सुट्टीतील उद्योग "प्राणी"

Submitted by विनार्च on 25 April, 2012 - 09:06

आता पर्यंत आपलं गाव वसलं, त्याला फेयरी गॉडमदरही मिळाली. आता पाळी प्राण्यांची Happy
चला तर मग बनवुया रिळा पासून मजेदार प्राणी.

साहित्य :
2012-04-25 14.29.26.jpg

आता कार्डपेपरवर रिळापेक्षा थोडे मोठे असे दोन गोल व पायाच्या दोन जोड्या काढुन घ्या.
2012-04-25 14.30.18.jpg

आता ह्यापैकी एका गोलात प्राण्याचे तोंड काढा व उरलेल्या जागेत शेपटी काढून ठेवा.
2012-04-25 14.41.19.jpg

आता रिळाच्या मधल्या भागापेक्षा रुंदीला थोडा मोठा असा आयत दाखवल्या प्रमाणे कापुन ठेवा. हा भाग रिळाच्या मधल्या भागावर चिकटवायचाआहे.
2012-04-25 15.27.24.jpg

आता हे सगळे भाग खाली दाखवल्या प्रमाणे कापून व रंगवून घ्या.
2012-04-25 15.46.54.jpg2012-04-25 15.49.43.jpg

आता आयताकृती तुकडा रिळाच्या मधल्या भागावर चिकटवून घ्या.
2012-04-25 16.01.48.jpg

आता पाय, तोंड, मागचा भाग,शेपुट चिकटवा.
2012-04-25 16.02.02.jpg

झाला आपला "सिंह" तयार.
2012-04-25 16.11.30.jpg

असाच "हत्ती" देखील तयार झाला.(ह्याला पांढर्‍या रंगाची बॉर्डर मी दिली आहे कारण अनन्याला वॉटर कलर अजुन नीट वापरता येत नाहीत. हा तिचा वॉटर कलरचा पहिलाच प्रयत्न आहे.)
2012-04-25 17.23.05.jpg

आता दोघं वाट पहाताहेत, अजुन कोणते मित्र त्यांना सामिल होणार? याची Happy
2012-04-25 17.23.33.jpg

चला तर अजुन निर्-निराळे प्राणी बनवुन जंगल पुर्ण करा. Happy

माहितीचा स्त्रोत : ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट" पुस्तक.
या आधीचे उद्योग : http://www.maayboli.com/node/34224
http://www.maayboli.com/node/34302

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान बच्चे कंपनीबरोबर मोठ्यांनाही मोहात पाडणारे हे मोठेठे मोठठे प्राणी खुपच छान आहेत.

साला असली शिम्ह पण इतका गोड नाय >>>> धन्यवाद, दक्षिणा........ अगं असेल कसा तो इतका गोड??? माझ्या लेकीने हा सिंह स्वतःच्या मनाने (मी पुस्तकातला कॉपी कर म्हणतं होते) काढलाय :अभिमान दाखवणारी बाहुली:

इथे बघून आम्ही आज एक प्राणी (चार पाय आणि शेपूट असल्याने प्राणी म्हणायला हरकत नाही) केला.

तोंड, शेपूट इ साठी USPS चे एक्सप्रेस डिलिव्हरी एनव्हलप वापरले, पाय बनवायला जुने मार्कर्स, मिशा बनवायला केकच्या बॉक्सला बांधून आलेला दोरा, पोट-पाठ बनवायला हँड टिशु टॉवेल्सचा रोल अर्धा कापून असं करुन टाकाउतून हस्तकला पार पडलेली आहे Happy

lion.JPG

Pages