महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!!!!!
महाराष्ट्राची माती गाते, मंगलमय गाणी
इथे जन्मले ज्ञानेश्वर, अन् देहुचा वाणी
मराठमोळी भोळी इथल्या भक्तीची पेठ
ब्रह्म इथे अवघडले येता पायाशी वीट
हरिनामने पावन अवघ्या संतांची वाणी
मेणाहुन मउ मोकळ्या हृदयाची ओल
मन वृंदावन होते येता तुळशीला फूल
फुलापरी कनवाळू इथल्या काट्याची धरणी
जन्म येथला मरण येथले, सामर्थ्याच्या टिळा
डोळ्यामधुनी सुर्य गोंदला, विठु परी सावळा
सोन्याहुन किमती इथल्या शब्द्वांच्या खाणी
महाराष्ट्राची माती गाते मंगलमय गाणी
"नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी" अशी महती कवी यशवंतनी महाराष्ट्राची केली आहे. अगदी भारताची छबी वाट्णारा माझा महाराष्ट्र. १०५ हुतात्म्यांचे बलिदान यामुळेच संयुक्त महाराष्ट्र आकाराला येऊ शकला. "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाल" असे अभिमानास्पद उद्गार सेनापती बापट यांनी काढले होते. महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. "अमृतातही पैजा जिकंणारी" माझी मराठी. "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी" जननी आणि जन्मभूमी हि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. याच मातीत जन्माला आलो त्याचा सार्थ अभिमान वाटतो.
वैविध्यतेने नटलेल्या माझ्या महाराष्ट्रात एकिकडे सह्याद्रीचे उत्तुंग शिखरं आहे तर दुसरीकडे मनाला मोहविणारे समुद्रकिनारे, इथे प्राचीन कोरीव लेणी आहेत आणि विविधतेने नटलेली वन्यसंपदाही. श्री छ्त्रपती शिवाजीमहाराजांच्या या महाराष्ट्रात जवळपास ३५० गडकिल्ले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने जे हवं ते असलेला असा हा महाराष्ट्र माझा. चला तर आज "महाराष्ट्र दिनाच्या" निमित्ताने माझ्या नजरेतुन पाहुया हि "महाराष्ट्राची लोकधारा"
=======================================================================
=======================================================================
गावातील एक रम्य पहाट. कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते. जागेसरशी कानावर येतात ते जात्यावर दळण दळणार्या माउलीच्या ओवीचे स्वर "कोंबडा घाली साद, जग समदं गं झालं जाग,समदं गं झालं जाग, जग समदं गं झालं जाग........". घरच्या माऊलीची दिवसाची सुरूवात सकाळी सकाळी सडा-शिंपण करून, अंगण सारवुन, दारात रांगोळी घालुन होते. तुळशीवृंदावनात दिवा लावताना माऊली गुणगुणते..."तुळस वंदावी वंदावी, संतांची सावली तुळस वंदावी.....". आईची ती कामाची गडबड पाहुन लेकरही गुणगुणतात "अंगणात सडा, सड्यावर रांगोळी, रांगोळीवरती रंग, आमची माऊली कामात दंग, आमची माऊली कामात दंग". काहि वेळाने "दान पावलं...दादा दान पावलं" म्हणत गाव जागवित येतो वासुदेव आणि म्हणतो, "उजुन आलं आभाळ रामाच्या पारी, अन् गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी" घरातुन माऊली येते आणि पसाभर धान्यचं दान वासुदेवाला देते. एव्हाना सारं गावचं जागं झालयं. सकाळची न्याहरी झाल्यावर बळीराजा आपल्या जिवा-शिवाच्या बैलजोडीला घेऊन शेतावर जायला निघतो. पेरणीचे ते दिवस, कामाची लगबग. बळीराजाही आपल्याच मस्तीत गाण गुणगुणतोय, "गेला वळीव निघुन, आला मिरग फिरून, तुर्या चालल्या रानात सुरू झालीया पेरण". दुपारी घरधनीला भाकरतुकडा घेऊन घरमालकिण शेतावर निघालीय. तिला बघुन राम्या म्हणतोय, "दिस आलाय माथ्यावर, बघ दुपार झाली भर, तिची अस्तुरी सुंदर आली घेऊन भाकर, पाय भाजत्याती चरचर अन् कशी चालतेया भरभर".
तिथं गावात पारू आणि शंकर यांच्या लग्नाची गड्बड सुरू आहे. एकिकडे मायेची माणसं, बालपणीच्या मैत्रीणी दुरावणार तर दुसरीकडे नवीन आयुष्याचे स्वप्न असे एका डोळ्यात आसु आणि दुसर्या डोळ्यात हासु घेऊन पारु म्हणतेय "उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा". नवर्याची वरात वेशीपाशी आली आणि सगळ्यांचीच धांदल उडाली. नवर्याची वरात वेशीवर अडवून करवल्या नवरदेवाची थट्टा करत विचारतात, "नवरा आला वेशीपाशी, नवर्या नवरी कशी नेशी" त्याला उत्तर म्हणुन "देईन येसकर्याचा मान, नवरी जिंकुन नेईन, जिंकुन नेईन" असं उत्तर देऊन नवरदेव नवरी घेऊन जातो. रात्री लग्नाच्या जागरण गोंधळाची तयारी सुरू होते. गोंधळीने आई तुळजाभवानी आणि खंडोबाची पूजा मांडलीय. गोंधळी सर्व देवांना गोंधळाला येण्याचं आव्हान करत आहेत, "मोरेश्वर गना...गोंधळा यावे, वाईच्या गणपती...गोंधळा यावे, कोल्हापूरच्या लक्ष्मी, पुण्याची पर्वती, सातारची मंगळाई....गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे, कृष्णा कोयनामाय, तुळजापुरची भवानी, पसरणीच्या भैरीदेवा, नाशिकच्या काळारामा, फलटणच्या रामा तुम्ही गोंधळा यावे, म्हसवड सिद्धा, रत्नागिरी जोतिबा, कवठ्याची यमाबाई, जुन्नरची शिवाबाई, सातिसमिंदरा, नवलाख तारांगणा अन् राहिल्या साहिल्या भक्तांच्या गणा, तेहतीस कोटी देवा गोंधळा यावे...." अंबाबाईच्या नावाने गोंधुळ मांडला न देवा गोंधळाला यावे. आम्ही गोंधळी हो आंबेचे गोंधळी....उदे...उदे...उदे!! "येळकोट येळकोट जय मल्हार" "अंबाबाईच्या नावाने उदे उदे" च्या जयघोषात जागरण गोंधळ चालु असतो.
एकिकडे लग्नाची घाई तर दुसरीकडे शिर्प्याला दुसर्या गावच्या जत्रंला जायची घाई. "कांदा न भाकरी खाऊ द्या कि रं मला बी जत्रंला येऊ द्या कि रं" म्हणत तो जाण्यार्याला विनवतोय. एकदाचा शिर्प्या जत्रंत पोहचतो आणि थेट जातो तो जेजुरकराच्या तमाशाच्या फडात. सुरुवातीला गण, गौळण, बतावणी झाल्यावर थाप पडते ती ढोलकीवर आणि गाणं ऐकु येतं आणि खेळ रंगतो तो लावणीचा....."अशी गाडी आणावी बुरख्याची, बुरख्याची दोन चाकी".
इकडे गावात बळीराजा दिवसभर काम करून थकुन संध्याकाळी आपल्या लाडक्या जिवाशिवाच्या बैलजोडीला घेऊन घरी परततो. घडीभर विसावा घेऊन जातो ते लाडक्या विठुरायच्या भेटीला गावच्या देवळात. रात्र रंगते टाळ, चिपळ्या आणि तंबोर्याच्या तालात आणि कानावर येतं "विठु माऊली तु माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठ्लाची...". अभंगाच्या सुरात रंगुन बळीराजा घरी परततो. अर्धागिनीच्या हातातली चटणीभाकर खाऊन सुखाने झोपतो.
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
=======================================================================
लोकसंगीतातला — महाराष्ट्र माझा
=======================================================================
जेजुरीच्या खंडेराया जागराला या
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
=======================================================================
सणांचा/उत्सवाचा राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
=======================================================================
गडकोटांचा राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================
भगवा झेंडा घेतला हाती, मावळे आम्ही शिवबाचे
ध्यास घेतला गडकोटांचा, वेड आम्हाला इतिहासाचे
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
=======================================================================
पर्यटन क्षेत्रातील राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================
राजधानी मुंबई
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
तिर्थक्षेत्र
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
धबधबे
सह्याद्रीच्या कडेकपारी खेळे, शुभ्र जलांचे निर्झर
माझ्या मातीचा गुण ऐसा, फोडी दगडालाही पाझर
प्रचि २८
प्रचि २९
समुद्रकिनारे
प्रचि ३०
प्रचि ३१
लेणी
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
=======================================================================
सुजलाम सुफलाम महाराष्ट्र माझा
=======================================================================
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
=======================================================================
निसर्ग सौंदर्य महाराष्ट्राचे
=======================================================================
प्रचि ३९
प्रचि ४०
तटी: अशा या "महा"राष्ट्राची व्याप्ती खुप मोठी आहे जी या एका भागात मांडता येणार नाही. सदर मालिकेत मी जास्तीत जास्त महाराष्ट्राचे प्रचि दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. जास्त प्रचि असल्याने आणि यातील बरेचसे माझ्या इतर भागात प्रदर्शित झाल्याने कोलाज स्वरूपात प्रदर्शित करत आहे. आशा आहे हा प्रयत्नही तुम्हाला नक्कीच आवडेल. 
==============================================================================================================================================
_______________/\____________
_______________/\__________________
अप्रतिम मित्रा... अतिशय
अप्रतिम मित्रा...
अतिशय सुंदर....
जितके सुंदर लिखाण तेव्हडेच सुंदर प्रचि...
खूप सुन्दर!!
खूप सुन्दर!!
जिप्स्या एका से एक सुंदर थिम
जिप्स्या एका से एक सुंदर थिम ही तुझी खासियत आहे
पण हे माझ्या मातीचे गायन... हा त्याचा कळसच आहे.
हया प्रचिंसाठी तु जी मेहनत घेतली आहेस त्या साठी तुला सलाम............
सुंदर, सुंदर, अप्रतिम फोटो..
सुंदर, सुंदर, अप्रतिम फोटो.. थिम एकदम लाजवाब!!!
-----^-----
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र हा.. !!
मित्रा ! तुझ्या बुद्धीची आणि
मित्रा ! तुझ्या बुद्धीची आणि मांडणीची झेप अफाट आहे ! सलाम !
जिप्स्या, ते बैलगाड्यांच्या
जिप्स्या, ते बैलगाड्यांच्या शर्यतीचे फोटो कुठले आहेत रे?
)
त्या प्रचिंनी गावकडच्या आठवणी जाग्या केल्या रे...
(मगाशी विचारायचं राहिलं...
मस्त थीम आणि फोटो
मस्त थीम आणि फोटो
सारेच अप्रतिम आहे.
सारेच अप्रतिम आहे.
मस्तच!! शब्दच सुचत नाहियेत
मस्तच!! शब्दच सुचत नाहियेत व्यक्त करायला!
माझ्या मराठी मातीचा लावा
माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दर्याखोर्यातील शिळा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
ते बैलगाड्यांच्या शर्यतीचे फोटो कुठले आहेत रे?>>>>मंचरजवळील एका गावातले आहेत हे फोटो.
सुंदर! मस्त! अप्रतीम!
सुंदर! मस्त! अप्रतीम! जबरदस्त!
अख्खा महाराष्ट्र डोळ्यांसमोर उभा केलास. सगळ्या काव्यपंक्ती पण सुरेखच!
ते बैलगाड्यांच्या शर्यतीचे
ते बैलगाड्यांच्या शर्यतीचे फोटो कुठले आहेत रे?>>>>मंचरजवळील एका गावातले आहेत हे फोटो. >>> पुढच्या महाराष्ट्रदिनासाठी महालक्ष्मी रेसकोर्स वरच्या घोड्यांच्या रेसचा फोटो टाकावा लागेल बहूतेक तुम्हाला. सरकारने बैलगाड्यांच्या शर्यतींवर कायद्याने बंदी आणली आहे.
शर्यती चालत नाहीत आता रेस चालतात.
माफ करा थोडा विषाद वाटला म्हणून विषयांतर झालं. प्रचि खूप आवडले म्हणून पुन्हा बघायला आलो होतो.
पुढच्या महाराष्ट्रदिनासाठी
पुढच्या महाराष्ट्रदिनासाठी महालक्ष्मी रेसकोर्स वरच्या घोड्यांच्या रेसचा फोटो टाकावा लागेल बहूतेक तुम्हाला>>>>>:फिदी:
वा मस्तच! महाराष्ट्र दिना
वा मस्तच! महाराष्ट्र दिना निमीत्य आखलेली ही कल्पना,फोटो,लेख सर्वच छान झालेत.
जीप्सी धन्यवाद
योगेश.... तुमचा हा विशेष (आणि
योगेश....
तुमचा हा विशेष (आणि अगदी दृष्ट काढण्यायोग्य असा...) लेख माझ्या नजरेतून हुकला खरा, पण ते अगदी सहजी घडले. त्याला कारण म्हणजे मी अगदी १ मे पासूनच अगदी कालपर्यंत जालापासून दूर होतो. ज्यावेळी इथे आलो त्यावेळी हा धागा मागे गेला होता. पण आता तो पाहिल्यावर किती मोलाचे हुकले होते याची तीव्र जाणीव झाली.
लेखाच्या तयारीसाठी तुम्ही आत्मियतेने प्रदीर्घ असा वेळ खर्च केला असणार त्याचा विचार करता निव्वळ एक वाचक या नात्याने माझे मन थक्क होऊन गेले. "जिप्सी तुमचे अभिनंदन !" एवढ्या तीटासारख्या प्रतिसादाने माझे मन तरी कदापिही भरणार नाही, इतके प्रभावी हे विशेषदिन सादरीकरण झाले आहे.
ही केवळ प्रकाशचित्रे नसून एका समृद्ध आणि संपन्न राज्याच्या थोर परंपरेचा इतिहास दाखविणारा पट असून प्रत्येक प्रचि टक लावून पाहात बसावे इतके प्रसन्न आहे. विशेषत: "सणांचा उत्सवाचा राजा माझा महाराष्ट्र......" त्या गटात आपले लक्ष आकर्षून घेणारी ती आख्ख्या महाराष्ट्राची संस्कृती असलेली लाडकी तांबडीपिवळी एस.टी. आणि नांगरट झालेल्या शेतात पहुडलेला तो शेतकरी....व्वा. खरा महाराष्ट्र आय.टी.पार्कात नसून तो अशा आडवळणाच्या मातीत रमला आहे हे फार प्रकर्षाने जाणवले.
या विषयावर कितीही लिहिले तरी 'अजून लिहिले असते तर....' ही हुरहूर मनी राहणारच
पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन तुमचे जिप्सी.
अशोक पाटील
छान
छान
धन्य धन्य योगेश.....
धन्य धन्य योगेश.....
मस्त फोटो लेख सुद्धा मस्तच.
मस्त फोटो
लेख सुद्धा मस्तच.
मी मिसलं होतं हे .. खूप खूप
मी मिसलं होतं हे ..

खूप खूप सुंदर.. जेवढे सुंदर फोटो तेव्हढच सुंदर लिखाण
दिल्लीचे हे तख्त राखीतो,
दिल्लीचे हे तख्त राखीतो, महाराष्ट्र माझा !!
Pages