

Submitted by सुलभा on 14 June, 2012 - 04:19

न्यू यॉर्क शहर ! कधीही न झोपणारे ,कायम पळत असणारे ,आजूबाजूला सतत लोक,भरभर चालणारे ! सुटाबुटातील ! तुम्हाला तिथे कधीच एकटेपणा वाटणार नाही.मग तुम्ही ब्रुकलीन ब्रिजवर असा अथवा टाईम्स स्क़्वेअर वर . वॉल स्ट्रीट असो कि manhattan , तुम्ही एकटे कधीच नसता ! हीच तर याची खासियत आहे !
तुम्ही कुठल्याही देशाचे असा ,पंथाचे असा,गोरे असा,काळे असा, Asian असा ,आफ्रिकन असा वा युरोपियन किंवा अमेरिकन असा, एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही एकटे नसता. सर्वांना या शहराने आपलेसे केले आहे. या लोकांनीच या शहराला ओळख दिली आहे.प्रत्येक ठिकाणी विविधतेला वाव ठेवला.विविध धर्माच्या ,विविध देशाच्या लोकांना या शहराने त्याच्यात सामावून घेतले.तुम्ही कधीही जा आणि तिथलेच बनायला तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही,त्रास होत नाही.
चोवीस तास चालू असणारे फूड joints ,रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या ,हॉटेल्स पाहिले कि जाणवते ,हे शहर जणू कधी झोपतच नाही,सतत जागेच असते.
रमणीय दिसणारे आकाश,आकाशाला गवसणी घालणाऱ्या बिल्डींग्स,उंच उंच इमारतींमुळे रस्त्यांमध्ये लागणारा तो वारा......हा अशा प्रकारे इमारतीआणि रस्त्यांमध्ये बंदिस्त झालेला वारा आपल्याला तिथेच अनुभवायला मिळतो.मग एखाद्या इमारतीच्या आडोशाला गेलं कि वाऱ्यापासून सुटका मिळते. पण हीच तर इथली ओळख आहे.
रस्त्यांतून मधून मधून ऐकू येणारे भोंगे ! हे भोंगे कधी पोलिसांच्या गाडीचे तर कधी ambulance चे आणि कधी फायर ब्रिगेडच्या गाडीचे.या सायरनच्या music background मुळे ह्या शहराला melody मिळाली आहे .फार कुतूहल वाटते .
जमिनीखालून धावणाऱ्या सबवे रेल्वेचे जाळे,रस्त्यांवरच्या पिवळ्या taxis आणि times स्क्वेअरचे मोठाले प्रकाशमान billboards .टिपिकल न्यू यॉर्क !
पण हे काही नवीन वाटत नव्हते मला ! जणू मी इथलीच असल्यासारखी ! जणू हे सर्व काही मी पूर्वी पाहिल्यासारखे ! अर्थात इंग्लिश सिनेमांमधून हे आपल्याला पाहायला मिळते. पण मला आठवत होते ते माझे बालपण ! होय, न्यू यॉर्क शहर मला माझ्या बालपणात घेऊन गेले,मुंबईला ! माझे लहानपण ,शिक्षण मुंबईला झालेले. आणि मग नकळतच मला या दोन शहरांमधील साम्य दिसले.
त्या पिवळ्या -काळ्या रंगाच्या taxis ,मरीन drive चा तो झोंबरा वारा, लोकल ट्रेन्स ने विणलेले जाळे, रस्त्यांच्या कडेला असणारे खाद्यपदार्थ विक्रेते ! कायम जागी असणारी मुंबई !शहराची स्वतःची अशी एक ओळख आहे. ती दुसरीकडे आपल्याला दिसत नाही. जणू मुंबईने आपले स्वत्व जपले आहे. आता त्यात शहरीकरणाची वाढ म्हणजे GUCCI आणि FOSSIL अशांसारखे दिसणारे मोठाले प्रकाशमान billboards .
दोन्ही शहरांमध्ये अनेक साम्य आहे , काही आवडते, काही नावडते. दोन्ही शहरांवर मोठ्या आपत्ती ओढवल्या . त्यातून ही शहरे वर आली.न्यू योर्कमधील मोठे दोन towers जमीनदोस्त झाले. त्यावर आता स्मरणचिन्ह तलाव बांधले आहेत. आम्ही ९/११ चे स्मरण चिन्ह म्हणून बांधलेले तलाव पाहण्यास गेलो. खूपच सुंदर design ! कधी कधी मला आपल्या देशाच्या मुळमुळीत धोरणाचा राग येतो आणि अमेरिकेने घेतलेल्या धोरणाची योग्यता पटते. ताबडतोब शत्रूवर हल्ला चढवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा तो अमेरिकेनेच. मुंबईत बॉम्ब स्फोट झाले, अनेक निरपराध बळी पडले.
911-Memorial-WTC-Footprint-537x359.jpg

पण एवढ्या मोठ्या संकटा नंतरही या शहरांचा स्वभाव तोच राहिला. जणू काही घडलेच नाही. माणुसकी मुळे ही शहरे हळू हळू संकटातून वर आली. यातून वर येण्यास इथल्या भव्य इमारती नव्हेत तर इथली माणसे कारणीभूत आहेत. एकमेकांना प्रसंगी मदतीचा हात देणारी,दुसऱ्यांच्या दुक्खावर फुंकर घालणारी ,आधार देणारी माणसे. हाच या शहरांचा मुख्य दुवा आहे , हेच ते मुख्य साम्य !
आणि मग वाटलं कि हे खर तर संपूर्ण जगभराच साम्य आहे !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकच फोटो? अजुन फोटो टाका ना.
२ वर्ष मॅनहॅटच्या पलिकडच्या तिरावर जर्सी सिटी मधे राहिलो आहे.
घर अगदी हडसन नदीच्या तिरावर २२ व्या माळ्यावर होते. घराच्या हॉल मधुन टाईम्स स्क्वेअर तर बेडरूम मधुन स्टॅच्यु ऑफ लिबर्टी दिसायचं. माझ्या पण खुप आठवणि आहेत न्युयॉर्क शहरा बद्दल. आणि तुम्ही म्हणता तसे मुंबई आणि न्युयॉर्क मधे बरेच साम्य आहे. सगळ्यात महत्वाच म्हणजे दोन्ही शहरे कधिही न झोपणारी Happy

काही वर्षांपूर्वी सुट्टी घालवायला अमेरिकेच्या अनेक शहरांबरोबर न्यूयॉर्क मधे राहिलो होतो,सर्वात जास्त दिवस.. वॉल्डॉर्फ अस्टोरिया मधे.. शहराच्या चौकांमधून फिरताना अगदी मुंबईत फिरल्यासारखं वाटत होतं,तशीच गर्दी.. लंच टाईम ला टाईम्स स्क्वेअर च्या आसपास असाल तर तेथील लहानलहान रेस्टॉरेंट्स मधून लंच विकत घ्यायच्या लांब क्यूज पाहूनच दडपायला होतं..
न्यू यॉर्क मधे ब्रॉड वे ला नाटक पाहणं अनिवार्य !!!
इतरही फेमस बिल्डिंग्स,स्टूडियोज, स्टॅचू ऑफ लिबर्टी इ.इ.इ. अनेक गोष्टी पाहण्यात गंमत आहे..
आणी शॉपिंग इन न्यूयॉर्क ........... जस्ट अमेझिंग!!!!
अजून फोटोज टाका !!! Happy

@ वर्षु नील : आम्ही तिथे एका टपरीवर दुपारी हलाल गाईज कडून क्यू मध्ये उभे राहून लंच घेतले.ब्रोद्वे वर लायन किंग पहिला ! अप्रतिम ! आणि इतरही खूप काही ...खरेच खूप गम्मत आहे !

@ madard : इतके उदास नका होऊ ! नीट पाहाल तर लक्षात येईल, तीच चहल -पहल, तोच उत्साह ,पण आपली लोकसंख्याच इतकी आहे कि कोण किती पुरे पडणार ?!

या लेखामध्ये न्यू योर्क आणि मुंबई यात साम्य आहे हे म्हणण्यामागचा हेतू असा आहे कि, ज्याप्रमाणे भारतातील एखाद्या छोट्या गावात राहणाऱ्या माणसाला मुंबईविषयी आणि शहराविषयी जे आकर्षण असते, वाटते, तशाच प्रकारचे आकर्षण अमेरिकेतील छोट्या गावात राहणाऱ्या माणसाला न्यू योर्क विषयी वाटू शकते. आणि त्या दृष्टीकोनातून अमेरिकेची न्युयोर्क हि भारताची मुंबईच आहे .

एक कुतुहल : न्युयोर्कमधे पण अमेरीकेच्या दुसर्या राज्यातुन आलेल्यांना हिणवले जाते का? जसे मुंबईत भैया / बिहारी / लुंगीवाले हिणवले जातात. तेथे पण राज ठाकरे आहे का?

टेक्निकली दोघात काही साम्य नाही. मुंबई हे अतिशय बकाल शहर आहे.<<<

मुंबई हे अतिशय बकाल शहर झालेले आहे हे मान्य, पण मुंबईला बकाल बनविण्यात सर्वात मोठा हात आहे तो इतर राज्यातुन आलेल्या या उपर्‍यांचा, नाहीतर मुंबई सारखे नितांत सुंदर शहर नाही. व्य.म.

मुंबईत बिहारमधून माणसांचे लोंढेच्या लोंढे येतात, तसे अमेरिकेच्या इतर राज्यातून तिथे येत नसावेत...आपल्याकडचे प्रश्नच वेगळे आहेत. सरते शेवटी सर्व प्रश्न 'लोकसंख्येचा महापूर 'या एकाच प्रश्नापाशी येऊन थांबतात.

सुलभा छान लिहिलंय.
२००९ मध्ये २ दिवस पायी फिरून न्यूयॉर्क पाहिलं. तेव्हा सेन्ट्रल पार्कात मायकेल जॅक्सनला श्रद्धांजली चालली होती.
रात्री १२ वा. टाइम स्केअरला होतो.......खरंच हे शहर झोपत नाही.
आणि चायना टाऊनात खरेदी!
हा ब्रेकफास्ट मी टाइम स्केअरमधल्या एका फेमस हॉटेलात घेतला होता. आता नाव आठवत नाही.

DSC02981.JPG

खूप फोटो आहेत न्यूयॉर्कचे. काही इथे माबोवर आहेत.

टेक्निकली दोघात काही साम्य नाही. मुंबई हे अतिशय बकाल शहर आहे.

त्याचे काय आहे, वाईटच पहायचे ठरवले तर कुठेहि वाईट दिसतेच. म्हणजे सुंदर बाग, सुंदर तळे, सुंदर कमळे जिथे असतात, तिथेच कमळांच्या खाली चिखलहि असतोच, त्यातहि किडे असतातच, वगैरे वगैरे.
आपले मन ज्यामुळे आनंदित होते, तिकडे लक्ष दिल्यास बरे.

मुंबईत बिहारमधून माणसांचे लोंढेच्या लोंढे येतात, तसे अमेरिकेच्या इतर राज्यातून तिथे येत नसावेत...आपल्याकडचे प्रश्नच वेगळे आहेत.
खरे आहे. इथे १९५०-१९६० या दशकात आयसेनहॉवर राष्ट्राध्यक्ष असताना त्याने infrastructure म्हणजे मुख्यतः रस्ते बांधणीचे काम हाती घेतले नि ४१००० मैलाचे रस्ते चार पाच वर्षात बांधून काढले. नंतरहि रस्ते बांधणी, दुरुस्ती ही कामे चालूच आहेत. देशाच्या एका टोकापासून थेट दुसर्‍या टोकापर्यंत जाणारे अनेक रस्ते आहेत, त्यावर धावण्यासाठी फोर्ड, जी एम, ख्रायस्लर या कंपन्यांनी लक्षावधी मोटारी तयार केल्या, मध्यपूर्वेत जाऊन तिकडचे तेल बळकावले, परिणामी सर्वत्र वहाने, वीज, पाणी, टेलेफोन इ. सर्व सोयी सर्व खेड्यातसुद्धा उपलब्ध झाल्या. मग कारखाना शहरात काढून तिकडे माणसांचे लोंढेच्या लोंढे ओढवून घेण्यापेक्षा जिथे मनुष्यबळ स्वस्त आहे, जमीन स्वस्त व प्रचंड मोठी आहे, तिथेच कारखाने काढले. तयार माल अगडबंब ट्रक्स मधे भरून सहज, लवकर इकडून तिकडे नेता येतो. सर्वत्र टेलेफोन, विमान वहातुक, मोटरीचा प्रवास सुखाचा, जलद व आरामाचा - मग उगाच लोंढेच्या लोंढे इकडून तिकडे कशाला? नि आता तर काय, इंटरनेट, हाय स्पीड कम्युनिकेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग - म्हणजे काम चीन, भारतातच पाठवायचे - आणखी स्वस्त.
फक्त वरचे अधिकारी, सेल्स, मार्केटिंगमधले लोक गलेलठ्ठ पगार घेऊन आरामात न्यू यॉर्कमधे राहून एंजॉय करतात.

मुळात न्यू यॉर्क मधे नेहेमीसाठी राहून नेहेमी ब्रॉडवे, बेसबॉल, फुटबॉल, शॉपिंग इ. एंजॉय करायचे, शिवाय लहान मुलांना शाळा, इ. सगळे हवे असल्यास एक तर मिलियन डॉ. वर्षाला मिळत असायला हवे, नाहीतर भारतातून येऊन काही दिवस रहावे. भारतातल्या लोकांना काय, महिन्याभरासाठी फार तर फार एक दोन कोटी रुपये - म्हणजे किस झाडकी पत्ती!

बाकी भारतातले लोक इथे कायमचे कशाला येतील, आता मुंबई, बंगलोर, दिल्ली न्यू यॉर्कच्या तोंडात मारेल एव्हढे सुधारले आहे. तिथली हॉटेलेहि फायू स्टार काय सेव्हन ष्टार आहेत. आणि बॉलिवूड तर काय, विचारायलाच नको.

अहो जावुद्या झाले. माझी पोस्ट कशाला मनावर घेता.... बाकी तुम्हाला मुंबई बघुन किती वर्षे झाली. आजकाल माबो वर लिहायलाच भीती वाटते.

झकास वर्णन ! ! आम्ही दोघे जण आठ महिने न्युजर्सी मधील माहवाह येथे राहुन न्युयॉर्क येथे पाच सहा फेर्‍या करून नुकतेच भारतात परतलो ( १० फेब्रुवारी २०१४) त्यामुळे लेख वाचतांना ,आठवणी जाग्या झाल्यात. माहवाह मधून , न्यु यॉर्क कडे जातांना ,हाय वे वर एक पॉइन्ट असा येतो कि तेथून न्युयॉर्क शहरातील उंच इमारती लांबूनच दिसू लागतात . कारण माहवाह हे डोंगर दर्‍यात वसलेले शहर आहे. न्युयॉर्क शहरात प्रवेश करण्यापुर्वी १३ डॉलर्सचा
(७८० रु.) चा टोल भरावा लागतो. न्युयॉर्क मध्ये सुद्धा , मुंबई सारखीच पार्किंग ची मोठी समस्या आहे. टाइम स्केअर जवळील मॅडम तुसाद चे " मेणाच्या पुतळयांचे " संग्रहालय पहातांना ,पार्किंग नसल्याने , मुलगा कार इकडे तिकडे फिरवीत राहीला ( त्याने ते पूर्वीच पाहिले होते). रस्त्याच्या कडेला , जेथे आग विझवण्यासाठीचे नळ आहेत अगर ज्या जागा खास अपंग बंधूंसाठी ( निळे पट्टे मारलेले ) राखीव असतात , तेथे चुकीने कार पार्क केली तर २५० डॉलर्स (१५,००० रु.) असा जबरदस्त दंड आकारला जातो.एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या , १०२ व्या मजल्यावरुन न्युयॉर्क चे दर्शन म्हणजे नेत्राचे पारणे फिटणे होय. त्या बिल्डिंगची , लिफ्ट वर - खाली जातांना , १,२,३,४,.....असे मजले न गाठता दहाच्या पटीत , म्हणजे १०,२०,३०,४० .......अशा गतीने ,खरोखर एका मिनिटात ८६ मजले चढून जाते अगर खाली येते. न्युयॉर्क मधील सेन्ट्रल पार्क , इतका मोठा आहे कि आतमध्ये फिरण्यासाठी ,सायकली भाड्याने मिळतात. न्युयॉर्क शहरातील फूटपाथ वर ( तिकडे ' साइड वॉक ' म्हणतात ) काही ठिकाणी बसविलेल्या लोखंडी जाळ्यामधून , भुयारी रेल्वेच्या ( ति़कडे 'सब वे ' म्हणतात) जाण्या - येण्याचे आवाज छान ऐकू येतात. टाइम स्क्वेअर वर नेहमी गर्दी असतेच असते. अमेरिकन स्वातन्त्र्य दिनाच्या दिवशी ,न्युयॉर्क शहराच्या १२ th Avenue या रस्त्यावरच सर्वजण दुपारी चार वाजेपासून ठाण मांडून बसतात. प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होतो रात्री ९.३० वाजता ! ! पण रात्री ८.३० वाजेपर्यन्त अंधारच होत नाही ! आकाशात भुइनळे सोडले जातात. वीस मिनिटात सबंध आकाश लखलखत असते. अमेरिकन लोकांच्या हिशेबी ही ' दिवाळीच ' ! !
अमेरिकन वर्ल्ड टॉवर सेन्टर च्या ज्या दोन इमारती , ९ सप्टेम्बर २००१ रोजी पाडण्यात आल्यात , त्याच ठिकाणी
" 9/11 Memorial " म्हणून स्मारके उभारण्यात आली आहेत , त्या स्मारकांची संकल्पना अतिशय कल्पकतेने मांडण्यात आली आहे. पाडलेल्या इमारतीचा एक मजला , तसाच राखून ठेवण्यात आला आहे. त्यावरून आतील लोखंडी बीम किती जाडीचे वापरले होते याची कल्पना येते. जरी मुंबई व न्युयॉर्क शहरे थोडीबहूत सारखी असली तरीही न्युयॉर्क शहर एकदा तर पहावेसे वाटावे असे , तेथे प्रत्यक्ष जावून आल्यानंतर वाटते.

आजकाल माबो वर लिहायलाच भीती वाटते > सहमत..
त्यांनि फक्त त्यांन्चा अनुभव वर्णन केलाय, उगाच वाद घालुन त्यांन्च्या उत्साहावर का पाणि फिरवताय..

वर्णन आणि प्रचि मस्त...