भारतीय दर्शने आणि तत्वज्ञान मंत्रमहात्म्याने खचाखच भरलेली आहेत .मंत्रोच्चार हा कर्मकांडांचा कणा आहे असे म्हण्टले तर वावगे ठरणार नाही. मंत्रशक्तीची भलामण करण्यासाठी खालील स्पष्टीकरणे दिली जातात.
1)मंत्रोच्चाराने वातावरण शुद्ध आणि पवित्र होते.
2) मंत्रोच्चारातील ध्वनीस्पंदने दुर अंतरावर सुष्ट परीणाम घडवुन आणतात.
3) विशिष्ट देवतेचे विशिष्ट मंत्र असतात त्यांचा ठरावीक वेळेला जप केल्यास वैयक्तीक पातळीवर सुखशांती लाभते.
4) मंत्रशक्तीने पाऊस पाडता येतो, दुष्काळ दुर होतो ,मृत्युवर विजय मिळवता येतो.
5)गुरुने दिलेला गुरुमंत्र मोक्षप्राप्ती मिळवुन देतो.
6) विशिष्ट मंत्राची ध्वनीफीत मंद आवाजात घरात लावावी भूते पिशाच्चे पळुन जातात .
मंत्रोच्चाराचे सामर्थ्य ठसविण्यासाठी वरील स्पष्टीकरणे कमीअधिक प्रमाणात नेहमी दिली जातात.इथे एक गोष्ट लक्षात येईल कि वरील स्पष्टीकरणे बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर वा शास्त्रिय कसोट्यांवर फोल ठरतात कारण त्या स्पष्टीकरणांचा कार्यकारणभाव सांगितला जात नाही किंवा सांगता येत नसावा.यावरुन असे लक्षात येईल की शास्त्रिय दृष्टीकोनातुन मंत्रवाद खोटा ठरतो. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव देता येत नाही असा विश्वास असणारे मात्र मंत्रशक्तीवर विश्वास ठेवतातच .
इब्लिस | 21 October, 2012 -
इब्लिस | 21 October, 2012 - 21:48 नवीन
हे मन्त्र आहेत?
खरच गावला जायचं असेल तर मी पत्ता सांगतो
मंत्रोच्चारात सामर्थ्य असतं
मंत्रोच्चारात सामर्थ्य असतं का?
असेल किंवा नसेल.म्हणायला आवडतं म्हणून म्हणावं.
धागा धार्मिक ग्रूपात असल्याने सामर्थ्य आहे हे मान्य करावं.सार्वजनिक ग्रूपात आल्यास दोन्ही बाजूंनी वादविवाद करता येईल.
वोक्के @ सातीबेन
वोक्के @ सातीबेन
हरिहर्/टुनटुन, धन्यवाद
हरिहर्/टुनटुन, धन्यवाद
डोकं शांत राहण्यासाठी /
डोकं शांत राहण्यासाठी / ठेवण्यासाठी काही उपासना (सोपी), मंत्र माहित असल्यास इथे द्या प्लीज.
अर्पणा | 23 October, 2012 -
अर्पणा | 23 October, 2012 - 16:08
डोकं शांत राहण्यासाठी / ठेवण्यासाठी काही उपासना (सोपी), मंत्र माहित असल्यासइथे द्या प्लीज.>>>>||ॐ धरः धरीपत्ते धृतम च अवषः परी मंडं च लिप्तती|| हा दाससंप्रदायात एक मंत्र आहे, रोज सकाळी स्नान करताना याची आव्रतने केल्यास राग ,नैराश्य याच्यावर ताबा राहतो असे म्हणतात.(हा मंत्र फक्त स्नान करताना मनातल्या मनात म्हणावा ,पथ्य न पाळल्यास आपल्यालाच विपरीत फळ देतो)
विसु- मी स्वतः याच्यावर जास्त विश्वास ठेवत नाही परंतु ज्यांना अनुभव आहे त्यांचकडुन हा मंत्र ऐकला.
>>> डोकं शांत राहण्यासाठी /
>>> डोकं शांत राहण्यासाठी / ठेवण्यासाठी काही उपासना (सोपी), मंत्र माहित असल्यास इथे द्या प्लीज. <<<<
"खं(म्)" हा एकाक्षरी मंत्र उपयोगी पडेल.
हा उच्चारताना, छातीत (वरील अर्ध्याभागात) हवा भरुन घेण्याऐवजी, छातीसहीत पोटातही (खालील अर्धा भाग फुगवुन) हवा भरुन मग उच्चारल्यास अधिक उपयोगी ठरतो.
मूळात हा मंत्र कोणतीही भिती घालविण्यासाठी उपयोगी आहे. मात्र डोकेही तेव्हाच अशांत होते, जेव्हा मूलतः अशान्तीच्या कोणत्याही कारणामागे सूप्त दडलेली भिती हेच कारण असते. सबब हा मंत्रही उपयोगी पडतो असा स्वानुभव आहे.
<<डोकेही तेव्हाच अशांत होते,
<<डोकेही तेव्हाच अशांत होते, जेव्हा मूलतः अशान्तीच्या कोणत्याही कारणामागे सूप्त दडलेली भिती हेच कारण असते + १
धन्यवाद लिंबूटिंबू मी नक्की करून पाहिन, अनुभव इथे लिहिन २ - ३ महिन्यांनी.
यदक्षरपदभ्रष्टं असे पूर्ण
यदक्षरपदभ्रष्टं असे पूर्ण सामासिक पद आहे.
अदक्षरं पदं भ्रष्टं असे नाहिये.
डांबीस देविचे कुठलेही स्तोत्र
डांबीस देविचे कुठलेही स्तोत्र पण विशेषता सप्तशती वगैरे म्हटल्यावर हे म्हणावे किंवा दररोज पूजा झाल्यावर एकदा म्हणावे.>>>
मी ही ओळ "डांबीस देवि"चे अशी वाचली.
नंतर नीट वाचल्यावर अर्थ लागला.
> डोकं शांत राहण्यासाठी /
> डोकं शांत राहण्यासाठी / ठेवण्यासाठी काही उपासना (सोपी), मंत्र माहित असल्यास इथे द्या प्लीज.
कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास त्याने डोके शांत राहण्यास मदत होते - यात व्यायाम, लिखाण, बागकाम वगैरे सुद्धा चालेल
कोणतीही गोष्ट सातत्याने
कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास त्याने डोके शांत राहण्यास मदत होते - यात व्यायाम, लिखाण, बागकाम वगैरे सुद्धा चालेल>>>> अनुमोदन
चालणे ,संथ गतीने टु व्हीलर चालवणे ,कार स्लो मोशनमध्ये चालवणे या गोष्टींनी रीलॅक्स वाटते ,करुन बघा.
पाळीव प्राण्यांशी खेळणे, चिमण्या वगैरे पक्ष्यांना खायला टाकणे, एखादी वस्तु दुरुस्त करत बसणे हे ही रीलॅक्सींग असते.
अर्पणा, त्याव्यतिरिक्त अजुन
अर्पणा, त्याव्यतिरिक्त अजुन एक एकाक्षरी मन्त्र आहे.
"गं"
मात्र याचा उच्चार करताना, पुढे म् लावायचा नाही (म कडे वा कोणत्याच अन्य अक्षराकडे उच्चार वळला नाही पाहिजे), त्याकरता उच्चार करताना ओठ मिटायचे नाहीत, तोंड अर्धवट उघडेच ठेवायचे (ते रहातेच तसे) व केवळ अन केवळ गं इतकाच एकाक्षरी शब्द स्वतःस ऐकु येईल इतपत उच्चारायचा, उच्चारताना, श्वास भरुन घ्यायचा व श्वास संपेस्तोवर गं चे उच्चारणाचे शेवटास तयार होणारा कंपनयुक्त नाद वाढवित न्यायचा.
माझ्या अनुभवानुसार, चित्त तत्काळ एकाग्र होतेच, पण शरिराकडे किंवा कंपनाकडे लक्षदिल्यासही लक्षात येते की "देहभावना" केवळ कानाचे वरील अर्ध्या मस्तकात केंद्रीत होते आहे.
मात्र विशिष्ट बैठक घेऊन विशिष्ट संख्या ठरवुन वगैरे मी केले नाहीये. तो प्रयोग स्वतंत्र करुन बघायचा आहे. वरील बाब मात्र कोणासहि केव्हाही करुन बघता येईल.
वरील उच्चारण ॐ च्या परिपूर्ण उच्चारणास सहाय्यभूत होऊ शकते, ॐ शी साद्धर्म्यही दर्शविते. किंबहूना, सामान्य माणसाकडून ॐ चा उच्चार सहजासहजी करवुन घेण्यास तर ॐ गं गणपतये नमः हा मत्र गजानन महाराजान्नी प्रसारित नाही ना केला असे वाटून जाते.
गं अथवा ॐ यांचे उच्चारणाचे वेळी तयार होणारी / जाणवणारी कंपने/नाद व एखाद्या उत्कृष्ट घंटेच्या नादातुन निर्माण होणार्या कंपन लहरी मधे साम्य आढळते, मला केवळ इतकाच फरक वाटला की वरील दोन बीजाक्षरे स्वतःची स्वतः म्हणून नादाचा अनुभव घेऊन एकाग्र होता येते, तर घंटेच्या बाबतीत नाद अन्य वस्तुतून निर्माण करुन, त्या नादाचे सहाय्य घेऊन मन एकाग्र होऊ शकते.
अर्थात घंटानादाचा मूळ उपयोग बराच भिन्न आहे, मला दोन्हीमधे साम्यस्थळ जाणवले ते केवळ मांडले.
Pages