"सत्यमेव जयते" भाग ६ - (We Can Fly!)

Submitted by आनंदयात्री on 10 June, 2012 - 01:58

आज, १० जून २०१२ च्या सहाव्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा....

"तूम्ही ज्या तर्‍हेने माझा हात धरता, त्यावरुन मला कळते....."

धिस इज रीअली समथिंग.
नसिरूद्दीन शाह शबाना आझमी अभिनित 'स्पर्श' मध्ये शाळा प्रमुख अंध नासिरला डोळस शबाना शाळेतील मुलांबद्दल म्हणते, "इन बेचारोंके लिये मै कुछ करना चाहती हूं.." तर तिथल्या तिथे नासिर तिला खडसावतो "प्लीज ये बेचारा लब्ज मत इस्तेमाल किजीए. ये देख नही सकते लेकीन फिर भी बहुत कुछ देख सकते है !" यावर ती खजिल होते.

ते एम.डी. देखील नासिरच्या व्याख्येतीलच व्यक्ती आहेत.

@ दक्षिणा...

कृष्णकांत माने आगाऊ बोलत होते असे म्हणण्यापेक्षा काहीसे 'कडवट' पणे बोलत होते असे मला वाटत होते. कदाचित ज्या परिस्थितीतून त्यानी कालक्रमणा केली असेल त्या अनुभवापोटीही त्यांची ती भाषा त्यांच्या मुखी वसली असेल. बाकी जीवनात यशस्वी झाले आहेत हे तर सत्य आहेच.

अशोक पाटील

.

भारतातल्या किती शाळांमध्ये सोयी म्हणण्यासारख्या उपलब्ध असतात.
शिक्षकांच्या एकंदर सर्वसाधारण गुणवत्तेवर व क्षमतेवरच प्रश्नचिन्ह असताना (त्याची कारणे लक्षात घेऊनच लिहितोय, पण वस्तुस्थिती आहे ती आहे) स्पेशल स्किल्स घेतलेले शिक्षक प्रत्येक शाळेत उपलब्द असावेत असा आग्रह धरणे स्वपरंजन वाटले.>>>>+१. फक्त शाळेत प्रवेश दिल्याने प्रश्न मिटणार नाहीत. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत.. ज्यांच्या मधे अपंगत्वामुळे काही गोष्टी शिकायला वेळ लागतो.
ईथे (अमेरिकेत), वय वर्ष ० ते ३ पर्यंतच्या अपंग मुलांसाठी Early Intervension Services असतात. त्याद्वारे त्या मुलाला काय येते आणि काय शिकवायची गरज आहे हे ठरवले जाते आणि त्यानुसार त्याला Physical, Speech, Occupational, Orientation & Mobility यासारख्या therapies दिल्या जातात. ते शिकविण्यासाठी Therapist स्वतः घरी येतात. या सुविधा फुकट किंवा माफक दरात (फॅमिली इनकम आणि साईझ नुसार) पुरविल्या जातात.

३ वर्ष पूर्ण झाल्यावर Public School मध्ये प्रवेश दिला जातो. पण त्या शाळेकडे त्या मुलासाठी योग्य Education program with therapies नसेल तर ती शाळा त्या मुलास विशेष शाळेत पाठवते. ह्या शिक्षणासाठी लागणारा तसेच शाळा लांब असेल तर येण्या-जाण्यासाठी लागणारा खर्च किंवा ती सोय शाळा स्वतः पुरवते. आपण जो कर भरतो त्या मधूनच हा सर्व खर्च केला जातो.

मोबिलिटीमधे अडचण असणार्‍यांसाठी रॅम्प्स वगैरे बांधता येऊ शकतात. अंधांसाठी पाठ्यपुस्तकं (शालेय पातळीवरची पाठ्यपुस्तकं स्टँडर्ड असतात ना अजूनही?) ब्रेलमधे उपलब्ध करून देता येऊ शकतात असं वाटतं. यासाठी पाच वर्षं पुरेशी असावीत. निदान शालेय शिक्षण त्यांना सर्वांबरोबर, सर्वांच्याच गतीने घेता यावं. अशा मुलांना शिकवता येण्यासाठी शिक्षकांना काही प्रशिक्षणाची आवश्यकता असते का याची मला कल्पना नाही. पण ते ही पाच वर्षांत होणं अवघड वाटत नाही.
हे मुळात महानगरपालिकेच्या शाळांत सरकारनेच सुरू केलं तर आपोआप पायंडा पडेल का?

मला खरोखरच भारतातील सद्यपरिस्थितीची नीटशी माहिती नाही, पण या बाबी जमण्यातल्या वाटतात.

छान

मला कृष्णकांत माने आगाऊ वाटला. एअर हॉस्टेस टकाटक होती वगैरे कशासाठी बोलला कळले नाही. त्याऐवजी साईप्रसाद अतिशय समजूतदार वाटला.

एनिवे, हा भाग खुप आवडला. वेगळ्या द्रूष्टीने विचार करायला भाग पाडणारा वाटला.

मलाही केके अधिक वाटला. त्यापेक्षा साई मॅचुअर्ड वाटला. एकंदरीतच समाज डिफरंटली एबल्ड लोकांना थोडे वेगळे वागवतो कारण ते वेगळे असतात हे नाकारून चालणार नाही. सोयी सुविधा या द्यायलाच हव्यात, मानाची वागणूक इतरांसारखीच हवी. भेदभाव नको पण लोक जेंव्हा थोडे बिचकतात ते त्यांना कसे वागावे हे न समजल्याने, आपल्याकडून अपमान तर होणार नाही ना या भावनेनेही असते हे लक्षात घेतले पाहिजेत. आपल्याकडे या विषयाबद्दल आणखी जागृती होणे आवश्यक आहे. ती झाल्यावर असे भेदभाव नक्कीच राहणार नाहीत.

कृष्णकांत माने आगाऊ बोलत होते >> मलाही वाटले तसेच. यवरून थोडेसे विषयांतर, अपंग असले तरी तीपण सगळी 'माणसे'च आहेत. त्यामुळे सर्व सामन्य माणसाप्रमाणे त्यांच्याही स्वभावात काही उणे अधिक असतेच. केवळ अपंग आहेत म्हणुन ते सगळेच अगदी गोड, समजुतदार अशा स्वभावाचे नसतात, त्यातही आगाऊ, धूर्त , आपमतलबी अशी माणसे असतातच. शिवाय त्यांना समाजाकडून मिळणार्‍या वेगळ्या वागणुकीमुळे ही हे स्वाभाविक आहे.
आम्ही अंध शाळेतल्या मुलींचे पेपर लिहायला, त्यांना अभ्यासात मदत करायला जायचो तेव्हा एका मुलीकडून थोडासा वाईट अनुभव आलेला त्यावरून लिहिलेय. पण बाकी सगळ्या मुली खरोखरच छान होत्या स्वभावाने सुद्धा.

सर्व जि.प. आणि महापालिका शाळात रँप अनिवार्य आहे, पण त्याच्यातही काही वर्षापूर्वी प्रचंड भ्रष्टाचार झाला.
सर्वसमावेशक शाळा हा खरेच एक उत्तम उपक्रम आहे. सामान्य मुलांना विकलांगांविषयी संवेदनशील बनवण्याचा हा सर्वात प्रभावी उपाय असेल.

महापालिकेच्या शाळांमध्ये अपंगांना प्रवेश नाकारला जात नाही, आणि त्यांच्यासाठी वेगळ्या शिक्षकांची व्यवस्था केली जाते.
'एअरहोस्टेस टकाटक होती', हे कृष्णकांतच्या ऐवजी एखादा डोळस मुलगा म्हणाला असता, तर तेही आगाऊ वाटलं असतं का?

"कृष्णकांत माने" विषयावरून हा धागा भरकटला जात आहे अशी साधार भीती वाटत आहे. जितकी झाली चर्च्या त्या तरुणाबाबत तितकी ती पुरेशी आहे असे मानून भाग-६ मधील अन्य घटकांकडेही इथल्या सदस्यांनी लक्ष केन्द्रीत केल्यास अजून छान चर्चा घडू शकते.

त्वचारोग झालेल्या मुलीला दत्तक घेणारे पालक लोबो....दिल्लीतील तो जिद्दीचा व्यायामशाळा संचालक, धारवाडमधील ते बहीणभाऊ ज्याना तिथल्या विविध शाळांनी अपंगत्वामुळे प्रवेश नाकारले, डायव्हिंग पूर्ण करण्याची जिद्द बाळगणारा तो अपंग युवक (ज्याने विद्यापीठातील मेरीट लिस्टमध्ये स्थानही मिळविले होते), शिवाय केतन कोठारी यांचे कार्य.....आदी अनेक बाबीवर आपण मत व्यक्त करू शकतो.

अशोक पाटील

>>'एअरहोस्टेस टकाटक होती', हे कृष्णकांतच्या ऐवजी एखादा डोळस मुलगा म्हणाला असता, तर तेही आगाऊ वाटलं असतं क>>>>

हो कारण ही कमेंट अस्थानी आणि अकारण होती. इन्फ्रास्ट्र्क्चरमुळे त्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला असा काहीतरी प्रश्न विचारला होता. त्यावर एअरहोस्टेस कशी होती, हे बोलण्याचे काहीच कारण नव्हते. असो. माझ्यासाठी हा विषय संपला.

>> केवळ अपंग आहेत म्हणुन ते सगळेच अगदी गोड, समजुतदार अशा स्वभावाचे नसतात, त्यातही आगाऊ, धूर्त , आपमतलबी अशी माणसे असतातच. >>

अनुमोदन.

कार्यक्रम आवडला.

मात्र शेवटचा एसेमेस मी 'एन' म्हणून पाठवला आहे. केवळ एवढ्या मुद्द्यावरून शाळांची मान्यता रद्द व्हावी असे मला वाटत नाही.

भरत, पुर्वीपण इनकम टॅक्स मधे होती ना ही सवलत ? वाचल्यासारखे आठवतेय.

शाळांची मान्यता हि एक अडथळ्याची शर्यत असते (आगाऊ आणि अशोक जास्त नेमकेपणाने सांगू शकतील.) त्यामूळे त्यासाठी आणखी एक अट घालणे, जरा अवघड वाटतेय. अशा सोयी केल्या, तर काही प्रोत्साहन द्यावे,
असे मात्र नक्कीच वाटते.

अपंग असले तरी तीपण सगळी 'माणसे'च आहेत. त्यामुळे सर्व सामन्य माणसाप्रमाणे त्यांच्याही स्वभावात काही उणे अधिक असतेच. केवळ अपंग आहेत म्हणुन ते सगळेच अगदी गोड, समजुतदार अशा स्वभावाचे नसतात, त्यातही आगाऊ, धूर्त , आपमतलबी अशी माणसे असतातच. >>++१

रविवारचा भाग पुर्ण नाही पाहता आला... पण एकुणात छानच झाला असेल...

ईथे मरोळ पाईपलाईनला एक माणुस चढतो बसमधे... हातातल्या काठीमुळे तो ईसम अंध आहे हे लक्षात येते... पण त्याच्या चेहर्‍यावरचा नि चालीतला आत्मविशावास पाहीला की मनातल्या मनात हॅट्स ऑफ म्हटल्याशिवाय रहावत नाही... नि सगळे नेगेटीव्ह विचार दुर पळतात...

पण ट्रेनमधल्या विकलांग डब्यातला अनुभव फारच वाईट आहे...

अगदी खरं सांगायचं तर असं काही दाखवलं कि अस्वस्थ वाटत राहतं. आपण काही करत नाही ही टोचणी लागते. एकीकडे त्याच्या समर्थनार्थ कारणं शोधत असताना "निवांत" या संस्थेचे आनंद बडवे, मीराताई बडवे यांच्याशी भेट होते. त्यांचं कार्य जवळून पाहता येतं. अंध मुलांना स्वतःच्या राहत्या घरात आसरा देऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभं रहायला शिकवणा-या या दांपत्याबद्दल काय बोलावं ?
http://ibnlive.in.com/news/pune-school-helps-blind-realise-their-dreams/...

( या मुलंनी बनवलेले गिफ्ट आयटेम्स, चॉकलेटस, मेणबत्त्या, वह्या इ. उत्पादनांची ऑर्डर दिल्यास आपले सोहळे साजरे होतील आणि त्यांना ही मदत होईल. एक आगाऊ सूचना आहे ही )
http://www.niwantvision.com/about.html

एपिसोड छान सादर झाला. अशा गोष्टी पाहिल्यावर काही काळ येणारी अस्वस्थता आणि भारून जाऊन काहीतरी करायची इच्छा पण अनुभवली.
...पण सत्यमेव जयतेमध्ये हा विषय घेण्याचं कारण कळलं नाही.
आधीच्या काही भागांमुळे (विशेषतः डागदरांवरच्या भागामुळे !) उठलेला गदारोळ शांत करण्याच्या उद्देशाने दाखवल्यासारखा वाटला हा भाग.

http://www.maayboli.com/node/24514#new
http://www.maayboli.com/node/24533
http://www.maayboli.com/node/24538
याच विषयाशी संलग्न मी दीड वर्षांपूर्वी काही लिहिले होते.
>>दिनेशदा....

"तूम्ही ज्या तर्‍हेने माझा हात धरता, त्यावरुन मला कळते....."
>>या अनुभवाचा देखील उल्लेख यात आहे.

Pages