सुट्टीतील उद्योग "परी"

Submitted by विनार्च on 16 April, 2012 - 07:07

गेल्या उद्योगात आपण गाव वसवला पण त्या गावाला "फेअरी गॉडमदरची" फार गरज आहे म्हणुनच आजचा आपला उद्योग आहे "परी" बनवण्याचा Happy

साहित्य :
2012-04-16 13.16.09.jpg

चला आता कामाला सुरुवात करुया. प्रथम आईसक्रिमच्या चमच्यावर नाक, डोळे, तोंड काढून घ्या.
2012-04-16 13.49.35.jpg

आता एका कागदावर दोन-तीन हेअर स्टाइल्स काढून कापून ठेवा. (काळा घोटीव पेपर देखील वापरु शकता)
2012-04-16 13.50.13.jpg

आता स्टीकच्या गळ्याला घोटीव पेपरचा त्रिकोण मफलर प्रमाणे चिकटवा.
2012-04-16 13.56.29.jpg

आता घोटीव पेपरचा २ बाय ३ इंचाचा तुकडा कापून घ्या.
2012-04-16 13.59.43.jpg

त्याची दाखवल्या प्रमाणे घडी घाला.
2012-04-16 14.01.38.jpg

आता गाउनचा हवा तसा गळा कापून घ्या.
2012-04-16 14.03.58.jpg

हा गाउन परीला घालुन घ्या.
2012-04-16 14.06.09.jpg

मागुन हे असे दिसेल.
2012-04-16 14.06.29.jpg

तिला सुट होइल अशी हेयर स्टाइल चिटकवून घ्या.
2012-04-16 14.17.58.jpg

आता गिफ्ट रॅपिंग पेपरचे पंख व मुकुट कापून चिटकवून घ्या.
2012-04-16 14.38.09.jpg

झाली आता आपली "परी" तयार. तिला तुम्ही तुम्हाला हवं तसं सजवा.
2012-04-16 14.58.35.jpg

ही आली मिक्स अ‍ॅन मॅच करुन तिची मैत्रीण.
2012-04-16 15.32.59.jpg

चला तर मग, बनवा आपापल्या पर्‍या आणि टाका त्यांचे फोटो इथे.

माहितीचा स्त्रोत : ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट" पुस्तक.
या आधीचा उद्योग : http://www.maayboli.com/node/34224

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, संपुर्ण कलाकृतीचा कलाकार एकच आहे (आपला नेहमीचाच Happy ). माझ काम फक्त पुस्तकातल्या ज्या स्टेप तिला कळत नाहीत त्या समजावून सांगणे आणि त्यासाठीचे साहित्य जमवणे.

वृषाली नक्कीच टाक फोटो.

अरे! हा उद्योग जास्त कोणी पाहिला नाही की आवडला नाही ? आवडला नसेल तरी तसं सांगा म्हणजे कोणते उद्योग टाकावेत याचा साधारण अंदाज येइल. Happy