गणेशोत्सव : काळानुसार कधी बदलणार आपण ???

Submitted by आशूडी on 12 September, 2008 - 04:06

मला एका सामाजिक प्रश्नाला वाचा फोडायची आहे..
कित्येक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती, चिमण्या गणपती, नातूबाग अशा सारखी मंडळे त्यांच्या दिमाखदार लायटिंग साठी सुप्रसिध्द आहेत.. पण मला सांगा, हे लायटिंग आपण ३ मिनिटांच्या पेक्षा जास्त पाहू शकतो का? तिथल्या स्पीकर्स ने छातीत धडधडायला लागायच्या आत आणि त्या गलिच्छपणे नाचणार्‍यांच्या चेंगराचेंगरीत सापडायच्या आत आपण तिथून काढता पाय घेतो.. मग कशासाठी हा अपव्यय??
गेल्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात एवढं जोरदार भानि चालू होतं.. आजही कित्येक खेडेगावांमधे आठ आठ तास भानि चालू हे..पाणी आणायला उस्मानाबाद जवळच्या खेड्यात लोकांना १५-१५ कोस दूर जावं लागतंय.. शेतीला पाणी द्यायला पंपांना वीज नाही.. कर्जापोटी बळीराजाला स्वतःचा आणि पर्यायाने त्याच्यावर अवलंबून असणार्‍यांचा बळी देण्याशिवाय पर्याय उरला नाही.. वीजनिर्मितीसाठी किती प्रोसेसिंग व्हावं लागतं..किती मनुष्यबळ लागतं..किती अफाट पैसा पाण्यावर पाण्यासारखा खर्च होतो हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची झळ आपल्याला पोचणार नाही...
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर गणपतीमधे डोळे दिपवणारं झगमगीत लायटिंग्.. फालतू गाणी केकाटणारे स्पीकर्स.. या गोष्टीवरचा वीजेचा वापर आपण नियंत्रणात आणू नाही का शकत??
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सारखी वर्षानुवर्षे सामाजिक कार्य करण्यासाठी प्रसिध्द असणार्‍या मंडळांनी याबाबतीत पुढाकार घेऊन काही नवीन पायंडे पाडले तर त्यांना लोकाश्रय तर मिळेलच पण इतर मंडळेही या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करतील... तुम्हाला काय वाटतं??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्युत रोषणाईकडे पैशाची उधळपट्टी म्हणुन न पाहता रोजगाराचे साधन म्हणुन पहा.. महाराष्ट्रात वीज कमी असेल तर ती गणेश मंडळांची नसुन वीज मंडळाची जबाददारी आहे... >> अगदी मान्य.. पण किती मंडळे कायदेशीर विद्युतजोड घेतात ते जर बघितले तर कळेल की वीजबीलं प्रामाणिकपणे भरणार्‍या ग्राहकांच्या जोरावर ही रोषणाई केली जाते. त्यातून वितरण कंपनीला काहीच मिळत नाही (फक्त लोड वाढतो आणि इतर ठिकाणी लोडशेडींग करावे लागते)

बाकी शेवटच्या मुद्याला अनुमोदन.पण गणेशोत्सवात काही चांगले पायंडे पाडले तर मूळ कारणावर इलाज करणे अजून सोपे होइल.

मायबोली गणेशोत्सव २००९

**************************************************
B&W_Teaser_1.jpg
**************************************************
Paryavaran_Teaser_1.jpg
**************************************************
chitrakala_teaser_1.jpg
**************************************************
Pakakruti_Teaser_1.jpg
**************************************************

Pages