फरारी की सवारी...झुम्म्मम्म्मssssss

Submitted by शापित गंधर्व on 30 May, 2012 - 05:48

फरारी म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येते ती लालचुटूक वार्‍याच्या वेगाने पळणारी कार आणि त्या सोबत येणारे स्टेटस सिंबॉल. आणि ते खर पण आहे (मी स्टेटस सिंबॉल बद्दल बोलतोय). फरारीच्या एन्ट्री लेव्हल कारची (मारुतीच्या भाषेत सांगायच तर मारुतीची एन्ट्री लेव्हल कार म्हणजे मारुती ८००) किंमत आहे २ कोटी १० लाख. अर्थात ही आहे भारता बाहेरची किंमत. भारतात ही कार आयात केली तर त्यावर १००% कर लागेल आणि कारची किंमत होईल ४ कोटी २० लाख.

तर अशा या महागड्या आणि आत्ता पर्यंत फोटोतच बघितलेल्या फरारी कारचा मेळावा बघण्याच्या योग गेल्या विकांतास आला. जोहानसबर्ग येथील माँटे कॅसीनो मधे दरवर्षी मे महिन्यात हा फरारी मेळावा भरतो. जोहानसबर्ग आणि आजुबाजूच्या परीसरात रहाणारे फरारी मालक आपली कार या मेळ्याव्यात घेऊन येतात. त्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा आणि खेळांचे आयोजन केले जाते. तब्बल ५७ (ही संख्या खुपच जास्त आहे) फरारी कार्स या मेळाव्यात प्रदर्षीत केल्या होत्या.

या मेळाव्या दरम्यान घेतलेले हे काही प्रचि.

प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्व्वा व्वा

फार आवडले हे सर्वच फोटो

एका चित्रात एन ई एच ए लिहिले आहे ते 'नेहा' तर नाही ना?

धन्यवाद या चित्रांसाठी

एका चित्रात एन ई एच ए लिहिले आहे ते 'नेहा' तर नाही ना? >>> हो ते 'नेहा' च आहे. इथे थोडे जास्त पैसे देऊन तसा नंबर घेता येतो गाडीला. एका भारतिय माणसचि होती ती फारारी. Happy

हो ते 'नेहा' च आहे. इथे थोडे जास्त पैसे देऊन तसा नंबर घेता येतो गाडीला. एका भारतिय माणसचि होती ती फारारी. ?|>>>>>>>>>>>> अरे काय सांगतो गंधर्वा.......मलाही हाच प्रश्न पडला होता! बाकी प्रचि मस्तच!

पण सगळ्या गाड्या लाल रंगाच्याच का? :एक भाप्रः>>> फरारीचा ट्रेड मार्क आहे तो लाल कलर. पिवळा, काळा आणि पांढरा अश्या रंगात पण फरारी मिळते पण फारच थोडे लोक तशी घेतात.

WOW!!!

तु तर आता आम्हला ती Harry Potter वाली लेखकिन बाई - J.K. Rowling वाटायला लागला आहेस
प्रत्येक लेखा गनिक नव नविन जादुमई दुनियेत घेवुन जातोस.!!
by the way , आपल्या अंगभूत (अव)गुणामुळे Test Drive का कितना??असे विचार्लेस कि नाहि?
और वोह दो बच्चे किसके है रे? कही पे देखा हुवा लगता है .
photos मस्तच ! लाजवाब ! दिल खुश.

जळजळाट.... असले फोटो टाकून अ‍ॅसिडीटी वाढवू नये... Happy

लाल शिवाय दुसर्‍या रंगाची फेरारी??? विचारच करता येत नाही...

बुंगाट !!!!!!!!!!!!!!!!

गंधर्वा... बेस्टच की हो... फोटो आणि फरारी दोन्ही Happy

ऐसी एक फरारी मिल जाए तो ...... काश.................

स्वप्न सत्यात आणायची असतिल तर चला कामाला लागा... Happy

फरारीचा ट्रेड मार्क आहे तो लाल कलर. पिवळा, काळा आणि पांढरा अश्या रंगात पण फरारी मिळते पण फारच थोडे लोक तशी घेतात.>>>>>>>
निळी नाही मिळत ना.. Sad
नाहीतर केव्हाच घेतली असती.. वर परत एवढे पैसे टाकुन "ऑटोमॅटीक" मधे पण मिळत नाही. काय उपयोग (कोण म्हणतेय रे "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" Wink

जोक्स अपार्ट..
अल्टिमेट फोटोज..

मस्तच फोटो शागं........
फेरारी म्हणजे स्वप्नातल्या राजकुमारीसारखी आहे............ Happy
इतक्या ठेवल्या होत्या तर एखादी आणायची की उचलून्......कोणाला कळणार होते.......... Wink

Pages