मी गेली ४.५ वर्ष "Manual Software Testing" मधे काम करते. (PLM). बाळ झाल्यावर मी नोकरी सोड्ली आहे.
आता पुन्हा नोकरी करायची आहे. वर लिहिल्याप्रमाणे या बदलासाठी खालील मुद्द्यांचा विचार मी केला आहे.
१. IT मधील नोकरीचा आता कंटाळा आहे. (कामाच्या वेळा, येणारा ताण या गोष्टी लक्षात घेता)
२. तुलनेने अड्मिन मधे काम कमी असेल. उदा: कमी वेळ, डेडलाईनची फारशी चिंता नसावी असा अंदाज, ऑफिसमधून वेळेत घरी जाता येइल.
टीपः इथे या क्षेत्रातील लोकांना कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा उद्देश नाही. मला माहिती हवी आहे.
३. पगार थोडा कमी मिळेल, पण घराकडे लक्ष देता येईल.
४. तसंच माझ्या घरातल्या लोकांच्या मते ८-१० तास काम करायचेच आहे तर टेस्टिंगच का नाही. पैसे पण चांगले मिळ्तील.
वरील मुद्दे चुकीचे देखील असू शकतात. अॅडमिन मधे काम करणारे जाणकार काही प्रकाश टाकू शकतील का?
मला मार्गदर्शन हवे आहे.
धनश्री, ह्या विकेंडला
धनश्री,
ह्या विकेंडला कॅपजेमिनीत वॉक इन आहे... ईटीएल टेस्टींग साठीची.. डेटाबेस टेस्टींग, एस्क्यूएल किंवा इन्फोमेटीकाचे बॅकग्राऊंड असेल तर घेतील.
कुठच्याही आयटी क्षेत्रातल्या खात्यात तेवढेच प्रेशर असते.. प्रेशर शिवाय ४०००० - ६०००० पगार कोणी देईल का?
आजकाल "नोकरी" कुठेच नाही.. असले तर करीअरच आहे.. म्हणजे आठ तास काम करून घरी जाईन अशी सोय हल्ली शाळांमध्ये शिक्षकांना किंवा क्लेरीकलमधल्या लोकांना देखिल नाही. रिसेप्शनिस्टला देखिल मल्टी टास्किंग, (बिनपगारी) ओव्हर टाईम करावे लागते, पीएकडे पीएमओचे स्किल्स हवे असतात हे कृपया नोटावे.
नक्की ठरवा की घराबाहेर का पडायचे आहे.. नाही तर घर, मूल, करीअर यात क्लॅश ऑफ टायटन्स होते.
घर, मूल, करीअर यात क्लॅश ऑफ
घर, मूल, करीअर यात क्लॅश ऑफ टायटन्स >>+१
पण प्रयत्न करणे सोडू नका. वी
पण प्रयत्न करणे सोडू नका. वी ऑल डिझर्व अ बेटर टुमारो. प्रयत्नांना हार्दिक शुभेच्छा.
मी एका काळी ४२ मुलाखती दिल्यात नोकरीसाठी. ब्रेक मिळविला. तो ही आमच्या काळात पगार किती कमी म्हणून सार्वत्रिक शिव्या खाल्ल्या. तुमची आंतरिक तगमग कोणालाही समजणार नाही. पण आपण शोध सोडायचा नाही.
पण शेवटी घर मूल करीअर हे तिन्ही आपल्या सोबत राहात नाही. घर आपल्या विना मस्त चालते. कोणी तरी
बिले भरली म्हणजे झाले, मूल मोठे होउन आपल्या मार्गानेच जाणार. करिअर मध्ये कंपनी सर्व जीवन रस
काही एक पैश्याच्या मोबदल्यात घेणार. व बाजूला फेकून नव्या दमाचे लोक्स घेणार हे जरी सत्य असले तरी ह्या
सर्व गोष्टी आपले जीवन एन्रिच करतात. व आपण आपल्या सुखा - आनंदा साठी, आंतरिक समाधानासाठीच हे सर्व करतो हे मनाशी असू द्यावे. त्रास होतोच. तो सहन करतच पुढे जायचे. जेव्हा धीर सुटतो तेव्हाच त्याची सर्वात जास्त गरज असते.
अमा चांगली पोस्ट
अमा चांगली पोस्ट
अमा _/\_ मानगये, माझिया मनिचे
अमा _/\_ मानगये, माझिया मनिचे शब्द तु चपखल मांडियले.
१.तुम्हाला टेस्टींग च्या
१.तुम्हाला टेस्टींग च्या कामाचा कंटाळा आला आहे का जी दगदग होते त्याचा कंटाळा आला आहे?
२. तुम्हाला अॅडमिन च्या कामाचा अनुभव आहे का? कुठल्या बेसिस वर तुम्हाला अॅडमिनचे काम मिळु शकेल? आणि ते तुमचे कोअर स्किल नसेल तर तुम्हाला ज्युनियर लेवलवर काम करावे लागेल. (पगारही बराच कमी असेल बहुतेक).
माझ्या पत्नीचाही ६ वर्षे QA चा अनुभव होता त्यानंतर मधे ९ वर्षांची गॅप झाली. तिने आम्ही परत आल्यावर पुण्यात एका institute मधे एक रेफ्रेशर कोर्स केला आणि तिला आता परत त्याच फिल्ड मधे नोकरी मिळाली आहे. ती institute placement help देते.
तुमचा स्किल सेट चांगला असेल तर तुम्ही एखाद्या Medium scale कंपनीत पार्ट टाईम किंवा रीमोट लॉगिन ने काम करु शकाल अशी नोकरी मिळु शकेल. जर तुम्ही सरळ तिथल्या एच आर मधे जाउन बोललात आणि काय परिस्थिती आहे ती सांगितलीत तर ते कन्सिडर करु शकतात.
कृपया शक्यतो तुमचे कोअर फिल्ड सोडु नका. अश्विनीमामी यानी फार चांगले लिहिले आहे.
अश्विनीमामी खूप सुंदर पोस्ट .
अश्विनीमामी खूप सुंदर पोस्ट .
मस्त अमा
मस्त अमा
जाजु+१
जाजु+१
अश्विनीमामी खुपच छान लिहिले
अश्विनीमामी खुपच छान लिहिले आहे.
करिअर मध्ये कंपनी सर्व जीवन रस
काही एक पैश्याच्या मोबदल्यात घेणार. व बाजूला फेकून नव्या दमाचे लोक्स घेणार हे जरी सत्य असले तरी ह्या
सर्व गोष्टी आपले जीवन एन्रिच करतात. व आपण आपल्या सुखा - आनंदा साठी, आंतरिक समाधानासाठीच हे सर्व करतो हे मनाशी असू द्यावे. त्रास होतोच. तो सहन करतच पुढे जायचे. जेव्हा धीर सुटतो तेव्हाच त्याची सर्वात जास्त गरज असते.
अगदी अगदी!
जाईजुई - अगदी बरोबर अमी -
जाईजुई - अगदी बरोबर
अमी - अगदी चपखल पणे विचार मांडले आहेत तुम्ही. तुमचं म्हणणं अगदी १००% पटलं. धीर दिल्याबद्द्ल खूप धन्यवाद.
manasmi18 - मला जी दगदग होते त्याचा कंटाळा आला आहे (मुख्य म्हणजे येणेजाणे). पण जाईजुई म्हणते तसं त्याला पर्याय नाही.
सगळयांना खूप खूप धन्यवाद.
Pages