डिश वॉशिन्ग मशिन.

Submitted by इन्ना on 6 June, 2012 - 03:10

भारतात रहाणारे कोणी डिश वॉशिन्ग मशिन वापरतात का? त्याचे फायदे , तोटे, उपयुक्तता याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा!
: कामवाली बाई ह्या प्रक्रणाने त्रस्त बाहुली:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

diy. fyi.

भारतात डिश वॉशिंग मशीन उपयुक्त नाही. वै मत.
माझ्याकडे नॅशनलचे होते. जपानचे. एक अ‍ॅडाप्टर उडाला, आणि अ‍ॅडाप्टर बसवायचा खर्चच फार म्हणुन म्हणुन बारगळले. नातेवाईकांकडे आहे. ते दोघंच असतात घरात. वीज आणि पाणी असेल त्या दिवशी वापरतात.

उपयोगी का नाही
- भारनियमन आणि पाण्याचे नियमन
- मोठी भांडी टाकता येत नाहीत जास्त. ती आपणच घासून घ्या.
- एकंदरितच जास्त भांडी करणे. त्याचा ढीग रचून ठेवणे. वगैरे.

त्यापेक्षा हे नियोजन करता आले तर बरे. आम्ही बाईफ्री फेज चा अटॅक आला तर असे करायचो
- स्वैपाक करताकरता पडतील ती भांडी आपण घासून घेणे
- घरातील प्रत्येकाने आपापली जेवणाची भांडी जेवण झाल्यावर घासून ठेवणे
- जेवणानंतर उरलेली थोडी एका सदस्याने घासणे

ही पद्धत घरात पाहुणे आले, सणवार इतर खास प्रसंगी फारशी उपयोगी नाही. तरीही आपण स्वावलंबी आहोत याचा ताप काही दिवस पुरतो. मग पुन्हा येरे माझ्या मागल्या. Proud

रैना, माझ्या खरेदीच्या उत्साहावर पाणी पडेपर्यन्त, ताप डोक्यात जाउन ,क्रुती घडुन गेली ना बायो Sad . दुर्दैवानी ताप माझ्या डोक्यात गेलाय, घरच्या मा. सदस्यांच्या नाही त्यामुळे, एकमेका किती दिवस साह्य करु ह्याबाबत शंकाच आहे.
असो, आज संध्याकाळी एक सर्व्हे फेरी मारणार आहे. Happy

मुळात सगळे ग्रिट काढून मगच ते मशिनमधे टाकायचे, मशिन भरेपर्यंत ते खरकटी भांडी तशीच म्हणजे प्रत्येक गोष्टी दोन किंवा तीनाच्या पटीत नाहीतर रोजचा रोज डि वॉ भरण्यासाठी पसारा करायचा..

पाणी असणे, वीज असणे इत्यादी भानगडी आहेतच.

समहौ इथे झेपतच नाही ते.

माझ्याकडे आय एफ बी चे आहे पण त्या मध्ये भात वगैरे केलेली भांडी निघत नाही सो तशी भांडी पहिले घासून टाकावी लागतात. लाईट पाणी पावडर आणि साल्ट चा खर्च आहेच. पण काम वाली च्या त्रासापेक्षा थोडे पैसे खर्च करून शांती मिळू शकते. परत हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. मोठी भांडी बसत नाही पण जर लहान कुटुंब आहे तर त्यात बसतील अश्या आकाराची भांडी घेऊ शकता. छोट्या प्लेट्स पातेले वगैरे. पण ते १००% human element ला replacement नाही.

माझ्या नणदेकडे डीश वॉशर आहे.
भांड्यांसाठी बाईही आहे पण कुटुंब मोठं असल्याने काही भांडी मशीनमध्ये होतात तेवढीच कामवाल्या बाईला मदत आणि त्यामुळेच की काय ती टिकलीये. शिवाय बाई न येण्याच्या वेळी बरीच मदत होते.
ऑफीसमधून आल्यावर अगदी ताणाताण होत नाही. वीज, पाणी मात्र त्यांच्याकडे आहे.

आमच्यकडे आहे, पण दोनच माणसे(आई-बाबा) असल्याने बरे पडते. कामवाली बाई असून नसल्यासारखी आहे. खाडे पाचवीला पुजलेले.

मशिन असो वा नसो, आम्ही भांडी पुर्ण विसळून, ब्रश मारून ठेवतो. खरकटे असे ठेवत नाही , कोणाला वाटेल डबल जॉब पण घासून विसळत बसण्यापेक्षा मशिनीत टाकलेले बरे असे भांडे.

काही जण जेवलेले ताट तसेच टाकतात न विसळता व त्यांच्या मशिनीत बुरशी वगैरे येते. Wink

थोडंसं विषयांतर.. माझ्या सहका-याने एक सिस्टम बसवलीये. एका मोठ्या स्टील पाईपमधून पाणी खेळवलंय. त्या पाईपच्या दोन्ही बाजूंनी मोठे सोलर पॅराबोलिक रिफ्लेक्टर्स ( आरसे) अशा रितीने बसवलेत कि जसा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाईल तसे ते आरसे त्याच्या बाजूने तोंड वळवतात पण त्यांचा फोकस मात्र पाईपच्या त्याच भागावर पडत जातो. अशा रितीने ३५० डिग्री से ची स्टीम सोलर एनर्जी वर तयार होते. या स्टीम वर १०००० लोकांचा भात आणि इतर शिजवण्याचे जिन्नस पाच मिनिटात तयार होतात. हीच स्टीम पुढे नोझल्सच्या सहाय्याने डिश वॉशरला दिली आहे. दहा हजार लोकांची ताटं पाच मिनिटात लखलखीत होतात.

घरगुती वापरासाठी आरसे आहेत. सध्या बंगलेवाल्यांसाठी चालू शकतात. त्याच आरशांवर स्टीमच्या सहाय्याने डिश वॉशिंग साठी वापर करता येऊ शकतो. घरगुती वापराला थोडं अजस्त्र होईल हे संयंत्र.. कुणाला यातून काही सुटसुटीत सुचलं तर लिहा.

आमच्याकडे गेली दोन-अडीच वर्षे आय एफ बी चे डिश वॉशर असून ते व्यवस्थित चालते -
आमच्या कुटुंबाचा अनुभव - डिश वॉशर इज मस्ट.
खरकटी भांडी फक्त पाणी मारुन ठेवतो - प्रेशर कुकरला चिकटलेला भात, दुधाच्या भांड्याला चिकटून बसलेली साय वगैरे सर्व छान धुवून निघते- पाणी व वीज खूप कमी वापरले जाते. डिटर्जंट, सॉल्ट वगैरेचा खर्च - वर्षाला साधारण ४-४.५ हजार रु. (दररोज एकदा लावले तर)
आमच्या कडील डिश वॉशर बघून नुकतेच एका नातेवाईकाने पण घेतले - ते ही खूष आहेत (आधी त्यांना खूप शंका, धास्ती होती)
आमच्या दृष्टीने कामवाल्याबाईला डिश वॉशर हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

वरदा, एकदम झक्कास चालू आहे. Happy
कामवाली आणि तिच्या दांड्या वगैरे पोस्ट वाचून , मला मी तिरीमीरीत जाउन मशिन आणल ते आठवल.
कामवालीवर अवलंबून नसण्यासारख सूख नाही. Happy
हातासरशी वापरलेली भांडी विसळून मशिन लोड करत रहायचं . दिवसातून एकदा ( तुझ्या घरच्या साग्रसंगीत स्वैपाकाला २ दा) चालू करायच. भांडी धूवून ,कोरडी कुरकुरीत होउन येतात. Happy
निर्लेप , कॉपर बॉटम वगैरे भांडी चालत नाहीत. हल्ली सगळ्या नविन भांड्यावर डिश वॉशर सेफ ची पण खूण असते.

थॅन्क्स गं, इतक्या लगबगीने उत्तरल्याबद्दल Happy
निर्लेप, कॉपर बॉटम चालत नाहीत? हम्म्म...
तुझा डिवॉ कुठल्या कंपनीचा आहे? काय मॉडेल? वीज पाणी याचं कन्झम्प्शन किती आहे?

मी आता त्या तिरीमिरी मोडाकडे झपाट्याने चाललेय

आय एफ बी.
पाणी, वीज कोष्टक पाहून सांगाव लागेल. आय एफबीची पावडर , सॉल्ट्स असतात ( पाणी सॉफ्ट करायला) मी एकावेळी ६ महिन्यांचे घेउन ठेवते. फोनवर ओर्डर नोंदवली की माणूस घरी आणून देतो.
घ्यायच ठरल की, मशिन कस वापरायच ह्याचे धडे तुझ्याबरोबर इतरांना ही घ्यायला सांग Wink

वरदा, एकदा मागे पुपुवर माझ्या मैत्रीणीने पुण्यात डिवॉ घेतल्याचे मी सांगितले होते. त्याबद्दल डिटेल्स नंतर तिथे लिहीले होते पण तू त्या दरम्यान नव्हतीस बहुदा. तर इन्नाने वर लिहीलय तेच डिवॉ मैत्रीणीने घतले आहे आणि तीच नव्हे तर तिच्या साबाही खुश आहेत डिवॉ वर! इन्नाने सांगितलेली वरील माहिती मैत्रीणीने सांगितली होती.

किरण,

थोडंसं विषयांतर.. माझ्या सहका-याने एक सिस्टम बसवलीये. एका मोठ्या स्टील पाईपमधून पाणी खेळवलंय. त्या पाईपच्या दोन्ही बाजूंनी मोठे सोलर पॅराबोलिक रिफ्लेक्टर्स ( आरसे) अशा रितीने बसवलेत कि जसा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाईल तसे ते आरसे त्याच्या बाजूने तोंड वळवतात पण त्यांचा फोकस मात्र पाईपच्या त्याच भागावर पडत जातो. अशा रितीने ३५० डिग्री से ची स्टीम सोलर एनर्जी वर तयार होते. या स्टीम वर १०००० लोकांचा भात आणि इतर शिजवण्याचे जिन्नस पाच मिनिटात तयार होतात. हीच स्टीम पुढे नोझल्सच्या सहाय्याने डिश वॉशरला दिली आहे. दहा हजार लोकांची ताटं पाच मिनिटात लखलखीत होतात.

घरगुती वापरासाठी आरसे आहेत. सध्या बंगलेवाल्यांसाठी चालू शकतात. त्याच आरशांवर स्टीमच्या सहाय्याने डिश वॉशिंग साठी वापर करता येऊ शकतो. घरगुती वापराला थोडं अजस्त्र होईल हे संयंत्र.. कुणाला यातून काही सुटसुटीत सुचलं तर लिहा.

याबाबत उत्सुकते पोटी माहिती हवी आहे. वैयक्तीक मेल पाठवायचा होता पण बहुदा असे करता येत नाही.

जागा किती खाते <<
हे सगळ्यात महत्वाचं. गेल्या दहा वर्षात पार्ल्यात झालेली बरीच बांधकामं बघितलीत (खूप घरं बदललीयेत, त्यापायी बघितलीयेत!) त्यातली सगळी किचन्स इतकुश्शी आहेत. माझं किचन मी अगदी लिमिटेड ठेवलंय तरी मावताना वैताग येतो. डिवॉ साठी जागा कुठून आणायची? पाणी, वीज वगैरेचं जमवता येईल पण मुंबईत डिवॉ ची जागा म्हणजे किमान लाखभर रूपये असला प्रकार आहे.

इन्ना, घरं बांधली जाताना (सोसायट्या. बंगले नाहीत) आपल्याकडे डिवॉ कम्पॅटिबल किचन्स डिझाइन केली जातात का गं आता?
(तू आर्किटेक्ट आहेस ना बहुतेक? म्हणून विचारतीये हां!)

नीधप, पुण्यात अमेनिटी म्हणून आणि मुंबैत लक्झरी म्हणून देतात अशी जागा Wink गोंडस नाव - ड्राय बाल्कनी. Happy
पण सहसा किचन जवळ प्लॅन करतात. किचनमधे नाही. एकतर त्याची ऊंची ओट्याच्या ऊंचीपेक्षा जास्त असते, आणि दुसर कारण वॉशिंग मशिन एवढ सर्रास अजून ते वापरल जात नाही .
सायो, बोअरचं पाणी असतं बर्याचदा .

नीरजा आम्ही देशात आमचा फ्लॅट, अंडर कन्स्ट्रक्शन असतानाच ओटा जरा उंच करून घेतला होता. एका नातेवाईकांकडे डिशवॉशर आहे सो त्याचं माप, ईथल्या (उसगावातल्या) डिशवॉशरची उंची आणी ओट्याची उंची ह्या अनुशंगाने साधारण ठोकताळा मांडला होता. प्लंबिंगची पण सोय करून घेतली आहे.

समजा किचनमध्ये वॉशिंग मशीन लावण्यासाठीची सोय केलेली असेल, तर तीच सोय वापरून (तेच पाण्याचे इन्लेट आणि आऊटलेट वापरून) वॉशिंगमशीन आणि डीशवॉशर दोन्ही गोष्टी किचनमध्ये फीट करता येतात का?

इन्ना, बोअरचे पाणी डिशवॉशरमधे वापरले तर चालते का?कारण आमच्या सोसायटीमधे पिण्याचे पाणी सोडुन इतर सगळीकडे बोअरवॉटरचा पुरवठा आहे. वॉशिंग मशिनला बोअरचे पाणीच वापरायला लागते..

ह्म्म प्रॅडी.
कामवालीचे नखरे झेलून मी कंटाळलेय. पण एकुणात जोवर स्वतःचं घर होत नाही तोवर डिवॉ शक्य नाही हेच प्रत्येक वेळेला लक्षात येतंय.

Pages