मश्रुम चटपटे - फोटोसह

Submitted by दिनेश. on 3 June, 2012 - 13:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान आहे पण तरीही रेसिपी मला खूप टेंप्टींग वाटली नाही. मश्रूम बरोबरचा तो पास्ता मला खूपच कोरडा वाटतोय.

रेसिपी छान आहे. पण थोडी ग्रेव्ही हवी असं वाटतयं.

आमच्या घरी कोणालाच मश्रुम्स आवडत नाहित... मला तर अ‍ॅलर्जीच आहे...त्यामुळे करुन बघण्याची शक्यता नाही. दुसरं काही वापरता येइल का?

हा पास्ता नाही, नूडल्स आहेत (इन्स्टंट, २ मिनिट्स वाल्या नाहीत.) साधारण हाका नूडल्स प्रमाणे.
शिवाय हा फक्त एक पर्याय आहे. नाहीतर भात किंवा चपाती पण वापरता येते,
मश्रुमच्या जागी सोया चंक्स, बटर बीन्स, चिकन वापरता येतील. पण ते जरा जास्त वेळ शिजवावे लागतील.

धन्यवाद.. लगेचच करून बघणार. मश्रुम पाहिले की तोंपासु.

कॅन मधले मश्रुम आणि ताजे मश्रुम ह्यात नक्की काय फरक असतो? ह्या रेसिपीत ताजे (button) मश्रुम्स वापरायचे असतील तर ते उकडून घ्यावे लागतील का?

ताजे मश्रुम्स एखादा मिनिट जास्त शिजवावे लागतील. तसा फरक काहीच नसतो, ताजे मश्रुम घेताना, ते शक्यतो शुभ्र रंगाचे घ्यायचे. (थोडीफार माती असतेच) आणि हाताळताना ते हाताला बुळबुळीत लागू नयेत.

सायोशी काही अंशी सहमत, मश्रुम्स टेम्प्टिंग दिसतायत पण पास्ता फार कोरडा वाटला.
पहिल्यांदा पाहिला झर्रकन तेव्हा वाफवलेला कोबीच ठेवलाय आजुबाजुला असं वाटलं.

दक्षे, आपल्याकडे अशा नूडल्स मिळत नाहीत का (हा पास्ता नाही) मिळत असाव्यात. यात रुंदीने कमी आणि जरा रुंद असे दोन प्रकार असतात. शिवाय यात अंडे घातलेल्या आणि बिन अंड्याच्या, असेही दोन प्रकार मिळतात. ( हा पास्ता आहे असे मी कुठेही लिहिलेले नाही. सायोला आणि तूला असे का वाटावे, ते कळले नाही. )

ज्या नूडल्स गोलाकार (म्हणजे शेवेसारख्या ) त्या डिप फ्राय केलेल्या असतात. आणि त्या अर्थातच फारच अपायकारक असतात. या नूडल्स तळलेल्या नसतात. यात अजिबात मेद नसतात. आणि भरपूर भाज्यांसोबत
खाल्ल्या तर आरोग्यपूर्ण पण आहेत. या अति शिजवून पण चालत नाहीत. गेव्ही केली तरी ती क्रिमी करुन चालत नाही. चायनीज पद्धतीनेच केली तर चांगली लागते.

दिनेशदा, सगळ्यात वरचा फोटो प्रचंड टेम्पटिंग आहे. ही एक भन्नाट साइड डिश होवु शकते. फक्त एकच शंका कि आटा असा भुरभुरवला तर कच्ची टेस्ट नाही लागणार का तोंडात? आणि का बरं घालायचा? स्किप करु शकतो का?

मनिमाऊ, अशी कणीक भुरभुरली तर सगळा मसाला मश्रुमना चिकटतो. नाहीतर मसाला वेगळा राहतो. शिवाय जे थोडेफार तेल + रस असतो तो शोषला जातो. मश्रुम्सना एरवी मसाला चिकटणार नाही.

हि आमच्या घरची जुनी युक्ती आहे, बटाटा, वांगी यांचे काप, शेवग्याच्या शेंगा वगैरे शिजल्या कि आई त्यावर
कणीक टाकते. सगळा मसाला त्यांना चिकटतो आणि तव्यातले तेल टिपले जाते.

>>( हा पास्ता आहे असे मी कुठेही लिहिलेले नाही. सायोला आणि तूला असे का वाटावे, ते कळले नाही. )>>
तुम्ही पास्ता असं लिहिलेलं नाही हे खरंय पण फोटोतल्या फ्लॅट नूडल्स मला फेटुचिनी पास्ता वाटल्या. चायनीज स्टाईल नूडल्स गोलच पाहिल्या आहेत (लोमेनकरता वापरतात त्या)

फोटो छान आहे. (मश्रुम फारसे केले जात नाहीत घरी, त्यामुळे ट्राय करणे अवघड आहे.)
पास्ता,नुडल्सच्या कन्फ्युजनसाठी ही लिंक बरी वाटली. http://www.pasta-recipes-made-easy.com/whats-the-difference-between-past...

सायो, थाई/चायनिज फुडमध्ये असतात की फ्लॅट नुडल्स. Happy

थायमध्ये खाल्या आहेत त्या फोटोतल्या पेक्षा तिप्पट साईजच्या होत्या. असो, मला तो पास्ता वाटला ( बहुतेक खूप जीव असल्यामुळे असेल) हे खरं आहे Happy

मस्त, मी बनवून पाहीली, छान झाली पण मी मश्रूम्ससोबत फरसबी, गाजर आणि टोफू टाकला होता आणि फ्राईड राइस सोबत सर्व्ह केला.
कणिक टाकायची कल्पना तर खुपच मस्त आहे...सगळा मसाला, सगळ्या भाज्यांना छान चिकटला.

दिनेश भाऊ ,
कसला जबरदस्त आहे फोटो Happy

तुमच्या रेसिपिज आणि तुम्ही आमच्या घरी हिट्ट आहात Happy एकदा( आता आठवत नाही पण) काही रेसिपी बद्दल मी शोधाशोध करत असताना नवर्‍याने अग ईतक करण्यापेक्षा विचार ना तुमच्या दिनेश भाऊना असे सांगीतले म्हणजे समजुन घ्या .

आभार सायो.
मला वाटतं भारतात हक्का नूडल्स नावाने मिळतात ह्या. चांगल्या खुटखुटीत राहतात.
या नुडल्स वापरून मी बरेच प्रकार करतो, सगळे एकत्र फोटो टाकतो मग.

रिमझिम.. अगदी कधीही !