ढिस्क्लेमर
१. सदर पाककृती हि एका बॅचलर ने केलेली आहे
२. आपण बॅचलर असल्याची हि जाहिरात नसून , नवीन बॅचलरांसाठी मार्गदर्शन दीपिका समजावी
३.हि पाक्रु टकाटक.. खतरनाक.. कातील.. जीवघेणी वेग्रे नाही.. अपेक्षाभंग होईल.. वेळीच धाग्याबाहेर पडू शकता
४.भांडी, चमचे आणि किचन उच्च नाही... त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देऊ नये
टीप : १.तोपांसू छाप प्रतिक्रिया अपेक्षित नसून " पोटाची खळगी भरण्याची सोय झाली" ,
"वा महिनाअखेरीस पैसे वाचवायची उत्तम सोय" छापाच्या प्रतिक्रिया चालतील
२.अंडे घालून हि खिचडी करता येते . त्याला अंडा खिचडी म्हणू शकता
ओक्के
आता साहित्य
१. एक मोबाईल, एक भांडकुदळ मित्र. साधा असला तरी चालतोय (आमच्या बाबतीत तो सूड होता)
२. फोडणीच साहित्य ( मोहरी, तिखट, मीठ, जीर, हिंग, हळद, काळा मसाला)
३ . एक वाटी तांदूळ, मुगाची डाळ सम प्रमाणात (हे माझ्या आकारमानानुसार , तुमच्या आकारात वरील साहित्याला गुणून.. तुम्ही तुमचा हिशोब लावू शकता )
४. चार वाट्या पाणी
५. फ्रीज मध्ये सापडतील त्या भाज्या (इथे मी बटाटा , कांदा आणि तळाशी पडलेला एक जुनाट फ्लॉवर चा तुकडा घेतला)
६ . लसूण, आलं आवडीनुसार
कृती :
हातात असलेल्या मोबाईल वरून.. त्या मित्र कम बॅचलरला फोन लावून (अर्थात सूड ) खिचडी कशी करतात ते विचारणे , त्याचे ज्ञान एका कागदावर लिहून घेणे
बाजूला साहित्याची जमवाजमव करणे
हे सर्व साहित्य
ओक्के
आधी एक अर्धा तास.. घेतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून बाजूला निथळत ठेवा
आता एका भांड्यात कच्क्कून फोडणी करा .. मोहरी जळून तुम्हाला तळतळात देत असतानाच त्यात कांदा टाकून तीच थोबाड बंद करा .. वरून फोडणीच इतर साहित्य मारा .
बाजूला एका भांड्यात ते चार वाट्या पाणी उकळवत ठेवा ..
तोपर्यंत इथे कांदा अदृश्य अवस्थेत पोचलेला असेल .. त्यात ते तांदूळ - डाळ, बटाटा टाकून छान परतवायला लागा..
इथे पाणी मजबूत उकळल कि.. ते बाजूच्या मिश्रणात ट्रान्स्फर करा.
आता छान पैकी त्यावर झाकण ठेवून .. बाहेर टीवी बघत बसा..
साधारण १० मिनिटात गरम गरम खिचडी तयार 
खिचडी वर खोबर कोथिंबीर घालू शकता, साजूक तुपाची धार मस्ट ..सोबत पापड, लोणचं.. ताक.. मेनू फक्कड होतो 
सोबत टोमाटो सूप चा बेत होता.. पण बाहेर टीवी बघताना आपण टोमाटो उकळत ठेवले आहेत हेच विसरलो .. .. पातेल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं... असो नंतर त्या २ टोमातोंच्या प्रेताची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीच .. असो..
खिचडी तरी झकास बनली.. आणि महत्वाच म्हणजे हाटेलात जायचे पैक वाचले 
मस्त केली आहे खिचडी. छान
मस्त केली आहे खिचडी. छान लिहिलय!
सॉलीड पंचेस !
सॉलीड पंचेस !
पहिला फोटो बघून डाळ तांदूळ सम
पहिला फोटो बघून डाळ तांदूळ सम प्रमाणात असं वाटत नाही ..
छान
छान
भारीच जमलंय खिचडी आणि लिखाण.
हा हा बापरे.. काय भयानक लिहील
हा हा
बापरे.. काय भयानक लिहील आहे =))
श्री ला प्रचंड अनुमोदन
सगळे पंचेस मस्त जमले आहेत..
आणि खिचडीचे फोटो हि तुफान
खिचडी, लिखाण आणि प्रतिक्रिया
खिचडी, लिखाण आणि प्रतिक्रिया .... सगळंच चमचमीत आहे.
मस्त. मला पण स्वैपाक असाच
मस्त. मला पण स्वैपाक असाच झटक्यात उरकून बाकी महत्त्वाच्या गोष्टींना जास्त वेळ द्यावा असे वाट्टे. आम्हाला वैनी कधी येणार?
डब्बल पोस्ट
डब्बल पोस्ट
लय भारी रे! येक्दम
लय भारी रे!
येक्दम नॉस्टेल्जिक...
माऽयला.. म्हाराजांच्या काळाऽत आमीबी असली खिचडी बनवायचो. मला माझ्या बॅचलरपणातल्या आमच्या खिचडीची आठवण झाली
आम्ही त्याला शाही खिचडी म्हणायचो. दुसरी म्हणजे शाही अंडा भुर्जी. ती शाही ब्रेड सोबत खायची.
फक्त दोन गोष्टी दिव्यासोबत....
१. दुसरा फोटो टाकायला नको होतास. कारण त्यात पोचे दिसतात..
२. सहावा फोटोही स्कीप करायला हवा होतास. कारण त्यात स्वच्छता दिसत नाही.
सांगायचं कारण हेच की ते केलं असतंस तर इथल्या दुष्ट लोकांकडून स्वच्छतेवरून वगैर ऐकावे लागले नसते.. त्यांना काय कल्पना बॅचलर लोकांना किती कामे असतात...
रच्याकः ही मालिका आहे का? सत्याचे प्रयोग भाग एक दोन तीन? असे कराच भॉ!
@चांगभल , मामी.. आणि अश्विनी
@चांगभल , मामी.. आणि अश्विनी मामी
धन्यु
@ऋयाम
तेच म्हणतोय मी .. संसारी लोकांना काय कळणार.. आपल्याला किती इतर महत्वाची काम असतात ते

स्वच्छता भांडी सर्व दुय्यम गोष्टी आहेत रे
वॉव.. छान रेसिपी.. मृ..
वॉव.. छान रेसिपी..
मृ..
प्रसन्न - ऋयाम चा सल्ला मनावर
प्रसन्न - ऋयाम चा सल्ला मनावर घेऊ नकोस.... येथे फोटो टाकण्यापुर्वी, फोटोशॉप मधे फुलावर स्वच्छ करुन घे आणि असलेले पोचे बुजवुन टाक... खिचडी करण्यापेक्षा सोपे आहे
हो, तेही चालेल! पोचे बुजवा!
हो, तेही चालेल! पोचे बुजवा!
हो उदय.. खरच ते जास्त सोप्पय
हो उदय.. खरच ते जास्त सोप्पय
@ मृण्मयी >>>>खिचडीच्या
@ मृण्मयी
>>>>खिचडीच्या भांड्याचं नॉनस्टिक कोटिंग गेलंय निघून! आता नवं घ्या!>>>
वरच्या नोंद वाचल्या नाहीत का
भांडी चमचे याकडे लक्ष देऊ नये
असो...
त्या भांड्या बाबत आम्ही भलतेच नोस्तयालेजिक का काय ते होतो.... कारण आमचे सर्व भयाण प्रयोग करायला आमच्या मातोश्री ते एकंच भांड आम्हाला उधार देतात
मस्त लिहल आहे..जिर्याचा फोटो
मस्त लिहल आहे..जिर्याचा फोटो आवडला
त्या भांड्या बाबत आम्ही भलतेच
त्या भांड्या बाबत आम्ही भलतेच नोस्तयालेजिक का काय ते होतो.... कारण आमचे सर्व भयाण प्रयोग करायला आमच्या मातोश्री ते एकंच भांड आम्हाला उधार देतात
>>>> तसं असेल तर त्या भांड्याची चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.
बरं एक शंका. फोटोकरता म्हणून खिचडी वेगळ्या (आणि स्वच्छ) बोलमध्ये काढण्यात आली आहे असा विचार मनात प्रबळ होत आहे. एरव्ही त्या भांड्यालाच बोल / प्लेटची भुमिका बजावायला लागत असेल असं का कोण जाणे, पण वाटतंय.
प्रसन्न फुलावर फोटोशॉप मधे
प्रसन्न फुलावर फोटोशॉप मधे स्वच्छ करता येत असतील तर बघ आता...>>>>>:फिदी:
@मामी >>>>>>>>>>>>बरं एक
@मामी
>>>>>>>>>>>>बरं एक शंका. फोटोकरता म्हणून खिचडी वेगळ्या (आणि स्वच्छ) बोलमध्ये काढण्यात आली आहे असा विचार मनात प्रबळ होत आहे. एरव्ही त्या भांड्यालाच बोल / प्लेटची भुमिका बजावायला लागत असेल असं का कोण जाणे, पण वाटतंय>>>>>>>
=))
=))
=))
खिक्क
बाप्परे... अस्सल पुणेरी कुरकुरीत शेलकी कमेंट
तू सांगितलेली शक्यता नाकारता येत नाहीये ग
मामी, >> तसं असेल तर त्या
मामी,
>> तसं असेल तर त्या भांड्याची चिकाटी वाखाणण्यासारखी आहे
तुम्हाला चिकटपणा म्हणायचं होतं का?

आ.न.,
-गा.पै.
हा प्रतिसाद बरिक फारच नम्र
हा प्रतिसाद बरिक फारच नम्र आहे होऽ आ.न. गा. पैलवान दादा
प्रसन्न, तू घरी फ्रोझन मटारची
प्रसन्न, तू घरी फ्रोझन मटारची एक पिशवी ठेवत जा फ्रीजात. ते व गाजर बीन्स पण लै भारी लागते.
तूपजिरे फोडणी व नुसते तांदूळ असल्यास व्हेज पुलाव होतो असे समजायचे.
तुमची खिचडी आवडलीच; पण
तुमची खिचडी आवडलीच; पण लिखाण... ते जास्त आवडले! दोन्ही खमंग!!
त्या टोंमॅटोचे के काय केलेत
त्या टोंमॅटोचे के काय केलेत ते तर फारच आवडले..
कोटिंग निघालेले भांडे खरच वापरु नये..
>>>भांडी चमचे याकडे लक्ष देऊ
>>>भांडी चमचे याकडे लक्ष देऊ नये
लक्ष देऊ नये म्हंटलं की आवर्जून द्यावं!
(मागच्या भिंती बघता 'हेल्थ अँड सेफ्टी इन्स्पेक्शन्'मधे नापास! :P) (ऋयामाच्या पोस्टीमुळे लक्ष गेलं! :P)
तोंडाला पाणि सुटलं खिचडी
तोंडाला पाणि सुटलं खिचडी पाहून.
मस्त! पहिला नि शेवटुन तिसरा
मस्त! पहिला नि शेवटुन तिसरा फोटो क्लास! तोंपासुच!
बाकी इथल्या कमेंट्स वाचुन हहपुवा..
आहा.. तोपांसू प्रतिक्रिया
आहा.. तोपांसू प्रतिक्रिया मिळाली तर
फ्लॉवर नक्की किती जुना आहे??
फ्लॉवर नक्की किती जुना आहे?? असा काळपट झालेला भाग खाउ नये असं म्हणतात. पण बॅचलर खिचडीत काहीही चालतं या नियमाप्रमाणे चलेंगा!! भारी आहे पाककृती.
लग्नानंतर काही वर्षे आम्ही दोघेही स्टुडंट होतो तेव्हा बॅचलर लाईफच होतं ते - फार कष्टाचं पण प्रचंड आनंदी!!! आणि अशा अनेक प्रयोगांनी समृध्द!!
Pages