मंत्रोच्चारात सामर्थ्य असते का?

Submitted by परमात्मा on 26 April, 2012 - 06:31

भारतीय दर्शने आणि तत्वज्ञान मंत्रमहात्म्याने खचाखच भरलेली आहेत .मंत्रोच्चार हा कर्मकांडांचा कणा आहे असे म्हण्टले तर वावगे ठरणार नाही. मंत्रशक्तीची भलामण करण्यासाठी खालील स्पष्टीकरणे दिली जातात.

1)मंत्रोच्चाराने वातावरण शुद्ध आणि पवित्र होते.
2) मंत्रोच्चारातील ध्वनीस्पंदने दुर अंतरावर सुष्ट परीणाम घडवुन आणतात.
3) विशिष्ट देवतेचे विशिष्ट मंत्र असतात त्यांचा ठरावीक वेळेला जप केल्यास वैयक्तीक पातळीवर सुखशांती लाभते.
4) मंत्रशक्तीने पाऊस पाडता येतो, दुष्काळ दुर होतो ,मृत्युवर विजय मिळवता येतो.
5)गुरुने दिलेला गुरुमंत्र मोक्षप्राप्ती मिळवुन देतो.
6) विशिष्ट मंत्राची ध्वनीफीत मंद आवाजात घरात लावावी भूते पिशाच्चे पळुन जातात .
मंत्रोच्चाराचे सामर्थ्य ठसविण्यासाठी वरील स्पष्टीकरणे कमीअधिक प्रमाणात नेहमी दिली जातात.इथे एक गोष्ट लक्षात येईल कि वरील स्पष्टीकरणे बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर वा शास्त्रिय कसोट्यांवर फोल ठरतात कारण त्या स्पष्टीकरणांचा कार्यकारणभाव सांगितला जात नाही किंवा सांगता येत नसावा.यावरुन असे लक्षात येईल की शास्त्रिय दृष्टीकोनातुन मंत्रवाद खोटा ठरतो. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव देता येत नाही असा विश्वास असणारे मात्र मंत्रशक्तीवर विश्वास ठेवतातच .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंत्रोच्चारात सामर्थ्य असते का?>>

नक्की असतं. कसे आणि कोणत्या भावनेने म्हटले आहेत त्यावर अवलंबून असतं. आईवडिलांच्या आशिर्वादात नसतं का सामर्थ्य? शब्दात सामर्थ्य असतं. त्यामुळे ते कधी, कुठे, आणि कसे वापरले आहेत त्यावर नक्कीच त्याचे परिणाम दिसतात. श्लोक, स्तोत्र पुष्कळदा मन शांत करायला नक्कीच उपयोगी पडतात. अर्थ समजावून घेऊन म्हटले तर नक्कीच फायदा होतो.

जागोमोहनप्यारे | 26 April, 2012 - 22:40 नवीन
ते परमात्मा आहेत. त्याना आई वडील काय माहीत?>>

जामोप्या, हे विधान वैयक्तीक आहे

(आणि म्हणुनच मी हासतो आहे)

Rofl

बेफिकिर, मी फक्त मित्र म्हणून तुम्हाला विनंती केली की तुम्ही विनोद करु नका जेणेकरुन बीबीचे रुप विनोदी होईल. तुम्ही गप्प बसा असं मी म्हणालो नाही. इथे ज्या विषयावर चर्चा सुरु आहे त्या विषयावर लिहिले की कुणीच काही म्हणू शकणार नाही. गैरसमज नको खरचं.

परमात्मा: समज नाही फक्त प्रेमानी विनंती करायची. नाही ऐकले की परत एकदा विनंती करायची. मग अजून नाही ऐकले की खाली लिहायचे "प्रिय प्रशासक, इथे ह्या बीबीवर नको त्या गप्पा रंगत आहेत. मला क्षमा असावी आपण हा बीबी कराल का? धन्यवाद, प्रशासक".

असे लिहिले की नक्की लोक बीबीचा विषय बदलणार नाही.

बेफिकिर, मी फक्त मित्र म्हणून तुम्हाला विनंती केली की तुम्ही विनोद करु नका जेणेकरुन बीबीचे रुप विनोदी होईल. >>

बी, बीबी विनोदीच आहे, फक्त मी गप बसलोय.

आस्तिक दृष्टीकोनातून विचार केल्यास मंत्र-विज्ञानाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असे मिळू शकेल ---=

१. मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो

२. ब्रेनवेव्ह साऊंड थेरपी नुसार विशिष्ट ध्वनिलहरी वर मन एकाग्र झाल्यास मेंदूच्या अवस्था बदलतात ,
म्हणजे १-४ हर्ट्झ डेल्टा,/ ५- ८ हर्ट्झ थिटा / ९-१२ हर्ट्झ अल्फा /१३-१६ हर्ट्झ बीटा .........इ.या मेंदूच्या अवस्थांचा मूड्स आणि स्वभावाशी जवळचा संबंध आहे .

३. मंत्र निर्माण करताना वरील ध्वनिलहरी शास्त्र /स्पंदन शक्ती आणि त्याचा मेंदूवरील परिणाम याचा अभ्यास केला गेलेला असावा.

५. मंत्राजपा बरोबरच संकल्प आणि उद्देश यांचाही विचार होतो. मंत्रजपा नंतर मन अधिक शक्तिशाली/ शांत व सूक्ष्म होते असा अनुभव आहे ,अशा सूक्ष्म मनाने ईश्वरी शक्तीशी लवकर तादात्म्य /तल्लीनता//तद्रूपता होऊ शकते .

६. सूक्ष्म आणि शक्तिमान मनातून निघणारे विचार प्रत्यक्षात येण्याची शक्यता जास्त असते ,संदर्भ -C W LEADBEATER- THOUGHT POWER

७. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मंत्राशाक्तीचे दिव्य अनुभव येत असावेत ,असं माझा कयास आहे, अधिक सखोल आणि सर्वंकष शास्त्रीय संशोधन होण्याची आवश्यकता आहे .

माता | 3 May, 2012 - 14:33
मनाच्या एकाग्रतेने केलेल्या प्रत्येक गोष्टीतसामर्थ्य असते .मग तो आशिर्वाद असो कि तळतळाट !>>>>>कोट्यावधी भारतीयांचे तळतळाट मुठभर इंग्रजांना लागण्यासाठी दिडशे वर्षं का लागावीत....

रेव्यु | 26 April, 2012 - 12:56
पूजा झाल्या वर 'यस्य स्मृत्याच नामोक्तः-------'हा साधा मंत्र नतमस्तक होवून म्ह्णा मग कळेल,मंत्रांचे सामर्थ्य अन ती अनुभूती!!!>>>> काय आहे या मंत्रात ?तुम्हाला कसला अनुभव आला आहे का?' त्रोटक उत्तरं देऊ नका ,या मंत्राने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला ते कळु दे ना सर्वांना.

जा मो प्या, बेफी, त्याला गाड याला गाड, पेशवा >>>>
परमात्म्याचा आय डी कधीच मोक्षाला गेला.>>>>>>>>>

अशक्य प्रतिक्रिया आहेत.

रेव्यु | 27 April, 2012 - 01:56
पूजा झाल्या वर 'यस्य स्मृत्याच नामोक्तः-------'हा साधा मंत्र नतमस्तक होवून म्ह्णा मग कळेल,मंत्रांचे सामर्थ्य अन ती अनुभूती!!!>>>> Biggrin Proud

सध्या शारदीय नवरात्र चालू आहे. त्यानिमित्ताने सायंकाळी देवीपुढे बसून ब्र. भू. शंकराचार्यकृत खालील प्रार्थना (श्रद्धापूर्वक) म्हणावी. आणि काही अनुभव आल्यास शेअर करावे, आले नाहीत तर तसे सांगावे. म्हणजे "हातच्या काकणाला आरसा नको!' ("आणि काही अनुभव आला नाही तर श्रद्धा कमी पडली असे समजावे.'' अशी खवाट प्रतिक्रिया कॉपीपेस्ट करण्यासाठी अगोदरच लिहून ठेवलेली आहे.) पण प्रयोग करून बघावयास काय हरकत आहे.

।।अथ देवीक्षमापनस्तोत्र ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया। दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्र्वरि।।1।।
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्‌। पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्र्वरि।।2।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्र्वरि। यत्पूजितं मया देवि परिपूर्णं तदस्तु मे।।3।।
अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत्‌। यां गतिं समवाप्नोति न तां ब्रह्मादयः सुराः।।4।।
सापराधोऽस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके। इदानीमनुकम्प्योऽहं यथेच्छसि तथा कुरु।।5।।
अज्ञानाद्विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतम्‌। तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्र्वरि।।6।।
कामेश्र्वरि जगन्मातः सच्चिदानन्दविग्रहे। गृहाणार्चामिमां प्रीत्या प्रसीद परमेश्र्वरि।।7।।
गुह्यातिगुह्यगोप्त्री त्वं गृहाणास्मत्कृतं जपम्‌। सिद्धिर्भवतु मे देवि त्वत्प्रसादात्सुरेश्र्वरि।।8।

मराठी अर्थ - (1)माझ्याकडून नित्य हजारो अपराध घडतात. हे परमेश्र्वरी! "हा माझा दास आहे' असे मानून मला क्षमा कर. (2)आवाहन कसे करावे हे मला माहीत नाही, विसर्जन कसे करावे ते माहीत नाही. त्याचप्रमाणे पूजाही कशी करावी हे मला माहीत नाही. हे परमेश्र्वरी! मला क्षमा कर. (3)हे देवेशी! मंत्ररहित, क्रियारहित व भक्तिहीन अशी जी पूजा मी केली ती माझ्याबाबतीत सुफल ठरो. (4)शतशः अपराध करूनही "आई जगदंबे!' असा उच्चार करणाऱ्यास जी सुगती मिळते ती ब्रह्मदेवादी देवांनादेखील मिळत नाही. (5)हे जगदंबे! अपराधी असूनही मी तुला शरण आलो आहे. तू आता माझ्यावर दया दाखवावीस. पण त्याबाबतीतही जशी तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तू करावेस. (6)अज्ञानामुळे, विस्मृतीमुळे व भ्रांती झाल्यामुळे मजकरवी कमीजास्त घडले असेल तर देवी! मला क्षमा कर. हे परमेश्र्वरी! प्रसन्न हो. (7)हे कामेश्र्वरी! जगन्माते! सच्चिदानंद-स्वरूपिणी! मी केलेल्या ह्या पुजेचा आनंदाने स्वीकार करावा. हे परमेश्र्वरी! प्रसन्न हो. (8)गुह्यातील गुह्य गोष्ट गुप्त ठेवणारी तू माझ्याकडून झालेल्या जपाचा स्वीकार कर. हे देवी! तुझ्या प्रसादामुळे मला सिद्धी प्राप्त होवो.

ता.क - आणि परमात्मा पहिल्यांदा तुम्ही करून पाहा. काही अनुभव आला नाही तर तसे स्पष्ट सांगा, मंत्रोच्चार थोतांड आहे म्हणून. पण आधी स्वतःचे काही तरी मत मांडा. उगीच "नरो वा कुंजरो वा' स्टाइलने फुसकूली सोडून देऊ नका.

टुनटुन | 12 July, 2012 - 16:58
रेव्यु तो पूजा केल्यानंतर म्हणायचा मंत्र इथे द्याल का प्लीज ?
यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपःपूजाक्रियादिषु। न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम्‌।।

मंत्रोच्चारात सामर्थ्य असते का?
हो ! पण हे सामर्थ्य ते मंत्र उच्चारनार्‍यात पण हवे .....
They help you concentrate you mind power on one task and mind is most powerful entity in this world. All originates in mind.

हरीहर अनेक धन्यवाद. मी पण सध्या रोज श्री सप्तशती वाचुन झाल्यानंतर तुम्ही वर दिलेले क्षमापना स्तोत्र वाचते, ते पण पोथीत आहेच. खूप सुंदर अनूभव असतो हा. मूळात आपण जर श्रद्धा ठेऊन मनापासुन सर्व केले तर ते नक्कीच परमेश्वराचरणी रुजु होते, हा माझा स्वतः चा अनूभव आहे.

अजून एक मंत्र आहे.

यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनंच यदभवते| तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्वरी ||

विसर्गबिंदुमात्राणि पदपादाक्षराणिच |

न्युनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी || क्षमस्व परमेश्वरी || क्षमस्व परमेश्वरी ||

ओम तत्सत ||

हरीहर तुम्हाला याचा अर्थ देता आला तर बघा दुर्दैवाने मी संस्कृत जाणकार नाही, पण संधी फोड करुन स्तोत्र म्हणू शकते इतकेच.

डांबीस देविचे कुठलेही स्तोत्र पण विशेषता सप्तशती वगैरे म्हटल्यावर हे म्हणावे किंवा दररोज पूजा झाल्यावर एकदा म्हणावे.

टुनटुन | 21 October, 2012 - 16:28
हरीहर तुम्हाला याचा अर्थ देता आला तर बघा

यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत्‌ ।। (म्‌ म्‌ म्‌ ञ्‌)
तत्‌ सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्र्वरि ।। (ङ्‌ न्‌)
(कंसातील अक्षरे अनुक्रमे अनुस्वाराचा अनुनासिक उच्चार दाखवतात. जसे की, यदक्षरम्‌ पदम्‌ भ्रष्टम्‌ मात्राहीनञ्‌ च...)
पदफोड - यत्‌(जे)+अक्षरं(अक्षर) पदं(पद) भ्रष्टं(स्खलित) मात्रा(मात्रा)-हीनं(हीन) च(आणि) यत्‌(जे)+भवेत्‌(असेल) ।। तत्‌(त्या) सर्वं(सर्वांबद्दल) क्षम्यतां(क्षमा केली जावी) देवि(हे देवी!) प्रसीद(प्रसन्न हो!) परमेश्र्वरि(हे परमेश्र्वरी!) ।।
मराठी अर्थ - जे अक्षर (वा) पद स्खलित आणि जे मात्राहीन असेल त्या सर्वांबद्दल हे देवी ! क्षमा केली जावी. हे परमेश्र्वरी! प्रसन्न हो !

विसर्गबिन्दुमात्राश्र्च पदपादाक्षराणि च।।
न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्र्वरि।।

पदफोड - विसर्ग(विसर्ग)-बिंदु(बिंदू)-मात्राः(मात्रा)+च(आणि) पद (पद)-पाद(पाद)+अक्षराणि(अक्षरे) च(व) ।। न्यूनानि(कमी) च(व)+अतिरिक्तानि(अधिक) क्षमस्व(क्षमाकर) परमेश्र्वरि (हे परमेश्र्वरी!) ।।
मराठी अर्थ - विसर्ग, बिंदू, मात्रा आणि पद, पाद व अक्षरे; जी कमी व अधिक असतील (त्याबद्दल) हे परमेश्र्वरी! क्षमा कर.

टुनटुन | 21 October, 2012 - 16:28
हरीहर तुम्हाला याचा अर्थ देता आला तर बघा...............

तुमच्यासाठी संपूर्ण स्तोत्रच फोड करून देत आहे. कंसामध्ये परसवर्ण उच्चारदर्शक अक्षरे दिलेली आहेत. जसे की, क्रियन्तेऽहर्निशम्‌ मया।।...............

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया।। (म्‌)
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्र्वरि।।1।। (म्‌)
अपराध(अपराध)-सहस्राणि(सहस्र) क्रियंते(केले जातात)+ अहः(दिवस)+निशं(रात्र) मया(मजकडून)।। दासः(दास)+अयम्‌ (हा)+इति(असे) मां(मला) मत्वा(मानून) क्षमस्व(क्षमा कर) परमेश्र्वरि (हे परमेश्र्वरी!)।।1।।

आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्‌।। (न्‌)
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्र्वरि।।2।। (ञ्‌ म्‌)
आवाहनं(आवाहन) न(नाही) जानामि(जाणत) न(नाही) जानामि(जाणत) विसर्जनम्‌(विसर्जन)।। पूजां(पूजा) च(तसेच)+ एव(ही) न(नाही) जानामि(जाणत) क्षम्यतां(क्षमा केली जावी) परमेश्र्वरि(हेपरमेश्र्वरी!)।।2।।

मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्र्वरि।। (ङ्‌ म्‌ वॅं्‌)
यत्‌ पूजितं मया देवि परिपूर्णं तदस्तु मे।।3।। (म्‌ न्‌)
मंत्र(मंत्र)-हीनं(रहित) क्रिया(क्रिया)-हीनं(रहित) भक्ति (भक्ति)-हीनं(रहित) सुरेश्र्वरि(हे देवेशी!)।। यत्‌(जे) पूजितं (पूजले) मया(मी) देवि(हेदेवी!) परि-पूर्णं(परिपूर्ण) तत्‌(ते)+अस्तु(ठरो) मे(माझ्या बाबतीत)।।3।।

मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु।।4।। (ञ्‌ न्‌)
मत्‌(माझ्या)+समः(सारखा) पातकी(पातकी) न+अस्ति(नाही) पापघ्नी(पापनाशनी) त्वत्‌(तुझ्या)+समा(सारखी) न(नाही) हि(तर)।। एवं(हे) ज्ञात्वा(जाणून) महादेवि(हे महादेवी!) यथा(जसे)-योग्यं(योग्य) तथा(तसे) कुरु(कर)।।4।।

अपराधशतं कृत्वा जगदम्बेति चोच्चरेत्‌।। (ङ्‌)
यां गतिं समवाप्नोति न तां ब्रह्मादयः सुराः।।5।। (ङ्‌ वॅं्‌ म्‌)
अपराध(अपराध)-शतं(शंभर) कृत्वा(करून) जगदंब (जगदंब!)+इति(असा) च(ही)+उच्चरेत्‌(घोष करील)।। यां(जी) गतिं(गती) सम+अवाप्नोति(प्राप्त करून घेतो) न(नाही) तां(ती) ब्रह्म(ब्रह्म)+आदयः(आदी) सुराः(देवांना)।।5।।

सापराधोऽस्मि शरणं प्राप्तस्त्वां जगदम्बिके।। (म्‌ ञ्‌)
इदानीमनुकम्प्योऽहं यथेच्छसि तथा कुरु।।6।। (य्‌ँ)
स+अपराधः(अपराधी)+अस्मि(आहे) शरणं(शरण) प्राप्तः (आलोआहे)+त्वां(तुला) जगत्‌+अंबिके(हेजगदंबे!)।। इदानीम्‌ (आता)+अनुकंप्यः(अनुकंपा दाखवण्याजोगा)+अहं(मी) यथा(जशी) +इच्छसि(इच्छा करशील) तथा(तसे) कुरु(कर)।।6।।

अज्ञानाद्विस्मृतेर्भ्रान्त्या यप्यूनमधिकं कृतम्‌।। (ङ्‌)
तत्‌ सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्र्वरि।।7।। (ङ्‌ न्‌)
अज्ञानात्‌(अज्ञानामुळे)+विस्मृतेः(विस्मृतीमुळे)+भ्रांत्या(भ्रांतीमुळे) यत्‌(जे)+न्यूनम्‌(कमी)+अधिकं(जास्त) कृतम्‌(केलेले असेल)।। तत्‌(त्या) सर्वं(सर्वांची) क्षम्यतां(क्षमा केली जावी) देवि(हेदेवी!) प्रसीद(प्रसन्न हो) परमेश्र्वरि(हे परमेश्र्वरी!)।।7।।

कामेश्र्वरि जगन्मातः सच्चिदानन्दविग्रहे।।
गृहाणार्चामिमां प्रीत्या प्रसीद परमेश्र्वरि।।8।। (म्‌)
कामेश्र्वरि(हे कामेश्र्वरी!) जगत्‌+मातः(हे जगन्माते!) सत्‌(सत्‌)+ चित्‌(चित्‌)+आनंद(आनंद)-विग्रहे(स्वरूपिणी!)।। गृहाण(स्वीकार कर)+अर्चाम्‌(पूजेचा)+इमां(ह्या) प्रीत्या(संतोषाने) प्रसीद (प्रसन्नहो!) परमेश्र्वरि(हे परमेश्र्वरी!)।।8।।

यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत्‌।। (म्‌ म्‌ म्‌ ञ्‌)
तत्‌ सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्र्वरि।।9।। (ङ्‌ न्‌)
यत्‌(जे)+अक्षरं(अक्षर) पदं(पद) भ्रष्टं(स्खलित) मात्रा(मात्रा)-हीनं(हीन) च(आणि) यत्‌(जे)+भवेत्‌(असेल)।। तत्‌(त्या) सर्वं(सर्वांबद्दल) क्षम्यतां(क्षमा केली जावी) देवि(हे देवी!) प्रसीद(प्रसन्न हो!) परमेश्र्वरि(हे परमेश्र्वरी!)।।9।।

विसर्गबिन्दुमात्राश्र्च पदपादाक्षराणि च।।
न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्र्वरि।।10।।
विसर्ग(विसर्ग)-बिंदु(बिंदू)-मात्राः(मात्रा)+च(आणि) पद (पद)-पाद(पाद)+अक्षराणि(अक्षरे) च(व)।। न्यूनानि(कमी) च(व)+अतिरिक्तानि(अधिक) क्षमस्व(क्षमा कर) परमेश्र्वरि (हे परमेश्र्वरी!)।।10।।

Pages