युरोपियन कप फुटबॉल - २०१२

Submitted by लोला on 10 June, 2012 - 09:04

युरोपियन कप फुटबॉल (सॉकर) स्पर्धा सुरु झाली आहे. पोलंड आणि युक्रेनमध्ये हे सामने खेळले जात आहेत. फुटबॉल जगतात ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे.
यावर चर्चा करण्यासाठी हा धागा-

वेबसाईट - http://www.uefa.com/uefaeuro/index.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब गटात काल धम्माल उडालेली आहे... डेन्मार्कनी हॉलंडला धक्का दिलेला आहे... हॉलंड यंदा जिंकेल असे वाटत होते... रॉबेन, वॅन पर्सी, श्नायडर.. असले क्लब लेव्हल गाजवलेले खेळाडू असल्यामुळे त्यांना संधी जबरदस्त होती.. पण आता दोन्ही गेम जिंकून दुसर्‍या टीमच्या कामगिरीवर सगळे अवलंबून आहे...

बघणारे बघतात हो... आणि रोज एक मॅच आहे की ९ वाजता सुरु होणारी ती बघा... दुसरी दुसर्‍या दिवशी सकाळी बघा...

लोला, थँक्स. मी वाटच बघत होते कोणी नविन धागा चालु करतं आहे का? मला आश्चर्यच वाटलं कि मॅचेस चालु झाल्या तरी अजुन माबोवर काहीच चर्चा नाही. Happy कालची हॉलंड vs डेन्मार्क शॉकिंग होती. वर्ल्ड कप २०१० ला फायनल्स खेळलेली टीम म्हणुन जरा जास्तच अपेक्षा होती.

आज मी स्पेनला सपोर्ट करते आहे.

आयरलँड आणि क्रोशिया................. १-३ होती ६० मिनिटाला.......... पुढे माहीत नाही काय झाले Happy

कालची स्पेन - इटली मस्त झाली मॅच... बरोबरीत सुटली... म्हणजे आता पुढच्या दोन्ही मॅचेस जिंकल्या की ह्या दोन्ही टीम्स पुढच्या फेरीत... स्पेननी काही चांगल्या संधी घालवल्या पण... इटलीनी मारलेला पहिला गोल मस्त होता.. त्या मानानी स्पेनचा गोल सरळ होता... रेफरी पहिल्या हाफ मध्ये जरा शांत होता.. दुसर्‍या हाफ मध्ये कार्डस दाखवत होता... पहिल्या हाफ मध्ये पण दोन ते तीन कार्डस द्यायला पाहिजे होती... कदाचित वेगळा निर्णय दिसू शकला असता... पण स्पेनची टोरेस आणि फॅबरगॅसला एकत्र न खेळवण्याचा फंडा काही झेपला नाही... दोघांनी मिळून केलेली आक्रमणं जास्त धोकादायक ठरली असती...

इतके चांसेस घालवले दोघांनी मिळुन ......... Sad
पहिला गोल जर स्पेन कडुन झाला असता तर सामन्यात रंगत आली असती. कारण नंतर बरोबरी झाल्यावर इटली ने सामना बरोबरीत राखण्यातच जास्त लक्ष दिले असे वाटले...

लोला काम कर मॅच बघू नकोस. रेकॉर्ड करायला लाव.
काल ESPN वरच फक्त स्पॅनिशच येत होतं Uhoh
टे. अन्-चॅ. लोकांची मदत मागावी लागणार. श्या..

काल डेन्मार्क पोर्तुगाल मॅच मस्त झाली.. नेहमीप्रमाणे रोनाल्डोनी प्रचंड संधी वाया घालवल्या.... तो नॅशनल टीम मध्ये खेळताना कसले तरी दडपण घेऊन खेळतो...

ह्या गटातून कुठलेही दोन संघ पुढच्या फेरीत जाऊ शकतात... हॉलंड काल जर्मनी विरुद्ध पण हारले... पण जर त्यांनी शेवटच्या मॅच मध्ये पोर्तुगालला किमान तीन गोल्सच्या फरकाने हारवले आणि जर्मनीनी डेन्मार्कला एकही गोल न स्विकारता हारवले तर हॉलंड पुढच्या फेरीत जाऊ शकेल... ह्याच्या विरुद्ध जर पोर्तुगाल जिंकले आणि डेन्मार्कही जिंकले तर ते दोघे पुढच्या फेरीत जाऊ शकतील आणि जर्मनी आणि हॉलंड बाद होतील... सामने बरोबरीत सुटले तर जर्मनी आणि पोर्तुगाल पुढे जाणार.. कारण काल पोर्तुगालनी डेन्मार्कला हारवले आहे.. आणि गोल फरक समान आहे.. जर गोल फरक वेगळा असेल तर ज्याचा गोल फरक जास्त तो पुढे जाणार..
जर्मनीला पुढच्या फेरीत जाण्यासाठी सामना बरोबरीत सोडवला तरी चालणार आहे... हॉलंडला सामना काहीही झाले तरी ३ पेक्षा जास्त गोलनी जिंकायलाच लागणार आहे आणि दुसर्‍या सामन्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे..
सध्याचा फॉर्म बघता हॉलंड बाहेर पडायची शक्यताच जास्त आहे.. डेन्मार्क की पोर्तुगाल हेच बघावे लागेल..

अ गटात पण अशीच मज्जा आहे... रशिया (४), झेक (३), पोलंड (२), ग्रीस (१) अशी सध्याची क्रमवारी आहे..
रशिया - ग्रीस आणि झेक - पोलंड अश्या लढती आहेत..
रशिया - ग्रीस - रशिया जिंकल्यावर किंवा बरोबरी झाली तर रशिया पुढच्या फेरीत आणि ग्रीस बाहेर, ग्रीस जिंकल्यास झेक - पोलंड मॅच वर अवलंबून आणि गोल फरक महत्त्वाचा.. ग्रीसला जिंकायलाच पाहिजे अन्यथा गतवेळचे विजेते साखळीतच स्पर्धेतून बाहेर.
झेक - पोलंड - पोलंड जिंकल्यास पुढच्या फेरीत.. बरोबरी झाल्यास झेक पुढच्या फेरीत पण जर ग्रीस जिंकले तर गोल फरकामुळे ग्रीस पुढच्या फेरीत.. झेक जिंकल्यास पुढच्या फेरीत.
रशिया जबरी फॉर्ममध्ये आहे त्यामुळे त्यांना हारवणे ग्रीसला अवघड आहे त्यामुळे रशिया नक्की पुढच्या फेरीत जातील.. झेकनी पहिल्या सामन्यात गचाळ खेळल्यावर दुसर्‍या सामन्यात बरा खेळ करून विजय मिळवला पण तरीही पोलंडला घरच्या प्रेक्षकांचे समर्थन आहे त्यामुळे त्यांना जास्त संधी आहे..

अरे इथे इतकं काही लिहायला होतं आणि हा धागाच हरवला होता. काय एकेक मस्त मॅच झाल्या.
आज मी स्पेनला सपोर्ट करते आहे. Happy

Pages