अकरावी - ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

Submitted by गजानन on 12 May, 2012 - 14:15

लवकरच दहावीचे निकाल हाती येतील आणि अकरावीच्या प्रवेशाचा गदारोळ उठेल.

गेल्या दोन-तीन वर्षांपसून मुंबई विभागाकरता (MMR - Mumbai Metropolitan Region) अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे.

ही प्रक्रिया अजून तशी नवीच असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात तिच्याबद्दल धास्ती आहे.

या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसंबंधीत शंकानिरसनासाठी इथे चर्चा करू या.

या प्रक्रियेतून गेलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करावे, ही विनंती. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर्षीची माहितीपुस्तिका बघितली, तिच्यात एक गोष्ट चांगली आहे - महाविद्यालयांच्या यादीत गेल्या वर्षीच्या प्रवेशांची Cut-offs दिली आहेत, त्यांचा आपल्या गुणांनुसार आपल्याला कोणकोणत्या महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकतो याचा अंदाज आणि आपली यादी तयार करायला मदत होईल.

पण या Cut-off ची एक ही गोष्ट कळली नाही - काही Cut-off अपूर्णांकात का आहेत? उदा. आचार्य कॉलेजचे मागच्या वर्षीचे कॉमर्स कटॉफ ३३४.४० आहे. काही विषय दीडशे गुणांचे आहेत, टॉप फाईव्ह काढताना त्यात मिळालेले गुण शंभराच्या पट्टीवर आणल्यामुळे ते अपूर्णांक आहेत का?

दुसरे म्हणजे, अ‍ॅडमिशन करता ५ विषयांचेच गुण विचारात घेतात ना? मग कॉमर्सचे काही Cut-offs पाचशेच्या वर कसे काय? उदा. Mcc कॉलेजचे मागच्या वर्षीचे कॉमर्स कटॉफ ५०६ आहे.
नेमके कारण कोणी सांगेल का?

मुंबईचा पॅटर्न मला माहिती नाही, पण पुण्यातला पॅटर्न माहिती आहे. अन हो ते टॉप फाईव्ह प्रकरणही नवीन आहे मला.दोन वर्षापूर्वी मी गेलेय त्यातून. काही मदत करू शकले तर नक्की आवडेल करायला.
गजानन>मग कॉमर्सचे काही Cut-offs पाचशेच्या वर कसे काय < चित्रकला, खेळ यांचे अ‍ॅड केले असतील का ?

मला ही ऑनलाइन पद्धती बरी वाटली कारण दहा कॉलेजात जाऊन फॉर्म्स आणायचा घोळ नाही होत. पण यंदा गेल्या वर्षीपेक्षा ऑनलाईन सिट्स कमी आहेत असे वाचले. ब-याच कारणाने ह्या सिट्स कमी होत असतात. जसे अल्पसंख्यांक कोटा (एखादी संस्था जसे एस आय इ एस मुळात सौदेंडीयनांसाठी आहे मग तिथे त्यांचा अल्पसंख्यांक कोटा ५०%, त्याला ऑनलाईन अ‍ॅडमिशन घ्यावी लागत नाही. एखाद्या संस्थेच्या शाळाअ नी कॉलेजेस असतील तर मग त्यांच्या शाळेच्या मुलांना त्यांच्या कॉलेजात २०% कोटा, हा ऑनलाईनने भरत नाहीत, तसेच मॅनेजमेंट कोटा इ.इ.) त्यामुळे उदा. मुंबईत पार्ले टिळक शाळेतल्या मुलांसाठी त्यांच्या सगळ्या कॉलेजात २०% जागा आहेत, या जागा ऑनलाईन प्रवेशाच्या आधी भरल्या जातात आणि उरलेल्या जागा ऑनलाईन साठी खुल्या होतात.

हे कटऑफ मार्कांचे मलाही कळले नाही कारण मुळात जे मार्क छापलेत ते ब-याच कॉलेजेससाठी चुक आहेत. आणि ते पुर्ण मार्कांवरती आधारित नाहीत तर बेस्ट ऑफ फाइव वर आधारीत आहेत. बेस्ट ऑफ फाईव ५०० किंवा ५५० होते. जसे एका मुलाच्या बेस्ट ऑफ फाइव मध्ये गणित नाहीय, तर त्याला ५०० पैकी मार्क किती ते मार्क दिसणार . ज्याच्या बेस्ट ऑफ फाइव मध्ये गणित आहे त्याला ५५० दिसणार. (इतर विषय १०० चे आणि गणित १५० चे आहे म्हणुन हा फरक)

पण यामुळे %वर परिणाम होत नाही. बोर्ड जी गुण पत्रिका देते त्यात सगळ्या विषयाचे मार्क दिसतात पण टक्के किती हे मात्र बोर्ड बेस्ट ऑफ फाईव वरुनच काढुन देते. जसे माझ्या मुलीच्या टॉप ५ मध्ये गणित नाही. गुण पत्रिकेत सगळ्या विषयातले मार्क आहेत पण एकुण मार्कांच्या समोर फक्त ५ टॉपच्या विषयांचे मार्क आहेत, त्याला ५०० ने भागलेय आणि % काढलेय. अशा प्रकारे तिला ८७% येतात. या टक्क्यांचा उल्लेख गुणपत्रिकेत आहे. सगळे विषय धरले तर तिचे मार्क ८४% होतात. या ८४% चा उल्लेख गुणपत्रिकेत नाही. पुढची सगळी अ‍ॅडमिशन प्रोसेस ८७% वर होणार. ८४ %च्या उल्लेखही कुठे होत नाही (फक्त एकदा फॉर्मवर लिहावे लागते) (बेस्ट ऑफ फाइव आपण ठरवत नाही तर आपोआप मार्कांवरुन ठरते)

निदान गेल्या वर्षी तरी कॉलेज सिलेक्शन खालिलप्रकाणे होते (यावर्षी बदलणार असे वाचलेय)
अ भाग - यात पुर्ण मुंबई अगदी पनवेल ते भिवंडी-निजामपुर पर्यंत कुठलीही २० कॉलेजेस निवडायची.
ब भाग - यात तुमच्या भागातली (म्हणजे माझ्या केसमध्ये नवी मुंबई) १५ कॉलेजेस.
क भाग - यात तुमच्या वॉर्डातली ५ कॉलेजेस (म्हणजे माझ्या केसम्ध्ये नेरुळमधली)

अ,ब्,क मध्ये एकच कॉलेज परत परत रिपिट करता येत नाही.

यामागे आयडिया अशी आहे की जर मुलाला अ भागतल्या २० पैकी एकातही अ‍ॅडमिशन मिळाली नाही तर मग ब भाग पाहिला जाणार. ब भागातही अ‍ॅडमिशन नाही तर मग क भाग. त्यामुळे कॉलेज निवडताना अ भागात आपल्या आवडीनुसार हवी ती कॉलेजेस घ्यायची. आपल्या मुलांना पहिल्या ५-६ कॉलेजेसपैकी एकाततरी नक्कीच प्रवेश मिळणार. ब आणि क कडे जायची वेळ येणारच नाही. पण भाग भरणे आवश्यक आहे. (माझ्या केसम्ध्ये क भागात कलाशाखेचे एकही कॉलेज नव्हते त्यामुळे तो भाग मोकळा ठेवण्यास परवानगी होती)

तुम्ही आधी जी शाखा निवडलीय त्याप्रमाणे कॉलेजचे कोड सिलेक्शनसाठी मिळतात.
जसे तुम्ही शाखा सायन्स - बायफोकल एलेक्ट्रिकल निवडलीय तर हा विषय ज्या कॉलेजेसम्ध्ये आहे फक्त तेच कोड तुम्हाला निवडण्यसाठी दिसतात. पण बहुतेक सायन्स जनरल ही शाखा निवडुन नंतर बायफोकल घेता येत असावे (पण हे चेक करा, उगीच ह्यामुळे हवे ते कॉलेज हातचे जायला नको)

तसेच पहिल्या फेरीत जे कॉलेज आलेय तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे (फक्त ५० रु भरायचे असतात). जर समजा तुम्हाला तुमच्या हव्या त्या कॉलेजच्या लिस्टमधल्या ५ नंबरच्या कॉलेजमधे प्रवेश मिळाला तर तुमचे नाव पुढच्या प्रवेशात धरले जाते. पुढच्या फेरीत कधाचित २ नंबरच्या किंवा १ नंबरच्या कॉलेजात मिळू शकते. प्रवेश घेतला नाही तर मात्र नाव बाद होणार.

(ऐशुच्या मैत्रिणीच्या क्रमवारीत रुईया १ नं. होते आणि केसी ५ नं. होते पण पहिल्या फेरीत केसी कॉलेज मिळाले, तिथे प्रवेश घेतला. पुढच्या फेरीत रुईया मिळाले. केसी रद्द केले आणि रुईयाला प्र्वेश घेतला. ऐशुने रुपारेल १ नंबरला घेतलेले आणि पहिल्या फेरीत तिथे मिळाले, त्यामुळे तिचे नाव पुढच्या फेरीत आले नाही)

मला तरी वाटते की कट ऑफचा फारसा बाऊ न करता सरळ हव्या त्या कॉलेजची नावे क्रमवारीत भरावी. पुस्तकातले कटॉफ चुकीचे असले तरी आपल्याला माहित असते अमुक कॉलेजमध्ये साधारण किती कटऑफ आहेत ते. त्याप्रमाणे प्रवेश मिळतो. जास्त काळजी करु नये. अगदीच वाईट परिस्थिती ओढवली तर १२वीला कॉलेज बदलुन घ्यायचे.

पण जर तुमच्या शाळेचेच कॉलेज असेल., तुमच्या जातीबांधवांनी काढलेले कॉलेज असेल (ज्याची नोंद सरकार दरबारी मायनॉरिटी म्हणुन होते (इथे मायनॉरिटी म्हणजे जणगणनेमधले नाहीत. इथे खालसा कॉलेजम्ध्ये पंजाबी मायनॉरिटी आहेत, एस आय इ एस मध्ये दाक्षिणात्य, रिझवी मध्ये मुस्लिम इ.इ.), तर ऑनलाईनच्या आधीच प्रवेश होणार. ऑनलाईनमध्ये जायची गरज नाही.

साधना , फार छान लिहिलेत.
http://www.indianexpress.com/news/class-xi-online-admissions-to-continue...
In his reply, Darda said last year the admission process had taken 52 days and the government, with the help of a team of experts, has now ensured that the process will be completed in 25 days.

Now, a message will flash on the screen if a student chooses a college that has a much higher cut-off percentage than his marks.

“The message will say there is no guarantee of admission in this college. A margin of five per cent has been kept to issue this warning message,”

to resolve the problem of students getting admission into colleges far from their residence, the government has now made it mandatory to choose five colleges attached to secondary schools in the locality.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-04-27/mumbai/31421217_1...

This year, of the total 2.65 lakh seats for all three streams combined, 1.5 lakh will be available for the online admission process, whereas the rest will be available for various quotas including management, in-house and minority quotas. "Admissions for these seats will take place offline before the online admissions begin. Once the seats under the various quotas are filled, colleges will have to surrender the rest of their seats for the open category admission that will take place online," added the official.

वाणिज्य शाखेत बायफोकल अभ्यासक्रम मोजक्याच महाविद्यालयांत उपलब्ध आहे असे कळले.

मग कॉमर्सचे काही Cut-offs पाचशेच्या वर कसे काय < चित्रकला, खेळ यांचे अ‍ॅड केले असतील का ?

कट ऑफ मार्क असतील तर ते ५०० किंवा ५५० पैकी धरतत. आणि जर तुमच्या मुलाचे ५०० पैकी असतील तर ते गणिताचा नियम लावुन ५५० पैकी किती हेही काढुन फॉर्मवर लिहितात असे मला अंधुकसे आठवतेय. पण यामुळे % वर काहीही परिणाम होत नाही.

चित्रकला/ खेळ वगैरे थोडेफार महत्वाचे आहे., पण जिथे प्रवेश घेतोय तिथे ते लागु असले पाहिजे. ऐशुकडे इंटर्मिजिएटचे सर्टिफिकेट होते पण कलाशाखेतल्या एकाही विषयात याचा उपयोग नव्हता त्यामुळे ते सर्टिफिकेट नको म्हणुन मॉडरेटरने सांगितले. कदाचित विज्ञानात उपयोग झाला असता तर मग थोडे वेटेज मिळाले असते. पण उगीच सर्टिफिकेट आहे म्हणुन ते जोडता येत नाही. अ‍ॅडमिशन प्रक्रियेत त्याचा उपयोग होत असेल तरच जोडायला मिळते.

खेळात स्टेट/नॅशनल लेवेलला पार्टिसिपेशन केल्याचे सर्टिफिकेट पाहिजे. मार्क बघत नाहीत. चित्रकलेतही इंटर्मिजिएटचे सर्टिफिकेट पाहिजे. शालेय मार्क बघत नाहीत.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही जर विभाग बदलत असाल (म्हणजे पुण्यात/दिल्लीत आहात आणि मुंबईत प्रवेश पाहिजे) तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर लगेच पुण्याच्या/दिल्लीच्या शिक्षण अधिका-याची सही घ्या. अशी सही लागते हे इथे मुंबईत कोणीही सांगणार नाही. पण अ‍ॅडमिशनच्या वेळेस जेव्हा तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला द्याल तेव्हा तो सही नाही म्हणुन तुमच्या तोंडावर परत फेकायला मात्र त्यांना मजा येणार. :रागः पुण्यातल्या शाळेनेही हे सांगितले नव्हते, तिथल्या पालकांनी सांगितले म्हणुन मी १ दिवस खर्चुन सही घेऊन ठेवली. इथे मुद्दाम विचारले तेव्हा सही आवश्यक म्हणुन सांगितले. हे त्यांना फॉर्मवरही लिहिता येईल पण कुठेही लिहिलेले नाही. आणि सही नसली तर नो अ‍ॅडमिशन.

साधना, भरत, धन्यवाद.

साधना, एकूण किती फेर्‍या असतात?
यावेळी भ्रमणध्वनी क्रमांक घेतलेत. त्यावर वेळोवेळी संदेश येणार असं कळले.

गजानन,
हे वाचलेत का?
to resolve the problem of students getting admission into colleges far from their residence, the government has now made it mandatory to choose five colleges attached to secondary schools in the locality.

तुमच्या भागातल्या, शाळांशी संलग्न असलेल्या चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती काढून, निवड आत्ताच करून ठेवा. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम निवडायचा असेल (जिथे सामायिक प्रवेश परीक्षा कॅट लागत नाही असा) तर पुन्हा नव्याने प्रवेश घेणे मात्र आले.

साधना, एकूण किती फेर्‍या असतात?

गेल्या वेळेस किती होत्या आठवत नाही पण कमीत कमी ३ तरी होत्या.

फॉर्मचा पहिला भाग निकालाच्या आधी भरला तरी चालतो. दुसरा भाग निकालानंतर भरायचा असतो. तुमचा पाल्य इथल्याच शाळेत असेल तर शाळाच हे सगळे करुन घेते. पण मुंबईबाहेरुनच्या लोकांना गायडन्स सेंटरमध्ये जावे लागते. निकालाआधी तिथे एकदा भेट देऊन सगळी माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

ऑनलाईन फॉर्म्सच्या दोन्ही भागांचे प्रिंट घेऊन त्यावर मुख्याघ्यापकाची सही घेणे आवश्यक आहे. खरे तर बोर्डाने सही बद्दल काही लिहिलेले नाहीय पण जिथे प्रवेश घ्यायला जाऊ तिथल्या लोकांची डोकी कशी चालतील ते सांगता येणे अशक्य आहे. आपला वेळ वाया घालवायचा नसेल तर आधीच काळजी घेतलेली बरी. माझ्या मुलीच्या फॉर्मवर गायडन्स सेंटरने 'आवश्यकता नाही' म्हणुन सही करायला नकार दिला. तिकडे कॉलेजात सही हवीच म्हणुन लोक अडुन बसले. शेवटी तिथे बोर्डाचा एक आचरट आणि अक्कलशुन्य इसम बसवलेला त्याच्यासमोर 'अडला हरी.....' करत शरणागती पत्करली आणि एकदाचा प्रवेश घेतला. सगळे ऑनलाईन असले तरी प्रत्येक गोष्टीचा प्रिंट घेणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवावे. Happy

कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनसाठी काय कागदपत्रे लागतील हे बोर्डाच्या फॉर्ममध्ये स्पष्टपणे लिहिलेले नसते. कागदपत्रे प्रत्येक कॉलेजप्रमाणे बदलतात. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेल्यावर ही ज्ञानप्राप्ती झाली आणि वर तिथे आलेल्या पालकांना प्रिंसिपॉलकडुन 'आम्ही बोर्डावर ठळक अक्षरात लिहिलेय, तुम्ही आधी येऊन बघायला पाहिजे होते' हे ऐकुन घ्यावे लागले. खरे तर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर एकाही पालकाला हे ठळक अक्षरात लिहिलेले कुठेही दिसले नव्हते पण आपल्याला गरज असल्याने आणि रोज खेटे घालण्याइतपत सुट्ट्या ऑफिस देत नसल्याने गप्प बसुन ऐकावे लागते Happy

प्रवेशाच्या वेळी पाल्याचे २-३ तरी आयकार्डसाईज फोटो लागतात. हे फोटो आताच काढुन ठेवा. प्रवेशाच्या वेळी सोबत ग्लु-स्टिकही घेऊन जा. फोटो स्टेपल केलेले चालत नाही. अर्थात हे प्रत्येक कॉलेजनुसार बदलते.

पाल्य मुलगी असेल आणि कॉलेजला शासनाची ग्रँट असेल तर कॉलेजमध्ये फी माफीसाठी रेशनकार्डच्या पहिल्या नी शेवटच्या पानाची फोटोकॉपी आवश्यक आहे. अर्थात हे देऊनही मुलीच्या कॉलेजने तेव्हा दिलेली फीमाफी आता काढुन घेतली आणि कॉलेजच्या सगळ्या मुलींना शेवटच्या महिन्यात ३०० रुपये भरायला लावले.

इथे कोर्सेसबद्दल थोडक्यात चांगली माहिती आहे.
व्होकेशनल आणि बायफोकलमधला फरक कळला.
http://sathayecollege.com/JCourses.html

साधना, तीनेशे रुपये एखाद्या विशिष्ट कोर्सचीगोष्टीसाठीची फी असेल का? प्रत्यक्षात फी हजारी असते (ना?)

तुमच्या भागातल्या, शाळांशी संलग्न असलेल्या चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती काढून, निवड आत्ताच करून ठेवा. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम निवडायचा असेल (जिथे सामायिक प्रवेश परीक्षा कॅट लागत नाही असा) तर पुन्हा नव्याने प्रवेश घेणे मात्र आले. <<<

भरत, होय.
शाळेत दीडशे रुपये भरून माहितीपुस्तिका आणि त्याबरोबर लॉगीन आयडी/पासवर्ड मिळाला आहे. यादी करायला घेतली आहे. त्या पुस्तकातली भली मोठी बारीक अक्षरातली सगळ्या कॉलेजांची यादी बघून आपली यादी काढणे अवघड वाटले म्हणून मी त्या संकेतस्थळावरची यादी एक्सेलमध्ये कॉपी करून घेतली आहे. आणि त्या एक्सेलमध्ये (नोर्थ, साऊथ, इस्ट, वेस्ट, ठाणे झोनच्या) वाणिज्य शाखेच्या प्रत्येक कॉलेजचा कटॉफ टाकला आहे. (गेले दोन दिवस तेच करत बसलोय. :फिदी:)
संकेतस्थळावरही कटॉफ आहे पण वेगळ्या पॉपमध्ये उघडातो.

हे अशासाठी केले, की अजून निकाल आलेला नसल्यामुळे प्रत्यक्ष गुण माहीत नाहीत. एक्सेलमध्ये डेटा घेतल्यामुळे आपल्याला हवी ती गाळणी लावून यादी करणे सोपे जाईल.

तर इथल्या कोणाला ही यादी हवी असेल तर मी घरून पाठवू शकेन.

...

फॉर्मचा पहिला भाग निकालाच्या आधी भरला तरी चालतो. दुसरा भाग निकालानंतर भरायचा असतो. तुमचा पाल्य इथल्याच शाळेत असेल तर शाळाच हे सगळे करुन घेते. <<<
साधना, दोन आठवड्यांपूर्वी शाळेने माहितीपुस्तिका वितरीत केल्या. त्याआधी म्हणे नोटीस लावून एक मार्गदर्शक बैठक बोलावली होती. दहावीची परिक्षा झाल्यावर नोटीस लावली. विद्यार्थ्यांना माहीत कसे पडायचे? Uhoh (शाळेचे स्पष्टीकरण : नंतर खूप गडबड होते म्हणून आम्ही आतापासूनच सुरू केलीय प्रक्रिया. चांगले आहे, पण व्यवस्थित कळवणे आवश्यक नाही का?) ज्यांची लहान भावंडे शाळेत होती त्यांच्याकडून कळले. आमची ही बैठक हुकली!

साधना, तीनेशे रुपये एखाद्या विशिष्ट कोर्सचीगोष्टीसाठीची फी असेल का? प्रत्यक्षात फी हजारी असते (ना?)

फी सगळीकडे सारखी नाहीय. जिथे कॉलेजला ग्रँट आहे तिथे शेकड्यामध्ये फी आहे, ग्रँट नाही तिथे काही हजारात. रुपारेलला ६१० रुपये पुर्ण वर्ष, सर्व काही यातच+१००० रुपये वेगळे जर जर्मन/फ्रेंच्/जॅपनीज घेतले तर. आम्ही आधी ३१०+१००० भरलेले, मुलगी म्हणुन रिजरर्व्ड कॅटेगरीत प्रवेश मि़ळाला. फेबमध्ये उरलेले ३०० भरावे लागले.

हेच नव्या मुंबईत बिना ग्रँटच्या कॉलेजात १५,००० ते २०,००० पर्यंत आहे. वाशीच्या मॉडॅल कॉलेजात ग्रँट आहे तरी रु. १५,००० फी आहे. नव्या मुंबईत सायन्ससाठी फादर अ‍ॅग्नेलची वर्षाची फी ३२,००० होती. (इथे सगळ्यात जास्त). मुंबईतही १००० पासुन १०,००० पर्यंत आहे.

सरकारने फीवर काहीतरी कंट्रोल आणला पाहिजे. बाकी सगळे सारखे असताना केवळ ग्रँट नसेल तर अव्वाच्या सव्वा फी आकारायची परवानगी प्रायवेट कॉलेजेसना दिलीय.

आमची ही बैठक हुकली

काहीही काळजी करु नका. सगळ्या शाळांनी उगीच फॉर्म भरायचे प्रस्थ बनवुन ठेवलेय. कॉम्प्युटर लिटरेट माणसाला हा फॉर्म घरच्या घरी आरामात भरता येतो. मी स्वतःच भरला. तुम्ही फॉर्म बघुन ठेवा आणि भरुन ठेवला तरी चालेल. सेव करायचा. सबमीट नंतर करायचा. शाळेने त्यांचा पासवर्ड वापरुन स्विकारला कीच भाग दोन उघडतो. उगीच फॉर्मची भिती बाळगु नका. शा़ळांनी लोकाना प्रचंड घाबरवुन ठेवलेय. काहीही दम नाहीय त्यात.

गजानन, माहितीपुस्तिकेतल्या कट-ऑफवर पूर्णपणे विसंबून राहू नकोस. (स्वानुभवाचे बोल)

बैठक हुकली म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. कारण बैठक प्रामुख्याने नेट-सॅव्ही नसलेल्या लोकांसाठी असते. (ती बैठक घेणारे स्वत: किती नेट-सॅव्ही असतात हा वादाचा मुद्दा होऊ शकतो.)

ही मूळ प्रक्रिया चांगली असली, तरी तिच्या अंमलबजावणीत प्रचंड गोंधळ आहेत. (आम्ही गेल्यावर्षी यात बर्‍यापैकी भरडले गेलोय.) दरवर्षी नियमांत बदल होतात, नवीन बैठकी घेतल्या जातात, मुलं-पालक अधिकाधिक कन्फ्यूज होतात आणि शेवटी जवळजवळ ५०% जागा नंतर ऑफलाईन पध्दतीने भरल्या जातात. आणि अखेर ११वीचे वर्ग सुरू व्हायला सप्टेंबर उजाडतो Sad

साधना, ललिता, मौल्यवान सूचनांबद्दल धन्यचवाद.

प्रक्रिया नवीन आहे म्हणजे गोंधळ असणारच हे गृहीत धरलेय. जसजशी जुनी होत जाईल तशी जास्त परिपक्व, तंदुरुस्त होत जावी ही अपेक्षा.