वाघाची शिकार रोखण्यासाठी जालीम उपाय.

Submitted by विजय आंग्रे on 23 May, 2012 - 01:41

tigers.jpegप्रकाशचित्र सौजन्य:- आंतरजाल

देशभरात ' वाघ वाचवा ' मोहीम जोरात असतानाच गेल्या बारा वर्षांत सुमारे साडेचारशे वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे . त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावल्याची माहिती पर्यावरण व वन मंत्रालयाने दिली आहे . वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला; परंतु हाचा वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीविताच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे.

वाघ हा संपूर्ण पर्यावरणाचे प्रतीक आहे. जेथे नद्या जलप्रवाहित असतात तेथे गवत आणि वृक्ष वाढतात. जेथे गवत आणि वृक्षराई असते तेथे तृणभक्षी प्राणी आणि फळे, पाल्यावर जगणा-या पशु-पक्ष्यांची गर्दी असते आणि जेथे तृणभक्षी वन्यप्राणी असतात तेथेच वाघांचा अधिवास असतो. म्हणून वाघाशिवाय पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल राहू शकत नाही. दुर्दैवाने अशा वाघाला वाचविण्याचे प्रयत्न कमी पडत आहेत. निसर्गसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वाघाचे अस्तित्व शाबूत राहिले तरच मानवी विकास आणि प्रगतीला अर्थ राहणार आहे. कारण निसर्गाला ओरबाडून भौतिक विकास साधणा-या मानवाला नैसर्गिक साधनसंपत्तीविना येत्या काही काळात भकास होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पर्यावरणाचा राखणदार वाघ वाचावा, वाघांची संख्या वाढावी म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला. भारताचा विविध क्षेत्रांत विकास घडवून आणणा-या इंदिरा गांधी यांनी वाघाचे अस्तित्व व संख्यावाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. पुढे २००४ मध्ये डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. त्यांनी वाघाच्या संपूर्ण संरक्षणासाठी टायगर टास्क फोर्स स्थापन केले. आज भारतात ४१ व्याघ्र प्रकल्प आहेत. वन्यजिवांचे ६६३ अभयारण्ये आहेत. महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यात वाघाला हक्काचा नैसर्गिक अधिवास मिळत आहे.

याशिवाय महाराष्ट्रात ३७ अभयारण्ये आहेत. महाराष्ट्रासह भारतातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यासाठी सुमारे ६० हजार चौ. कि. मी. चे जंगल राखीव करण्यात आले आहे. आता हे जंगलही सुरक्षित राहील की नाही अशी शंका आहे. कारण देशात दरवर्षी ७२ लाख हेक्टर एवढे जंगलाचे भूक्षेत्र व्यापार व उद्योगासाठी हस्तांतरीत करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. त्याचा परिणाम विदर्भातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला बसला. अदानी उद्योग समूहाने या प्रकल्पाच्या वॉटर झोनमध्ये खाण खोदकाम गेल्यावर्षी सुरू केले; परंतु जागृत नागरिकांच्या रेट्यामुळे अदानीला खोदकाम तूर्त बंद करावे लागले आहे.

देशातील 1989 च्या गणनेनुसार वाघांची संख्या चार हजार 300 होती. ही संख्या तेव्हाच जास्त असावी. त्यानंतर गेल्या 17 वर्षांत ही संख्या निम्मी झाली असल्याचा अंदाज आहे. आणखी 10 वर्षांनी पुढच्या पिढीला वाघ कसा दिसतो, हे प्रत्यक्ष बघायला मिळेल अवघडच होईल.

सन २००७ मध्ये भारतात १४११ वाघ होते. त्यापैकी महाराष्ट्रात १०३ वाघ असल्याचे पाहणीत आढळले होते. मागील पाच वर्षांत देशात २९५ तर महाराष्ट्रात ६६ ने वाघांची संख्या वाढली. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण आणि डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थांनी अत्याधुनिक पद्धतीने २०१० मध्ये देशभरात व्याघ्र गणना केली होती. त्यानुसार देशातील पूर्व घाट, मध्य भारत तसेच महाराष्ट्राशी संलग्न असलेल्या पश्चिम क्षेत्रात ११३५ वाघ आढळले होते; परंतु महाराष्ट्रातील वाघांची संख्या तुलनेत कमी आढळली होती. तरीही देशात वाघांची संख्या १२ टक्क्यांनी वाढली होती. मागील १० वर्षांत देशभरात ३६५ वाघांचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीतून समोर आले आहे. त्यापैकी ६८ वाघांची शिकार झाली.याशिवाय ताडोबा आणि फेंच अभयारण्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या तीन वाघांच्या मृत्यूंची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. वाघांच्या शिकारीला चाप लावण्यासाठी शिकारी दिसताक्षणीच त्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले असून हा गोळीबार गुन्हा समजला जाणार नाही, असे महाराष्ट्र सरकारने घोषीत केले आहे. वाघांच्या भवित्व्यासाठी राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का?

वाघाचे अस्तित्व नाकारून मानव भौतिक सुखाच्या आहारी गेला तर आगामी काळात पर्यावरणाला मोठा धोका होईल.त्यातून मानवीजीवन सुरक्षित आणि शाश्वत राहणार नाही.तेव्हा ‘वाघ वाचवा- मानव वाचवा, देश वाचवा’ हा संदेश भारतीय नागरिकांनी अंगिकारला तर जंगले राहतील, वाघ वाचतील आणि शाश्वत विकासाला गती येईल

सविस्तर माहीती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मग त्या 'वाकड्या तोडांच्या गांधीला म्हणजे अण्णा हजारेला' पाठवताय का तिथे उपोषण करायला....!!
हे काय आहे ? उगाच काहीही ? Angry

>>वाघांच्या शिकारीला चाप लावण्यासाठी शिकारी दिसताक्षणीच त्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले असून हा गोळीबार गुन्हा समजला जाणार नाही, असे महाराष्ट्र सरकारने घोषीत केले आहे. हे योग्य का अयोग्य?<<

विजय
तुमचा लेख माहितीपूर्ण तर आहेच पण विचारलेला प्रश्न व त्यावरील चर्चाही चांगली चालली आहे. त्यात आदरणीय अण्णांबद्दल ओढूनताणून अनादराने लिहिणार्‍याचा मी तीव्र निषेध करतो.

श्री.दामोदरसुत यानी संयत भाषेत नोंदविलेला निषेध हा प्रातिनिधिक मानून त्यावर आता इथे कृपया पुढे चर्चा करू नये असे म्हणतो.

श्री.विजय आंग्रे यानी एका अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला छेडले असताना चर्चेचा ओघ त्याव्यतिरिक्त अन्यत्र वळू नये हे पाहण्याची जबाबदारी त्या समस्येबद्दल आस्था असणार्‍या सर्वांचीच आहे.

अशोक पाटील

>>दिसताच क्षणी गोळ्या मारा.....चांगला आदेश आहे......पण शिकारी कुठे आणि कुणाला या आधी दिसलेले ? ...... तेव्हा दिसले तर काय केलेले?
यावर प्रकाश टाकेल का कोणी>>

प्रामाणिक वनरक्षकांना त्यांनी सलमानला हरीणाची बेकायदा शिकार केल्याबद्दल पकडले म्हणून कोर्टात आजही हेलपाटे मारावे लागत आहेत हे अशोक यांनी नमूद केले आहे. आणि सलमान? तो तर मजेत!
हे उदाहरण समोर असल्यावर वनरक्षकांनी शिकार्‍यांकडे कानाडोळा करून झंझट टाळले असेल किंवा हटकल्यावर शिकारीच आक्रमक झाल्याने जीव तरी वाचवला असेल किंवा अधिक चलाखांनी भागीदारी केली असेल.
वाघ वाचविण्याची आंतरीक कळकळ असणारा, जिवावर उदार झालेला प्रामाणिक वनरक्षकच असे शिकार्‍याला मारण्याचे धाडस करील. त्याला हा आदेश मदत करो अशी आपण प्रार्थना करू.
हा आदेश आदिवासींचाच बळी न घेवो अशीही एक प्रार्थना करू.
नंतर अशा बळींच्या नावे वारसांना मदत म्हणून दरडोई ५/१० लाख [कागदावरच] खर्ची न पडोत म्हणजे झाले.
बाकी कायदे हे फक्त त्यांना भिणार्‍यांसाठीच डिटरंट म्हणून उपयुक्त असतात. सध्या वाघांच्या शिकारी करणार्‍यांना कायद्याचा अंमल होतो आहे हे दिसले तरच कांही उपयोग आहे. नाहीतर इतर अनंत कायद्यांप्रमाणेच हाही एक!
फाशीच्या देण्याच्या तरतुदीचे सध्या काय चालले आहे? {हे फक्त उदाहरण म्हणून दिले आहे. यावर मतप्रदर्शन अपेक्षित नाही. मूळ विषयावरच ही चर्चा केंद्रीत व्हावी.}

विजय
तुम्ही दिलेले प्रकाशचित्र पहायला फारच चांगले आहे. असे चित्र टिपणार्‍या छायाचित्रकाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
अगदी डिस्कव्हरीवर देखील पूर्ण वाढ झालेल्या पाच वाघांचा कळप पाहिल्याचे आठवत नाही. एकटा किंवा दोन वाघ दिसतात. सिंहांचे कळप मात्र दिसतात. आपण दिलेले छायाचित्र भारतातील जंगलातील असेल तर चित्र आशादायक आहे आणि हा उमदा, हजारो वर्षांच्या उत्क्रांतितून निसर्ग निर्मित प्राणी नामशेष होऊ नये असेच कोणालाही वाटेल.

आजकाल अनेकदा टीव्ही तसेच वर्तमानपत्रांतून मानवी वस्तीत बिबळ्याच्या हल्ल्याच्या व घुसखोरीच्या बातम्या येतात. या हल्ल्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तर उत्तर सहज मिळते. आज मानवाने मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली आहे. त्यामुळे या प्राण्यांचा निवाराच नष्ट होत चालला आहे. मग त्या बिचाऱ्या बिबळ्यांना मानवी वस्तीत घुसल्याखेरीज पर्याय तरी कुठे असतो? हे प्राणी न्याय मागण्यासाठी कोर्टाची पायरी तर चढू शकत नाहीत. मग ते करणार तरी काय? मानवाने केलेल्या हस्तक्षेपामुळे 'चित्ता' हा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे.

आज आफ्रिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांसारख्या देशांवर नजर टाकली तर असे दिसते की हे देश त्यांच्या भूमीवरून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राण्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. आता आफ्रिकेचंच उदाहरण घेऊया! काही दशकांपूवीर् या देशात सिंह नामशेष होऊ घातले होते. मात्र आज या देशाने सिहांच्या अस्तित्वासाठी कष्ट घेतले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच सिंह आता वाढताहेत. भारतात मात्र नेमकी उलट परिस्थिती आहे. हे असेच चालत राहिले तर एक दिवस असाही येईल जेव्हा भारतात एकही वाघ-बिबळ्यासारखा प्राणी शिल्लक राहणार नाही.

वेताळ, आफ्रिकेतील अनेक देशांत भरपूर गवताळ कुरणे आहेत. मानवी वस्तीच तुरळक असल्याने
प्राण्यांना तसा जागेसाठी संघर्ष करावा लागत नाही. गवताळ प्रदेशात तृणजीवी प्राण्यांची भरमसाठ पैदास होते,
आणि सिंह, बिबळ्यांसारख्या प्राण्यांना कधी भुकेचा प्रश्न पडत नाही.
इथल्या पर्यटन व्यवसायाचे ते मुख्य आकर्षण आहे. सिंह (स्वाहिलीत सिंबा) हे त्यांचे मानचिन्ह आहे.
इथल्या काही जमाती, सिंह खात असलेली शिकार ओढून आणण्यात बाकबगार आहेत.

इथल्या प्राण्यांनाही ईश्वर मानण्याची प्रथा आहे. अगदी शिकार केलेल्या प्राण्यालाही, जशी तूला मुलेबाळे आहेत.
तशीच मलाही आहेत, त्यांची भूक भागवण्यासाठीच मी तूझी शिकार करतोय, असे प्रार्थनेत सांगितले जाते.

इथली संस्कृती फार वेगळी आहे.

(एक प्रेमळ सूचना, आफ्रिका हा खंड आहे, देश नाही. इथल्या प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे.)

अरे आंग्र्या वाघ वाचवाला तुझ्या त्या हापचड्डी वाल्या संघातील म्हातर्‍यांना का नाही सांगत. का उगाच सरकार समोर भोकाड पसरतोयस वाघ वाचवा, वाघ वाचवा म्हणून सरकारला त्याशिवायही आणखी बरिच कामे आहेत.. तेंव्हा शांत रहा आणि टाळ कुट. कळल का?

(शिकारी) ssssk

शिकारी हे असले भुक्कड लिखाण बंद करा. असले आगलावे लिहून काय साध्य करणार आहात. बाहेरचे माहित नाही पण निदान माबोचे वातावरण तरी गढूळ करू नका.
लोकहो या असल्या पोस्टींना एखादा समजावणीवजा प्रतिसाद लिहून नंतर अखंड इग्नोर करावे.
जसे वर अशोक यांनी लिहिले आहे.

 

वाघाच्या शिकारीत वनमजुरांचाच सहभाग

गेल्या एप्रिलमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघाच्या शिकार प्रकरणात वनखात्यात काम करणारे वनमजूरच सहभागी असल्याची धक्कादायक माहिती आता तपासातून समोर आली आहे. आजवर या आरोपींचा बचाव करणाऱ्या एका वनरक्षकाला वनखात्याने तडकाफडकी निलंबित केले आहे. वाघाच्या शिकारीच्या मुद्दय़ावरून वनविकास महामंडळाच्या कार्यशैलीवर बोट ठेवणाऱ्या वनखात्यातील अधिकाऱ्यांनी आता या घटनाक्रमावर मात्र मौन धारण केले आहे.

भयाण परिस्थिती. वाचुन खुप हताश वाटले, अर्थातच नवल अजिबातच वाटले नाही. भारताच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार कसा मुरलाय याचे पुरावे रोज बाहेर येताहेत..... कधी वाटते डिसेंबर २०१२ खरेच झालं तर बरं होईल.... Sad

अमेरिकेतल्या काही राज्यांमधे एक गमतीदार नियम आहे. तिथे प्रशासन विशीष्ट हरणांची मोजणी करतात. आणि मग ठरवतात, की त्यांच्या शिकारी ला बंदी घालायची की नाही. हरणे कमी झाली की बंदी घालतात . वाढली की बंदी उठवतात. थोडक्यात काय, आपल्याला सोयीस्कर आकडा आपण ठरवणार. किती हरणे आपल्या सोयीची आणि मग ठरवा त्यांचा जीव घ्यायचा की नाही ते. भारतात ही तेच सुरू आहे. वाघ कमी आहेत तो पर्यंत त्यांच कौतुक करताहेत. उद्या वाढल्यावर कोण त्यांची फिकीर करतय. परवा कुठे तरी वाचल, भारतात सध्या आहेत त्या पेक्षा जास्त वाघ सामावून घेण्याची क्षमता आता आपल्या जंगलांची नाही. त्यामुळे याहून पुढे वाघ वाढले तर मग त्याना भक्ष अपुरे पडेल आणि ते मानवी वस्त्यांवर हल्ले करतील. जसे बर्‍याचशा आदिवासी भागात सध्याही होते. वाघ मारणार्‍या ला दिसता क्षणी गोळ्या घालणे. हा नियम सध्या माणूस मारणार्‍या मारेकर्‍याला ही लागू नाही. उदा, पोलिसांना मानवी जमवावर गोळी बार करण्या आधी जिल्हाधिर्यान्ची अनुमती लागते. मग माणूस माणसाला मारत असेल तर त्या मारणार्‍या माणसाला मारण्यासाठी इतकी तरतूद कायद्या असताना, वाघ मारणार्‍या माणसाला मारणे इतके सहज सोपे कसे केले? वाघ जगलेच पाहिजेत पण, हा उपाय नव्हे. स्मगलिंग रॅकेट्स मोडून काढणे हा आहे. तो कुणालाच करायचा नसतो. लागे बांधे...

Pages