Submitted by राज जैन on 17 April, 2012 - 09:33
कोल्हापुरच्या पंचगंगेच्या काठावर खुप सुंदर अशी मंदिरे आहेत त्याचे निवडक फोटो.













गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कोल्हापुरच्या पंचगंगेच्या काठावर खुप सुंदर अशी मंदिरे आहेत त्याचे निवडक फोटो.













छान आहेत फोटो. मंदिराचे कोरीव
छान आहेत फोटो.
मंदिराचे कोरीव काम पण मस्तच
मंदिरा बद्दल आजुन महीती द्या.
कुठे आहे हे मंदिर, कोणि बांधल, कधि बांधल इ.
नुसते फोटो नको... माहिती
नुसते फोटो नको... माहिती देखील हवी.. कोणी बांधली, कधी वगैरे...
भोजाच्या काळातील आहेत का? की कोल्हापूर भोसले? किती जुनी आहेत?
सेनापती , याची पुर्ण माहीती
सेनापती , याची पुर्ण माहीती मलातर कोठे सापडली नाही.
कोणाकडे याची माहीती असेल तर कृपा मला देखील द्यावी, मला खूप आवडतात ही मंदिरे.
सुंदर फोटो. इतक्या वेळा
सुंदर फोटो.
इतक्या वेळा कोल्हापूरला जाऊन ही देवळे फक्त बसमधून पूलावरुन जातानाच बघितलीत. कधी तिथे जाणेच झाले नाही. इतक्या लांबून नीट कल्पना येत नाही.
छान!
छान!
मस्त.. ९ वा आकर्षून घेतोय
मस्त.. ९ वा आकर्षून घेतोय
व्वा!! गाववालं, भारी सफर
व्वा!! गाववालं, भारी सफर घडीवल्यासा की.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्तच! ९वा फोटो जास्त आवडला.
मस्तच! ९वा फोटो जास्त आवडला.
मस्त
मस्त
मस्तच फोटो त्यातील एका
मस्तच फोटो

त्यातील एका मंदिराचा झब्बु देण्यास हात शिवशिवतोय.
एक कोल्हापूरकर या नात्याने मी
एक कोल्हापूरकर या नात्याने मी हे सांगू शकतो की, नदीकाठच्या या पारंपारिक बांधकामाला जरी आपण ढोबळमानाने 'मंदिर' म्हणत असलो तरी ती पूर्णतया खाजगी मालकीची....[म्हणजेच छत्रपती घराण्याकडे मालकी]....पद्धतीची आहेत. बांधकामाच्या घडणीवर हेमाडपंथी बांधकामाची छाया असणे क्रमप्राप्त आहे, त्याला कारण कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे बांधकाम त्या परंपरेचे आहे.
पंचगंगेच्या किनारी बांधलेली ही मंदिरसदृश्य मालिका १८८५ साली शिवाजी तिसरे यानी बांधली. ताराबाईंच्या वंशजांनी कोल्हापूर गादीची परंपरा पुढे चालू ठेवली आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी हवी म्हणून नदी काठचा हा भाग तिसर्या शिवाजीने मुक्रर केला. त्या जागेची विधिवत पूजाअर्चना करून सभोवताली तटबंदीही करण्यात आली. आतील जागेत सर्वसामान्यांनी गुरेढोरे आणू नयेत म्हणून [मूळ राजवाडा या जागेपासून खूप दूर अंतरावर असल्याने या जागेची विशेष खबरदारी घेण्यासाठी सेवकवर्गही नेमस्त केला गेला होता] त्या ठिकाणी 'राजघराण्याची मंदिरे' ही बांधण्यात आली, जी वरील फोटोत दिसतात. मात्र या मंदिरात रयत कधी दर्शनास जात नव्हती. मुळात ती 'दहना'ची जागा आहे असा समज सर्वत्र पसरविण्यात आला होता. [निरखून पाहिल्यास वरील फोटोतील सार्या मंदिरांना कुलुपे आहेत असे दिसेलच.]
आजही ही जागा 'राजघराण्या'च्याच मालकीची असून वाड्यावर सरकार घराण्यातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर ते प्रेत वरील जागेत आणले जाते व रितिरिवाजानुसार दहन करून समाधीही बांधली जाते. पूर्वी अशाप्रसंगी तोफ उडवून रयतेला खबर दिली जात असे. पण कालौघात ही प्रथा बंद झाली असून अंत्ययात्राही पूर्णपणे खाजगी स्वरूपाची असते.
अशोक पाटील
चांगली माहिती.. नविनच आहेत
चांगली माहिती..
नविनच आहेत की मंदिरे..
छान फोटो. आशोकमामा,
छान फोटो.
आशोकमामा, माहितीबद्दल धन्यवाद.
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
काका चांगली माहीती दिलीत.
काका चांगली माहीती दिलीत.
सुंदर फोटोज !
सुंदर फोटोज !
वाह!! लेका हीच मंदीरं मी
वाह!!
लेका हीच मंदीरं मी पाहुन आलो होतो. एकाच ठिकाणी शंकराची इतकी मंदिरं पाहुन भंजाळालो होतो.
नंतर सर्वात कोपर्यातल्या मंदिरात एक बोर्ड आहे तो वाचला. कोणत्यातरी मुख्य सचिव की कायसं अशा मोठ्या हुद्द्यावर किंवा पद असलेल्या कुणा मात्तबर व्यक्तीच्या मातोश्रींची समाधी व मंदिर होत.
शिवाय फोटो नम्बर ९ (जरा फोटोला नम्बर दे रे भावा.) पाहुन लक्षात येतच की ही समाधी मंदिरं आहेत.
ह्यातल्या सर्वात मोठ्या मंदिरात काळ्या पाषाणातील कोरलेला मस्त नंदि आहे. शिवाय त्या मंदिराच्या भिंतीवर काळ्या दगडाची फरशी बसवल्यासारखं आहे. हे सांगुन लक्षात नाही येत. पहायला हवं. तिथे बरीच मुलं अभ्यास करायला येतात. शांत व नितांत सुंदर जागा आहे.
मामाश्रीनी माहिती दिलीच आहे.
माझ्याकडे आहेत ह्याचे फोटो पण अपलोडच नाही केलेले.
>>>माझ्याकडे आहेत ह्याचे फोटो
>>>माझ्याकडे आहेत ह्याचे फोटो पण अपलोडच नाही केले
मग काय लोणंचे घातलं आहे का त्याचे
छान फोटो... मामा, झकोबा छान
छान फोटो... मामा, झकोबा छान माहिती...
सुंदर कोरीव काम.
सुंदर कोरीव काम.
सुंदर फोटो, मंदिरं धंन्यवाद
सुंदर फोटो, मंदिरं
धंन्यवाद
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत फोटो!
झक्क
झक्क
झकास
झकास
धन्यवाद मंडळि!
धन्यवाद मंडळि!
मस्त फोटो
मस्त फोटो
सुंदर प्र ची , माहितीही छान
सुंदर प्र ची , माहितीही छान
छान फोटो ! >>>माझ्याकडे आहेत
छान फोटो !
>>>माझ्याकडे आहेत ह्याचे फोटो पण अपलोडच नाही केले
मग काय लोणंचे घातलं आहे का त्या>
