महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!!!!!
महाराष्ट्राची माती गाते, मंगलमय गाणी
इथे जन्मले ज्ञानेश्वर, अन् देहुचा वाणी
मराठमोळी भोळी इथल्या भक्तीची पेठ
ब्रह्म इथे अवघडले येता पायाशी वीट
हरिनामने पावन अवघ्या संतांची वाणी
मेणाहुन मउ मोकळ्या हृदयाची ओल
मन वृंदावन होते येता तुळशीला फूल
फुलापरी कनवाळू इथल्या काट्याची धरणी
जन्म येथला मरण येथले, सामर्थ्याच्या टिळा
डोळ्यामधुनी सुर्य गोंदला, विठु परी सावळा
सोन्याहुन किमती इथल्या शब्द्वांच्या खाणी
महाराष्ट्राची माती गाते मंगलमय गाणी
"नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी" अशी महती कवी यशवंतनी महाराष्ट्राची केली आहे. अगदी भारताची छबी वाट्णारा माझा महाराष्ट्र. १०५ हुतात्म्यांचे बलिदान यामुळेच संयुक्त महाराष्ट्र आकाराला येऊ शकला. "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाल" असे अभिमानास्पद उद्गार सेनापती बापट यांनी काढले होते. महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. "अमृतातही पैजा जिकंणारी" माझी मराठी. "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी" जननी आणि जन्मभूमी हि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. याच मातीत जन्माला आलो त्याचा सार्थ अभिमान वाटतो.
वैविध्यतेने नटलेल्या माझ्या महाराष्ट्रात एकिकडे सह्याद्रीचे उत्तुंग शिखरं आहे तर दुसरीकडे मनाला मोहविणारे समुद्रकिनारे, इथे प्राचीन कोरीव लेणी आहेत आणि विविधतेने नटलेली वन्यसंपदाही. श्री छ्त्रपती शिवाजीमहाराजांच्या या महाराष्ट्रात जवळपास ३५० गडकिल्ले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने जे हवं ते असलेला असा हा महाराष्ट्र माझा. चला तर आज "महाराष्ट्र दिनाच्या" निमित्ताने माझ्या नजरेतुन पाहुया हि "महाराष्ट्राची लोकधारा"
=======================================================================
=======================================================================
गावातील एक रम्य पहाट. कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते. जागेसरशी कानावर येतात ते जात्यावर दळण दळणार्या माउलीच्या ओवीचे स्वर "कोंबडा घाली साद, जग समदं गं झालं जाग,समदं गं झालं जाग, जग समदं गं झालं जाग........". घरच्या माऊलीची दिवसाची सुरूवात सकाळी सकाळी सडा-शिंपण करून, अंगण सारवुन, दारात रांगोळी घालुन होते. तुळशीवृंदावनात दिवा लावताना माऊली गुणगुणते..."तुळस वंदावी वंदावी, संतांची सावली तुळस वंदावी.....". आईची ती कामाची गडबड पाहुन लेकरही गुणगुणतात "अंगणात सडा, सड्यावर रांगोळी, रांगोळीवरती रंग, आमची माऊली कामात दंग, आमची माऊली कामात दंग". काहि वेळाने "दान पावलं...दादा दान पावलं" म्हणत गाव जागवित येतो वासुदेव आणि म्हणतो, "उजुन आलं आभाळ रामाच्या पारी, अन् गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी" घरातुन माऊली येते आणि पसाभर धान्यचं दान वासुदेवाला देते. एव्हाना सारं गावचं जागं झालयं. सकाळची न्याहरी झाल्यावर बळीराजा आपल्या जिवा-शिवाच्या बैलजोडीला घेऊन शेतावर जायला निघतो. पेरणीचे ते दिवस, कामाची लगबग. बळीराजाही आपल्याच मस्तीत गाण गुणगुणतोय, "गेला वळीव निघुन, आला मिरग फिरून, तुर्या चालल्या रानात सुरू झालीया पेरण". दुपारी घरधनीला भाकरतुकडा घेऊन घरमालकिण शेतावर निघालीय. तिला बघुन राम्या म्हणतोय, "दिस आलाय माथ्यावर, बघ दुपार झाली भर, तिची अस्तुरी सुंदर आली घेऊन भाकर, पाय भाजत्याती चरचर अन् कशी चालतेया भरभर".
तिथं गावात पारू आणि शंकर यांच्या लग्नाची गड्बड सुरू आहे. एकिकडे मायेची माणसं, बालपणीच्या मैत्रीणी दुरावणार तर दुसरीकडे नवीन आयुष्याचे स्वप्न असे एका डोळ्यात आसु आणि दुसर्या डोळ्यात हासु घेऊन पारु म्हणतेय "उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा". नवर्याची वरात वेशीपाशी आली आणि सगळ्यांचीच धांदल उडाली. नवर्याची वरात वेशीवर अडवून करवल्या नवरदेवाची थट्टा करत विचारतात, "नवरा आला वेशीपाशी, नवर्या नवरी कशी नेशी" त्याला उत्तर म्हणुन "देईन येसकर्याचा मान, नवरी जिंकुन नेईन, जिंकुन नेईन" असं उत्तर देऊन नवरदेव नवरी घेऊन जातो. रात्री लग्नाच्या जागरण गोंधळाची तयारी सुरू होते. गोंधळीने आई तुळजाभवानी आणि खंडोबाची पूजा मांडलीय. गोंधळी सर्व देवांना गोंधळाला येण्याचं आव्हान करत आहेत, "मोरेश्वर गना...गोंधळा यावे, वाईच्या गणपती...गोंधळा यावे, कोल्हापूरच्या लक्ष्मी, पुण्याची पर्वती, सातारची मंगळाई....गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे, कृष्णा कोयनामाय, तुळजापुरची भवानी, पसरणीच्या भैरीदेवा, नाशिकच्या काळारामा, फलटणच्या रामा तुम्ही गोंधळा यावे, म्हसवड सिद्धा, रत्नागिरी जोतिबा, कवठ्याची यमाबाई, जुन्नरची शिवाबाई, सातिसमिंदरा, नवलाख तारांगणा अन् राहिल्या साहिल्या भक्तांच्या गणा, तेहतीस कोटी देवा गोंधळा यावे...." अंबाबाईच्या नावाने गोंधुळ मांडला न देवा गोंधळाला यावे. आम्ही गोंधळी हो आंबेचे गोंधळी....उदे...उदे...उदे!! "येळकोट येळकोट जय मल्हार" "अंबाबाईच्या नावाने उदे उदे" च्या जयघोषात जागरण गोंधळ चालु असतो.
एकिकडे लग्नाची घाई तर दुसरीकडे शिर्प्याला दुसर्या गावच्या जत्रंला जायची घाई. "कांदा न भाकरी खाऊ द्या कि रं मला बी जत्रंला येऊ द्या कि रं" म्हणत तो जाण्यार्याला विनवतोय. एकदाचा शिर्प्या जत्रंत पोहचतो आणि थेट जातो तो जेजुरकराच्या तमाशाच्या फडात. सुरुवातीला गण, गौळण, बतावणी झाल्यावर थाप पडते ती ढोलकीवर आणि गाणं ऐकु येतं आणि खेळ रंगतो तो लावणीचा....."अशी गाडी आणावी बुरख्याची, बुरख्याची दोन चाकी".
इकडे गावात बळीराजा दिवसभर काम करून थकुन संध्याकाळी आपल्या लाडक्या जिवाशिवाच्या बैलजोडीला घेऊन घरी परततो. घडीभर विसावा घेऊन जातो ते लाडक्या विठुरायच्या भेटीला गावच्या देवळात. रात्र रंगते टाळ, चिपळ्या आणि तंबोर्याच्या तालात आणि कानावर येतं "विठु माऊली तु माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठ्लाची...". अभंगाच्या सुरात रंगुन बळीराजा घरी परततो. अर्धागिनीच्या हातातली चटणीभाकर खाऊन सुखाने झोपतो.
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
=======================================================================
लोकसंगीतातला — महाराष्ट्र माझा
=======================================================================
जेजुरीच्या खंडेराया जागराला या
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
=======================================================================
सणांचा/उत्सवाचा राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
=======================================================================
गडकोटांचा राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================
भगवा झेंडा घेतला हाती, मावळे आम्ही शिवबाचे
ध्यास घेतला गडकोटांचा, वेड आम्हाला इतिहासाचे
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
=======================================================================
पर्यटन क्षेत्रातील राजा, महाराष्ट्र माझा
=======================================================================
राजधानी मुंबई
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
तिर्थक्षेत्र
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
धबधबे
सह्याद्रीच्या कडेकपारी खेळे, शुभ्र जलांचे निर्झर
माझ्या मातीचा गुण ऐसा, फोडी दगडालाही पाझर
प्रचि २८
प्रचि २९
समुद्रकिनारे
प्रचि ३०
प्रचि ३१
लेणी
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
=======================================================================
सुजलाम सुफलाम महाराष्ट्र माझा
=======================================================================
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
=======================================================================
निसर्ग सौंदर्य महाराष्ट्राचे
=======================================================================
प्रचि ३९
प्रचि ४०
तटी: अशा या "महा"राष्ट्राची व्याप्ती खुप मोठी आहे जी या एका भागात मांडता येणार नाही. सदर मालिकेत मी जास्तीत जास्त महाराष्ट्राचे प्रचि दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. जास्त प्रचि असल्याने आणि यातील बरेचसे माझ्या इतर भागात प्रदर्शित झाल्याने कोलाज स्वरूपात प्रदर्शित करत आहे. आशा आहे हा प्रयत्नही तुम्हाला नक्कीच आवडेल. 
==============================================================================================================================================
फार फार सुंदर!!! >>>अगदी
फार फार सुंदर!!!
>>>अगदी भारताची छबी वाट्णारा माझा महाराष्ट्र.>> हे मला तिसरीत असताना पहिल्यांदा भारताचा नकाशा नीट पाहिल्यावर वाटलं होतं.
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शूभेच्छा !!
जिप्सी, मस्त आहे तूझी थीम आणी सगळे फोटो.
मला आवडलेले फोटो मी कॉपी केले तर चालतील का?
झक्कासच
झक्कासच
निव्वळ अप्रतिम ... मानाचा
निव्वळ अप्रतिम ...
मानाचा मुजरा तुला अन आपुल्या मायभुमीला ..
जय जय महाराष्ट्र ... !!!
अप्रतिम! महाराष्ट्रदिनाचा
अप्रतिम! महाराष्ट्रदिनाचा मस्त मूड पकडलायेस रे!
जय महाराष्ट्र!
जय महाराष्ट्र!
प्रणाम घ्यावा माझा जय जय
प्रणाम घ्यावा माझा जय जय श्री महाराष्ट्र देशा
अप्रतिम प्रयत्न जिप्सी !!!..... धन्यवाद
बहु असोत सुंदर संपन्न कि
बहु असोत सुंदर संपन्न कि महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच मनापासुन धन्यवाद!!!!!
मस्त माझ्या बहिणीला
मस्त


माझ्या बहिणीला प्रोजेक्टसाठी बराच उपयोग होईल याचा असं वाटतय
मस्त! सगळेच प्रचि खुप आवडले.
मस्त! सगळेच प्रचि खुप आवडले.
अफलातून !!! आता मात्र
अफलातून !!!
आता मात्र पुस्तकाचं मनावर घेच
अफलातून थीम, आजच्या दिवसाशी
अफलातून थीम, आजच्या दिवसाशी घातलेली सांगड अन अफलातून प्रकाशचित्रे. !!
झकास एकदम !!.... फार भारी
झकास एकदम !!.... फार भारी वाटलं. धन्यवाद जिप्सी.
लेखन, कोलाज सगळंच मस्त.
'माझ्या मातीचे गायन' वाचून कुसुमाग्रजांच्या कवितेचं रसग्रहण की काय असं वाटलं, पण हे वेगळंच आणि अतिशय सुखद प्रकरण निघालं.
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे
लेख आणि आठवलेली कविता दोघांनी एकदम जुन्या आठवणी जाग्या केल्या.
धन्यवाद.
कशाला 'THE BEST' म्हणु तेच
कशाला 'THE BEST' म्हणु तेच समजत नाहीये... प्रचिंना? कल्पनेला की लेखनाला?...
स्पीचलेस....
आणि खरं सांगु... हा सगळा 'गोतावळा' एकत्र बघुन अंगावर अजुनही रोमांच उभे राहिलेयेत...
आशा आहे हा प्रयत्नही तुम्हाला
आशा आहे हा प्रयत्नही तुम्हाला नक्कीच आवडेल>>
अरे वेडं केलस... एवढा सुंदर झालाय हा धागा.
अफाट अफाट आणि केवळ अफाट...
मस्त !! पिठलं-भाकरीपाशी जरा
मस्त !!
पिठलं-भाकरीपाशी जरा जास्तच रेंगाळले.
प्रचि ८ च्या कोलाजमधल्या एस.टी.च्या फोटोत आपल्या लाल डब्ब्याची समस्त कहाणी, सुदैव, दुर्दैव, सर्वकाही दडलेलं आहे. मुरमाड जमीन, जिथे धड रस्ताही नाही, अशा ठिकाणी सुध्दा हा पब्लिक का ट्रान्सपोर्ट बिनधास्त आणि दिवस-रात्र फेर्या करतो. एस.टी. लोकप्रिय आहे ती यासाठीच. (आणि तिचा खडखडणारा, हाडं मोजायला लावणारा 'लाल डब्बा' झालाय तो ही यामुळेच !!)
खूप आवडली थीम ! कोलाज बेस्ट !
खूप आवडली थीम ! कोलाज बेस्ट !
वा जिप्सी - महाराष्ट्राचे
वा जिप्सी - महाराष्ट्राचे "महा दर्शन" घडवलेस अगदी - मस्तच जमलंय सर्व.......
जिप्स्या तुला दंडवत रे बाबा.
जिप्स्या तुला दंडवत रे बाबा. तू एक महान कलाकार आहेस. खुप छान प्रची.
खूप आवडली थीम!!!!! जय
खूप आवडली थीम!!!!! जय महाराष्ट्र _/\_
मस्त कल्पना अन संकलन
मस्त कल्पना अन संकलन !
झक्कास!
__/\__ अप्रतिम फोटोज जिप्सी..
__/\__ अप्रतिम फोटोज जिप्सी..
सह्याद्रीच्या कडेकपारी खेळे,
सह्याद्रीच्या कडेकपारी खेळे, शुभ्र जलांचे निर्झर
माझ्या मातीचा गुण ऐसा, फोडी दगडालाही पाझर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
आठवलेली कविता दोघांनी एकदम जुन्या आठवणी जाग्या केल्या>>>>माझ्याही आवडत्या कवितांपैकी एक
मुरमाड जमीन, जिथे धड रस्ताही नाही, अशा ठिकाणी सुध्दा हा पब्लिक का ट्रान्सपोर्ट बिनधास्त आणि दिवस-रात्र फेर्या करतो. एस.टी. लोकप्रिय आहे ती यासाठीच>>>>+१
अ प्र ति म... जय
अ प्र ति म... जय महाराष्ट्र.......महाराष्ट्र दर्शन झाले..............
तुझे खादाडीचे फोटो बघत असताना अचानक एकदम खमंग वास नाकाला जाणवु लागला.>>>>++११
लेखन प्रचि दोन्ही अप्रतिम!
लेखन प्रचि दोन्ही अप्रतिम!
जिप्स्या, अप्रतिम कल्पना,
जिप्स्या, अप्रतिम कल्पना, फ़ोटो, कोलाज, कविता, वगैरे वगैरे.

जिप्सी = सर्वगुण संपन्न मुलगा.
कणखर देशा, काटेरी देशा, फ़ुलांच्याही देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.
अप्रतिम कल्पना आणि तेव्हदेच
अप्रतिम कल्पना आणि तेव्हदेच अप्रतिम प्र चि गाणी व प्र चि सुद्धा सुन्दर
मस्तच. तो बाळकृष्णाचा तोंडाला
मस्तच. तो बाळकृष्णाचा तोंडाला लोणी लावलेला फोटो कसला भारी आलाय.
सुंदर थीम आणि तेवढेच सुंदर
सुंदर थीम आणि तेवढेच सुंदर पिक्स ....
you are simply great...hats off to you...
एवढे सगळे प्रतिसादही वाचले
एवढे सगळे प्रतिसादही वाचले आणि आता काय प्रतिसाद लिहू असे झाले.
मला वाटते की चांगदेवांसारखा --- कोरा कागद हाच माझा प्रतिसाद
नि:शब्द

Pages