आमचा आबा,
आयुष्याच्या रिएलिटी शो मध्ये आला
तेव्हा घेतली नव्हती त्याची दखल कुणी.
नांगरावरच्या त्याच्या घोगर्या गाण्याला
कधीच दिली नव्हती कुणीही खच्चून दाद…
त्याच्या रांगड्या गावरान स्टाईलचं
तसं नव्हतंच कुणालाही लटकं कौतुक,
आणि त्याचा तिखट शिवराळ भाषेबद्दल
कुठल्याच परिक्षकांत झाले नव्हते वाद…
वांझोटी जमीन, पावसाच्या नाना कळा,
बबडीचं लगीन आन बारक्याची शाळा,
म्हातारीचा दमा, लाईटीच्या येळा…
कोरडी ठाक विहिर आन कर्जाच्या झळा..
नियतीच्या प्रत्येक कठीण फेरीला
तो झुंजतच राहीला आरपार.
पडत राहीला, उठत राहीला
तरी लढत राहीला झेलत मार.
पण आपल्या जखमांचं भांडवल करून
कधी बघ्यांच्या पायाशी रडला नाही…
दुष्काळाच्या एपिसोडला त्यानं राहावं तगून
म्हणून एसएमएस चा कृपाळू पाऊस
त्याच्यासाठी कधीच पडला नाही.
त्याची लाडाची बैलजोडी,
दावणीची सावळी गायवासरं…
सोनंनाणं आन घरादारामागोमाग
एकेक करून सारी वावरं,
अशा सगळ्या लाईफलाईनी संपल्यावर
हळहळलं नाही बघणारं कुणी…
आणि पारावरती फास घेऊन
या शो मधून एलिमिनेट होताना,
आलं नव्हतं अगदी टिपू्सभरही
कुठल्याही महागुरूंच्या डोळ्याला पाणी…
~
तुम्हाला म्हणून सांगतो…
या सिझनला विजयी झालेला
तो चमचमत्या कपड्यातला तरूण,
जरी होर्डिंगवर बेगडी हसत उभा होता,
वास्तवाच्या या वाहिनीवरचा
खरा आयडॉल आमचा आबा होता…
वा ! ___/|\___
वा !
___/|\___
हायक्लास!!
हायक्लास!!
त्रिवार सलाम !
त्रिवार सलाम !
सुरेख...!!!
सुरेख...!!!
अप्रतिम.....
अप्रतिम.....
काय मांडल आहे वास्तव! शब्दात
काय मांडल आहे वास्तव!
शब्दात ताकद आहे तुमच्या.
अंगावर शहारा आला.
सह्ही......
सह्ही......
काय मांडल आहे वास्तव! शब्दात
काय मांडल आहे वास्तव!
शब्दात ताकद आहे तुमच्या.
अंगावर शहारा आला. >>>>>> अनुमोदन.
म स्त !
म स्त !
वा! सुरेख!
वा!
सुरेख!
अफाट....
अफाट....