ये रांगोळी है सदा के लिये!!

Submitted by वर्षू. on 12 June, 2012 - 06:14

दरवर्षी दिवाळी च्या दिवसांत फटाके,विविध फराळ इ. गोष्टींबरोबर रांगोळीची सुद्धा प्रकर्षाने आठवण येई..
फटाके अलाऊड नाहीत्,फराळ तयार करण्याकरता लागणारे पदार्थ उपलब्ध नसतात त्यामुळे मनात असून ही काही करता येत नाही..पण इथे मिळणारे स्टोन्स,टिकल्या पाहून रांगोळ्या तरी तयार कराव्यात असा विचार मनात आला आणी अमलात ही आणला..

रांगोळ्यांसाठी सामान जमवलं.. विविध टिकल्या ,स्टोन्स, प्लास्टिक चा रोल,सुपर ग्लू,मेणबत्तीची पेंसिल (या पेंसिलीच्या टोकामुळे बारीक स्टोन्स उचलून चिकटवणे सोपे होते), विविध रंगी टी लाईट कँडल्स.
साध्या अल्युमिनियम चा बेस असणार्‍या टी लाईट कँडल्स असल्या तर बेसला डबलटेप लावून घ्या. मग पील करून ,कलर्ड ग्लिटर मधे रोल करा..कि आपोआपच पूर्णे अल्युमिनियम चा बेस कलरफुल आणी चकमक दिसू लागतो.
(उत्साहाच्या भरात भला मोट्ठा रोल विकत आणलाय.. कधी संपणारे कोणास ठाऊक!!! Proud )

मग प्लास्टिकवर स्केचपेन ने विविध शेप्स काढून कात्रीने कापून घेतले, आणी स्टोन्स चिकटवून घेतले..
रांगोळ्या तयार.. उत्सवानंतर छानपैकी एकेक भाग , वेगवेगळा नीट पॅक करून ठेवून दिला कि पुढे कधी ही वापरायला इंस्टंट रांगोळी तय्यार!!
यावर्षी लेकीला आणी मैत्रीणींना या हॅण्ड्मेड रांगोळ्याच भेट म्हणून दिल्या..
(पत्ते खेळायला आवडणार्‍या मैत्रीणी करता टेबल डेकोरेशन!!)

इतर रांगोळ्या

या रांगोळीत प्लास्टिक ऐवजी पातळ कार्डबोर्ड आणी रंगीत चार्ट पेपर वापरलाय, डबल टेप ने चिकटवलाय पेपर्,नीट नेस यायला..

मधून मधून टी लाईट कँडल्स त्या त्या रंगाच्या लावल्या होत्या. फोटो काढायचा विसरून गेले कँडल्स लावल्यावर .. Uhoh

गुलमोहर: 

.

वर्षु, कसल्या गोड आहेत या रांगोळ्या. वार्‍याने किंवा आलेल्या पाहुणीच्या साडीने विस्कटायची ही भीती नाही. कधी लिविंगच्या मध्यभागी काढली तरी काय क्लास दिसेल. झकास आयडिया आहे. तु काढल्यात ( आपलं चिकटवल्यात Wink ) पण सुंदर. Happy रंगसंगती छान आहेत.

मनीमाऊ... Lol Lol खरच विस्कटात नाहीत आणी मेड ने फर्रकन झाडू मारला तरी हर्कत नाही..
ड्रॉ करून कापण्याचं काम झटपट होतं.. चिकटवण्याकरता मिनिमम ३ ते ४ तास जातात..

खरंच गं तायो, आयडियाची कल्पना अफलातून आहे ही Happy
आणि मने खरंच गो, खर्रच्च.. मी मारे मर-मर करून महाल़क्ष्मीच्या वेळेस ऩक्षीदार रांगोळ्या काढते दारात आणि एखाद्या गप्पिष्ट काकूंची चप्पल बरोबर त्यावर जाऊन सुटते Angry गप्पांच्या नादात कळतच नाही म्हणे खाली रांगोळी आहे ते...
ही आयडिया टिकाऊ आहे गो Wink Happy

ताई, तू काढलेल्या सर्व रांगोळ्या तुझ्यासारख्याच क्यूट आल्यात Happy

मस्त.... छान कल्पना..... रंगसंगती एकदम छान ... मला शेवटची गणपतीची आवडली. ह्या गणपतीत चोरते ही आयडीया आणि भाव खाउन घेते!!!!

रच्याकने....

रोल जरा लहानच आहे नाही!!!!!! हीहीहीही.... ( आता वर्षु ताई पुढील अनेक वर्ष फक्त रांगोळ्याची डीझाइनच करत रहाणार बहुतेक.... बायांनो अत्ताच नाव नोंदणी करा... तसे ताई मला एक गीफ्ट करेलच......)

वर्षू, सुंदर आहेत रांगोळ्या.

पण पारंपारिक रांगोळ्यांमधे पण तरबेज आहेस, असे कानावर आलेय Happy

"पण पारंपारिक रांगोळ्यांमधे पण तरबेज आहेस, असे कानावर आलेय""... देवा... दिनेश दा..कुठून ऐकलं?? म्हंजे मीही अजून कोणाकडून माझ्याबद्दल हे ऐकलं नाहीये.. Wink
मोकिमी.. अगदी अगदी.. खातरजमा ठेव.. Lol
मोकिमी.. शेवटची तुला आवडलेली, कार्डबोर्ड वर रंगीत चार्टपेपर चिकटवून केलीये.. ती प्लास्टिकवर नाहीये..
रैनाला पण एक सेट.. माझी शेजारीणे ती!!! Happy
शशांक.. धन्स !!

मस्तच..!! मला रांगोळी काढायचा जाम कंटाळा येतो, चित्रकलेतही मी आहे, पण अशी रांगोळी तयार करायला आवडेल.. आजच कामाला लागते..
साबांना खुप बरे वाटेल, ऊर भरुन येईल त्यांचा जर मी असे काही केले तर.. Happy

सारीका.. सोप्प्या आहेत गं.. चिकाटी हवी फक्त!!
वॉव!!जयवी-जयश्री कडून प्रशस्तीपत्र!!! आहाहा!!! और क्या चाहिये!!! Happy थांकु गं!!

कसली भारी आय्डीआ आहे.. मला फक्त ते कापुन दिलंस आणि कुठे कुठे काय चिकटवायचं एव्हडं सांगितलंस तरी चालेल.. चिटकवायचं काम मी करेन.. Wink

अफलातुन. बाकी ते चिकटवण्याच्या कामाला चिकाटी हवी. देवा मला कधी देणार तु चिकाटी?
(स्वगतः नसला देणार तर वर्षूला माझ्यासाठी एक अशी सुंदर रांगोळी बनवायची आयडीया दे Wink )

छाने Happy

Pages