Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 18 April, 2012 - 02:39
चार होती
फार होती
उष्णतेने
गार होती
पत्रवेडी
तार होती
श्वास चालू
ठार होती
माझियागत
भार होती
वारियावर
स्वार होती
जिंकलेली
हार होती
मर्द कोठे?
नार होती
दुश्मनी मम
यार होती
गोड दिसली
क्षार होती
आर होती
पार होती.
--डॉ.कैलास गायकवाड
गुलमोहर:
शेअर करा
चार होती फार होती>>>>
चार होती
फार होती>>>>
बहर छोटा जार होती.....
बहर छोटा
जार होती.....
लोणच्याच्या फोडीसारखी.
लोणच्याच्या फोडीसारखी.
छान ....
छान ....
सेक सी ती नार होती (पण) जवळ
सेक सी ती
नार होती
(पण)
जवळ नाही
far होती
लोणच्याच्या फोडीसारखी.
>>>
(लोणच्यातल्या कैरीची)
फोड नाही
खार होती
ही गजल बे-
कार होती
अजुन वाढवतोय ....
छान!.
छान!.
धन्यवाद
धन्यवाद
मतला आणि मक्ता आर-पार झाले.
मतला आणि मक्ता आर-पार झाले.
डॉक : हा प्रयोग तसा नवीन
डॉक : हा प्रयोग तसा नवीन मुळीच नाही..........आणि वाईट तर मुळीच नाहिये
उदाहरण पहा .
http://www.maayboli.com/node/33531
आभारी आहे.
आभारी आहे.
''चार होती'' माझ्यासाठी
''चार होती''
माझ्यासाठी क्लिष्ट फार होती
सव्वाबारा पर्यंत गरम होती
साडे-चारला गार होती !
अरे वा आज वेगळा प्रकार आहे.
अरे वा आज वेगळा प्रकार आहे. छान आहे.
टवाळशेठ. धन्स जागू.
टवाळशेठ.
धन्स जागू.
मस्तच .. .
मस्तच ..
. चार होती
फार होती>>>>>>>>> नाही कळलं ।
@ कमलाकर देसलेजी, माझ्या
@ कमलाकर देसलेजी,
माझ्या अवतीभवती फक्त चार माणसे होती,पण मला त्याची काळजी नाही.....,कारण खांदा द्यायला चार माण्सेही पुरतात.
@ डॉ. साहेब आणखी काही अर्थ
@ डॉ. साहेब आणखी काही अर्थ ऐका..!
चार कुत्री होती
फार भित्री होती
चार मित्र होती
फार विचित्र होती
दिसायला तशी चार खांदे होती
पण
तिरडी न्यायची तर वांदे होती.
चार होती फार होती डॉक्टर
चार होती
फार होती
डॉक्टर साहेब , एवढेही आमच्या लक्षात आले नाही . कया बात है ! क्लिअर . मस्त ..