एक उनाड दिवस...

Submitted by बागेश्री on 26 April, 2012 - 06:05

एक उनाड दिवस
चल सख्या घालवूया,
नको काटे घड्याळाचे
राना- वनात फिरूया!

एक उनाड दिवस
घालू पाखरांना साद,
जरा अंगणात त्यांच्या
चल रमूया निवांत!

एक उनाड दिवस
नको पैसा व्यवहार,
मन रिक्त होता थोडे
येते नात्यांस बहार..

एक उनाड दिवस
नको कर्तव्य नि पाश
मागे टा़कू कवडसे
पाहू मोकळे आकाश!!

अश्या उनाड दिवशी
भर उन्हात भटकू,
मृगजळे दिसताच
थोडे फसू, थोडे हसू!

पाहू सांज कलंडती
रंग जुनेच नव्याने,
येवो मन मोहरून
मरगळ विझल्याने!

असे मनाजोगा वेळ
मग हळूच सरावा,
चित्त, पुन्हा ताजे होता
नवा दिवस गुंफावा!

नवा दिवस गुंफावा...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हाउ रोमँटिक ! बाग्ज, ८ दिवसांची सुट्टी याचसाठी का? Wink
कसली गोड कविता आहे! प्रचंड आवडली. स्वप्नच शब्दात उतरलं आहे.

हाउ रोमँटिक ! बाग्ज, ८ दिवसांची सुट्टी याचसाठी का?
>>>>>>>>>>>

"मन"कवडी मनि Proud

बागेश, भारी जमतेय ब्वा Happy

..

आभारी आहे प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांची..
मने, भुंगा Lol
प्रसाद, गो अहेड, खरमरीत विडंबन कर, अष्टाक्षरीतच हां! Happy
पजो, अगदी Wink

तुला एक जागा सांगणार होतो ना तिथे जाउन आले मन माझे..>> अरे वा, सेना पत्ता वगैरे सांगून ठेव, उनाड दिवस आलारेआला की येतेच जाऊन Happy

अगदी सहजतेने उतरली आहे कविता .... आवडली.

"असे मनाजोगा वेळ
मग हळूच सरावा,
चित्त, पुन्हा ताजे होता
नवा दिवस गुंफावा!" >>> विशेष उल्लेखनीय.

खूपच छान....

पाहू सांज कलंडती
रंग जुनेच नव्याने,, मस्तच!
असेच रन्ग भरा!!!