"काहीच्या बाही!"

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 30 April, 2012 - 14:55

"ओ पाव्हन, आव इकडं कुठ आज? या कि बसू जरा पाराखाली"
"काय सखाराम, कसा आहेस मित्रा?"
"हाय आता जसा हाय तसा तुमच्या म्होरं" "तुम्ही बोला, आज इकड काय काम काढलं बाय्कुच्या माहेरला?"
"अरे होतं जरा काम!"
"व्हय, राहतंय तुम्च काम! मास्तर होते न जणू तुम्ही?
" होतो रे पण आता रिटायर झालो"
"म्हंजी आता घरीच का?" "आता काय कामधाम करायला नको तुम्ला"
"अरे आयुष्य गेल काम करण्यात आता घरी बसून कुठ करमणार आहे का?"
"हा, म्हणी तुम्ही काम केलं, शाळात बसून लई त लई पोरांच्या टेर्या झोडल्या असतील"
"हा हा हा!!!"
"हसता काय? बायकू-पोर्ह कुठ आहे?"
"अरे अस काय करतोस सखाराम, अरे हिला जावून दोन वर्ष झाले"
" हा, पण बरच झाल! लई जगू नई माणसान, जीवाला तरास नुस्ता"
"अरे काहीतरीच काय?"
"नाही त काय?" "आन पोर्ह कुठाय?"
"अरे आम्हाला मुलबाळ नव्हता ना रे"
"अर्रर, माह्या कुठ ध्यानात, म्हून त गावातले पोर्ह तुम्ची उडवायचे ना?"
"काय उडवायचे?"
"जाऊ द्या आता, कशा करता आलथे???"
"अरे आमच्या सासर्यांची इथ थोडी जमीन आहे, सासरे गेले अन वारसदार मी एकटाच, आणि आता माझही वय झालाय, म्हटलं टाकू विकून"
"म्हंजी फुकटच्या जमीनीच पैस करायचं म्हणा की"
"तू काहीही समज."
"कुठ हाय कूढशिक तुम्चीवाली जमीन?"
" अरे ती जुन्या शाळेच्या मागची जमीन"
"नेमकी कूढशिक?"
"अरे शाळेच्या मागची सगळीच"
"ओ ती जमीन तुम्ची नाय"
"अरे काय आमची नाय, आमचीच आहे ती"
"आव्हा ती जमीन पीरबाबाची हाय अन तुम्ची नाय?"
"कोण पीरबाबा?"
"त्योच पीरबाबा ज्यो संकटाला धावून येतो"
"कोण पीरबाबा, कोण संकटाला धावून येतो"
"त्योच, ज्याची तिथ मज्जीद अन दर्गा होणारे"
"मज्जीद, अरे पण ती माझी जागा आहे"
"देवाची हे ती, तुमचा सासरा मेल्यावर जमिनीला कोण वाली नई म्हणल्यावर पीरबाबानि तिथ साक्षात्कार दिला"
"अरे पण ती माझी जमीन आहे"
"व्हती, ती तुमच्या सासर्याची जमीन व्हती पर आता पीरबाबाची हाय"
"मला सरपंचांना भेटू द्या"
"महा पोर्गाच हे की सरपंच, त्यानी निधी मंजूर करून आणलाय पीरबाबासाठी."
"मग मी आता काय करू?"
"गप गुमान घरी जा आन झोपा"
"अरे सखारामा ती माझी जमीन आहे"
"महा पोरगा आला, त्याच्याशीच बोला तुम्ही, अय रघु हे मास्तर म्हणतय जुन्या शाले मागली जमीन त्याची हाय"
"हा मंग आसन ना त्यांचीच, तुम्हाला काय त्याच?"
"आर ती पीर बाबाची नाय का?"
"म्हातार्या गप गाडीवर बैस, पीरबाबाची जमीन शाळे म्होरची हे, मागली नई"
"मास्तर, पोरग मला म्हातार्या म्हणल, मी म्हणल व्हतं ना लई जगू नई माणसानी, जीवाला तरास नुस्ता.......!"

गुलमोहर: 

>>शाळात बसून लई त लई पोरांच्या टेर्या झोडल्या असतील Biggrin Biggrin Biggrin
>>लई जगू नई माणसानी - खरंय!

शेवट काही पटला नाही.
आजकालच्या जगात सरपंचानं अन बापानं मिळून मास्तरला गंडवला असता नक्कीच.