पाणी टंचाई

Submitted by Mandar Katre on 8 May, 2012 - 14:24

मानव-निर्मित कृत्रिम वस्तू व सेवा उदा.कॉम्युटर /मोबाईल ह्या स्वस्त होत जाणार आणि नैसर्गिक वस्तू उदा.पेट्रोल /अन्नधान्ये महाग होत जाणार असा इशारा ७०-८० वर्षांपूर्वी एका अर्थ-तज्ज्ञाने दिला होता ....तो तंतोतंत खरा होत आहे
o
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम उपाय यांचा वापर करून अन्नधान्ये उत्पादनात वाढ आणि इतर नैसर्गिक साधन-संपत्तीचा काळजीपूर्वक वापर याचा समतोल राखल्यास काही प्रमाणात फरक पडू शकेल

जसे कि आज आपल्याला जाणवत असलेल्या भीषण पाणी टंचाई /दुष्काळ यावर उपाय म्हणून समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करणारे डी-सेलीनेशन प्लांट असणे ही काळाची आत्यंतिक गरज आहे, पण आपल्याकडे राज्यकर्त्यांना पैसा खाण्यातून वेळ मिळेल तर शपथ.........................

http://www.youtube.com/watch?v=txWYhWTz9QM&feature=fvst

Water - letter written in 2070

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या सगळ्या वाहिन्यांवर आणि पेपर्समध्ये महाराष्ट्रातल्या भीषण दुष्काळाबद्दल चर्चा घडत आहेत. त्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत

१) गेल्या पावसाळ्यात खरंच पाऊस कमी झाला होता का? तेव्हा अशा बातम्या वाचल्याचं / पाहिल्याचं आठवत नाही. आणि असं नसेल, तर हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे, असं म्हणाला पाहिजे. काय वाटतं?

२) या सगळ्या हृदयद्रावक बातम्या दाखवणारे/ चर्चा करणारे/ चवीचवीनी बघणारे सगळे त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल करून पाणी वाया घालवणं टाळायला लागले आहेत का? की ही सगळी जबाबदारी 'त्यांची' ( - राजकारणी, सरकारी अधिकारी, उस शेतकरी, कांग्रेस, रा स्व संघ, राष्ट्रवादी, या किंवा त्या जाती धर्माचे लोक - म्हणजे मी सोडून सगळे) आहे याची सर्वांना खात्री आहे?

३) या विषयावर अशीच गंभीर चर्चा पावसाळ्यात जेव्हा नदी नाले भरून वाहत असतात, तेव्हा करता येईल का? तेव्हा करणे योग्य आहे का?

अतुल पाटणकर, गेल्या वर्षी एकंदरित पाऊस सरासरीइतका/त्यापेक्षा जास्त झाला असला तरी काही विशिष्ट भागांत पाऊस कमी पडला होता. महाराष्ट्रातल्या काही धरणांमध्ये पुरेसे पाणी नाही ही बातमी लोकसत्ताने २०११ मध्येच (पावसाळा संपल्यावर) दिली होती.
तरीही दुष्काळ मानवनिर्मित नाहीच असेही नाही. पंजाबात पाण्याच्या अतिरेकी उपश्यामुळे भूजलपातळी खालावली असल्याचे वाचले.
आमच्या मुंबईत मात्र अजिबात पाणीटंचाई नाही. लोक वाहता पाईप घेऊन तासभर अगदी मन लावून मोटारी धूत असतात.

मुंबईत जी विजेची परिस्थिती तीच पाण्याची Sad
मुंबईत मोठमोठाले हॉटेल्स, दुकाने, शो-रूम्स्,होर्डींग्स व इतरही अनेक ठिकाणी जसा वीजेचा अपव्यय केला जातो, तीच गत पाण्याच्या वापराबाबतही आहे. मागे कुठेतरी वाचल्याचे आठवते, की रोजच्या वापरात पाण्याची बचत केल्याने केवढेतरी पाणी आपण वाचवू शकतो. नेमके आकडे आठवत नाहीत पण त्या लेखात असे दिले होते की, नळ सुरू ठेवून तोंड धुण्याऐवजी जर भांड्यात पाणी घेतले तर अमुक लीटर पाणी वाचते, शॉवरचा वापर न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ केली तर अमुक लीटर पाणी वाचते. म्हणजेच जोवर प्रत्येक व्यक्ती काम झाल्यावर नळ बंद करणे, कोणत्याही कामासाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणे,नको तिथे पाण्याचा अपव्यय करणे अशा छोट्या वाटणार्‍या परंतु परिणामकारक गोष्टी टाळत नाही, तोवर नुसते ''पाणी टंचाई'' च्या नावाने बोंबलून काय फायदा??

आमची कामवाली बाई भांडी घासताना नळ चालू ठेवायाची.

नळ बंद करायला सांगितला की म्हणायची "काय वहिनी तुमच्याकडे २४ तास पाणी असते. काय उगाच मागे लागता नळ बंद कर म्हणून. तुमचे आमच्या सारखे थोडेच आहे? आम्हाला पाण्याचा सारखाच त्रास असतो."

तिला सांगावे लागले "बाई गं इथे असे पाणी वाया जाते म्हणून तुमच्याकडे पाण्याचा problem येतो."

पावसाळा संपला तेव्हाच माहित झाले होते की काही भागांत दुष्काळ पडेल. मग ८ महिने हा कालावधी हाताशी असताना सरकार / सरकारी यंत्रणा / लोकप्रतिनिधी काय करत होते बरं?

पंजाबात पाण्याच्या अतिरेकी उपश्यामुळे भूजलपातळी खालावली असल्याचे वाचले.>>> प. महाराष्ट्रात ऊसाला पाणी दिल्याने असे होत असेल कां??

आपली तहान किती असा एक लेख लिहिल होता मी मागे.

समुद्रातील खारे पाणी गोडे करून देखील वापरता येऊ शकते. बी.ए.आर.सी. मधील एक तंत्रज्ञ अरविंद देशमुख यांनी ह्या संदर्भात एक रिपोर्ट सादर केला होता. त्यात त्यांनी अवघ्या १५ करोड रुपयात असा १ प्लांट उभा करून दररोज २० दशलक्ष्य लिटर इतके पाणी शुद्ध करता येईल ह्याकडे लक्ष्य वेधले होते. असे प्लांट उभे केले तर भविष्यातील आपली पाण्याची गरज वाढली तरी त्याचा भार इतरस्त पडणार नाही आणि त्यामुळे अनेकांचे नुकसान होण्याचे टाळू शकेल.

पाणी टंचाई ला समुद्रातील खारे पाणी शुद्द करण्याचा मार्ग आपल्या साठी योग्य नाही.

भारतासारख्या देशात जेथे शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात आहे तिथे प्रश्न आहे पाण्याचा योग्य नियोजनाचा आहे.

शहर नियोजनात आपण समुद्राचा वापर एक डंपींग यार्ड म्हणुन करतोय. मुंबईतील सर्व नाले, गटारे, समुद्राला
मिळतात. जर विमानातुन मुंबईच्या किनार्या कडे बघितल तर कळेल, किनार्या पासून जवळ जवळ तिन किम
पर्यंतचा समुद्र हा गटारा सारखा झालाय. असे पाणी आपण शूद्ध कसे करणार ?

आखाती देशात जेथे पाऊसच पडत नाही, शुद्ध पाणीच नाही तेथे समुद्रातील खारे पाणी शुद्द करण्याचा मार्ग
वापरला जातो, त्यामूळे समुद्राची चांगली काळजी घेतली जाते. सर्व गटारातील पाणी हे मलःनिस्सारण
प्रकल्पात पाठवले जाते. त्यात प्रक्रिया केलेले जल हे सार्वजनिक बागां मध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या
हिरवळीला जिवंत ठेवण्यासाठी वापरले जाते.

दुसरे कारण पाणी शुद्धीकरण प्रकल्प हे वीज निर्मीती प्रकल्पाला जोडून उभारले जातात. त्या मुळे ऊर्जेचा वापर
जास्तीत जास्त केला जातो. असाही आखाती देशात CNG मुबलक मिळत असल्याने पाणी शुद्ध करायला त्याचा
वापर करता येतो.

त्या विरूद्ध भारतात शेतकर्यांना फुकट वीज देतात ( पंपासाठी), त्या पंपाने शेतकरी किती पाणी ऊपसा
करतात यावर निर्बंध नाही. वीज फुकट असल्याने पंप किती वेळ चालवावा या बद्द्ल शेतकर्याला काही विचार
करण्याच कारण नाही. आज भारतात पाण्याच्या अतिरेकी उपश्यामुळे भूजलपातळी खालावली आहे.

पाण्याची भूजलपातळी ही हजारो वर्षांच्या नैसर्गीक प्रक्रीयेने तयार झालेली असते. आता Masoon Water Harvesting सारख्या प्रयोगाने ही भुजल पातळी परत वर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गेल्या काही वर्षां पुर्वी ऊघडकीस आलेल्या एका प्रकारात, गुजरात मधील एका रासायनीक कारखानदाराने
कारखान्यातील प्रदुषित पाणी जमिनीत पंप करत होता. त्याला पोलिसांनी अटक केली. जर कारखान दार
असे प्रदुषीत पाणी परत भूर्गभा कडे पंप करतील तर भूजलातील पाण्याची शूद्धता काय राहील ?

महाराष्ट्रातील विषेतः कोकणातील नद्या ची परीस्थीती कशी आहे हे आपण सर्व जाणताच !!

मूळ प्रश्न आहे नियोजनाचा !!

नाईक जी नियोजन महत्त्वाचे आहेच , पण desalination plants चे हि तितकेच महत्त्व आहे
खरोखर अजूनही सरकारने जागे होऊन या संदर्भात हालचाल करायलाच हवी
ती यु ट्यूब ची लिंक बघितली का कुणी? खरोखर विचार करायला लावणारे भीषण वास्तव आहे

इकडे आपण पाण्याच्या थेंबाथेंबाची बचत करतो. तिकडे नगरसेवकाच्या ४ गाड्या, पुरातलं पाणी वळवून घेतल्यासारख्या भसाभस धुतल्या जातात! अंगणातल्या फरश्या बादल्या बादल्या पाणी ओतून घासल्या जातात.

हे बघून बहीण भांडून आली. २ दिवस सगळं शांत. तिसर्‍या दिवशीपासून येरे माझ्या मागल्या..