उप्पीट (पण वेगळं, रूनी यांच्या सजेशननुसार चहाच्या आधणाचं)

Submitted by pradyumnasantu on 30 April, 2012 - 16:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा (नेहमी उप्पीटासाठी घेता तितका किंवा ८/१० मिनिटे भाजून): १ वाटी
पाणी: ४ वाट्या
साखरः ६ टीस्पून्स
मीठः ३/४ टी स्पून (पाऊण चमचा)
हिरवी मिरची: १ मिरची
वेलच्या: ४ अख्ख्या उघडून
आले: जाडजूड तीन इंच (ठेचून किंवा मिक्सर मध्ये वाटून)
फोडणीसाठी तूप्/तेल, हिंग, मोहरी, कांदा चिरून.

क्रमवार पाककृती: 

पाण्यात साखर, वाटलेले आले, वेलच्या व मीठ घालून उकळत ठेवावे. तोवर रवा भाजून घेऊ शकता. भाजलेला रवा बाजूला ठेवावा.
भरपूर उकळून पाणी गाळून घ्यावे.
तूप्/तेलावर कांदा परतून मिरची,मोहरीची फोडणी करावी व फोडणीत उकळलेले पाणी ओतावे. लगलीच विस्तव अति मंद करून रवा घालावा. गुठळ्या न व्हाव्यात यासाठी हलवत रहावे व विस्तव मिडीयम करून झाकण द्यावे.
पाच मिनिटांनी उहदून हलवावे. वाफ आली असल्यास खायला घ्यावे. आवडत असल्यास ओले अथवा सुके खोबरे पसरू शकता.

वाढणी/प्रमाण: 
दोन्/तीन व्यक्ती
अधिक टिपा: 

आल्यामुळे व साखरेमुळे अप्रतिम तिखट-गोडसर चव येते. साखर्-मीठ्-आले व मिरची हे प्रमाण अनुभव व आवड यानुसार कमीजास्त करावे.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारी नाश्त्याला उप्पीट केल. अप्रतिम झालं होत.
मी ३ चमचे साखर घातली. आल्याचा स्वाद छान उतरला होता. फोडणीत तुप + तेल वापरले.

Uppit.jpg

अप्रतिम झालं होतं उप्पीट! चव उत्तम आणि इतकं लुसलुशीत झालं होतं! Happy
साखर्,वेलची मुळे मस्त स्वाद्/चव आली होती!
थँक्स! Happy

upama.jpg

आज मुहुर्त मिळाला. छान लुसलुशित झाल होतं उप्पिट. Happy

साबु चविचे आहेत आणि नवर्याला उपमा विशेष आवडत नाही .
दोघानीहि कुरकुर न करता खाल्लं.(याचा अर्थ त्यांना आवड्लं असा मी घेतला)

आल्याची चव थोडी कमी लागली मला , पुढच्या वेळी पाणी जरा जास्त खळखळवुन उकळेन.

हे उप्पीट आमच्याकडे आता नेहमीच्या नाश्ता मेन्यूत समाविष्ट करण्यात आले आहे. एक वाटी रव्यासाठी चार वाट्या पाणी घेतल्याने रवा मस्त फुलून येतो, कणन् कण उमलतो व उप्पीट लुसलुशीत होते. आले, वेलदोड्याचा स्वाद मस्त लागतो. साखरेचे प्रमाण कमी घेतले आहे. उप्पीट झाल्यावर खमंग स्वादासाठी वरून चमचाभर साजूक तूप घालायला हरकत नाही. Happy

मी इथे वाचून हे उप्पिट करायला लागले.‌ माहेरी, सासरी सगळीकडे अत्यंत लोकप्रिय झाला आहे! मऊ, लुसलुशीत असल्याने खायला सोपा. घरी एकाला मिठाचं पथ्य आहे. त्यांनाही आलं, वेलचीच्या स्वादामुळे चिमुटभर मीठ पुरतं.

आज या पद्धतीने करून पाहिले. मी दोनच चमचे सांखर घातली आणि बारीक दलिया घेतला. शेवटाला थोडे तूप सोडले. छान मऊ होतो चार कप पाण्यामुळे.

मी पण शीर्षक वाचून धागा उघडला Lol मला वाटलं चहाचं पाणी घालून उप्पीट बनवलं असेल, हा वेगळाच प्रकार आहे म्हणून रेसिपी वाचली.

मात्र रेसिपी आहे भारी. मी उकळून पाणी घालतेच, यापुढे त्यात साखर आणि आलं घालेन. Happy

मी हे करून पाहिलं एकदा! पण थोडी अजून वाफ काढायला हवी होती. साखर जरा कमी घातली. चवीला छान झाला होता. पण जरा चिवटसर झाला.

देवकी, एकाला चारचं प्रमाण वाचताना खूप वाटतं. पण उप्पिट खाल्ल्यावर आधी असं का करत नव्हतो, ह्याचं आश्र्चर्य वाटलं!
मध्यंतरी घरी एका मेंबरचं दातांचं काम चालू होतं. अगदी आसट, मऊसर खायला हवं होतं, तेव्हा मी सहापट पाणी घातलं. खीर होणार, असं वाटलं. पण नाही झाली. पेशंटनी मिटक्या मारत खाल्लं.

, एकाला चारचं प्रमाण वाचताना खूप वाटतं. पण उप्पिट खाल्ल्यावर आधी असं का करत नव्हतो, ह्याचं आश्र्चर्य वाटलं!>>>>>>>> आज मीही हे केले.मात्र सव्वा वाटीसाठी,४-५ मिरच्या+२ चमचे साखर+ ४ वाट्यांना जरासंच कमी पाणी घातलं.छान झाले होते.अर्धा चमचा साखर अजून चालली असती.

मी केला काल. छान झालं. साखर जास्त वाटली. वेलचीचा स्वाद नाही आला मात्र. आल्याचा चांगला स्वाद आला. 2 चमचे तेलात फोडणी केली कांदा भाजत आल्यावर दोन चमचे तूप घातले, आणि आधणाचं पाणी आधी न घालता भाजलेल्या कांद्यावर रवा घालून परतले. नंतर पाणी घातले म्हणजे गुठळ्या नाही होत. मी नेहमी आधी रवा कांद्यावर परतून घेते मग पाणी घालते.

Pages