Submitted by श्रीकांत काशीकर on 30 April, 2012 - 09:11
महाराष्ट्राच्या शूरवीरांची साक्ष देती हे सह्यकडे ।
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। धृ.।।
तलवारीच्या तालावरती शूर नाचले थयाथया
थयाथयाट तो पाहुनी करतो शत्रू त्यापुढे गयावया ।
आठवुनी त्या पराक्रमाला पाऊल टाकू सदा पुढे
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। १ ।।
गोब्राह्मण प्रतिपालक राजा इथेच झाला तो शिवबा
महाराष्ट्राच्या जरिपटक्याला अटकपार ने राघोबा ।
राक्षसभुवनी माधवरावे निजामास चारिले खडे
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। २।।
त्या रक्ताचे वारस आम्ही भाग्य असे हो हे अमुचे
हुंकाराने केवळ अमुच्या ऊर धडाडे शत्रूचे ।
राष्ट्रघातकी शोधून त्यांना चला देऊया उचित धडे
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। ३।।
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
त्या रक्ताचे वारस आम्ही भाग्य
त्या रक्ताचे वारस आम्ही भाग्य असे हो हे अमुचे
कसाबलाही घाबरणारे पहा पुढारी हे अमुचे
शिवबाच्या नावाने बसती राजकारणी सत्तेवर
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।।
तुमच्या कवितेतील बाळबोध प्रामाणिकपणा भावला, जो हल्ली दुर्मीळ आहे.
बाळबोध या शब्दाने रागावू नका, ते विशेषण प्रामाणिकपणा या शब्दाचे आहे