खिमा लॉकेट्स

Submitted by pradyumnasantu on 4 May, 2012 - 16:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खिमा दीड वाटी, कच्चा कांदा बारीक किसलेला दोन वाट्या, मोठे मोठे सहा टोमॅटो बारेक चिरून, आलं, लसूण, कोथिंबीर एकत्र वाटून दोन्-तीन टीस्पून, लाल तिखट, गरम मसाला, आवडीचा तयार मसाला एकेक सपाट चमचा, अर्धा चमचा हळद, दोन चमचे साखर,चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

दोन वाट्या किसलेला कच्चा कांदा, दोन वाट्या खिमा, अर्धा चमचा हळद, आवडीनुसार मीठ, अर्धा-अर्धा चमचा वाटलेले आले, लसूण, कोथिंबीर; एक चमचा लाल तिखट व एक चमचा कुठलाही असेल तो मसाला(ऐच्छिक), हे सर्व नीट कालवून बाजूला ठेवा्वे.
एका भांड्यात कांद्यावर फोडणी करून त्यात फ्लेवरसाठी गरम मसाला किंवा आवडीचा कुठलाही मसाला फक्त अर्धा चमचा घालावा. त्यावर सहा वाट्या बारीक चिरलेले टोमॆटो टाकावेत. चार पाच मिनिटे शिजू द्यावे. वरून वेलच्या, दोन चमचे साखर, मीठ, हवे असल्यास अर्धा चमचा लाल तिखट घालावे. हलवत रहावे. हे मिश्रण उकळत असताना....
बाजूला ठेवलेल्या खिम्याचे छोटे गोळे करून तळहातावर निथळून, चेपून लॊकेट (खरेतर पेन्डंट) प्रमाणे चप्पट करावेत व पत्त्यांतील बदामाचा आकार देऊन उकळत्या टोमॆटो रसात पटापट सोडावेत. झाकण देऊन अर्धा तास शिजू द्यावे. गरज लागल्यास थोडे थोडे पाणी व आणखी टोमॆटो घालून रस वाढवावा.
खिमा (कोवळा-जून जसा असेल तसा) शिजल्यावर खायला घ्यावा. चपाती अथवा ब्रेडबरोबर ही लॊकेट्स चविष्ट लागतात.

वाढणी/प्रमाण: 
चार जण अंदाजे
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users