'हनी' व्होडका केक

Submitted by लोला on 4 June, 2012 - 21:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

२ कप मैदा (all purpose flour, self rising किंवा साधे)
१ बटर स्टिक (अर्धा कप बटर)
१ कप साखर
१ मोठा चमचा बेकिंग पावडर (self raising असेल तर लागणार नाही.)
३ अंडी (रुम टेम्परेचरला आणून)
१ कप ऑरेंज ज्यूस (किंवा पायनॅपल, ऑरेंज-पायनॅपल, ऑरेंज-पीच आवडेल तो)
३ मोठे चमचे vodka.
चिमूटभर मीठ.

उपकरणे-
स्टँड मिक्सर किंवा हँड ब्लेंडर
९ इंच व्यासाचा बेकिंग पॅन (इतर आकार चालतील)
अव्हन

क्रमवार पाककृती: 

- बटर फ्रीजमधून बाहेर काढून रुम टेम्परेचरला आणावे.
- अव्हन ३७५ फॅ. ला गरम करुन घ्यावा.
- मैदा बेकिंग पावडर घालून चाळून घ्यावा. त्यात चिमूटभर मीठ घालावे.
- मग बटर स्टँड मिक्सर किंवा ब्लेन्डरने मध्यम स्पीडवर अर्धा मिनिट फेटावे.
- मग त्यात हळूहळू साखर घालावी आणि फेटावे.
- एकजीव झाल्यावर एकेक अंडे फोडून घालावे. प्रत्येक अंडे घातल्यावर एक मिनिट फेटावे.
- मग मैदा आणि ज्यूस घालत जावे.
- शेवटी vodka घालून फेटावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.

havo.jpg

- बेकिंग पॅनला तुपाचा हात लावून वरुन मैदा भुरभुरावा.
- मिश्रण पॅनमध्ये ओतून अव्हनमध्ये ठेवावे.
- ३०-३५ मिनिटे बेक करावे.
- पॅनच्या मध्यभागी टुथपिक घालून केक बेक झाल्याची खात्री करुन घ्यावी. टुथपिकला मिश्रण चिकटले तर अजून थोडा वेळ बेक करावे.
- पॅन बाहेर काढून थंड झाल्यावर केक पॅनमधून सुटा करावा. किंवा वॉर्म खायचा असेल तर प्लास्टिक सुरीने पॅनमध्येच कापून तुकडे सुटे करावेत.

havocake.jpg

हा केक पाउंड केकसारखा दिसतो.

वाढणी/प्रमाण: 
६-८ जण.
अधिक टिपा: 

vodka कोणतीही वापरु शकता. मी हनी व्होड्का वापरली. केकचे 'हनी' हे नाव व्होडकासाठी नसून हा केक हनीसाठी करायचा आहे म्हणून आहे. ज्यूस-व्होडकाचे प्रमाण झेपेल तसे कमी-जास्त करु शकता.

सांगितलेल्या उपकरणांशिवाय वेगळी उपकरणे वापरु शकता. पण रिझल्ट वेगळा येईल त्याची तयारी ठेवावी, कदाचित जास्त चांगलाही येऊ शकतो.

माहितीचा स्रोत: 
बेसिक केक कृती आणि मी.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्ही!!! Happy

नक्की करणार.

केकचे 'हनी' हे नाव व्होडकासाठी नसून हा केक हनीसाठी करायचा आहे म्हणून आहे<< हे भारीच Lol

सुलेखाताई, व्होडका ऐवजी आमंड इसेन्स किंवा संत्र्याबरोबर मिंट इसेन्स चालवता येइल. क्वांटिटी फक्त ३ मोठे चमचे ऐवजी १ लहान चमचा/आवडीनुसार वगैरे करता येइल.

उपकरणे >> brands ची नावे दिली त तर तेव्हढेच branding पण होउन जाईल ग Lol

पुढच्या वेळी केक घेउन येणे नक्कि करावे.

लोक बुवांकडची 'हनी वोडका' घेऊन काय वाट्टेल ते करतात... Proud
लहान्याला (योग्य ते बदल करून) रेसिपी देण्यात येईल << रेसिपीपेक्षा केक दिल्यास जास्त आवडेल लहान्याला.. नाही का? Proud

Pages