पंचगंगेच्या तीरावर....

Submitted by राज जैन on 17 April, 2012 - 09:33

कोल्हापुरच्या पंचगंगेच्या काठावर खुप सुंदर अशी मंदिरे आहेत त्याचे निवडक फोटो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान आहेत फोटो.
मंदिराचे कोरीव काम पण मस्तच Happy

मंदिरा बद्दल आजुन महीती द्या.
कुठे आहे हे मंदिर, कोणि बांधल, कधि बांधल इ.

नुसते फोटो नको... माहिती देखील हवी.. कोणी बांधली, कधी वगैरे...

भोजाच्या काळातील आहेत का? की कोल्हापूर भोसले? किती जुनी आहेत?

सेनापती , याची पुर्ण माहीती मलातर कोठे सापडली नाही.
कोणाकडे याची माहीती असेल तर कृपा मला देखील द्यावी, मला खूप आवडतात ही मंदिरे.

सुंदर फोटो.
इतक्या वेळा कोल्हापूरला जाऊन ही देवळे फक्त बसमधून पूलावरुन जातानाच बघितलीत. कधी तिथे जाणेच झाले नाही. इतक्या लांबून नीट कल्पना येत नाही.

मस्त Happy

एक कोल्हापूरकर या नात्याने मी हे सांगू शकतो की, नदीकाठच्या या पारंपारिक बांधकामाला जरी आपण ढोबळमानाने 'मंदिर' म्हणत असलो तरी ती पूर्णतया खाजगी मालकीची....[म्हणजेच छत्रपती घराण्याकडे मालकी]....पद्धतीची आहेत. बांधकामाच्या घडणीवर हेमाडपंथी बांधकामाची छाया असणे क्रमप्राप्त आहे, त्याला कारण कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे बांधकाम त्या परंपरेचे आहे.

पंचगंगेच्या किनारी बांधलेली ही मंदिरसदृश्य मालिका १८८५ साली शिवाजी तिसरे यानी बांधली. ताराबाईंच्या वंशजांनी कोल्हापूर गादीची परंपरा पुढे चालू ठेवली आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी हवी म्हणून नदी काठचा हा भाग तिसर्‍या शिवाजीने मुक्रर केला. त्या जागेची विधिवत पूजाअर्चना करून सभोवताली तटबंदीही करण्यात आली. आतील जागेत सर्वसामान्यांनी गुरेढोरे आणू नयेत म्हणून [मूळ राजवाडा या जागेपासून खूप दूर अंतरावर असल्याने या जागेची विशेष खबरदारी घेण्यासाठी सेवकवर्गही नेमस्त केला गेला होता] त्या ठिकाणी 'राजघराण्याची मंदिरे' ही बांधण्यात आली, जी वरील फोटोत दिसतात. मात्र या मंदिरात रयत कधी दर्शनास जात नव्हती. मुळात ती 'दहना'ची जागा आहे असा समज सर्वत्र पसरविण्यात आला होता. [निरखून पाहिल्यास वरील फोटोतील सार्‍या मंदिरांना कुलुपे आहेत असे दिसेलच.]

आजही ही जागा 'राजघराण्या'च्याच मालकीची असून वाड्यावर सरकार घराण्यातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर ते प्रेत वरील जागेत आणले जाते व रितिरिवाजानुसार दहन करून समाधीही बांधली जाते. पूर्वी अशाप्रसंगी तोफ उडवून रयतेला खबर दिली जात असे. पण कालौघात ही प्रथा बंद झाली असून अंत्ययात्राही पूर्णपणे खाजगी स्वरूपाची असते.

अशोक पाटील

वाह!!
लेका हीच मंदीरं मी पाहुन आलो होतो. एकाच ठिकाणी शंकराची इतकी मंदिरं पाहुन भंजाळालो होतो.
नंतर सर्वात कोपर्‍यातल्या मंदिरात एक बोर्ड आहे तो वाचला. कोणत्यातरी मुख्य सचिव की कायसं अशा मोठ्या हुद्द्यावर किंवा पद असलेल्या कुणा मात्तबर व्यक्तीच्या मातोश्रींची समाधी व मंदिर होत.
शिवाय फोटो नम्बर ९ (जरा फोटोला नम्बर दे रे भावा.) पाहुन लक्षात येतच की ही समाधी मंदिरं आहेत.
ह्यातल्या सर्वात मोठ्या मंदिरात काळ्या पाषाणातील कोरलेला मस्त नंदि आहे. शिवाय त्या मंदिराच्या भिंतीवर काळ्या दगडाची फरशी बसवल्यासारखं आहे. हे सांगुन लक्षात नाही येत. पहायला हवं. तिथे बरीच मुलं अभ्यास करायला येतात. शांत व नितांत सुंदर जागा आहे. Happy

मामाश्रीनी माहिती दिलीच आहे.

माझ्याकडे आहेत ह्याचे फोटो पण अपलोडच नाही केलेले. Sad

झक्क Happy