“ओशो”

Submitted by RISHIKESH BARVE on 11 May, 2012 - 15:00

“सेक्स” या प्रकाराचे प्रचंड विकृत आकर्षण व त्यातुन घडणारे गुन्हे आणि तितकाच जोरकसपणे “सेक्शुअॅलिटी”ला होणारा विरोध अशा दोन परस्परविरुध्द मनोधारणा एकाच समाजात असणारा देश म्हणजे आपला भारत...याचं मुख्य कारण म्हणजे भावनांच्या नियोजनाचा व नियमनाचा अभाव हे आहे..संतमहात्म्यांनी कायम आपल्या शिकवणूकीतुन असं वागु नका! तसं वागु नका!! हे सांगितलं पण तो भावनांना विरोध झाला, नियमन कसं करावं हे कोणीच सांगितलं नाही...मार्ग नक्कीच दाखवला पण, चालावं कसं ते शिकवलंच नाही...मोक्षाच्या पंचपक्वांन्नाचं ताट समोर वाढलं पण, न सांडता कसं खावं ते शिकवलंच नाही....सगळ्यांनी शिखरावरचा कळस दाखवला, पण “आहेस तिथेच थांब आणि माझं बोट धर, मी नेतो तुला शिखरापर्यंत” असं म्हणुन माझं बोट धरुन मला चालायला शिकवणारे माझे तत्वज्ञगुरु एकच ते म्हंणजे “ओशो”......तुकारामांच्या ‘चालविशी हाती धरोनिया’चा अक्षरश: अनुभव करुन देणारा माझा बुध्दीमान गुरु म्हणजे “ओशो”

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओशो यांच्यावर धागा काढल्याबद्दल धन्यवाद. ओशोंची पुस्तके मी वाचली आहेत. ओशोंबद्दल माझे जे मत होते ते पुस्तके वाचुन संपुर्ण बदलले.

ओशोंची पुस्तके मी वाचली आहेत. ओशोंबद्दल माझे जे मत होते ते पुस्तके वाचुन संपुर्ण बदलले.

सेम हिअर. मीही ओशोंची पुस्तके वाचते.

प्रत्यक्षात ओशो कसे होते याच्याशी आता काही देणेघेणे असायचे कारण उरले नाही.

इथे एका मैत्रिणीचं ओशोमेडिटेशन सेंटर पण आहे. मी तिथे २-३ वेळा निरनिराळे ध्यानाचे प्रकार शिकले आहे.
प्रत्येक ध्यान हे साधारण तास्भर चालतं आणि खूप डाय्नॅमिक प्रकार असतात. संधी मिळाली तर जरूर ट्राय करा.
कोणत्या तरी वेब साइट वर ओशोंचं आत्मचरित्र पण ऑनलाइन वाचता येतं. सापडली लिंक तर इथे डकवीन.

ओशोंची पुस्तके मी वाचली आहेत. ओशोंबद्दल माझे जे मत होते ते पुस्तके वाचुन संपुर्ण बदलले. >> ओशोंचं एकही पुस्तक वाचलेले नाही पण त्यांच्या शिष्याचे पुस्तक वाचूनच ओशोंबद्दलचे मत अमूलाग्र बदलले.

खूप मोठा तत्त्ववेत्ता... मी जितके जाणलेय त्यावरून, खूप उशिरा ( कदाचित खूप लवकर!) जगात आला. चुकीच्या काळात बरोबर गोष्टी सांगायला गेला आणि वादाच्या भोवर्यात अडकला. लोकानी त्याचे तत्त्वज्ञान जरूर ऐकावे, वाचावे..

सर्वांना धन्यवाद ,
निदान इथेतरी कुणी गलिच्छ राजकारण केले नाही हे पाहून बरे वाटले
नाहीतरी आम्ही बदनामच आहोत माबो वर
म्हणतात न? बदनाम हुवे तो क्या हुवा?नाम तो हुवा .....
त्याच धर्तीवर , माझ्यावर यथेच्च चिखलफेक सुरु आहे दुसरीकडे, पण म्हणून निदान मी म्हणतोय ते लोक वाचतायत तरी ...................
जावूद्या
पुनश्च धन्यवाद

RISHIKESH BARVE >> तुम्ही जे विचार मांडता आहात , लोक त्यावर प्रतिसाद देत आहेत. इथे कोणीही तुमचा वैयक्तिक शत्रू नाही. हे अतातरी तुमच्या लक्षात आले असेल अशी अपेक्षा.

ओशो बद्दल विकुनी चांगले लिहिले होते त्यांच्या लेखात.

RISHIKESH BARVE,

मी ओशो वाचलेले नाहीयेत. मात्र ऐकलं बरंच आहे. आणि ते पारंपारिक मनोभूमिकेत बसत नाही. त्यांची इंद्रियांवरील संयमाच्या बाबतीतली मतं ऐकायला आवडतील. मला वाटतं तिथेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा भारतीय पारंपारिक मताशी विरोध होतो.

त्यांच्या नावाखाली काय चालतं याचा (कदाचित) त्यांच्या शिकवणुकीशी संबंध नसेलही.

आ.न.,
-गा.पै.

ओशोंचं एकही पुस्तक वाचलेले नाही पण त्यांच्या शिष्याचे पुस्तक वाचूनच ओशोंबद्दलचे मत अमूलाग्र बदलले.

हो, मी आनंदऋषी यांचे पुस्तक वाचलेले, अजुन एका मुंबईच्या डॉक्टरचे पण अनुभव वाचलेले. खुप आश्चर्य वाटले वाचुन. काही वर्षांपुर्वी यशवंत देव यांना टिवीवर सतत भगव्या कपड्यात पाहिलेले, तेव्हा आश्चर्य वाटायचे, यांनी का घातले असले कपडे म्हणुन. त्याचेही कोडे उलगडलेले, मुंबईच्या डॉक्टरांचे अनुभव वाचुन.

त्यांच्या नावाखाली काय चालतं याचा (कदाचित) त्यांच्या शिकवणुकीशी संबंध नसेलही
हो, मलाही असेच वाटले. आधी रजनिश म्हणजे काहीतरी अघोरी कामे करणारा माणुस असेच वाटायचे.

एनी वेज, आता ते पुस्तकरुपे उरलेत. आणि जे काही पुस्तकांमध्ये आहे ते आधी इतरांनीही लिहुन ठेवलेय पण एकत्र परत वाचताना बरे वाटते. काही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यासारखी वाटतात.

मी ही वाचलीये ओशोची पुस्तके, मनुष्य जीवनातुन विलग न करता येनारी आणि त्यच्याशिवाय जीवन नाहीच अशी सेक्स ही गोष्ट आपण सर्वच तर आपल्या वैवाहिक जीवनात करत असतो (आता ती विक्रुती बनत आहे आणि नैसर्गिक नियमाना न जुमानता समोर येत आहे ही गोष्ट वेगळी कदाचित तो वादाचा मुद्दा ही ठरु शकेण ) तरीही त्याबद्दल उघडपने भाष्य करु न देनारी आणि जो करेल त्याला निर्लज्ज ठरवणारी संस्क्रुतीच याबद्दल विक्रुती निर्माण करते.........याच विक्रुतीला योग्य मार्ग दाखवुन त्याचे उपयोजन करण्याचे काम आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे.........या त्यांच्या एकाच विचाराने भारवुन मी माझ्या परीने त्यांना समजुन घेन्याचा प्रयत्न केला आणि गामांच्या मताप्रमाणे ते पारंपारिक मनोभूमिकेत बसत नाही. त्यांची इंद्रियांवरील संयमाच्या बाबतीतली मतं ऐकायला आवडतील. मला वाटतं तिथेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा भारतीय पारंपारिक मताशी विरोध होतो.

ओशोंबद्दल माझे जे मत होते ते पुस्तके वाचुन संपुर्ण बदलले.

सेम हिअर. +१

हो, मी आनंदऋषी यांचे पुस्तक वाचलेले, >> Happy मी पण - पातंजलयोगदर्शन! त्यात जी ओशोंच्या विचारांशी ओळख झाली ती खूप सकारात्मक होती.

तिथेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा भारतीय पारंपारिक मताशी विरोध होतो. >> असे मलाही वाटायचे गामा. पण 'भोग हे भोगूनच संपवायचे असतात' हा भारतीय तत्वज्ञानातीलच कर्मसिद्धांत आहे. मला समजलेले ओशो असे:

या जन्मातील प्रारब्ध भोगण्यासाठी इंद्रियांची प्राप्ती होते. कर्मेंद्रियांनी बनलेले शरीर ही गाडी आणि वाट्याला आलेले प्रारब्ध हे इंधन. समजूतींच्या पगड्यामुळे आपण मुक्ती मिळवण्याच्या नावाखाली त्या गाडीलाच ब्रेक मारू पहातो. त्याने ते प्रारब्धाचे इंधन तर संपत नाहीच उलट अचानक ब्रेक मारल्याने गाडी रस्त्यावरून घसरण्याचा धोका असतो. ओशो म्हणतात की गाडी चालूच राहू द्या काही काळाने इंधन आपोआप संपून जाइल. हा भाग तर सर्वश्रुत आहे. पण मग ते सांगतात की ही गाडी चालू असताना नवीन इंधन मात्र भरत नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. ज्ञानेंद्रियांकदून मिळणार्‍या उद्दिपना बुद्धीच्या कह्यात ठेवायच्या आहेत. हा भाग मात्र सोयीस्कररीत्या विसरला जातो बर्‍याच जणांकडून. आणि मग त्यांचा विनोद खन्ना होतो.

>>ज्ञानेंद्रियांकदून मिळणार्‍या उद्दिपना बुद्धीच्या कह्यात ठेवायच्या आहेत. हा भाग मात्र सोयीस्कररीत्या विसरला जातो बर्‍याच जणांकडून.
अगदी अगदी, हेच लिहिणार होतो इकडे. ओशोंचे मी काहीच वाचलेले नाहीये, पण त्यांनी संयमित भोग भोगावेत आणि वेळ येताच त्यापासुन विलग (मनाने) व्हावे असे काही सांगितले असेल तर ते भारतीय वैदिक तत्वज्ञानाला अनुसरूनच आहे.
त्यांच्या मतांवर विश्वास ठेवणार्‍या अनेकांनी त्यांच्या शिकवणीचा फक्त पहिलाच भाग महत्वाचा मानलेला दिसतो. Wink

ओशोंचे महावीर (नमोकार महामंत्र) आणी नानक, जपजी (एक ओंकार सतनाम) वरिल प्रवचने फार सुंदर आहेत

<< कर्मेंद्रियांनी बनलेले शरीर ही गाडी आणि वाट्याला आलेले प्रारब्ध हे इंधन. समजूतींच्या पगड्यामुळे आपण मुक्ती मिळवण्याच्या नावाखाली त्या गाडीलाच ब्रेक मारू पहातो. त्याने ते प्रारब्धाचे इंधन तर संपत नाहीच उलट अचानक ब्रेक मारल्याने गाडी रस्त्यावरून घसरण्याचा धोका असतो. ओशो म्हणतात की गाडी चालूच राहू द्या काही काळाने इंधन आपोआप संपून जाइल. हा भाग तर सर्वश्रुत आहे. पण मग ते सांगतात की ही गाडी चालू असताना नवीन इंधन मात्र भरत नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. ज्ञानेंद्रियांकदून मिळणार्‍या उद्दिपना बुद्धीच्या कह्यात ठेवायच्या आहेत.>>

+100

प्रत्यक्षात ओशो कसे होते याच्याशी आता काही देणेघेणे असायचे कारण उरले नाही.
पूर्ण सहमत !

//मार्ग नक्कीच दाखवला पण, चालावं कसं ते शिकवलंच नाह////
मला वाटते कि तुम्ही प्रेषित मुहम्मद सलम यांच्याविषयी वाचले नसावे बहुतेक, म्हणून असे सांगत आहात. प्रेषितांनी फक्त मार्गच दाखविला नाही तर त्यावर कसे चालावे ते अनुकरणातून दाखवून दिले आहे.

>>>>>> प्रेषितांनी फक्त मार्गच दाखविला नाही तर त्यावर कसे चालावे ते अनुकरणातून दाखवून दिले आहे.

हा हा हा... फार छान वाक्य आहे. मार्ग दाखवला का अनुकरण केल? का त्या वर चालून दाखवल? अनुकरण केल तर कोणाच केल? काही तरी sensible बोला राव.