टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)

Submitted by टवाळ - एकमेव on 24 April, 2012 - 01:41

मित्रांनो ! मी तसा मा.बो. वरचा जुनाच पडीक आहे. म्हणजे बघा, उणीपुरी १० वर्षे काढलीत मी ईथे. सुरवातीची साडे-चार वर्षे मी अगदी साधा-सुध्या स्वरूपात जपून-जपून प्रतिक्रिया देत काढली. पण माझा येळकोट काही रहात नव्हता आणि मुळ स्वभाव जात नव्हता. शेवटी एक दिवशी माझ्यातल्या मी चा साक्षात्कार झाला आणि "नम्र टवाळा" चा जन्म झाला. बराच काळ मुख्यतः कट्टा आणि क्वचित दुसर्‍या काही पानांवर टवाळक्या केल्यानंतर आता स्वतःचे एक पान सुरू करावे अशी सुरसुरी आली. या पानाचे नाव मी "टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)" असे देण्याचे मुख्य कारण टवाळ या आय्-डी सारख्याच मा.बो. असंख्य चित्र-विचित्र वाटणार्‍या आय-डी आहेत आणि रोज असंख्य नविन जन्मत पण आहेत. हे आय-डी वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या मतांची पिंक टाकत फिरत असतात. बर्‍याच वेळेला त्यांची मतं, प्रतिक्रिया या खरोखर चांगल्या आणि विचार करण्यासारख्याही असतात. परंतू, विचित्र स्रिन-नेम मुळे त्यांची दखल फारशी घेतली जात नाही. अशा या उपेक्षितांनी या पानावर येऊन आपले अंतरंग मोकळे करावे ही माफक अपेक्षा या पानाच्या निर्मितीमागे आहे. अर्थात सर्व धर्माच्या, जाती-पंथाच्या, वेगवेगळ्या कंपूंच्या आय्-ड्यांना ईथे मुक्त प्रवेश आहेच.

- नम्र टवाळ

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

टवाळ, रोज आसनगाव ते बोरीबंदर आणि परत! जिंदगी कटली असेल लोकलगाडीमध्ये! काही गटबिट होता का, की एकला चलो रे? संध्याकाळी १८०३ कसारा, का १८२२ आसनगाव?
आ.न.,
-गा.पै.

दुर्मिळ मासे आणि पक्षी पहाण्याची संधी - २७ एप्रिल ते १ मे सिद्धी गार्डन समोर, म्हात्रे पुलाजवळ
आवश्य भेट दया
उद्या दुपारी ११ ते ४ भेट देणे शक्य असल्यास मासे तज्ञ अमित देसाई यांच्या बरोबर पहाण्याची दुर्मिळ संधी Proud

टवाळ - एकमेव, कचेरी जवळ दिसतेय बोरीबंदराच्या! तरीच सुखी जीव म्हणवताय! Happy पण ते आसनगाव-शहापूर हे लांबचं प्रकरण आहे, नाही?
आ.न.,
-गा.पै.

हा वाहता धागा आहे धेनातच आलं नव्हतं त्यादिवशी. आन मी ते निशला हवी नसलेली टवाळी आप्लं टाळी द्याया आलं होते....:)

फादर्स डे, १७ जून २०१२ निमित्त
baba.jpg

१. चंदेरी पडद्यावरील पित्याच्या प्रतिमेविषयी शर्मिला फडकेंचा खास लेख

२. मी आणि बाबा सॉल्लिड टीम : वडिलांशी असलेल्या नात्याची जवळून ओळख!