सुट्टीतील उद्योग "प्राणी"

Submitted by विनार्च on 25 April, 2012 - 09:06

आता पर्यंत आपलं गाव वसलं, त्याला फेयरी गॉडमदरही मिळाली. आता पाळी प्राण्यांची Happy
चला तर मग बनवुया रिळा पासून मजेदार प्राणी.

साहित्य :
2012-04-25 14.29.26.jpg

आता कार्डपेपरवर रिळापेक्षा थोडे मोठे असे दोन गोल व पायाच्या दोन जोड्या काढुन घ्या.
2012-04-25 14.30.18.jpg

आता ह्यापैकी एका गोलात प्राण्याचे तोंड काढा व उरलेल्या जागेत शेपटी काढून ठेवा.
2012-04-25 14.41.19.jpg

आता रिळाच्या मधल्या भागापेक्षा रुंदीला थोडा मोठा असा आयत दाखवल्या प्रमाणे कापुन ठेवा. हा भाग रिळाच्या मधल्या भागावर चिकटवायचाआहे.
2012-04-25 15.27.24.jpg

आता हे सगळे भाग खाली दाखवल्या प्रमाणे कापून व रंगवून घ्या.
2012-04-25 15.46.54.jpg2012-04-25 15.49.43.jpg

आता आयताकृती तुकडा रिळाच्या मधल्या भागावर चिकटवून घ्या.
2012-04-25 16.01.48.jpg

आता पाय, तोंड, मागचा भाग,शेपुट चिकटवा.
2012-04-25 16.02.02.jpg

झाला आपला "सिंह" तयार.
2012-04-25 16.11.30.jpg

असाच "हत्ती" देखील तयार झाला.(ह्याला पांढर्‍या रंगाची बॉर्डर मी दिली आहे कारण अनन्याला वॉटर कलर अजुन नीट वापरता येत नाहीत. हा तिचा वॉटर कलरचा पहिलाच प्रयत्न आहे.)
2012-04-25 17.23.05.jpg

आता दोघं वाट पहाताहेत, अजुन कोणते मित्र त्यांना सामिल होणार? याची Happy
2012-04-25 17.23.33.jpg

चला तर अजुन निर्-निराळे प्राणी बनवुन जंगल पुर्ण करा. Happy

माहितीचा स्त्रोत : ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट" पुस्तक.
या आधीचे उद्योग : http://www.maayboli.com/node/34224
http://www.maayboli.com/node/34302

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम सही झालेत सिंह आणि हत्ती. ते रीळाला लावून त्यांना उभं करायची कल्पना खूप भारी आहे.

अरे बापरे! इतक्या कमी वेळात, इतके प्रतिसाद आले..........
इतक्या कौतुकाबद्द्ल शतशः धन्यवाद! इथले प्रतिसाद वाचून खूप हुरुप येतो. Happy

छानच.

Pages