पावसा पावसा ये रे

Submitted by सुसुकु on 17 April, 2012 - 16:17

पावसा पावसा ये रे चिंब भिजवून जा रे ||ध्रु||

अंग माझे काहिले रे तन माझे कावले रे
देऊन थंडावा जा रे चिंब भिजवून जा रे ||१||

वस्त्र माझे मळले रे पाय धुळीने काळे रे
धुवून काजळी जा रे चिंब भिजवून जा रे ||२||

डोळे माझे चुरले रे गळा पुरा भरला रे
पुसून काळिमा जा रे चिंब भिजवून जा रे ||३||

शोधुनिया पथ सारे रे थकले हातपाय रे
करून शिडकावा रे चिंब भिजवून जा रे ||४||

हृद्य माझे पेटले रे खवळे शरीर सारे
फुंकून वणवा जा रे चिंब भिजवून जा रे ||५||

मन माझे वितळे रे उभ्या उभ्या पेटले रे
पेटवून जाळ जा रे चिंब भिजवून जा रे ||६||

सुख सारे विटले रे दु:ख सारे नटले रे
गाळून बाकी ने रे चिंब भिजवून जा रे ||७||

मान सारा संपला रे नुरे अपमानही रे
सोडून सूड बा़की रे मिळवू गंगेस ये रे ||८||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रद्युम्न +१+१
शोधुनिया मार्ग सारे थकले हातपाय रे
करून शिडकावा रे चिंब भिजवून जा रे ||४||
शोधुनिया मार्ग सारे(ईथे रे लिहायचा राहिला>>>सारे रे)थकले हातपाय रे

pradyumnasantu, उमेश वैद्य, विभाग्रज - धन्यवाद.

कविता बदलून मांडण्याचा प्रयत्न करीन. मला स्वतःला "रे" आवडला होता कारण "पाउस" हा जवळचा मित्र आहे असे वाटते "रे" मुळे.

तुम्हाला 'रे' आवडला असला तर बदलण्याचे काय कारण आहे? आम्हाला कुणाला वाटले म्हणून मुळीच बदलू नका. आपण कविता लिहितो ते आपले अंतःकरण मोकळे करण्यासाठी, त्याचे खरे स्वरुप आपल्याच शब्दांत पहाण्यासाठी.