२ कप मैदा (all purpose flour, self rising किंवा साधे)
१ बटर स्टिक (अर्धा कप बटर)
१ कप साखर
१ मोठा चमचा बेकिंग पावडर (self raising असेल तर लागणार नाही.)
३ अंडी (रुम टेम्परेचरला आणून)
१ कप ऑरेंज ज्यूस (किंवा पायनॅपल, ऑरेंज-पायनॅपल, ऑरेंज-पीच आवडेल तो)
३ मोठे चमचे vodka.
चिमूटभर मीठ.
उपकरणे-
स्टँड मिक्सर किंवा हँड ब्लेंडर
९ इंच व्यासाचा बेकिंग पॅन (इतर आकार चालतील)
अव्हन
- बटर फ्रीजमधून बाहेर काढून रुम टेम्परेचरला आणावे.
- अव्हन ३७५ फॅ. ला गरम करुन घ्यावा.
- मैदा बेकिंग पावडर घालून चाळून घ्यावा. त्यात चिमूटभर मीठ घालावे.
- मग बटर स्टँड मिक्सर किंवा ब्लेन्डरने मध्यम स्पीडवर अर्धा मिनिट फेटावे.
- मग त्यात हळूहळू साखर घालावी आणि फेटावे.
- एकजीव झाल्यावर एकेक अंडे फोडून घालावे. प्रत्येक अंडे घातल्यावर एक मिनिट फेटावे.
- मग मैदा आणि ज्यूस घालत जावे.
- शेवटी vodka घालून फेटावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.
- बेकिंग पॅनला तुपाचा हात लावून वरुन मैदा भुरभुरावा.
- मिश्रण पॅनमध्ये ओतून अव्हनमध्ये ठेवावे.
- ३०-३५ मिनिटे बेक करावे.
- पॅनच्या मध्यभागी टुथपिक घालून केक बेक झाल्याची खात्री करुन घ्यावी. टुथपिकला मिश्रण चिकटले तर अजून थोडा वेळ बेक करावे.
- पॅन बाहेर काढून थंड झाल्यावर केक पॅनमधून सुटा करावा. किंवा वॉर्म खायचा असेल तर प्लास्टिक सुरीने पॅनमध्येच कापून तुकडे सुटे करावेत.
हा केक पाउंड केकसारखा दिसतो.
vodka कोणतीही वापरु शकता. मी हनी व्होड्का वापरली. केकचे 'हनी' हे नाव व्होडकासाठी नसून हा केक हनीसाठी करायचा आहे म्हणून आहे. ज्यूस-व्होडकाचे प्रमाण झेपेल तसे कमी-जास्त करु शकता.
सांगितलेल्या उपकरणांशिवाय वेगळी उपकरणे वापरु शकता. पण रिझल्ट वेगळा येईल त्याची तयारी ठेवावी, कदाचित जास्त चांगलाही येऊ शकतो.
सह्ही!!! नक्की करणार. केकचे
सह्ही!!!
नक्की करणार.
केकचे 'हनी' हे नाव व्होडकासाठी नसून हा केक हनीसाठी करायचा आहे म्हणून आहे<< हे भारीच
अजून एक मस्त पाककृती. केक
अजून एक मस्त पाककृती. केक कसला टेम्प्टिंग दिसतोय, लालू!
खुपच मस्त केक !!! काहीतरी
खुपच मस्त केक !!! काहीतरी उत्तम पर्याय शोधावा लागणार.
मस्तच ! नक्की करणार !
मस्तच ! नक्की करणार ! उपकरणांची अॅडिशन आवडली.
सुलेखाताई, व्होडका ऐवजी आमंड
सुलेखाताई, व्होडका ऐवजी आमंड इसेन्स किंवा संत्र्याबरोबर मिंट इसेन्स चालवता येइल. क्वांटिटी फक्त ३ मोठे चमचे ऐवजी १ लहान चमचा/आवडीनुसार वगैरे करता येइल.
वाव! तोंपासु
वाव! तोंपासु
सही , केक खाऊन टल्ली आय मीन
सही , केक खाऊन टल्ली आय मीन तॄप्त होतील लोक !
लै भारी दिसतोय केक..
लै भारी दिसतोय केक..
केक आवडता आहे ...
केक आवडता आहे ... तोंपासु.....
मssस्त दिसतोय केक!
मssस्त दिसतोय केक!
भारी रेसिपी. केक काय मस्त
भारी रेसिपी. केक काय मस्त दिसतोय !
भयंकर सतावणारी रेसिपी पुन्हा
भयंकर सतावणारी रेसिपी
पुन्हा हा धागा बघणे होणार नाही
उपकरणे >> brands ची नावे दिली
उपकरणे >> brands ची नावे दिली त तर तेव्हढेच branding पण होउन जाईल ग
पुढच्या वेळी केक घेउन येणे नक्कि करावे.
जबराट!!! तो तयार केक पटकन
जबराट!!! तो तयार केक पटकन तोंडात घालावासा वाटतोय!
भारी दिसतोय केक. केकचे 'हनी'
भारी दिसतोय केक.
केकचे 'हनी' हे नाव व्होडकासाठी नसून हा केक हनीसाठी करायचा आहे म्हणून आहे >>
भारी!!
भारी!!
सही दिस्तोय केक!
सही दिस्तोय केक!
भारी. लहान्याला (योग्य ते बदल
भारी. लहान्याला (योग्य ते बदल करून) रेसिपी देण्यात येईल.
भारी आहे रेसीपी, मस्त दिसतोय
भारी आहे रेसीपी, मस्त दिसतोय केक
मस्त दिसतोय केक. केकचे 'हनी'
मस्त दिसतोय केक.
केकचे 'हनी' हे नाव व्होडकासाठी नसून हा केक हनीसाठी करायचा आहे म्हणून आहे >>
केक छान. ही बुवांची हनी वोडका
केक छान. ही बुवांची हनी वोडका का?
लोक बुवांकडची 'हनी वोडका'
लोक बुवांकडची 'हनी वोडका' घेऊन काय वाट्टेल ते करतात...
लहान्याला (योग्य ते बदल करून) रेसिपी देण्यात येईल << रेसिपीपेक्षा केक दिल्यास जास्त आवडेल लहान्याला.. नाही का?
देसाई मी तेच म्हणणार होतो. पण
देसाई मी तेच म्हणणार होतो. पण आज काल ज्यु. मास्टर शेफ पण असतात
मस्त दिसतोय हनीसाठीचा केक
मस्त दिसतोय हनीसाठीचा केक
अरे वा सह्ही आयडिया. फोटो पण
अरे वा सह्ही आयडिया. फोटो पण सही आलाय केक चा. आय कॅन अल्मोस्ट स्मेल इट
रेसिपी आणि फोटो छान आहे ..
रेसिपी आणि फोटो छान आहे ..
मस्त.
मस्त.
भारी दिसतोय केक लोला, उचलून
भारी दिसतोय केक लोला, उचलून खावासा वाटतोय
फारच छान! बॉस ला कळवायला हवं.
फारच छान! बॉस ला कळवायला हवं. तो धन्य होईल वोडकाचे अन्य उपयोग ऐकून.
वोडकाचे अन्य उपयोग ऐकून
वोडकाचे अन्य उपयोग ऐकून
Pages