भाषिक विविधता आणि प्रांतवाद - मराठीच्या अनुषंगाने

Submitted by सं.देश. on 29 April, 2012 - 10:11

खरंतर इथे मला मराठी, महाराष्ट्रातील अ मराठी लोकांच स्थलांतर आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारतातील भाषिक विविधता आणि प्रांतवाद ह्याचा विचार करायचा आहे. दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मनसेच्या माध्यमातून ह्या विषयी आंदोलन केलं आणि बरच रणकंदन माजल होत. हा धुरळा आता खाली बसला आहे. विषय तसा मागे पडला असला तरी विचार करायला आपल्या मनात बरेच प्रश्न ठेवून गेला आहे.

ह्या प्रश्नाला अनेक बाजू आहेत. सर्व प्रथम हे मान्य करायला हव कि हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण माझ्या माहितीतील अनेक लोकांच आणि बऱ्याच (विशेषतः इंग्रजी) माध्यमांच तर ठाम मत आहे कि इथे मुळात कांही प्रश्नच नाही आणि हे शुद्ध राजकीय हेतूंनी प्रेरित कांड आहे. आपल्या देशातील माध्यमांवर (त्यातल्यात्यात इलेक्ट्रॉनिक) खर तर स्वतंत्रपणे लिहायला हव. कदाचित राज ठाकरेंचा हेतू फक्त राजकीय असू शकतो....किंवा तस नसेलही. पण ह्या विषयाचा अराजकीय दृष्टीने धांडोळा घेतला पाहिजे. राजकारणी लोकं ह्या विषयावर खोलात जाऊन विचार मांडत नाहीत हे एक वेळ समजू शकत पण ह्या विषयाबद्दल आपल्या सर्वसामान्य लोकांच काय मत आहे? का आपण हो-नाही-कदाचित ह्या त्रिकोणात अडकलोय? सामाजिक विज्ञानाच्या अभ्यासकांच काय मत आहे? सामाजकारणाने खरंतर राजकारणाची दिशा ठरवायला हवी पण बहुतेक उलट होतंय. संविधानात नागरिकांना स्थलांतर करण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे ह्या एका वाक्यात संपूर्ण विषयावर बोळा फिरवणे योग्य होणार नाही.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अमराठी लोकं स्थलांतर करतात. त्याची कारण अनेक आहेत - आपलं राज्य देशातील एक आघाडीचं राज्य आहे, इथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण, शहरीकरण झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे, कायदा सुव्यवस्था तुलनेने चांगली आहे. किमान स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या ४/५ दशका पर्यंत तरी नक्कीच हि परिस्थिती होती. मागच्या कांही वर्षात हे चित्र झपाट्याने बदलतंय. हे स्थलांतर मुंबईत सर्वाधिक होतं पण इतर शहरात पण हि संख्या लक्षणीय आहे उदा. पुणे, नागपूर, औरंगाबाद व जवळपास सर्व महत्वाची जिल्ह्याची शहरं. देशात काय इतरत्र अस स्थलांतर होत नाही का? होतं. पण वेगळी भाषा, संस्कृती, इतिहास असणाऱ्या लोकांच सर्वात ज्यास्त स्थलांतर महाराष्ट्रात होत. मध्य प्रदेशातून बिहार किंवा उत्तरप्रदेश, दिल्लीत स्थलांतर करणे आणि दिल्लीतून चेन्नईत स्थलांतर करणे वेगळं. राज्या-राज्यांमधली विविधता कमी अधिक प्रमाणात आहे. त्या अर्थानं अधिक विविधता असणारं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होत. मित्रांमध्ये चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येते की अमराठी लोकांना महाराष्ट्रात यायला, राहायला आणि जमलं तर स्थायिक व्हायला आवडत. माझे मित्र कामानिमित्त चेन्नई कोचीला गेले तरी त्यांची पहिली पसंती मुंबई पुण्यालाच असते. ह्याचं अजून एक कारण म्हणजे असं स्थलांतर करणं सोप्प आणि सोयीच आहे.

म्हणून काय झालं, अस स्थलांतर रोखता येत नाही ... तस करण बेकायदेशीर होईल ... आपण सर्व भारताचे नागरिक आहोत .... हा काही प्रश्न होऊ शकत नाही. माझ्या अनेक मित्राचं मत. ते बरोबर आहेत. प्रश्न हे स्थलांतर नाही तर त्या नंतरचा आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित झालेली हि लोकं महाराष्ट्राच्या मूळ प्रवाहात इतक्या वर्षानंतर सुद्धा मिसळली नाहीत हे खर दुखण आहे. स्थलांतरितांचे वेगळे भाषिक, सांस्कृतिक गट महाराष्ट्रात आहेत, ते इथे रुजलेत, "भैया हात पाय पसरीच्या" चालीवर वाढीला लागलेत व त्याने महाराष्ट्रातच मराठी संस्कृती दुय्यम व हळू हळू अल्पसंख्यांक होत आहे. बऱ्याच मराठी लोकांच्या मनात हे खदखदत आहे. ह्यावर विचार व्हायला हवा. स्थलांतरितांनी मूळ संस्कृतीत मिसळायला हवं - हा संघर्ष कमी करण्यावर नामी उपाय आहे. परराज्यातून आलेल्या रेल्वे गाडीतून उतरणाऱ्या प्रत्येकाला फलाटावरच अस्खलित मराठी यायला पाहिजे अस मी म्हणणार नाही. स्थलांतरितांच्या पहिल्या पिढीत हे कदाचित शक्य होणार नाही पण दुसरी पिढी मिश्र वळणाची आणि तिसरी व त्यानंतरच्या सर्व पिढ्या पूर्णपणे मराठी संस्कृतीला आपलं मानणाऱ्या बनणे आवश्यक आहे. इतक्या कि शिवाजी महाराज म्हणाल्या बरोबर आपसूक जय त्यांच्या मुखातून निघेल, ते घरी बाहेर मराठी बोलतील आणि स्वतःला गर्वाने मराठी सांगतील. दुर्दैवाने अस कांही घडल नाही हे खर. गुप्ते आणि गुप्ता हा फक्त अडनावांचा फरक असता तर तो सुदिन.

आता काही लोक चार दोन अपवाद दाखवतील व दिशाभूल करायचा प्रयत्न करतील. आज काल थोड कोणी काही बोलल किंवा काही चर्चा केली कि हि अपवादाची मात्रा देऊन बुद्धिभेद (विचकाच खरतर) करणारे आणि आपण पण कसे (अर्ध्या हळकुंडाने) पिवळे आहोत हे दाखवणारे इथे तिथे दिसतात. उगाच क ला अ ने भागायचं आणि ज्ञ बाकी सोयीस्कर दुर्लक्षायची. हि प्रवृत्ती अशीच राहिली तर उद्या, आज जातोय तितकाही भाग अ ने क ला जाणार नाही. असो.

महाराष्ट्रातल्या स्थलांतरितांनी मराठीला आपलं न बनवण्यामागे अनेक कारण आहेत. ह्यातलं पहिल सर्वात महत्वाच कारण म्हणजे अस काही करण आवश्यक आहे अस त्यांना वाटतच नाही. मी भारतीय आहे आणि महाराष्ट्र पण भारतातच आहे तेंव्हा मी माझ्या भाषिक, सांस्कृतिक ओळखीने राहीन व त्यात काही वावग आहे अस त्यांना वाटत नाही. नाही म्हणायला कृपाशंकर सिंह म्हणतात कि मराठीवर संकट आलं तर रक्त सांडणारे पहिले आम्हीच असू. अर्थात ते किती खोटं आहे हे मी वेगळं सांगायला नको. महात्मा फुले माहित नसलेले अबू आजमी महाराष्ट्राचे आमदार आहेत (मटा मध्ये बातमी वाचली होती), राजीव शुक्ला महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार आहेत (महाराष्ट्राच्या किती प्रश्नांबद्दल त्यांना जिव्हाळा आहे आणि त्यावर त्यांनी राज्यसभेत आवाज उठवला देव जाणे) कित्तेकांना संत ज्ञानेश्वर, तुकाराम माहित नाहीत, शिवाजी महाराज लुटमार करणारे होते अस काहींना वाटत, मराठी भावगीत आणि लोकगीत त्यांना परके आहेत, अभिमान वाटावा अश्या गोष्टींबद्दल त्यांना अभिमान नाही आणि चिंता वाटावी अश्या गोष्टींबद्दल त्यांना चिंता नाही. माझे कित्तेक मित्र परदेशस्थ ग्राहकांसमोर "विविधतेत एकता" गात असतात पण खरंतर त्यांना हि विविधता नकोशी असते आणि सगळं अमेरिकेसारख असत तर कित्ती बर झालं असत अस त्यांना वाटत. महाराष्ट्रातील अनेक गावात मराठी लोकांना गुजराती समाजाने एकजुटीने बाजारातून हद्दपार केले, गुजराती डॉक्टरांनी मराठी डॉक्टरांबद्दल अफवा पसरवल्या, अनेक उद्योगातून अमराठी लोक बढती व भरतीच्या वेळेस त्यांच्याच राज्यांच्या लोकांना पसंती देतात, एकत्र राहून एन केन प्रकारेण आपल्या लोकांच्या प्रभावात वाढ करत राहतात.

अस सगळ हे लोक सुखनैव इतकी वर्ष करू शकतायात म्हणून मराठीला आपलं मानण तर दूर उलट त्याबद्दल त्यांना काही साधा आदर सुद्धा राहिला नाही. मराठी खाद्यपदार्थ, शब्द, गाणी आणि शेवटी लोक - आधी माहिती नाही म्हणायचं मग माहिती असायला पाहिजे अस काही नाही अस म्हणायच मग माहिती असण्याच्या लायकीची नाहीत अस म्हणायच आणि शेवटी चक्क टिंगल करून हिणवायचं. राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर ह्या क्रमात चढत्या दिशेने वाढ झाली आहे अस मला तरी दिसतंय. जर मराठी शिवाय माझ काही अडत नसेल तर मग ती दुय्यमच झाली ना. वरच्या दिलेल्या क्रमात जशी वाढ होत गेली तशी मराठी भाषा, इतिहास, संस्कृती दुय्यम आणि डाउन मार्केट ठरली.

अजून दोन उदाहरणांचा उहापोह करणं मला आवश्यक वाटत - १) कौशल इनामदारांना मुंबईमध्ये सूटच्या दुकानात घाटी म्हणून हिणवल गेल होत. त्यानंतर त्यांनी मराठी अभिमान गीताची निर्मिती केली. ह्या उपक्रमात भाग घेतलेल्यांना हे ठाऊक असेल. २) बऱ्याच वर्षांपूर्वी विनय आपटेंनी शिवाजी महाराजांवर आधारित मालिका बनवली होती पण त्यांना शिवाजी बिकता नही म्हणून सांगितलं गेल होत. खुपते तिथे गुप्ते मध्ये त्यांनीच हि गोष्ट सांगितली होती. रीमा लागुनी सुद्धा हिंदीत मराठी म्हणून काम करताना प्रयास पडले अस सांगितलं होत. कदाचित मराठी बद्दल इतर प्रांतातल्या लोकांना आकस असेल व ते पण एक कारण असू शकेल पण त्यात मी अधिक खोलात जाऊ इच्छित नाही, ते विषयांतर होईल आणि वस्तुनिष्ठ पण असणार नाही.

काही लोक म्हणतील कि अहो त्यात काय? .... आपण थोड दुसऱ्यांच घ्यावं .... त्यांनी थोड आपलं घ्यावं ... संस्कृती अभिसरणातून ती अधिक उत्तम होत जाईल. साखरेचा पाक लावलेलं हे वाक्य बुद्धिभेद करायचं अजून एक नामी शस्त्र आहे. देवाण घेवाण उत्तम पण नक्की असं घडतंय? अस्सल मराठी ताटात एखादी दाल बाटी किंवा पनीर कढाई वगैरे समाविष्ट झालं तर चांगलच आहे पण ताटात कोल्हापुरी ठेचा सोडून सगळं काही बाहेरचं असेल तर ते ताट मराठी राहील का? (उगाच नाही मराठी खानावळ शोधावी लागत.) हे फक्त एक उदाहरण होत शब्दशः अर्थ घेवू नये. देवाण घेवाण ठीक पण शेवटी ती मराठी भाषा आणि संस्कृतीच राहिली पाहिजे. तस नाही झालं तर मग तेच - विविधता नष्ट सगळं एकसारख.

हा लेख वाचणाऱ्यांना अस वाटेल कि मला काही वाईट अनुभव आलेत आणि संतापून मी हा लेख लिहितो आहे. मी खरच सांगतो कि अस काही नाही. मी शक्यतो ह्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहतो. आपल्यातीलच काही लोकांना वाटते की परप्रांतीयांनी मराठीला डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज नाही, थोडा आदर देणे पुरेसे आहे. मला व्यक्तीशः अस वाटत कि जर आपण मराठीला त्यांनी आपलस कराव अस म्हणालो तर किमान आदर तरी मिळेल. हे सगळ बाजूला जरी ठेवल तरी - आपल्या देशातील हि विविधता जपली जावी, भाषिक-सांस्कृतिक संघर्ष कमी व्हावा व स्थलांतरितांमुळेचे प्रश्न कमी व्हावे ह्या साठी त्यांनी स्थानिक संस्कृतीत मिसळणे अनिवार्य आहे.

असं सगळ घडायला अजून एक कारण म्हणजे आपण सर्व मराठी बंधू भगिनींनी ह्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. आपल्याच लोकांना कसा मराठी भाषेचा अभिमान नाही अस म्हणून हा मुद्दा इथे संपत नाही. थोड खोलात जाव लागेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांचे बलिदान देऊन आपण मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करून घेतली पण मला अस वाटत कि आपण खरतर तो लढा हारलो. लौकीकाप्रमाणे युद्धात जिंकून सुद्धा तहात हरल्या सारखे. मुंबई मिळाली तरी राष्ट्र का राज्य हा पेच / हि शंका / हा घोळ आपल्या समाजात टिकून राहिला. राज्याच्या बाजूने बोलल तर राष्ट्राद्रोहाची टोच मनाला लागते आणि राष्ट्राच्या बाजूने बोलल तर भाषा संस्कृतीला दुय्यम मानावं लागत ह्या विवंचनेत आपण अजूनही आहोत. मुंबई लढ्याच्या निमित्ताने ह्या विषयावर खोल मंथन होऊन काही एक कायम स्वरूपी तोडगा विचार किमान मराठी समाजाने तरी अवलंबायला पाहिजे होता. बरेच जण दोन टोकाच्या मध्ये तर काही लोक एखाद्या टोकावर आहेत. त्यावेळेस ह्या विषयाचा अजून तड लावला तर देशात आणखी फाळण्या होतील ह्या भीतीने ते सोडून दिल असावं. स्वातंत्र्याच्या वेळेस आणि नंतर आपण बऱ्याच गोष्टी भीतीतून केल्या ज्याचा आपल्या देशावर चुकीचा परिणाम झाला अस मला व्यक्तीशः वाटत.

परप्रांतातून आलेल्या लोकांनी इथली भाषा संस्कृती आपलीसी करावी ह्यासाठी आपण आग्रह धरला नाही व काही प्रयत्न सुद्धा केले नाहीत. सुरुवातीला कुतूहल म्हणून, नंतर आपल्याच देशातले आहेत म्हणून, त्यानंतर आगत्य म्हणून किंवा मी कसा राष्ट्र प्रेमी आहे हे दाखवायला म्हणून आणि हिंदी राष्ट्र भाषा आहे ह्या चुकीच्या समजुतीतून आपण हिंदी बोलत राहिलो. आपल्याला वाटल असेल जस मी हिंदी बोलतो तस तो हळू हळू मराठी शिकेल पण आत्ता आपल्या लक्षात येतंय कि तस काही झालं नाही. आत्ता तर ते म्हणतात कि तुम्हालाच हिंदी येते तर मग आम्हीं का मराठी शिका.

काही लोक म्हणतील कि लिपी देवनागरी असल्यामुळे हिंदी शिकणं सोप आहे व त्यामुळे आपण मराठीचा आग्रह धरू शकत नाही. जे कि दक्षिण भारतीयांच्या बाबतीत होत. (आपल्या लोकांची हिंदी पण एक स्वतंत्र विषय आहे म्हणा). पण मग सारख्या लिपीचा फायदा आपल्याला हिंदी शिकायला होतो तर मग तो त्यांना मराठी शिकताना पण व्हायला पाहिजे. उत्तर भारतीयांना तर हे गंगा उलटी वाहण्याचा प्रकार वाटेल. काहींना वाटत हिंदी मुळे आपल्या युवकांच्या नौकरीच प्रमाण वाढत. मला तरी तस दिसत नाही. उलट हिंदीला विरोध करणारे दक्षिण भारतीयच मला जिकडे तिकडे दिसतात. अगदी केंद्र सरकारी नौकऱ्यामध्ये पण. खरंतर साखरेचा पाक लावलेल्या ह्या सांस्कृतिक देवाण घेवाणीत आपला आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे हेच खर.

परप्रांतीयांनी आपल्या संस्कृतीत मिसळण्यासाठी भाषा हा अत्यावश्यक आणि प्रभावी उपाय आहे. पण तो पुरेसा नाही. कानावर सतत मराठी भाषा पडणे, मराठी सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होणे, मराठी शाळेतून मराठी इतिहास शिकणे, मराठी मित्र मंडळीत वावरणे अश्या अनेकविध मार्गांनी हे कराव लागेल. (अमेरिकेत गेलेले मराठी शेवटी कसे अमेरिकन होऊन जातात ते डोळ्यासमोर आणावे.) सध्या महाराष्ट्रातच नवीन मराठी शाळांना परवानगी नाही तेंव्हा परप्रांतीयांना काय सांगणार?

भाषेच्या अनुषंगाने इथे अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो कि हिंदी आता जवळ जवळ महाराष्ट्राची सार्वजनिक भाषा झाली आहे. टॅक्सी चालक, ऑटो चालक, चणे फुटाणे विकणारा, सुरक्षा रक्षक, बरेच दुकानदार, ग्राहक आणि एकूणच परप्रांतीय एवढे वाढले आहेत कि आपण माहित नसलेली व्यक्ती हिंदीच आहे अस समजून सरळ हिंदीत सुरु करतो. म्हणजे परप्रांतीयांच्या कानावर मराठी पडणे तर दूर त्यांना मुळी सुद्धा मराठी ऐकण्याचा त्रास होऊ नये याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे. हे इतक्या धोकादायक पातळीवर आहे कि आत्ता तर थोड सुद्धा टापटीप दिसणाऱ्या बरोबर लोक सरळ हिंदीत सुरु करतात. मग समोरचा हिंदी असेल अस समजून आपण पण हिंदीत सुरु करतो. ह्याने दोन मराठी लोक महाराष्ट्रातच हिंदीत बोलत राहतात. माझ्या बाबतीत अस घडलंय. आता मी आधी सरळ मराठीतून उत्तर देतो. ह्यामूळे अजून एक होत ज्या परप्रांतीयाने मराठी शिकली असेल तो पण मराठीचा नाद सोडून देतो. मराठी चित्रपट मालिकांमध्ये पहा - त्रयस्त व्यक्ती सरळ अमराठी दाखवली जाते. मुंबई पुणे मुंबई चित्रपटात सिंहगडावरचा प्रसंग आठवा - जेंव्हा ती म्हणते कि मी कोणाशीही भांडू शकते तेंव्हा ती बाजूने जाण्याऱ्या माणसाशी हिंदीत भांडायला सुरु करते. हिंदीत का? म्हणजे त्रयस्त व्यक्ती हिंदी आहे हे गृहीत धरण्य इतपत परिस्थिती झाली आहे. दगडू शेठ गणपती मंदिराच्या बाजूला फळांचा रस विकणारा माणूस माझ्याशी असाच हिंदीत सुरु झाला. त्याला चांगला समजावला होता मी.

परप्रांतीय मराठी संस्कृतीत मिसळत नाहीत ह्याच अजून एक कारण म्हणजे मराठीची हि स्पर्धा फक्त हिंदीशी नाही तर इंग्रजीशी पण आहे. आर्थिक उदारीकरणा नंतर मराठी आणि अमराठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर इंग्रजी नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने अवलंबिली. माहिती तंत्रज्ञान, डॉट कॉम आणि बी पी ओ च्या ढग फुटी नंतर इंग्रजी बोलणाऱ्यांचे नाक्या नाक्या वर पेव फुटले. ह्याच्यातून असा समाज निर्माण झाला कि इंग्रजी शिवाय नौकरी नाही, यश नाही, काही खर नाही. इंग्रजी येईल ते शहाणे, हुशार, यशस्वी आणि न येणारे मागास. हे धृवी करणच भारत विरुद्ध इंडिया ला कारणीभूत आहे अस मला वाटत. ह्या सो कॉल्ड हाय फाय लोकांना कुठलीच भारतीय संस्कृती भाषा इतिहास आता उपयोगाच्या नाहीत व सरळ केराच्या टोपलीत टाकल्या पाहिजेत अस वाटत. अमेरिकेत कायमच स्थायिक झालेल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने मराठी संस्कृती सोडून स्थानिक संस्कृती, भाषा अनुसरली तर ते योग्य आहे पण इथे तर महाराष्ट्रातच अमेरिका वसू पहात आहे.

विवेकानंद म्हणाले होते तुम्ही आपला धर्म विसराल तर मिटून जाल. विवेकानंदांना धर्म म्हणजे कर्मकांड अभिप्रेत नसेल. मी तरी ह्याचा अर्थ असाच घेतो कि आपण जर आपली भाषा इतिहास ओळख संस्कृती विसरलो तर आपण कधीच पुढे पडू शकणार नाही. मी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता आहे. सांस्कृतिक राष्ट्रावादाशिवाय जगात विकसित झालेला एक तरी देश आहे का? मुळात राष्ट्र म्हणजे फक्त लोकांचा समूह नव्हे - संस्कृती तर डीएनए आहे राष्ट्राची. उद्या आपली संस्कृती टाकून आपण विकसित झालो तर ते काय कामाच - विकसित झाला असेल फक्त एक लोकांचा समूह - राष्ट्र आणि समाज तर नष्ट झाला असेल. गांधीजी म्हणाले होते खेड्यांकडे चला - प्रत्यक्षात खेड्याकडे नाही तर किमान आपल्या मुळांकडे चला असा अर्थ घेऊ. इथे तर आम्ही ती उखडून टाकत आहोत. बहुसंख्य लोकांची जी भाषा आहे तीच जर नष्ट झाली तर त्यांचा विकास कसा होणार.

ह्या लोकांना काय वाटत कि आपल्या देशातले सगळे इंग्रजी बोलायला लागले कि सर्व प्रश्न सुटतील? आफ्रिकेतल्या कित्तेक देशात सर्व लोक इंग्रजी बोलतात मग काय ते विकसित आहेत? आणि हे मुळातच अव्यवहार्य आहे. सर्वांना इंग्रजी शिकवण्या पेक्षा इंग्रजीतल ज्ञान आपल्या भाषेत आणल्यामुळे हे प्रश्न सुटतील. उच्च शिक्षित लोकांच्या सुरुवातीच्या पिढीतील लोकांनी हे करायला पाहिजे होत पण त्या पेक्षा आपण कसे इतरांपेक्षा वेगळे आणि आधुनिक आहोत ह्याच विचारात हे लोक मश्गुल राहिले.

का बर मी महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मराठीतून करू शकत? महाराष्ट्रात सर्व प्रकारच माध्यमिक, उच्च शिक्षण, संशोधन मराठीतून व्हायला पाहिजे. तसं झाल तर ते अधिक लोकांपर्यंत पोहंचेल , आपल्या समाजाला पाहिजे अस तंत्रज्ञान त्यातून निघेल, संशोधन वाढेल आणि नुसत परदेशातील ग्राहकांना सेवा देण्याबरोबर अधिक भरीव अस योगदान आपण देऊ शकू. वर उल्लेखलेली सांस्कृतिक देवाण घेवाण आतबट्ट्याची होणार नाही. सरकार म्हणतं विकास झालाय पण तो तळा गाळापर्यंत पोहंचला नाही. त्यासाठी बहुजन समाजाची भाषा वापरायला पाहिजे. इथे तर पहिली पासून इंग्रजी सुरु आहे. आपण तर अशी व्यवस्था करून ठेवली आहे कि बारावी नंतरच सर्व प्रकारच (कला मराठी सोडून) शिक्षण इंग्रजीत आहे. म्हणजे इंग्रजीशिवाय तुम्ही जगू शकणार नाही अशी व्यवस्था आहे. जपान मध्ये इंग्रजी नाही येत म्हणून कोणाच बिघडलय का? किंवा फ्रांसमध्ये, कोरिया, जर्मनी, रशिया. मग माझ्या महाराष्ट्रात मराठी येत पण इंग्रजी येत नाही म्हणून का बिघडाव? सुशिक्षित बरेच पालक आपल्या पाल्याला आज काल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. म्हणजे तो पाल्य शाळेत इंग्रजी शिकणार, मित्रांशी इंग्रजीत बोलणार, घरी आईला बाबांशी इंग्रजीत बोलणार, आज्जी आजोबांकडून कौतुक होणार - मग तो मोठा झाल्यावर आपल्या पाल्याला पण इंग्रजी शाळेत घालणार मग एक पिढी तयार होणार जी संपूर्णपणे इंग्रजीवर वाढलेली असेल. मग मराठी मरेल नाही तर काय? आपला पाल्य स्पर्धेच्या युगात मागे राहील ह्या भीतीने पालक अस करतात. अस सतत भीतीने गोष्टी करत राहिलो तर एक दिवस आपण मातीत जाऊ. संत तुकारामांची गाथा आपण रोज पाण्यात बुडवत आहोत. मराठी शाळांची परिस्थिती पण चिंतेचा स्वतंत्र विषय आहे.

सांस्कृतिक राष्ट्रवाद वगैरे अस काही नसत - जग फार पुढे चाललय - आता संगणकाचा जमाना आहे. माझे काही मित्र. माझे हे मित्र खरतर अमेरिकेच्या / पाश्चात्य सांस्कृतिक राष्ट्रवादाला बळी पडतायत त्यांच्याच नकळत. संगणक आला म्हणून कुठल्या देशांनी आपली भाषा सोडली? उत्तर : "भारत". जपान चीन छोटे छोटे युरोपियन देश ह्यांनी संगणकात आपली भाषा वापरायला सुरुवात केली. माझा स्विस ग्राहक जर्मन मधून आउटलूक वापरतो. आम्ही तर मराठीच सोडली मराठीतून आउटलूक काय वापरणार.

मला माहिती आहे हे काही सोप काम नाही. आपल्याला कित्तेकदा पर्यायी मराठी शब्द आठवून सुद्धा सापडत नाहीत तिथे मराठीतून उच्च शिक्षण म्हणजे अवघड काम आहे. पण त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. २०-२५ वर्षानंतर कदाचित ते प्रयत्न फळाला येतील. पण मला हि दिशा महत्वाची वाटते. काही जण म्हणतील हे इंग्रजी हिंदी शब्द मराठीत नवीन भर आहे आणि ह्यांनी भाषा समृद्ध होते. मला तस नाही वाटत. add हा शब्द मराठीत भर आहे का? शब्द उच्चारल्या नंतर मेंदूत अर्थ स्पष्ट होतो तेंव्हा तो मराठी असतो का? मी भाषा शात्रज्ञ नाही पण मला तस वाटत नाही. हं कदाचित अजून काही वर्षानंतर हा शब्द पूर्णपणे मराठी वाटायला लागेल. तस पाहिलं तर मराठीत नवीन शब्दांची भर पडत नाही हेच खर. ऑक्सफर्ड जस नवीन शब्दांची भर घालून शब्दकोश काढतो तसं मराठीत नवीन शब्दांची भर पडली आहे का? स्वा. सावरकरांनी नवीन मराठी शब्दांची भर घातली होती त्यानंतर कोणी अस केल्याच ऐकिवात नाही. मुळात भाषेचा वापर कमी होत असेल, ती प्रवाही नसेल तर तिच्यात नवीन शब्दांची भर पडणार कशी. अमेरिकेतल्या अनेक चांगल्या विनोदी मालिकांमध्ये शब्दांची जादू, नवीन शब्दांची रचना, परिस्थितीत शब्दांच्या विशिष्ट मांडणीतून निर्माण होणारा विनोद पाहायला मिळतो. पुलं एकदा म्हणाले होते अत्र्यांच्या साहित्यातली मराठी भाषा हा डॉक्टरेट करण्याचा स्वतंत्र विषय आहे.

आता मात्र माझे मित्र फुटतात. महाराष्ट्रात मराठी, कर्नाटकात कानडी राजस्थानात राजस्थानी भाषा चालतेय वाढतेय आणि अनिवार्य आहे...प्रत्येक राज्य आपल्या भाषा संस्कृतीने वाढतंय हि गोष्टच त्यांना पटत नाही ...म्हणजे आपण चक्क देशाची फाळणी करतोय अस त्यांना वाटत. एका मित्राला जेंव्हा मी सांगितला कि हिंदी राष्ट्र भाषा नाही, हिंदी आणि मराठीला संविधानात एकच दर्जा आहे तेंव्हा ते त्याला पटलं नाही. जेंव्हा संविधान दाखवलं मग पटलं, पण म्हणतो कसा - गेल्या साठ वर्षात आपण एक राष्ट्रभाषा बनवू शकलो नाही ....लाज वाटायला पाहिजे आपल्याला.

आपला देश एक खंडप्राय देश आहे, इथली एक एक राज्य स्वतंत्र देशाच्या क्षमतेची आहेत, तेंव्हा आपापल्या भाषा संस्कृतीच्या पायावर उभे राहून एकमेकांशी व बाहेरील देशांशी व्यापार उद्दीम करून ते विकसित होऊ शकतात आणि खरतर तेंव्हाच भारत पण विकसित होईल हे पटायला एवढ अवघड का आहे? आपली भाषा संस्कृती बाळगली तर ती देशाच्या व इतर राज्यांच्या विरोधात जाण्यासारखं आहे आणि मग देशाची फाळणी होईल ह्या भीतीत आणि भ्रमात आपण किती दिवस राहणार? विविधतेत एकता जे आपण म्हणतो ते कित्ती वरवरच आहे आणि आपल्यालाच त्यावर कसा विश्वास नाही हे ह्यानिमित्ताने कळत. भारत हा जगातील एक विलक्षण देश आहे जिथे एवढी विविधता आहे. हे वास्तव मान्य करू, हि विविधता टिकवू, वाढवू, आपापल्या राज्यात आपापली संस्कृती ह्या सोप्या तत्वाने त्यातील संघर्ष मिटवू आणि जेंव्हा एक एक राज्य आपल्या उच्चतम क्षमतेला पोहंचेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने भारत महान असेल हे पटायला का एवढ अवघड आहे? मग नाही आम्हाला राष्ट्र भाषा - कुठे बिघडलं...राष्ट्र भाषा नाही म्हणजे आमची एकता अखंडता धोक्यात येते? मी जर मराठी नसेल तर मी भारतीय राहू शकतो का? माझं भारतीय असणं माझ्या मराठी असण्याशी संलग्न आहे. मराठी, कानडी, गुजराती, बिहारी अश्या अनेकविध ओळखीतूनच भारतीय ओळख तयार होते. आपण वेगळे झालो तर संपलो हे आपण इतिहासातून शिकलोय. पण आपण भाषिक सांस्कृतिक मुस्कटदाबीने संघर्षाने एकत्र राहिलो तर मूळ उद्देश्यालाच हरताळ फसल्यासारख होईल.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुद्याकढे मी परत वळतो. आपल्या देशात संघराज्य व्यवस्था (Federal) केंद्राकडे झुकणारी आहे. आणखीन एका फाळणीच्या भीतीने तसं केल गेल होत. पण हि भीती अजूनही आपल्यात आहे हेच दिसत. हि भीती काढून टाकून आपण खऱ्या अर्थाने संघराज्य निर्माण केलं पाहिजे ज्यात वर उल्लेखिलेल्या विचारांचा अंतर्भाव असेल.

उठता बसता अमेरिकेची उदाहरण देणाऱ्या माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो कि अमेरिकेची संघराज्य व्यवस्था इतकी मूलगामी आहे कि त्यांच नावच मुळी अमेरिकी संघराज्य अस आहे. आपल्याही देशाच नाव भारतीय संघराज्य अस आहे पण आपल्याला प्रजासत्ताक असल्याचा इतका टेंभा आहे कि आपण संघराज्य आहोत हे विसरतो. अमेरीकेचे सार्वभौमत्व (ज्याला इंग्रजीत Sovereignity म्हणतात) ते त्यांच्या राज्यात विभागून आहे. म्हणजे अमेरिकेची राज्य सार्वभौम आहेत. त्यांना स्वताःच संविधान आहे आणि प्रत्येक राज्याच स्वताःच सर्वोच्च न्यायालय पण आहे. अर्थातच केंद्र सरकारच्या संविधान आणि कायद्या विरोधात राज्य सरकारांना जाता येत नाही. आपल्या कडे संयुक्त सूची बद्दल केंद्राला शेवटचा अधिकार दिलेला आहे तर अमेरिकेत संविधानात नमूद नसलेले अधिकार राज्य सरकारांसाठी राखीव ठेवलेले आहेत. अमेरिकेत रोजच्या जीवनाशी संबधित कायदे हे मुख्यत्वे करून राज्य सरकारांची आहेत.

मला वाटत मला काय म्हणायचं आहे ते मी मांडलय. तुम्ही जरूर आपले विचार अभिप्राय नोंदवा. कोणाकडे अधिक माहिती असल्यास अवश्य लिहा. कोणाला आवडला नसल्यास आणि वेगळा युक्तिवाद असेल तर ते हि जाणून घ्यायला आवडेल.

धन्यवाद!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

गुलमोहर: 

>>> Bilingual children . . . are . . . socially more tolerant.

वरील दाव्याला छेद देणारी वस्तुस्थिती . . .

गेल्या काही दिवसांत, संतापाचा उद्रेक होऊन अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन असभ्य व अर्वाच्य लेखन केल्यामुळे अ‍ॅडमिनने ज्या ज्या आयडींची हकालपट्टी केली, ते सर्वजण Multilingual आहेत.

http://www.scert.kerala.gov.in/2011pdf/english_medium/socialI/Unit%2009.pdf

पान ८ पहा. शिक्षणातज्ज्ञांची मते त्या दस्त-ऐवजांमध्ये आहेत. अर्थात कोणी व्यक्ती स्वतः चालवत असलेल्या शिशुविहारात (शिकण्यासाठी) अशा शिक्षणतज्ञांना प्रवेश न देण्याचे स्वातंत्र्य आहे.

>>गेल्या काही दिवसांत, संतापाचा उद्रेक होऊन अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन असभ्य व अर्वाच्य लेखन केल्यामुळे अ‍ॅडमिनने ज्या ज्या आयडींची हकालपट्टी केली, ते सर्वजण Mullingual आहेत.

हा षटकार आयपीलमधे ठोकल्या जाणार्‍या षटकारांच्या वरताण आहे Proud

महाराष्ट्रात मराठी न शिकता हिंदी शिका अशी सक्ती केलेली नाही. लहान मुले एकापेक्षा जास्त भाषा सहज शिकू शकतात, तेव्हा मातृभाषेच्या जोडीला अन्य भाषा मुलांनी शिकणे शिक्षणतज्ञांना योग्य वाटते. बरीच मुले शाळेत जायच्या वयापूर्वीच एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकतात (हे प्रत्यक्ष पाहिले आहे).
स्वातंत्र्यापूर्व काळात हिंदी आणि उर्दू या सारख्याच भाषा होत्या. दोन्ही भाषांसाठी देवनागरी व फारसी लिपी वापरली जायची. (बहुधा या भाषेला खडी बोली म्हणत). गेल्या पन्नास-साठ वर्षांत sanskitization मुळे हिंदी व अनेक भारतीय भाषा अवजड आणि अवघड झाल्या आहेत; असेही मत वाचायला मिळाले.

महाराष्ट्रातले सगळेच लोक मल्टी लिंग्वल आहेत.. इथल्या आय डीं चं काय घेऊन बसलात? कुणी अडचणीत आणनारा प्रश्न विचारला की असे काहीतरी डायलॉग टाकून विषयाला बगल द्यायची.

शाळेत जर सदाशिव पेठी मराठीत दहा वर्षे घोकमपटी चालते तर कोकणातले लोक कोकणी का बोलतात? त्याना कोकणी कोणत्या शाळेत शिकवले जाते? शाळेत तर तसे संस्कृतही शिकवतात.. मग मराठी लोक आपापसात संस्कृत का बोलत नाहीत?

>>स्वातंत्र्यापूर्व काळात हिंदी आणि उर्दू या सारख्याच भाषा होत्या. दोन्ही भाषांसाठी देवनागरी व फारसी लिपी वापरली जायची. (बहुधा या भाषेला खडी बोली म्हणत). गेल्या पन्नास-साठ वर्षांत sanskitization मुळे हिंदी व अनेक भारतीय भाषा अवजड आणि अवघड झाल्या आहेत; असेही मत वाचायला मिळाले.

हांगाश्शी!! आत्ता चर्चा कुठे वळवायची आहे ते समजलं Wink
रच्याकने, कुठे वाचायला मिळालं हो? Lol

रच्याकने, हिंदी आणि मराठी दोन्ही संस्कृतपासूनच उद्भवल्या आहेत (हे माहित आहे का?). त्यामुळे त्यांच्यावर संस्कृतचा प्रभाव असणारच. कैच्याकै आपलं.

जामोप्या,मुद्दे संपले (मुळात असतात कधी?) की वैयक्तिक पातळीवर येऊन चिखलफेक करायची सवय जुनी आहे.
मायबोलीवर कोकणी, खानदेशी, मालवणी अशी गप्पांची पाने आहेत. जनगणनेत 'आम्हाला संस्कृत लिहिता-बोलता येते' असे छाती ठोकून सांगणार्‍यांनी इथे संस्कृत गप्पांचे एक पान सुरू करावे म्हणजे मलाही पुन्हा संस्कृत शिकता येईल असे मी चांगुलपणाने सांगितले त्याला एक वर्ष झाले. गेल्याच आठवड्यात एका सदस्याने संस्कृत श्लोकाचा अर्थ विचारला तेव्हा तिथे किती लोकांनी अर्थ लावायचा प्रयत्न केला?
क्रियेवीण वाचाळता....

नारायण, नारायण

जामोप्या व भरत मयेकर या दोन मानवांचे असे चालले आहे की.....

उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि
परस्परं प्रशंसयंते, अहो रूपं अहो ध्वनि

इथे संस्कृत गप्पा? हे मराठी संकेतस्थळ असल्याचे ऐकिवात होते Light 1

मं.जो. मराठी भाषेच्या उगमाबद्दल एक अभ्यासपूर्ण लेख मायबोलीवरच उपलब्ध आहे. शोधा, वाचा, जमलं तर समजून घ्या.
वर लिहिलेल्याचे संदर्भही शोधा म्हणजे सापडतील.
गंगाजमनी तहजीब/संस्कृती म्हणजे काय तेही शोधा.
हिंदी-उर्दू यांचे मिश्रण असलेल्या हिंदीच्या रूपाला हिंदुस्थानी असेही म्हणतात.

रच्याकने, हिंदी आणि मराठी दोन्ही संस्कृतपासूनच उद्भवल्या आहेत (हे माहित आहे का?). त्यामुळे त्यांच्यावर संस्कृतचा प्रभाव असणारच. कैच्याकै आपलं.

हिंदीबाबत तुमचे विधान खरे नाही.

>>> मुद्दे संपले (मुळात असतात कधी?) की वैयक्तिक पातळीवर येऊन चिखलफेक करायची सवय जुनी आहे.

मी माझ्या आधीच्या प्रतिसादात जे लिहिले त्यात कोणतीही वैयक्तिक चिखलफेक नाही. असल्यास दाखवून द्या. 'बहुभाषिक असल्याने सामाजिक सोशिकता येते' हा निष्कर्ष फारसा बरोबर नाही हे सांगण्यासाठी कोणाचेही नाव न घेता व एकही असभ्य वा अर्वाच्य शब्द न वापरता मी वरील वाक्य लिहिले होते. त्यात तुम्हाला झोंबण्यासारखे काय वाटले हे समजले नाही.

बादवे, कोणकोण वैयक्तिक चिखलफेक करत होते / करतात आणि त्यामुळे कोणकोणत्या आयडींना इथून अ‍ॅडमिनने हाकलून लावले हे तुम्हाला माहित असेलच.

बहुभाषिकता आणि सामाजिक सहिष्णुता यांच्यातल्या संबंधांचे अनुमान तज्ज्ञ मंडळींचे आहे. ते प्रत्येकाने पटवून घेतले पाहिजे असे नाही. गेल्या पानापर्यंतची चर्चा तात्विक, त्रयस्थ पातळीवर चालली होती. मायबोलीवरील आयडींचा उल्लेख करून या दोन्ही पातळ्या सोडल्या. माझा स्वतःचा उल्लेख कशाला व्हायला हवा?
आपण स्वतः बहुभाषिक नाही आहात का? परदेशवास्तव्यात मराठीच बोलायचात का? हे प्रश्न अत्यंत नाईलाजाने विचारीत आहे.

मराठीचा उगम-उत्पत्ती यांबद्दलच्या लेखाची लिंक मंजों यांच्यासाठी.
http://www.maayboli.com/node/10993

आणि समजा काही आय डी झालेत डिलिट, तरी मायबोलीवरील एका आय डीचे उदाहरण दाखवून एका संशोधनाचा अख्खा निष्कर्षच खोटा आहे म्हणून कोलाहल माजवायचा, मास्तुरे, याला सहिष्णुता म्हणतात काय हो? Proud

>>> आपण स्वतः बहुभाषिक नाही आहात का?

आहे

>>> परदेशवास्तव्यात मराठीच बोलायचात का?

परदेशी असताना, घरात व महाराष्ट्रीय मित्रमंडळींशी पूर्णपणे मराठीतच बोलायचो. सिंगापूरला वर्षभर असताना बरेच सहकारी तामिळ होते. त्यांच्याकडून अनेक तामिळ शब्द व १५-२० वाक्ये शिकलो. त्यांच्याबरोबर तामिळ चित्रपटसुद्धा बघितले (फारसे समजत नसताना). दुसर्‍या ठिकाणी जाऊन अट्टाहासाने मी माझीच भाषा बोलणार, तुमची भाषा शिकणारच नाही, तुम्ही तुमच्या राज्यातसुद्धा माझ्याच भाषेत बोलले पाहिजे आणि माझ्या राज्यातही माझ्याच भाषेत बोलायचे अशी माझी प्रवृत्ती नाही.

>>>> हे प्रश्न अत्यंत नाईलाजाने विचारीत आहे.

त्यात कसला तुमचा नाईलाज झाला?

>>> गेल्या पानापर्यंतची चर्चा तात्विक, त्रयस्थ पातळीवर चालली होती.

हे पूर्णांशाने खरे नाही. अनेक प्रतिसादात वैयक्तिक टीका आहे (आणि ती टीका मी केलेली नाही). पहिल्या पानापासून वाचून बघा.

>>> मायबोलीवरील आयडींचा उल्लेख करून या दोन्ही पातळ्या सोडल्या. माझा स्वतःचा उल्लेख कशाला व्हायला हवा?

तुमचा किंवा इतर कोणत्याही आयडीचा मी वैयक्तिक उल्लेख एकाही प्रतिसादात केलेला नाही किंवा वैयक्तिक उल्लेख करून पातळी सोडलेली नाही. किंबहुना एकाही प्रतिसादात मी पातळी सोडलेली नाही. असल्यास दाखवून द्या.

<वरील दाव्याला छेद देणारी वस्तुस्थिती . . .

गेल्या काही दिवसांत, संतापाचा उद्रेक होऊन अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन असभ्य व अर्वाच्य लेखन केल्यामुळे अ‍ॅडमिनने ज्या ज्या आयडींची हकालपट्टी केली, ते सर्वजण Multilingual आहेत.> हे वाक्य त्रयस्थ आणि तात्त्विक पातळीवरचे आहे असे तुमचे म्हणणे असल्यास त्यावर बोलण्यासारखे काही नाही.
शुभेच्छा.

>>> वाक्य त्रयस्थ आणि तात्त्विक पातळीवरचे आहे असे तुमचे म्हणणे असल्यास त्यावर बोलण्यासारखे काही नाही.

"Bilingual children . . . are . . . socially more tolerant." हा तुम्ही दिलेला निष्कर्ष वस्तुस्थितीला धरून नाही आणि असा दावा करण्यासाठी कोणताही ठोस आधार नाही हे सिद्ध करण्यासाठी ते वाक्य मी लिहिले होते. ते व्यक्तिगत नव्हतेच आणि ते कोणा एका विशिष्ट व्यक्तीलासुद्धा उद्देशून नव्हते. त्या वाक्यात कोणत्याही व्यक्तीचा नावानिशी उल्लेख नाही आणि चिखलफेक तर नाहीच नाही.

गेल्या २ आठवड्यात १०-१२ आयडींची असभ्य लिखाणामुळे हकालपट्टी झालेली आहे. इथून हाकलून लावले तरीसुद्धा त्यातले काही आयडी वेगळ्या आयडीने परत आले आहेत. हे सर्वजण बहुभाषिक आहेत/होते पण तरीसुद्धा ते "socially intolerant" आहेत/होते हे दाखविण्यासाठी मी ते वाक्य लिहिले होते. हे तुम्हाला समजले असावे अशी अपेक्षा आहे.

बादवे, तुम्ही ज्या व्यक्तीची इथे पाठराखण करून मला नावे ठेवत आहात त्या व्यक्तिने मागील काही प्रतिसादात माझ्याबद्दल नावानिशी काय उद्गार काढले आहेत त्याची फक्त २ उदाहरणे पहा.

"पण इतकं करुनही यु पी बिहार कर्नाटकात तीन भाषा शिकत नाहीत , म्हणून आंधळ्या लोकांचा थयथयाट चालूच आहे.."

"तुमचे पोट सदाचेच दुखरे आहे. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तर आनंदात रहाणार नाही."

आणि हे तुमचे वाक्य - "मुद्दे संपले (मुळात असतात कधी?) की वैयक्तिक पातळीवर येऊन चिखलफेक करायची सवय जुनी आहे."

आता कोणाचे मुद्दे संपले आणि कोण वैयक्तिक पातळीवर येऊन चिखलफेक करत आहे हे तुम्हीच ठरवा. तुम्हाला या दोन उदाहरणात व अशासारख्या अनेक प्रतिसादात अजिबात वैयक्तिक चिखलफेक दिसली नाही आणि माझ्या "गेल्या काही दिवसांत, संतापाचा उद्रेक होऊन अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन असभ्य व अर्वाच्य लेखन केल्यामुळे अ‍ॅडमिनने ज्या ज्या आयडींची हकालपट्टी केली, ते सर्वजण Multilingual आहेत.
"
या वाक्यात (ज्याच्यात एकही असभ्य शब्द नाही किंवा कोणाचाही नावानिशी उल्लेख करून त्या व्यक्तीवर वैयक्तिक चिखलफेक केलेली नाही) मात्र तुम्हाला वैयक्तिक चिखलफेक दिसली ! Uhoh

कदाचित वैयक्तिक चिखलफेकीचे तुमचे आणि इतरांचे निकष वेगळे असावेत. त्याचप्रमाणे तुम्ही कोणाची पाठराखण करावी व का करावी आणि कोणाला नावे ठेवावी व का नावे ठेवावी ही तुमची वैयक्तिक पसंती आहे.

असो. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा!

मास्तुरे, इतर राज्यात तीन भाषा शिकत नाहीत, हे विधान तुम्ही किती तरी ठिकाणी लिहिले आहे. मी वेगळ्या वेगळ्या राज्यांच्या दहावीच्या पेपरच्या तारखा दिल्या त्यावरुन तिथे ३ भाषा असतात हे स्पष्ट आहे. तुमचा रोख मुख्यतः यु पी बिहार कर्नाटक याकडे होता.. या सगळ्या राज्यात तीन भाषा आहेत, हे मी दाखवून दिले. या तीनच नव्हे झारखंडचेही टाइम टेबल दिले. पण तरीही तिथे दोनच भाषा असतात , हे तुमचे पालुपद तुम्ही चालूच ठेवलेत, म्हणून मला वाटले की काही लोकाना या लिंक दिसल्या नसतील. म्हणून मी त्याना आंधळा हा शब्द वापरला. हा तुम्हाला व्यक्तीशः उद्देशून नाही. आता तुम्ही तुमचा समावेश त्या शब्दात करणार असाल तर तो तुमचा प्रश्न.

ज्यांचे आठवीला संस्कृत / हिंदी/ कन्नड/ उर्दु कोणतीही भाषा असेल त्यानाच अकरा बाराला ती भाषा मिळू शकते. एकदम ११ वीला संस्कृत घेता येत नाही.. अर्थात विद्यार्थ्याने जिद्द दाखवली तर कॉलेज तसे देतेही, पण शक्यतो नाहीच. ११, १२ ला जी भाषा असते, तीच भाषा पुढे पदवीला घेता येते ( म्हणजे त्या भाषेत बी ए, एम ए करता येते.) .. आता तुम्ही महाराष्ट्रात दोनच भाषा ठेवा म्हणून पालुपद लावले आहे, दहावी अखेर जर ती भाषा नसेलच तर महाराश्ट्रातील पोरानी संस्कृत, हिंदी, किंवा इतर भाषात पदवी कशी घ्यायची, हे सांगू शकाल? का बारावीनंतर पदवीला एकदम तो विषय घेतल्यावर कोण 'संघवाले' त्याना घरी जाऊन नवीन भाषेचे गमभन शिकवणार आहेत? त्यामुळे पाचवी पासून, आठवी पासून ती भाषा संबंधिताला अभ्यासावीच लागते.

लोकशाही आहे. कुणीही कशालही विरोध करावा, हे मान्य. पण निदान विरोध हा पूर्व ग्रहदूषीत नसावा आणि क्रिएटिव असावा.

त्यातूनही तुम्हाला हिंदी नकोच असेल, तर एक खुशखबरी.. आठवी पर्यंत मुलाला नापास करु नये असा सरकारी फतवा आहे.. ज्याला हिंदी नकोच आहे, त्याने हिंदीचे पुस्तकही विकत घेऊ नये,वर्गात हिंदीच्या तासाला कानात बोळे घालून बसावे. पेपरही लिहू नये, तो नापास होत नाही. आठवीला त्याने मग संस्कृत घ्यावे. Happy त्यामुळे आता तरी महाराष्ट्रात हिंदी सक्तीचे आहे, असा गळा काढू नका... महाराष्ट्रात आठवी पर्यंत काहीच सक्तीचे नाही... नुस्त्या हिंदीचं काय घेऊन बसलाय?

( आणि हे बोळेही तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही... खाकी चड्डीवाले लोक वर्षातून एकदा राष्ट्रीय रक्षा बंध्न साजरे करतात, त्यावेळी लहान गोंडे वाटतात. कलरही तुमचा आवडता.. त्यातले दोन घेतलेत तर दोन्ही कानात व्यवस्थीत बसू शकतील. )

केरळातही तीन भाषा आहेत. http://www.corporatetoday.org/2012/02/keralapareekshabhavanin-kerala-ssl...

ओरिसा तीन भाषा http://incredibleorissa.com/en/hsc-orissa-exam-timetable-2012-matric-exa...

फक्त बंगाल आणि तमिळनाडूत दोन भाषा आहेत.

आपले मुद्दे खोटे पडले म्हटल्यावर सगळे पळाले.

काश्मीर ते केरळ हा एक देश आहे.
कुणीही कुठेही जावे आणि आनंदात रहावे.
भाषा वेगळी असली तरी धारा एक आहे. मराठी मनुष्य भिमरुपी म्हणेल, बिहारी मनुष्य हनुमान चालिसा म्हणेल... त्याच्यावर तु मराठीतच बोल ही सक्ती कशाला? तुम्ची भाषा तुम्ही टिकवा, त्याची तो टिकवेल.

प्रादेशिकता प्रादेशिकता करत नाचणारे पक्ष फार काळ टिकत नाहीत.

सहमत

Pages