ये रांगोळी है सदा के लिये!!

Submitted by वर्षू. on 12 June, 2012 - 06:14

दरवर्षी दिवाळी च्या दिवसांत फटाके,विविध फराळ इ. गोष्टींबरोबर रांगोळीची सुद्धा प्रकर्षाने आठवण येई..
फटाके अलाऊड नाहीत्,फराळ तयार करण्याकरता लागणारे पदार्थ उपलब्ध नसतात त्यामुळे मनात असून ही काही करता येत नाही..पण इथे मिळणारे स्टोन्स,टिकल्या पाहून रांगोळ्या तरी तयार कराव्यात असा विचार मनात आला आणी अमलात ही आणला..

रांगोळ्यांसाठी सामान जमवलं.. विविध टिकल्या ,स्टोन्स, प्लास्टिक चा रोल,सुपर ग्लू,मेणबत्तीची पेंसिल (या पेंसिलीच्या टोकामुळे बारीक स्टोन्स उचलून चिकटवणे सोपे होते), विविध रंगी टी लाईट कँडल्स.
साध्या अल्युमिनियम चा बेस असणार्‍या टी लाईट कँडल्स असल्या तर बेसला डबलटेप लावून घ्या. मग पील करून ,कलर्ड ग्लिटर मधे रोल करा..कि आपोआपच पूर्णे अल्युमिनियम चा बेस कलरफुल आणी चकमक दिसू लागतो.
(उत्साहाच्या भरात भला मोट्ठा रोल विकत आणलाय.. कधी संपणारे कोणास ठाऊक!!! Proud )

मग प्लास्टिकवर स्केचपेन ने विविध शेप्स काढून कात्रीने कापून घेतले, आणी स्टोन्स चिकटवून घेतले..
रांगोळ्या तयार.. उत्सवानंतर छानपैकी एकेक भाग , वेगवेगळा नीट पॅक करून ठेवून दिला कि पुढे कधी ही वापरायला इंस्टंट रांगोळी तय्यार!!
यावर्षी लेकीला आणी मैत्रीणींना या हॅण्ड्मेड रांगोळ्याच भेट म्हणून दिल्या..
(पत्ते खेळायला आवडणार्‍या मैत्रीणी करता टेबल डेकोरेशन!!)

इतर रांगोळ्या

या रांगोळीत प्लास्टिक ऐवजी पातळ कार्डबोर्ड आणी रंगीत चार्ट पेपर वापरलाय, डबल टेप ने चिकटवलाय पेपर्,नीट नेस यायला..

मधून मधून टी लाईट कँडल्स त्या त्या रंगाच्या लावल्या होत्या. फोटो काढायचा विसरून गेले कँडल्स लावल्यावर .. Uhoh

गुलमोहर: 

Pages