व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ३

Submitted by संयोजक on 9 September, 2008 - 22:02

नियमः
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहिता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात.
४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल!

आजचे चित्रः
Vyangchitr_3.jpg

लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमासिकाची आधुनिक अंगाई
वाचून दाखवता झोपते मूल
डोळे न मिटता खुल्लमखुल्ला
दूध पिते आता मार्जारकूळ

  ***
  If dreams are like movies, then memories are films about ghosts...

  आई दंगली
  बाळ झोपले
  मांजरा तुझे
  काम साधले

  सुधीर

  आंधळं दळतं
  कुत्र पिठ खातं
  सिनेमांधत्व येतं
  मांजर दुध पितं

  पोट माझं केव्हाच भरलं
  तुही दमलीस आराम कर गं आई,
  माऊला देऊन टाक माझा खाऊ
  शाणं बाळ मी तुझं झोपेन न ऐकता अंगाई.

  वा अश्वीनी सही जमलीये Happy


  आईच्या फिल्मी कहाण्या ऐकून
  बाळ खोपलं खुशी खुशी
  आईला त्याचा पत्ताच नाही
  दुदू पिते वाघाची मावशी


  लवकर दुदू पिऊन घे माऊ
  पुन्हा नाही प्यायला मिळायचं !
  कुण्णाला सांगायची नाही आपली गंमत
  मीही घेतलंय सोंग झोपेचं !!

  फिल्मीणीच्या बुकामागे बाळ झोपला गं बाई
  माऊ बसली पुढ्यात चोरट्याच लक्षण बाई
  आज माझ्या कार्ट्याच पोटं का गं भरत नाही...

  माय रन्गली बुकात
  दुध पिते माऊमनी
  बाळ हसतो गालात
  नाही काही ध्यानीमनी

  फिल्मी रन्गी आई रन्गता,
  बाळ म्हणाले झोपू अम्मळ
  'डोळे उघडुनि ' दूध पिताना
  मान्जर बोले आमची चन्गळ

  फिल्मी रन्गी आई रन्गता,
  बाळ म्हणाले झोपू अम्मळ
  'डोळे उघडुनि ' दूध पिताना
  मान्जर बोले "आमची चन्गळ"

  अभिषेक ऐश च्या गॉसीपमध्ये,
  अशीच गुंतुन पडत रहा.
  बाळा घडले उपोषण तरी,
  मर्जारतृप्ती करत रहा.
  .................................................................................................................................
  ** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

  फिल्मी गॉसीपच्या नादात गेले,बाळाचे दुध मांजराच्या पोटात.
  बाळाने घेतले सहन करुन.
  पण बाळाच्या बाबांचे काय?
  त्यांचा टिफीन तर दिलाय टॉमीच्या 'डॉगफुडने' भरुन !
  .................................................................................................................................
  ** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

  चाफा ही चारोळी आहे का साडे पाचोळी आहे.. ? Sad

  बाळाचे बाबा ऑफिसमधून येतायेत, आणि खिडकीतून हा सीन बघून ते दार उघडण्यासाठी देवाला विनंती करतायेत.............

  पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
  हाती माऊलीच्या का रे चित्र तारकांची
  सरावले बाळ ही आता विनाअंगाई निजाया
  उघड दार देवा आता तूच उघड दार देवा

  बो-विश .... मस्तच रे!
  ती शेवटची ओळ अशी केलीस तर :
  सरावले बाळ ही आता विनाअंगाई निजाया
  फुकटचा मेवा बोक्या.. फुकटचा मेवा

  स्वरूप,
  अरे पहिल्या ओळीत मांजर आल्यावर बोका कसं म्हणणार पुन्हा. Happy
  पण सुचना छानच होती.

  अरे हो की.... (जीभ चावणारा चेहरा!)

  दुध पिउन पिउन मनीचा बोका झाला.... (चुकीवर पांघरुण घालणारी बाहुली!)

  अरे, जात मांजराची म्हट्लंय ना? मग चालेल, बोका मांजराच्याच जातीचा!

  आयला, मला सगळ्याच आवडल्या! मग मत एकालाच कस द्यायच?
  किमान पहिल्या ३ नम्बर्स करता तरी ऑप्शन मिळाल्या तर बर होईल! Happy
  ...;
  आपला, लिम्बुटिम्बु

  सगळ्याच मस्तयंत एकदम..:खोखो:

  बाळ तुझे झोपले असता
  वाचनात तू दंग असावी
  चोरुन त्याचे दूध पिता
  नजर तुझी नसावी

  वाचनात तू दंग असताना
  बाळ तुझे झोपू दे
  वाया घालवण्यापेक्षा
  दूध मला तरी पिऊ दे

  अश्विनी छान आहे.

  निखिल मस्तच

  सिनेमातल्या नायक श्वानाप्रमाणे
  भाउ बनुन बाळाचा सांभाळ करिन
  रक्षण करुन तुझ्या फेमीनाचे
  तुझ्या दुधाचे कर्ज मी फेडीन.

  मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
  मायबोली गणेशोत्सव २००८