राजे संभाजी (आज धर्मवीर संभाजी राजे यांचा जन्मदिवस)

Submitted by अनिल तापकीर on 14 May, 2012 - 01:13

आज धर्मवीर संभाजी राजे यांचा जन्मदिवस म्हनुन हि कविता पुन्हा टाकत आहे.
धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा

जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा

धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा

मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा

राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

गुलमोहर: 

छान !

आवडली

छान. Happy