ये रांगोळी है सदा के लिये!!

Submitted by वर्षू. on 12 June, 2012 - 06:14

दरवर्षी दिवाळी च्या दिवसांत फटाके,विविध फराळ इ. गोष्टींबरोबर रांगोळीची सुद्धा प्रकर्षाने आठवण येई..
फटाके अलाऊड नाहीत्,फराळ तयार करण्याकरता लागणारे पदार्थ उपलब्ध नसतात त्यामुळे मनात असून ही काही करता येत नाही..पण इथे मिळणारे स्टोन्स,टिकल्या पाहून रांगोळ्या तरी तयार कराव्यात असा विचार मनात आला आणी अमलात ही आणला..

रांगोळ्यांसाठी सामान जमवलं.. विविध टिकल्या ,स्टोन्स, प्लास्टिक चा रोल,सुपर ग्लू,मेणबत्तीची पेंसिल (या पेंसिलीच्या टोकामुळे बारीक स्टोन्स उचलून चिकटवणे सोपे होते), विविध रंगी टी लाईट कँडल्स.
साध्या अल्युमिनियम चा बेस असणार्‍या टी लाईट कँडल्स असल्या तर बेसला डबलटेप लावून घ्या. मग पील करून ,कलर्ड ग्लिटर मधे रोल करा..कि आपोआपच पूर्णे अल्युमिनियम चा बेस कलरफुल आणी चकमक दिसू लागतो.
(उत्साहाच्या भरात भला मोट्ठा रोल विकत आणलाय.. कधी संपणारे कोणास ठाऊक!!! Proud )

मग प्लास्टिकवर स्केचपेन ने विविध शेप्स काढून कात्रीने कापून घेतले, आणी स्टोन्स चिकटवून घेतले..
रांगोळ्या तयार.. उत्सवानंतर छानपैकी एकेक भाग , वेगवेगळा नीट पॅक करून ठेवून दिला कि पुढे कधी ही वापरायला इंस्टंट रांगोळी तय्यार!!
यावर्षी लेकीला आणी मैत्रीणींना या हॅण्ड्मेड रांगोळ्याच भेट म्हणून दिल्या..
(पत्ते खेळायला आवडणार्‍या मैत्रीणी करता टेबल डेकोरेशन!!)

इतर रांगोळ्या

या रांगोळीत प्लास्टिक ऐवजी पातळ कार्डबोर्ड आणी रंगीत चार्ट पेपर वापरलाय, डबल टेप ने चिकटवलाय पेपर्,नीट नेस यायला..

मधून मधून टी लाईट कँडल्स त्या त्या रंगाच्या लावल्या होत्या. फोटो काढायचा विसरून गेले कँडल्स लावल्यावर .. Uhoh

गुलमोहर: 

एकच फोटो दिसला फक्त जो छान दिसतोय.
एरवी जगभरात 'मेड इन चायना' च्या वस्तू दिसतायत पण तुमच्या चायनात आमच्या जपानच्या वस्तू दिसतायत Wink

अपर्णा,मेधा.. खास तुमच्यासाठी टी लाईट कँडल्स..
काचेचा बेस असलेल्या टी लाईट कँडल्स

अ‍ॅल्युमिनियम बेस च्या टी लाईट कँडल्स

साधना,मानुषी,बिल्वा, मामी.. धन्स धन्स...
अवनी.. अगं पैला फोटू प्लास्टिक शीट च्या मोठठ्या रोल चा आहे...
सायो Lol ... लेबल्सवरची अक्षरं जॅपनीज मधे हायेत ना??? ही आमची एक्स्पोर्ट क्वालिटी बर्का Proud
अम्या.. सदा कोणे करून रम्मी चं डोकं खाऊ नकोस म्हंजे झालं Proud
अर्रे.. वही सदा जिसके लिये हीरे होते हैं... उसी सदा के लिये अब रांगोळ्या... हाकानाका!!!

३,४,५ रांगोळ्या मस्त आहेत.
>>... लेबल्सवरची अक्षरं जॅपनीज मधे हायेत ना>> हो, ट्रेस अप शीट असं लिहिलंय त्यावर.
आणखी एक- शिर्षकात रांगोळी ऐवजी 'रंगोली' करणार? आत्ताचं शिर्षक 'मराठी लोकांचं हिंदी' बीबीवर खपेल Wink

मस्तच गं....
ते टि लाईटचं कसं करायचं डि टे ल मधे दे न...माझ्याकडे तशा पांढर्^या शंभर मेणबत्या आहेत..दिवाळीत एकदम पुरे घर के बदल डालुंगा स्टाइल लावते...;) यंदा काही वेगळं करता यील का पाहाते...:)

व्वॉव!
सुंदर रांगोळ्या आहेत गं वर्षूतै Happy
रंगसंगती, डिझाईन्स सगळंच एकदम मस्त! मला कोयर्‍यांची रांगोळी सगळ्यात जास्त आवडली Happy
मी पण करुन बघते आता अश्या रांगोळ्या.

थांकु मित्रमंडळी..
आयडियांची कमी नाही.. हाच प्रयोग विविध आकाराच्या आरश्यांवर( गोल्,अष्टकोनी,चौकोनी, लहान ,मोठे ) करून पाहिला.. सेंटर टेबल वर खूप छान दिसतात ,राईन स्टोन लावलेले मिरर्स.. मधे सुबक कँडल्स ठेवल्या कि झटपट पण हटके डेको. तयार..

टी लाइटची काय भानगड आहे? त्या अल्युमिनियमच्या कॅन्डल्स मला लेकीने मागच्या वर्षी बर्‍याच दिल्या आहेत.
आणि हो त्या ग्लास बेस वाल्या आरोमाथेरपीच्या सुद्धा! त्यातला ऑरेन्ज जिन्जर वासाच्या कॅन्डल्स माझ्या सर्वात आवडत्या.

मानुषी अश्या प्रकारच्या कँडल्स ना टी लाईट कँडल्स असेच नाव आहे.. नेट वर गेलीस तर अजून पाहायला मिळतील.. याच नावाने शोध.. Happy

Pages