''चार होती''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 18 April, 2012 - 02:39

चार होती
फार होती

उष्णतेने
गार होती

पत्रवेडी
तार होती

श्वास चालू
ठार होती

माझियागत
भार होती

वारियावर
स्वार होती

जिंकलेली
हार होती

मर्द कोठे?
नार होती

दुश्मनी मम
यार होती

गोड दिसली
क्षार होती

आर होती
पार होती.

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

छान ....

सेक सी ती
नार होती
(पण)
जवळ नाही
far होती

लोणच्याच्या फोडीसारखी.
>>>
(लोणच्यातल्या कैरीची)
फोड नाही
खार होती Proud

ही गजल बे-
कार होती Biggrin

अजुन वाढवतोय ....

''चार होती''
माझ्यासाठी क्लिष्ट फार होती
सव्वाबारा पर्यंत गरम होती
साडे-चारला गार होती ! Happy

मस्तच ..

. चार होती
फार होती>>>>>>>>> नाही कळलं ।

@ कमलाकर देसलेजी,

माझ्या अवतीभवती फक्त चार माणसे होती,पण मला त्याची काळजी नाही.....,कारण खांदा द्यायला चार माण्सेही पुरतात.

@ डॉ. साहेब आणखी काही अर्थ ऐका..!

चार कुत्री होती
फार भित्री होती

चार मित्र होती
फार विचित्र होती

दिसायला तशी चार खांदे होती
पण
तिरडी न्यायची तर वांदे होती.

Happy Happy Wink

चार होती
फार होती

डॉक्टर साहेब , एवढेही आमच्या लक्षात आले नाही . कया बात है ! क्लिअर . मस्त ..